Wednesday, 3 January 2024

जलेश्वर तलावाजवळील अतिक्रमण काढण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी

 जलेश्वर तलावाजवळील अतिक्रमण

काढण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी

मंत्री शंभूराज देसाई

            मुंबईदि. 02 : हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाजवळ अतिक्रमणे आहेत. याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमानुसार जिल्हा प्रशासनाने कारवाई करावीअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

            मंत्रालयात यासंदर्भात बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव लोणीकरअमोल मिटकरीबच्चू कडू तसेच नगरविकासमहसूल विभागाचे  अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अधिकारी  उपस्थित होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणालेअतिक्रमण केलेल्या नागरिकांची दुसरीकडे निवासस्थाने आहेत काय याचा शोध घ्यावा. या कारवाईत कुणीही बेघर होणार नाहीयाची काळजी घ्यावी. अतिक्रमण काढण्यासाठी नियमानुसार व न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करावी. बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी माहिती दिली.

*****

शेगाव – पंढरपूर मार्गावरील रखडलेली कामे पूर्ण करावीत

 शेगाव – पंढरपूर मार्गावरील रखडलेली कामे पूर्ण करावीत

- उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

            मुंबईदि. 02 : शेगाव – पंढरपूर महामार्गावर काही ठिकाणी पुलांचे काम कामे पूर्ण नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील रखडलेली कामे संबंधित कंत्राटदार कंपनीने पूर्ण करावीत. कामे पूर्ण न केल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करावीअशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिल्या.

             मंत्रालयात शेगाव-पंढरपूर महामार्गावरील रखडलेल्या कामांबाबत बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव लोणीकरअमोल मिटकरीबच्चू कडूमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता संदीप श्रावणेश्री. सुरवसे आदी उपस्थित होते, तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण वानखेडे व अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणालेकंपनीने काम पूर्ण न करता जाऊ नयेरखडलेली कामे पूर्ण करावीत. कंत्राटदार कंपनीला नोटीस देऊन 15 दिवसांत काम पूर्ण करण्याची मुदत द्यावी. त्यानंतरही कंपनीने काम पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई प्रस्तावित करावी. कंपनीने गौण खनिजकर बुडविला असल्यास दंड लावावादंडाची वसुली करावी. शेतकऱ्यांची जमीन, गौण खनिज ठेवण्यासाठी किंवा रस्ता कामाचे साहित्य ठेवण्यासाठी उपयोगात आणली असल्यास त्यांना मोबदला द्यावा. नाहक शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नयेअसेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.   

****

शिवणी विमानतळ धावपट्टी लांबीबाबत जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा

 शिवणी विमानतळ धावपट्टी लांबीबाबत

जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा

- मंत्री शंभूराज देसाई

            मुंबईदि. 2 : अकोला शहराजवळील शिवणी विमानतळाची धावपट्टी वाढवून विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शिवणी विमानतळ धावपट्टीच्या 1800 मीटर लांबीकरीता जागेची कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र  ही धावपट्टी 2500 मीटर पर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये 1800 मीटर धावपट्टी वाढवून  विमानतळ सुरू करणे व 2500 मीटरपर्यंत धावपट्टी वाढवून नाईट लॅण्डिग’ सुविधेसह सुरु करणे या दोन्ही प्रस्तावांचा अकोला जिल्हाधिकारी स्तरावर छाननी करून तुलनात्मकदृष्टया परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनास सादर करावाअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

            मंत्रालयात अकोला जिल्ह्यातील शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराबाबत बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला आमदार अमोल मिटकरीमहाराष्ट्र विमानपत्तन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेअपर जिल्हाधिकारी दीपक नरवडेभारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विभागीय व्यवस्थापक माया चौधरीश्री. त्रिपाठीसामान्य प्रशासन विभागाचे श्री. गावडे उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आमदार सर्वश्री रणधीर सावरकरवसंत खंडेलवालजिल्हाधिकारी अजित कुंभार उपस्थित होते. 

            मंत्री श्री. देसाई म्हणालेविमानतळाची 2500 मीटरपर्यंत धावपट्टी वाढवायची असल्यास आवश्यक असणाऱ्या खासगी जमिनीचे संपादन करावे लागेल. याबाबत संबंधित जमीन धारकांना बोलावून जिल्हा प्रशासनाने एक दर ठरवून घ्यावा. संबंधित जमिनीवर असलेले बांधकामपडीक जागा यानुसार दर ठरवावा. त्यानुसार जमीन धारकांना मोबदला देण्यात यावा. तसेच विमानतळ दोन टप्प्यात सुरू करण्याबाबत चाचपणी करावी, असा सर्वंकष प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाकडे सादर करावा. याबाबत आवश्यक निधीची व्यवस्था करण्यात येईल.

