Sunday, 31 December 2023

बृहन्मुंबई हद्दीत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी

 बृहन्मुंबई हद्दीत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी

 

            मुंबईदि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 5 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

           या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंधमिरवणूक काढणेमिरवणुकीत लाऊडस्पीकरवाद्येवाद्य बॅण्ड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभअंत्यविधी कार्यक्रमकंपन्यासहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठकाक्लबमध्ये होणारे कार्यक्रमसामाजिक मेळावेसहकारी संस्थाइतर सोसायट्या आणि संघटना यांच्या बैठकांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

            चित्रपटगृहेनाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणेन्यायालयेशासकीयनिमशासकीय कार्यालयेशाळामहाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्थाकंपन्याकारखानेदुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापारव्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहेअसे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

००००

आई' नीति के अंतर्गत एमटीडीसी के पर्यटक आवासों में

 आईनीति के अंतर्गत एमटीडीसी के पर्यटक आवासों में

महिलाओं के लिए 50 प्रतिशत छूट

                                               - पर्यटन मंत्री गिरीश महाजन

            मुंबई30 :   राज्य सरकार की 19 जून 2023 की 'आईमहिला केंद्रित/लिंग समावेशी पर्यटन नीति के अनुसारमहिला पर्यटकों और महिला उद्यमियों के लिए एमटीडीसी की विभिन्न योजनाएं लागू की जा रही हैं।  पर्यटन मंत्री गिरीश महाजन ने जानकारी दी है कि इस नीति के अंतर्गत अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के मद्देनजर 1 से 8 मार्च 2024 तक 8 दिनों के लिए महामंडल के सर्वश्रेष्ठ पर्यटक आवास गृहों में महिलाओं के लिए 50 प्रतिशत की छूट दी जायेगी। 

            मंत्री श्री महाजन ने कहाएमटीडीसी के रिसॉर्ट्स/पर्यटक आवास राज्य के प्रत्येक कोने में महत्वपूर्ण स्थानों पर स्थित हैं। महामंडल के कुल 34 पर्यटक आवास27 उपहारगृहनिवास और जलपान (Bed and Breakfast), महाभ्रमणकलाग्रामयात्री केंद्र (Visitor Centre’s) ईको टूरिज्म जैसे अनुभवशील उपक्रम हैं।  साथ ही हाल ही में एमटीडीसी ने जवाबदेह पर्यटन (Responsible Tourism) के तहत एक बड़े स्तर पर गतिविधि शुरू की है।  इसी प्रकार बीच रिसॉर्टहिल रिसॉर्टजंगल रिसॉर्ट जैसे विभिन्न प्रकार के पर्यटक आवास और उपहारगृह तथा बोट क्लबस्कूबा डाइविंग (IISDA) आदि जल क्रीड़ा केंद्र पर्यटकों को आकर्षित करते हैं। 

            मंत्री श्री महाजन ने कहामहाराष्ट्र राज्य पर्यटन की दृष्टि से एक महत्वपूर्ण राज्य है।  महाराष्ट्र देश का एकमात्र ऐसा राज्य हैजहां 6 विश्व धरोहर स्थल850 से अधिक गुफाएंकरीब 400 किले और दुर्ग स्थित हैं।  इसके अतिरिक्त महाराष्ट्र विभिन्न पर्वत श्रृंखलाओंराष्ट्रीय उद्यानोंवन्यजीव अभयारण्योंसमुद्र तटोंनदियोंसांस्कृतिक विरासतरीति-रिवाजोंपरंपराओंवेशभूषात्योहारोंउत्सवों से समृद्ध है।  महाराष्ट्र के ये शानदारदर्शनीय और ऐतिहासिक स्थल सदैव देशी-विदेशी पर्यटकों को आकर्षित करते हैं।  1975 में अपनी स्थापना से लेकर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल पूरे महाराष्ट्र में प्रथम क्रमांक की अग्रणी पर्यटन संस्था है।  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल के सभी पर्यटक आवास गृहों में 'अतिथि देवो भवके मूल्यों का पूरी तरह से पालन किया जाता है। एमटीडीसी को महाराष्ट्र में एक प्रसिद्ध महामंडल के रूप में देखा जाता है जो रिसॉर्ट्स और पर्यटक आवासों में पर्यटकों को उत्तम आतिथ्य प्रदान करता है।                            

