Monday, 4 December 2023

महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार

 महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार

मंत्री मंगल प्रभात लोढा

 

मुंबईदि. 4 : राज्य शासनाच्यावतीने मुंबई येथे चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभारणार असल्याची माहिती कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज येथे दिली.

चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४८ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पुण्यश्लोक फाउंडेशनच्यावतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री लोढा बोलत होते.

यावेळी सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डॉ. मनोहर अंचुलेउद्योजक अनिल राऊतराजीव जांगळेसागर मदनेमुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. स्मिता काळेश्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थानचे श्री फरांडे महाराजपुण्यश्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणालेधनगर समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत आहे. संयोजन समितीने येत्या ३० दिवसात मुंबई शहरातील जागा सूचवावी त्याठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभे करण्याची कार्यवाही केली जाईल.

 ऑगस्ट क्रांती मैदान येथे सायंकाळी पाच पासूनच धनगरी ढोलांचा आवाजाने मैदान दुमदुमून गेले होते. शाहीर सुरेश सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने शौर्यगाथा महाराजा यशवंतराव होळकरांची पोवाडा सादर केला. कोकणातील धनगर समाज बांधवांनी कोकणी गज नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सागर मदने यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

            यावेळी पुण्यलोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी प्रास्ताविक, तर रामचंद्र जांगळे यांनी आभार मानले. प्रशांत पुजारी यांनी निवेदन केले.

यावेळी संयोजन बबन कोकरे, गणपत वरकरामचंद्र जांगळेतुकाराम येडगेदीपक झोरेसंतोष बावदाणेपी. बी. कोकरेअनंत देसाईसुरेश वावदाणेसूर्यकांत जांगळेतानाजी शेळकेसंतोष जांगळेबंटी बावदाणेनाना राजगेअशोक पाटीलविश्वनाथ साळसकर यांनी केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी


 


मुंबई, दि. 3: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी चैत्यभूमी येथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.


            सकाळी धारावी येथे मुंबई सखोल स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करून मुख्यमंत्री श्री. शिंदे दादर येथील चैत्यभूमीवर आले. देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला.


            महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येपासून ते सहा डिसेंबरपर्यंत आलेल्या अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ज्याठिकाणी भोजनाची सोय करण्यात आली आहे त्याची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली. आरोग्य व्यवस्था, स्वच्छता यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाला सूचना केल्या.


            महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान 'राजगृह' यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्‍ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शिवाजी पार्क येथे आले होते. यावेळी राज्य आणि देशभरातून आलेल्या अनुयायांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला त्यांच्या निवास आणि भोजनाच्या सुविधेची माहिती घेतली.


            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून परिसरातील महानगरपालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्यात आल्या आहेत. 


            यावेळी आमदार सदा सरवणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, महानगरपालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थि

त होते.


000


सायन रुग्णालयात लवकरच 1200 खाटा उपलब्ध होणार सोनोग्राफी, डायलिसीसची सुविधा वाढविणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सायन रुग्णालयाला भेट; रुग्णांची विचारपूस अन् दिलासाही..

 सायन रुग्णालयात लवकरच 1200 खाटा उपलब्ध होणार

सोनोग्राफीडायलिसीसची सुविधा वाढविणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सायन रुग्णालयाला भेटरुग्णांची विचारपूस अन् दिलासाही..

 

मुंबई दि. 3: तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना..ट्रीटमेंट कशी सुरू आहे..वेळेवर जेवण मिळते ना..सायन हॉस्पीटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेला हा संवाद..आज महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ट्रॉमा आयसीयुसर्वसाधारण वॉर्डवॉर्ड क्रमांक चार येथे पाहणी करताना रुग्णांची विचारपूस केली आणि दिलासा दिला. यावेळी त्यांनी अचानक रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाला भेट देऊन तेथील अन्नपदार्थांची पाहणी केली.

 

सायन हॉस्पीटलमध्ये 200 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि एक हजार खाटांचा सर्वसाधारण कक्षाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे नव्याने 1200 खाटा उपलब्ध होतीलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

 

मुंबईच्या सखोल स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला साकाळी सातच्या सुमारास भेट दिली.

 

सायन रुग्णालयात सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला गती द्यावी. पुढच्या भेटीत कामाची प्रगती आढळली पाहिजेअसे मुख्यमंत्र्यांनी याभेटी दरम्यान निर्देश दिले. रुग्णालयात सोयीसुविधा वाढविण्यात येत असून त्या कालमर्यादेत पूर्ण कराव्यात. रूग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

 

रुग्णालयाची पाहणी करून तेथील रुग्णांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना मिळत असलेल्या उपचारांची माहितीही त्यांनी घेतली. रुग्णांची गैरसोय होते का याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले.

 

सोनोग्राफी आणि डायलेसिस सेवा देण्यासाठी उपकरणांची वाढ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रीप्शन संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून औषधांसाठी रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही. असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

 

भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सायन रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. प्रत्येक वॉर्डात जाऊन त्यांनी माहिती घेतली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करतानाच रुग्णाला वेळेवर औषधजेवण मिळेल यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाची पाहणी करताना तेथील साफसफाई आणि अन्नाची गुणवत्ता याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुख्यमंत्री पाहणीसाठी आले याचा रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर एका वॉर्डात तर एका रुग्णाने चक्क मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फीही घेतली.