            बैठकीत आमदार श्री. मिटकरीश्री. सावरकरश्री. खंडेलवाल यांनी सूचना केल्या


भगवान रामाचा दरबार आणि हनुमान यांचे दर्शन घडवणारे हे भांडे सन 1818 ला तयार केलेले असून

 भगवान रामाचा दरबार आणि हनुमान यांचे दर्शन घडवणारे हे भांडे सन 1818 ला तयार केलेले असून

या भांड्याजवळ सुई घेऊन गेलो तर स्पर्श करत नाही,

नट बोल्ट जवळ घेऊन गेलो तर नट उघडला जातो

अन

काडी घासली तर पेटते

अन हो

हे भांडे कोणी तयार केले आहे?

इंग्रजांच्या 

ईस्ट इंडिया कंपनीने


कामगार मंत्र्यांनी केला कंपनी मालक आणि कामगार संघटना यांच्यात समेट कामगारांशी संपमागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा

 कामगार मंत्र्यांनी केला कंपनी मालक आणि कामगार संघटना यांच्यात समेट

कामगारांशी संपमागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा

 

            मुंबईदि. 2 :- वालचंदनगर येथील मे. वालचंदनगर इंडस्ट्रीजमध्ये 42 दिवसांपासून सुरु असलेल्या कामगारांच्या संपाबाबत कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज कंपनी मालक आणि कामगार संघटना प्रतिनिधी यांच्यात समेट घडवून आणत संप मिटविण्याबाबत कामगारांशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी कामगार मंत्र्यांनी कंपनीने कामगारांचे थकीत वेतन दोन महिन्यांत द्यावेकामगार आणि कंपनीमध्ये झालेला करारनाम्याचे दोन महिन्यांत नुतनीकरण करावेअशा सूचना दिल्या.

            मंत्रालयातील समिती कक्षात याबाबत कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरेहर्षवर्धन पाटीलकामगार आयुक्त सतीश देशमुखउपायुक्त दादासाहेब खताळअभय गीतेकंपनीचे व्यवस्थपकीय संचालक चिराग दोशीमहाव्यवस्थापक संजय गायकवाडउपाध्यक्ष धीरज केसकरकामगार संघटनांचे अध्यक्ष राहुल नावडेकरकपिल गायकवाडगणेश सानपनीलेश गुळवे, सुनील माने, सराजी दबडे  उपस्थित होते.

            कंपनीच्या आस्थापनेवर असलेल्या कामगारांचे फेब्रुवारीमार्च आणि एप्रिल २०२३ या तीन महिन्यांचे वेतन थकीत होते. वेतनवाढवैद्यकीय देयके अशी २०२१ पासूनची थकीत देणीतसेच कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये कामगारांचे वेतन आणि भत्त्यासंदर्भातील करार प्रलंबित होता. या मागण्यांसाठी कामगारांनी संप पुकारला होता. हा संप मिटवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या मागणीनुसार कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी यात समेट घडवून आणला.

            यावेळी कामगार मंत्री यांनी इंडस्ट्रीने कामगारांचे थकीत वेतन आणि इतर कायदेशीर देणी मिळून होणारी ७ कोटी ८५ लक्ष रुपयांची रक्कम तीन टप्प्यात द्यावी, असे सांगितले. ४० टक्के रक्कम कामगार रुजू होताच सात दिवसांत द्यावी. तसेच उर्वरीत ६० टक्के रक्कम दोन महिन्यांत ३० टक्के प्रमाणे देऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत १०० टक्के थकित रक्कम अदा करावी. शिवाय कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील करार हा एक महिन्यात संपुष्टात येईलत्याचे नूतनीकरण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला. तसेच कामगारांनी सुद्धा ४ जानेवारीपासून संप मागे घेऊन तत्काळ कामावर रुजू व्हावे. कंपनीने कोणत्याही कामगारावर कारवाई करू नयेअसे निर्देश कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी दिले.

            कामगारांच्या विश्वासावर कंपनी उभी राहते. कामगारांनी सुद्धा संपावर जाण्यामुळे त्यांचे स्वत:चे नुकसान होते याचा विचार करावा. संपावर जाण्यापूर्वी व्यवस्थापनाशी चर्चा करावी आणि कंपनीने सुद्धा चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देऊन कामगारांच्या  मागण्या मान्य केल्यास कंपनी आणि कामगार दोघांचेही नुकसान टाळता येईल, असेही डॉ. खाडे म्हणाले.