            इस अवसर का लाभ उठाने के लिए महामंडल की आधिकारिक वेबसाइट www.mtdc.co. पर संपर्क करें।  इसके लिए कुछ नियम और शर्तें हैं। आपके पास पहचान पत्र होना चाहिए। यह छूट केवल महिला पर्यटकों के लिए है।  महिला पर्यटकों को आवास में प्रवेश (चेक-इन) के समय उपस्थित रहना अनिवार्य है।

इसके लिए नियम एवं शर्तें इस प्रकार हैं।  यह छूट 01 से 08 मार्च की अवधि तक वैध रहेगी। यह छूट कॉन्फ


आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 टक्के सवलत

 आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये

 महिलांसाठी 50 टक्के सवलत

- पर्यटन मंत्री गिरीश महाजन

 

            मुंबईदि.30 : राज्यशासनाच्या 19 जून 2023 रोजीच्या आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

            मंत्री श्री.महाजन म्हणाले, एमटीडीसीची रिसॉर्ट्स / पर्यटक निवासे ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. महामंडळाची एकूण 34 पर्यटन निवासे27 उपहारगृहे असूननिवास व न्याहारी (Bed and Breakfast), महाभ्रमणकलाग्रामअभ्यागत केंद्र (Visitor Centre’s), इको टुरिझम यांसारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत. तसेच अलिकडेच जबाबदार पर्यटन (Responsible Tourism) अंतर्गत एमटीडीसीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरु केली आहे. त्याचप्रमाणे बीच रिसोर्टहिल रिसोर्टजंगल रिसोर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपहारगृहे तसेच बोट क्लबस्कूबा डायविंग (IISDA) इ. जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात.

            महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्र हे देशातील असे एकमेव राज्य आहेज्यामध्ये 6 जागतिक वारसा स्थळे850 हून अधिक लेण्या400 च्या जवळपास दुर्ग व गडकिल्ले आहेत. तसेच महाराष्ट्र विविध पर्वत रांगाराष्ट्रीय उद्यानेवन्यजीव अभयारण्यसमुद्रकिनारेनद्यासांस्कृतिक वारसारुढीपरंपरावेशभूषासणउत्सव यांनी समृद्ध आहे. महाराष्ट्रातील ही


Àपॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश

 

 

            मुंबईदि. 29 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक जसे पॅराग्लाइडर्सरिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्टड्रोनपॅरा मोटर्सहॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 18 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहेअसे पोलीस उपायुक्तविशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

            मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाहीसामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाहीअति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाहीसार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे आदेश लागू आहेत. मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप आयुक्त (अभियान)बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी अपवाद राहीलअसेही या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे.

      या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल.

००००

बृहन्मुंबई हद्दीत 9 जानेवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

  

बृहन्मुंबई हद्दीत 9 जानेवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

 

            मुंबईदि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 9 जानेवारी 2024 पर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र वाहतूक बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.

           या आदेशानुसार शस्त्रेअग्नीशस्त्रेबॅटनतलवारीभालेदंडुकेविना परवाना बंदुकाचाकूकाठ्या किंवा लाठ्या,इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी करण्यासाठी वापरली जाऊ शकतेअशी हत्यारे बाळगणेस्फोटके वाहून नेणेप्रेतआकृतीपुतळे यांचे प्रदर्शनसार्वजनिक टिकाकरण उच्चारगाणी गाणेसंगीत वाजवणे यावर बंदी घालण्यात येत आहे.

         कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेतनोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार शस्त्रे बाळगण्यासाठी तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखाचौकीदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहेअसे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

००००

सर्वंकष स्वच्छता मोहीम लोकचळवळ व्हावी

 सर्वंकष स्वच्छता मोहीम लोकचळवळ व्हावी

                                       -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

ठाणेदि. 30(जिमाका) :- सर्वंकष स्वच्छता मोहीम (Deep Clean Drive) ही लोकचळवळ व्हावीहे अभियान मुंबईमुंबई महानगरएमएमआरडी क्षेत्र असे टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर राबविण्यात येईलअसे  प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ‍

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची (#DeepCleaningCampaign) ठाण्यातील सुरूवात आज वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातून करण्यात आलीत्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेत मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाले होते.

     यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगरजिल्हाधिकारी अशोक  शिनगारेपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेमाजी आमदार  रवींद्र फाटकमाजी महापौर नरेश म्हस्केमाजी नगरसेवक अशोक वैतीएकनाथ भोईरयोगेश जानकरडॉ. जितेंद्र वाघ,  एकता भोईरसंध्या मोरेशिल्पा वाघमनिषा कांबळेमहापालिकेचे अधिकारी -कर्मचारीठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघभजनी मंडळेनानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,  अनिरुद्ध बापू सेवा मंडळसंत निरंकारी सेवा मंडळस्वामी समर्थ सेवा मंडळविविध महाविद्यालयांचे एन.एस.एसएन.सी.सी चे विद्यार्थीशालेय विद्यार्थी यांनीही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेठाण्यातील प्रदूषण तुलनेने कमी असून ते आणखी  कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरित पट्टे तयार करावेत जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील. तसेच  मियावाकी पध्दतीने वृक्षलागवड करुन शहरात जंगले (Urban forest) तयार करावीत. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जिथे स्वच्छता असेल तेथे लोक कचरा टाकत नाहीत. आज बीएमसी पाईपलाईन येथे साठलेला कचरा साफ केला जातो आहेत्याठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार कराजेणेकरुन त्याचे दृश्य स्वरुप नागरिकांना दिसेल.

       ठाण्यातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होवू नयेयासाठी वाहतुकीचे ‍नियोजन करावे. त्याचप्रमाणे फेरीवाल्यांना हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करावेअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

       स्वच्छता अभियानाचे ठाणे महानगरपालिकेने केलेले नियोजन हे उत्कृष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विशेषतत्वाने नमूद केले. त्यांनी यावेळी जयेश गायकवाड व अनिता शिरसाट या सफाई कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान केला.

     मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तीन हात नाक्यावरुन मॉडेला नाका मार्गे वागळे मुख्य रस्ता, 16 नं. येथील बीएमसी पाईपलाईनवरील पूलरोड नं. 21, रोड नं 22 येथील शिवसेना शाखा येथून चालत सर्व ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वत:ही काही ठिकाणी रस्त्यांची सफाई केली तसेच फूटपाथवर पाण्याची फवारणी करुन फूटपाथ स्वच्छ केले.

       या अभियानात सहभागी झालेल्या भजनी मंडळस्वच्छता स्वयंसेवकज्येष्ठ नागरिक संघएन.सी.सीएन.एस.एसशालेय विद्यार्थी  तसेच विविध धार्मिक संस्थामार्फत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना भेट देवून त्यांच्याशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला.

   सर्वंकष स्वच्छता अभियानाच्या नियोजनाबाबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले कीआज वागळे इस्टेट प्रभागापासून या मोहिमेचा प्रारंभ झाला असून दर शनिवारी एक याप्रमाणे 24 फेब्रुवारी 2024 पर्यत प्रत्येक प्रभाग समितीत हे अभियान राबविले जाणार आहे. या  अभियानात मार्केटगल्ल्याबसस्थानकेफूटपाथदुभाजकनालेमैदानेकचरा जमा होणारी ठिकाणेविसर्जन घाट अशा सर्व सार्वजनिक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानात एकूण हजार 500 महापालिकेचे कर्मचारी, 1 हजार 797 स्वच्छता कर्मचारीविविध संस्थाचे स्वयंसेवक असे हजारांहून जास्त मनुष्यबळ या अभियानात सहभागी झाले असून त्यांच्यामार्फत सफाई केली जात  आहे.  सफाईसाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्रीपाण्याचे टँकरप्रथमोचाराची साधनेऍम्ब्युलन्स अशा सेवा त्यांना पुरविण्यात आल्या आहेत.

0000000000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण

 

जालनादि. 30 (जिमाका) :- जिल्हा नियोजन समिती  व पोलीस महासंचालकमुंबई यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या 14 चारचाकी आणि 20 मोटारसायकल वाहनांचे पोलीस आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत जालना पोलीस दलासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.

जालना येथील रेल्वे स्थानक परिसरात आयोजित या कार्यक्रमास  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेजालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावेविधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेआमदार बबनराव लोणीकरआमदार कैलास गोरंटयालआमदार नारायण कुचेआमदार राजेश राठोडआमदार संतोष दानवे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, माजी मंत्री अर्जुन खोतकर,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळपोलीस अधिक्षक शैलेश बलकवडेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी  अधिकारी वर्षा मीना आदी उपस्थित होते.

0000

                                                    

Featured post

Lakshvedhi