Wednesday, 3 January 2024

राजकारण माध्ये येण्यासाठी समाज सेवा महत्वाची


शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 साठी

 शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

            मुंबई दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रकारसमाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी2023 ते 31 डिसेंबर2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी2024 असा आहे.

            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई-32येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

1.

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)

1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)

2.

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

3.

अनंत


नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांकडून महोत्सवाच्या तयारीचा आढावा

महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवडमहोत्सवाचे यशस्वी आयोजन करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. 2 : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी कराअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारग्रामविकास मंत्री गिरीश महाजनक्रीडा मंत्री संजय बनसोडेमुख्य सचिव डॉ. नितीन करीरक्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित होते. नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसेविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

            युवकांचा सर्वांगीण विकास करणेसंस्कृती व परंपरा जतन करणेयुवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला मिळाली आहे. त्यामुळे नाशिक येथे १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ होणार आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील युवांचे चमू सहभागी होणार आहेत. त्यामुळे महोत्सवाचे आयोजन यशस्वी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

            या महोत्सवात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यातील प्रत्येकी १०० युवांचा चमूराष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवकनेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे ८ हजार जण यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक येथील तपोवन मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवांतर्गत सांस्कृतिककौशल्य विकासयुवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समूह लोकनृत्यलोकगीतकथा लेखनपोस्टर स्पर्धावक्तृत्वछायाचित्रहस्तकलावस्त्रोद्योगकृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे.

            महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीमुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समितीविभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठित करण्यात आली आहे. त्याचबरोबर गृहवित्तमहसूलकृषीउच्च व तंत्रशिक्षणसांस्कृतिक कार्यपर्यटनशालेय शिक्षण या विविध विभागांचा सहभाग असून त्यांनी समन्वयातून या महोत्सवाचे आयोजन करावेअसे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

            आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निवासभोजन व्यवस्थाकार्यक्रमस्थळ याबाबत आढावा घेतला. त्याचबरोबर महोत्सवासाठी करण्यात आलेले बोधचिन्हघोषवाक्य याबाबत क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.

जलेश्वर तलावाजवळील अतिक्रमण काढण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी

 जलेश्वर तलावाजवळील अतिक्रमण

काढण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी

मंत्री शंभूराज देसाई

            मुंबईदि. 02 : हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाजवळ अतिक्रमणे आहेत. याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमानुसार जिल्हा प्रशासनाने कारवाई करावीअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

            मंत्रालयात यासंदर्भात बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव लोणीकरअमोल मिटकरीबच्चू कडू तसेच नगरविकासमहसूल विभागाचे  अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अधिकारी  उपस्थित होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणालेअतिक्रमण केलेल्या नागरिकांची दुसरीकडे निवासस्थाने आहेत काय याचा शोध घ्यावा. या कारवाईत कुणीही बेघर होणार नाहीयाची काळजी घ्यावी. अतिक्रमण काढण्यासाठी नियमानुसार व न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करावी. बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी माहिती दिली.

*****

शेगाव – पंढरपूर मार्गावरील रखडलेली कामे पूर्ण करावीत

 शेगाव – पंढरपूर मार्गावरील रखडलेली कामे पूर्ण करावीत

- उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

            मुंबईदि. 02 : शेगाव – पंढरपूर महामार्गावर काही ठिकाणी पुलांचे काम कामे पूर्ण नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील रखडलेली कामे संबंधित कंत्राटदार कंपनीने पूर्ण करावीत. कामे पूर्ण न केल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करावीअशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिल्या.

             मंत्रालयात शेगाव-पंढरपूर महामार्गावरील रखडलेल्या कामांबाबत बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव लोणीकरअमोल मिटकरीबच्चू कडूमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता संदीप श्रावणेश्री. सुरवसे आदी उपस्थित होते, तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण वानखेडे व अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणालेकंपनीने काम पूर्ण न करता जाऊ नयेरखडलेली कामे पूर्ण करावीत. कंत्राटदार कंपनीला नोटीस देऊन 15 दिवसांत काम पूर्ण करण्याची मुदत द्यावी. त्यानंतरही कंपनीने काम पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई प्रस्तावित करावी. कंपनीने गौण खनिजकर बुडविला असल्यास दंड लावावादंडाची वसुली करावी. शेतकऱ्यांची जमीन, गौण खनिज ठेवण्यासाठी किंवा रस्ता कामाचे साहित्य ठेवण्यासाठी उपयोगात आणली असल्यास त्यांना मोबदला द्यावा. नाहक शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नयेअसेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.   

****

शिवणी विमानतळ धावपट्टी लांबीबाबत जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा

 शिवणी विमानतळ धावपट्टी लांबीबाबत

जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा

- मंत्री शंभूराज देसाई

            मुंबईदि. 2 : अकोला शहराजवळील शिवणी विमानतळाची धावपट्टी वाढवून विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शिवणी विमानतळ धावपट्टीच्या 1800 मीटर लांबीकरीता जागेची कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र  ही धावपट्टी 2500 मीटर पर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये 1800 मीटर धावपट्टी वाढवून  विमानतळ सुरू करणे व 2500 मीटरपर्यंत धावपट्टी वाढवून नाईट लॅण्डिग’ सुविधेसह सुरु करणे या दोन्ही प्रस्तावांचा अकोला जिल्हाधिकारी स्तरावर छाननी करून तुलनात्मकदृष्टया परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनास सादर करावाअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

            मंत्रालयात अकोला जिल्ह्यातील शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराबाबत बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला आमदार अमोल मिटकरीमहाराष्ट्र विमानपत्तन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेअपर जिल्हाधिकारी दीपक नरवडेभारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विभागीय व्यवस्थापक माया चौधरीश्री. त्रिपाठीसामान्य प्रशासन विभागाचे श्री. गावडे उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आमदार सर्वश्री रणधीर सावरकरवसंत खंडेलवालजिल्हाधिकारी अजित कुंभार उपस्थित होते. 

            मंत्री श्री. देसाई म्हणालेविमानतळाची 2500 मीटरपर्यंत धावपट्टी वाढवायची असल्यास आवश्यक असणाऱ्या खासगी जमिनीचे संपादन करावे लागेल. याबाबत संबंधित जमीन धारकांना बोलावून जिल्हा प्रशासनाने एक दर ठरवून घ्यावा. संबंधित जमिनीवर असलेले बांधकामपडीक जागा यानुसार दर ठरवावा. त्यानुसार जमीन धारकांना मोबदला देण्यात यावा. तसेच विमानतळ दोन टप्प्यात सुरू करण्याबाबत चाचपणी करावी, असा सर्वंकष प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाकडे सादर करावा. याबाबत आवश्यक निधीची व्यवस्था करण्यात येईल.

            बैठकीत आमदार श्री. मिटकरीश्री. सावरकरश्री. खंडेलवाल यांनी सूचना केल्या


भगवान रामाचा दरबार आणि हनुमान यांचे दर्शन घडवणारे हे भांडे सन 1818 ला तयार केलेले असून

 भगवान रामाचा दरबार आणि हनुमान यांचे दर्शन घडवणारे हे भांडे सन 1818 ला तयार केलेले असून

या भांड्याजवळ सुई घेऊन गेलो तर स्पर्श करत नाही,

नट बोल्ट जवळ घेऊन गेलो तर नट उघडला जातो

अन

काडी घासली तर पेटते

अन हो

हे भांडे कोणी तयार केले आहे?

इंग्रजांच्या 

ईस्ट इंडिया कंपनीने


Featured post

Lakshvedhi