००००

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहणार मुंबई, कोकण विभाग पदवीधरसह नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

 विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर

मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहणार

मुंबईकोकण विभाग पदवीधरसह नाशिक व मुंबई विभागातील

शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. 2 : भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला  शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 डिसेंबर 2023 रोजी संपला असलातरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीकरिता मतदार नाव नोंदणी करण्याकरिता निरंतर अद्यावतन कार्यक्रम (Continuous Updation) प्रक्रिया सुरु राहणार आहे. पुरवणी यादीच्या स्वरुपात मतदारांची नावे अंतिम मतदार यादीस जोडण्यात येतील.  मात्रया निवडणुकांच्या नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर मतदार यादीमध्ये कोणतीही दुरुस्ती/सुधारणा करता येणार नाही. 30 डिसेंबर 2023 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदारसंघाच्या  अंतिम मतदार याद्यांमध्ये पात्र  व्यक्तीचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्‍ट नसेलअशी व्यक्ती मतदार यादीमध्ये विहित प्रपत्रातील अर्जाद्वारे अद्यापही आपली नाव नोंदणी करु शकतेअसे राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपसचिव म. रा. पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            श्री. पारकर यांनी म्हटले आहे कीविधानपरिषदेच्या मुंबई व कोकण विभाग पदवीधरमुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. त्याकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात आाला. आता  अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 

            या मतदार संघामध्ये सन 2018 मध्ये नोंदविण्यात आलेल्या मतदारांची संख्या व सन 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांकरीता तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीतील मतदारांची संख्येची माहिती अशी (अनुक्रमे मतदारसंघाचे नावसन २०१८ च्या निवडणुकीकरीता झालेली एकूण मतदार नोंदणीसन २०२४ च्या निवडणुकीकरीता तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीप्रमाणे एकूण मतदार नोंदणी) :  मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ४५७३५९११२०. कोकण विभाग पदवीधार विधान परिषद मतदारसंघ१०४४८८१७७४६५. मुंबई शिक्षक विधान परिषद मतदारसंघ८७२२१४५५८. नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघ५३८९२६४८०२.

            पदवीधर मतदार नाव नोंदणी करण्याकरिता ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज (प्रपत्र क्र.18) भरु शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://gterollregistration.mahait.org/ ज्या पात्र शिक्षक मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नाहीअसे पात्र शिक्षक मतदार नाव नोंदणी करण्याकरिता ऑफलाईन अर्ज (प्रपत्र-19) त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत भरु शकतात. यासाठीचे अर्ज विभागीय आयुक्त (या निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी)संबधित जिल्हाधिकारी  (या निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी)विभागीय आयुक्तांकडून पदनिर्देशित केलेले उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. योग्यरित्या भरलेले अर्ज त्या कार्यालयात भरुन देता येतील. त्याच प्रमाणेहा नमुना मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Downloads/DownloadForms/Form-18.pdf तसेचDownloads/DownloadForms/Form-19.pdf व  Downloads/DownloadForms/Certificate -Form-19.pdf  येथे सुद्धा उपलब्ध आहेअसेही सह मुख्य निवडणूक अधिकारी श्री. पारकर यांनी म्हटले आहे.

००००

माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात माजी विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे

 माझी शाळासुंदर शाळा’ अभियानात

माजी विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे

- मंत्री दीपक केसरकर

----

अभियानातील विजेत्या शाळांना मुख्यमंत्री भेट देणार

            मुंबईदि. 2 : राज्यात सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ अभियानात राज्यातील सर्व शाळा सहभागी होत आहेत. याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन शाळांना मुख्यमंत्री स्वत: भेट देणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आपली शाळा - सुंदर शाळा ठरावी यासाठी या अभियानात माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.

            ‘मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ अभियानाचे उद्घाटन 5 डिसेंबर 2023 रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मंत्री श्री.केसरकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओलशालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरेप्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीप डांगेमाध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशीसहसचिव इम्तियाज काझीमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            या अभियानांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पत्र लिहिले असून सुमारे दोन कोटी विद्यार्थी या पत्राचे आपल्या पालकांसमोर वाचन करणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक व्यवस्थेतून आलेल्या अनुभवांवर आधारित घोषवाक्य लिहून अपलोड केले जाणार आहे. यामधून प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्यांची निवड करून विजेत्यांना मुंबई येथे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.

            राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. तर बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळावर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा अशा तीन स्तरांवर हे अभियान राबविण्यात येणार आहे.

अभियानाची उद्दिष्टे

            विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययनअध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणेक्रीडाआरोग्यवैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणेराज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणेराष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणेविशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणेत्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन व्यक्तिमत्त्वाचे जडणघडण करणे तसेच शिक्षकविद्यार्थीमाजी विद्यार्थीपालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.

अभियानाचे स्वरूप

            अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना गुणांकन देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 60 गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी 40 गुण देण्यात येतील. यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांच्या आयोजनामध्ये शाळा व परिसराच्या सौंदर्यीकरणविद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातीलव्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभागशैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रमशाळेची इमारत व परिसर स्वच्छताराष्ट्रीय एकात्मताविविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन (देशी खेळांना प्राधान्य)त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांच्या सहभागासाठी गुणांकन दिले जाणार आहे.

पारितोषिके

            राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी वर्गवारी निहाय प्रत्येकी 51 लाख रुपयेद्वितीय क्रमांकासाठी 21 लाख रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 11 लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विभागजिल्हा आणि तालुका स्तरावर देखील दोन्ही वर्गवारीमध्ये स्वतंत्ररित्या पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000

Featured post

Lakshvedhi