000


गिरगावातील आगग्रस्त इमारतीला मुख्यमंत्र्यांची भेट

 गिरगावातील आगग्रस्त इमारतीला मुख्यमंत्र्यांची भेट

 

मुंबई दि.3- मुंबई महापालिकेचा संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिम पाहणी दौर्‍यातून वेळ काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव परिसरातील धरम पॅलेस या आगग्रस्त इमारतीला भेट दिली. गिरगांव चौपाटी लगतच्या परिसरात असणाऱ्या या इमारतीला दि. 2 डिसेंबर रोजी रात्री आग लागली होती. या आगीवर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आले होते.

 

            स्वच्छता मोहीम पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांना याची माहिती मिळताच त्यांनी दुर्घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरकौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढामुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशीडॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

000

लहान मुलांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे क्रिकेट खेळण्याचा तर कुठे फोटोचा आग्रह

 लहान मुलांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुठे क्रिकेट खेळण्याचा तर कुठे फोटोचा आग्रह

 

मुंबई दि.3- मुंबई महापालिकेच्या संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेच्या शुभारंभानिमित्त आज सकाळपासून मुंबईच्या विविध भागात भेटी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कामाची तडफ मुंबईकरांना दिसली. दुसऱ्या बाजूला या मोहिमेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्येलहान मुलांमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्याचीत्यांच्यांशी बोलण्याची उत्सुकता दिसली.

 

            सुरुवातीला कमला नेहरू उद्यान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले असता त्यांनी सर्वप्रथम रस्त्याच्या पलीकडे उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. मग मुख्यमंत्र्यांनीही त्यांची इच्छा पूर्ण करत फोटो काढले. नंतर कमला नेहरू उद्यानाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या विविध विद्यालयाच्या आणि स्काऊट -गाईडच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना हाक मारली. त्यांनीही मुलांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करत मुलांच्या आग्रहास्तव फोटो पण काढले. हाच प्रकार गिरगांव चौपाटी आणि बी.आय.टी. चाळ येथे ही घडला. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांचा हट्ट पुरवत त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले.

 

गिरगांव चौपाटीवर लुटला क्रिकेटचा आनंद

 

            गिरगाव चौपाटी येथे पाहणीसाठी गेले असता तेथे क्रिकेट खेळणारी मुले मुख्यमंत्र्यांचा ताफा पाहून पुढे आली. तेव्हा वाहनातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उतरलेले पाहून मुलांना आश्चर्याचा धक्का बसला. या मुलांना जवळ बोलवून त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी फोटो काढलेच. याचवेळी या मुलांनी मुख्यमंत्र्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह ही केला. मग मुख्यमंत्र्यांनी देखील या मुलांचे मन राखून हाती बॅट घेत फटकेबाजी केली. थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत क्रिकेट खेळतांना मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

 

            आपल्या विकासाभिमुख कामांमुळे जनतेत लोकप्रिय झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लहान मुलांचेही तितकेच लाडके असल्याचे आजच्या मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या दौर्‍यात दिसून आले.

००००


Sunday, 3 December 2023

मुंबईकरांनी अनुभवली मुख्यमंत्र्यांची ‘स्वच्छता मॅरेथॉन’ स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त मुंबईसाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो..!



















 मुंबईकरांनी अनुभवली मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मॅरेथॉन

स्वच्छसुंदरप्रदुषणमुक्त मुंबईसाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर

सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

 

मुंबईदि. 3:  मुंबई स्वच्छसुंदरप्रदुषणमुक्त करण्याच्या ध्यास घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडेसहाला सुरू केलेला स्वच्छतेचा जागर दुपारी बारापर्यंत सुरू होता. मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देत त्यांनी डीप क्लिन मोहिमेचा शुभारंभ केला. सायनधारावीकमला नेहरू पार्कबाणगंगाबीआयटी चाळ परीसर या भागांना भेटी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली स्वच्छतेची मॅरेथॉन जवळपास सहा तास सुरू होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी अंतर्गत रस्तेगटारीनाले सफाईरस्त्यांची सफाई कामांची पाहणी केली जागोजागी सफाई कामगारांनी त्यांनी संवाद साधला. सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो आहेत असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईत डीप क्लिन (सखोल स्वच्छता) मोहिमेचा आज शुभारंभ झाला. धारावी टी जंक्शन येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थीसफाई कामगार यांच्याशी संवाद साधत मुंबईची स्वच्छता मोहिम ही लोकचळवळ झाली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. नालेसफाईरस्ते धुणे याकामांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच ठिकाणी पायपीट केली.

