Monday, 1 January 2024

पोटात चार पेग पडल्यावर किती काॅन्फीडन्स वाढतो,

 *पोटात चार पेग पडल्यावर किती काॅन्फीडन्स वाढतो, ते  पहा ! म्हणून म्हणतो अधूनमधून थोडी तरी घेत रहा !!31stची तयारी*


कमरेच सोडून डोक्याला बांधणे काय असते ते स्पष्ट केलय,नक्की पहावं अस .

 कमरेच सोडून डोक्याला बांधणे काय असते ते स्पष्ट केलय,नक्की पहावं अस .


झेपेल तेवढीच प्या भले तुम्ही पिण्यात वाघ असाल 🤣🤣

 आज झेपेल तेवढीच प्या भले तुम्ही पिण्यात वाघ असाल 🤣🤣


नववर्ष प्रारंभ

 नववर्ष प्रारंभ

नवीन आशा, नवीन ध्येये

नव तरुणांना निर्मू दे.

रामचरित गुणगान गात गात

तसेच त्यांना होऊ दे.

मातृभक्ती, पितृभक्ती, राष्ट्रभक्ती

हृदयी त्यान्च्या वसू दे

कनकम्बेच्या कृपाप्रसादे

नव वर्षाला उजळू दे

Sunday, 31 December 2023

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

 शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी

कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई दि. 28 : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांच्यासह कृषी विभाग व कृषी आयुक्तालय येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध संचालक व कृषी विद्यापीठांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            मंत्री श्री. मुंडे म्हणाले, राज्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.यामध्ये कृषी विभागाची जबाबदारी मोठी आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी जेवढ्या निधीची तरतूद केली आहे तो सर्व निधी वेळेत खर्च करावा. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना असणाऱ्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. त्यातून शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

            ‘सेंद्रीय शेती विषमुक्त शेती’ या सारख्या योजना प्रभावीपणे राबवाव्या. तृणधान्याला आता मोठी मागणी आहे. यादृष्टीने शेतकऱ्यांनी तृणधान्ये उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तृणधान्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ॲप विकसित करून डी मार्ट - ॲमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मना थेट शेतकऱ्यांना जोडण्याचे काम करावे, अशीही सूचना त्यांनी केली.

            शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक पद्धती घेण्यासाठी सल्ला देणारी यंत्रणा विकसित करावीजागतिक कृषी गणना व शेती विषयक आकडेवारी सादर करण्याच्या योजनेअंतर्गत रिक्त पदे कृषी पर्यवेक्षकांच्या पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव तयार करावाकृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात मोहीम प्रभावीपणे राबवावीपिकांवरील कीड नियंत्रणासाठी ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावाटपाल खात्याची मदत घेऊन शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात माती परीक्षण अहवाल सादर करावा असे विविध निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

            केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली, तर आणखी वाढीव निधीची मागणी करता येईल. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करावा. विभागाने आर्थिक वर्षात केलेल्या तरतुदीप्रमाणे खर्च केल्यास नवीन वर्षांत वाढीव निधीची मागणी करता येईल, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

0000

प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी

 प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

                मुंबईदि. 28 : ‘म्हाडा’च्या माध्यमातून मुंबई परिसरात गृहनिर्माण पुनर्विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.   

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीस गृहनिर्माण मंत्री अतुल सावेकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीगृहनिर्माण विभागाशी संबंधित शासनाकडे प्रलंबित असलेले विषय तातडीने मार्गी लावावेत. गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात यावा. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात कामे अधिक वेगाने करावीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येथील आदिवासी व अतिक्रमित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी ‘म्हाडा’ व नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच मुंबईतील ‘म्हाडा’च्या मालकीच्या जागेवर असलेल्या 27 पोलीस वसाहतींचा विकास म्हाडामार्फत करण्यात यावाअसे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधितांना दिले.

            सायन - कोळीवाडा येथील 1200 सदनिका पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. एलआयसी कॉलनी पुनर्विकासाबाबत म्हाडाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच ९१(अ) अंतर्गत रखडलेल्या प्रकल्पाबाबत प्राप्त प्रस्तावांना म्हाडाने गती द्यावी, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या.

जेएन- 1’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी

 जेएन- 1’ घातक नाहीनागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी

- आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

 

            मुंबईदि. 28 : राज्यात कोरोनाच्या जेएन-1’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन करण्यात आले असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. कोरोनाचा जेएन-1’ हा नवीन  उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावेअसे आवाहन मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

               ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन करण्यात आले आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची बैठक आज झाली.

                आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक धीरजकुमारसर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीमहानगरपालिकांचे आयुक्तजिल्हा आरोग्य अधिकारीमहानगरपालिका आरोग्य अधिकारीजिल्हा शल्यचिकित्सकतसेच टास्क फोर्सचे सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकरबी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्तेपुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) डॉ. वर्षा पोतदारनवले वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. डी. बी. कदमआरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्य:स्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सादरीकरण केले. 

                 ‘जेएन-1’ साठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असली तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रशासकीय रुग्णालयांमध्ये रंगीत तालीम झालेली नाही तेथे ती करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवाव्यात्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करावेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी लोक पर्यटनस्थळेधार्मिक स्थळी जातात. मात्र, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नयेअसे आवाहनही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानंतर लोक परत आपापल्या घरी येतीलत्यामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहेत्यामुळे पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सतर्क रहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सुचविल्या जातीलअसेही त्यांनी सांगितले.

            टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलेजेएन- 1 या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईलअशी परिस्थिती सध्या नाही. मात्र, तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.  उपचारामध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावली तसेच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. कानिटकरडॉ. कार्यकर्तेडॉ. पोतदारडॉ. कदम यांनी विविध सूचना केल्या.

Featured post

Lakshvedhi