 

            मुंबईत असलेल्या 24 वॉर्डमध्ये सखोल स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकाच वेळी एका वॉर्डमध्ये अन्य चार ते पाच वॉर्डातील सफाई कर्मचारी बोलावून सुमारे तीन ते चार हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून रस्तेगटारीपदपथनालेसफाई या मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे सफाई कामगारांचे जथ्थे आज मुंबईच्या एफ उत्तरजी उत्तरडी वार्ड मध्ये दिसत होते. प्रत्येकाच्या हातात झाडू आणि जोडीला रस्ते धुणारी यंत्रेफॉगरस्मोक गन या अत्याधुनिक साहित्याच्या मदतीने स्वच्छतेचा जागर सुरू होता. 

 

            प्रदुषणमुक्तीवर उपाय योजना म्हणून मुंबईचे रस्ते धुताना आधी त्यावरील माती उचलून मग उच्च दाबाने पाणी मारून रस्ते धुवावेतअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आज पासून सुरू झालेल्या सखोल स्वच्छता मोहिमेचा परिणाम येत्या काही दिवसात नक्कीच बघायला मिळेल. सफाई कर्मचारी सकाळी लवकर कामाला सुरूवात करतात. मुंबईकरांच्या निरोगी आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर असून मुंबईचे खरे हिरो ते आहेत असे सांगत त्यांनी ठरवले तर मुंबईस्वच्छनिरोगी आणि प्रदुषणमुक्त व्हायला वेळ लागणार नाहीअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

 

 

 

सार्वजनिक स्वच्छता गृहेशौचालयांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करा

            धारावी भागात मोहिमेला सुरूवात झाल्यानंतर या भागातील सार्वजनिक स्वच्छता गृहशौचालये यांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करण्यात यावी असे निर्दोश मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. केवळ मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेवर भर न देता झोपडपट्टीतील अंतर्गत रस्तेपदपथ यांची देखील साफसफाई करा. संपूण मुंबईत सखोल स्वच्छता मोहिम यशस्वी राबविली तर आमुलाग्र बदल दिसून येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

सफाई कामगारांच्या 48 वसाहतींचा कायापालट

 

            मुंबईतील सफाई कामगारांच्या 48 वसाहतींचा कायापालट करण्यात येणार असून गौतम नगरकासरवाडी येथील वसाहतींना भेटी दिल्या आहेत. यासर्व वसाहतींमध्ये दर्जेदार सोयीसुविधा देण्यात येतील.. स्वच्छतेच्या बाबतीत मुंबईचे नाव देशात नव्हे तर जगात अग्रक्रमावर येवू द्याअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना केले.

            सायन हॉस्पीटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. धारावीशाहू नगरएकेजी नगरधारावीटी जंक्शनकमला नेहरू पार्कबाणगंगा तलावगिरगाव चौपाटी येथील स्वच्छतेची पाहणी केली. जागोजागी मुख्यमंत्री सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करीत होते.

 

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री रंगले क्रिकेटमध्ये

 

            गिरगाव चौपाटीवर पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या बच्चे कंपनीने छायाचित्र काढण्याची विनंती केली. त्यांनी छायाचित्र घेतल्यानंतर मुलांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात बॅट दिली आणि आमच्या सोबत खेळा अशी विनंती केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुलां सोबत काही क्षण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.  

 

            यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकरमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडेअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेउप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) उप आयुक्त (परिमंडळ 1) डॉ. संगीता हंसनाळेउप आयुक्त (परिमंडळ 2) रमाकांत बिरादार जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळेडी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

००००


 

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज

 राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज

सादर करण्यास ४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ

मुंबईदि. २: राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांच्या तब्बल ७१७ रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना  मुदतवाढ करण्याबाबत आदेश दिले. 

उत्पादन शुल्क विभागातील लघुलेखक (निम्न श्रेणी)लघुटंकलेखकजवानजवान नि वाहनचालक आणि चपराशी  या पदांच्या एकूण ७१७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या भरती प्रक्रियेस मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाची मंजुरी मिळाली होती. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाली होती. यात १ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. 

मात्रहे अर्ज करताना अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करता आले नाहीत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीने विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना काही दिवस इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा मंत्री शंभूराज देसाई यांनी संवेदनशीलतेने विचार करून विभागास तात्काळ मुदतवाढ देण्याचे आदेश दिले. याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना त्यांनी निर्देश दिल्यानंतर  विभागाकडून सोमवार४ डिसेंबर २०२३ च्या रात्री ११:५५ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच ज्या उमेदवारांनी दि. ३० मे२०२३ रोजीच्या जाहिरातीस अनुसरून दि. ३० मे२०२३ ते ०९ जून२०२३ या कालावधीत अर्ज भरून परीक्षा शुल्क अदा केले आहेत्यांनाच त्यांच्या अर्जात दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ पासून ते दि. ०८ डिसेंबर २०२३ च्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत बदल करता येणार आहेत. 

याबाबत मंत्री शंभूराज देसाई म्हणाले कीविविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडचणी आल्या. मात्रएकही इच्छुक विद्यार्थी भरती प्रक्रियेपासून वंचित राहू नयेअशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच आता ४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नयेयादृष्टीने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तसेच ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध असून आता मुदतवाढीचा लाभ घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत आपले अर्ज सादर करावेतअसे आवाहनही मंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने केले आहे.


Featured post

Lakshvedhi