Friday, 1 December 2023

गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम

 गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वर सम्राट सुधीर फडके चौकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबईदि. 30 :- सध्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक माध्यमातून रसिक श्रोत्यांचे मनोरंजन होत असले तरीही गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम आहे. हा गोडवा यापुढेही तो कायम राहीलअसा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ह्युजेस रोडगावदेवीमुंबई येथील  स्वर सम्राट सुधीर फडके चौकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार पराग अळवणीश्रीधर फडकेमहामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद महाराज आदी उपस्थित होते.

            बाबूजींच्या नावाच्या चौकाचे उद्घाटन करण्याचे भाग्य आपणास लाभले याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीबाबूजींची मनाला प्रसन्न करणारी भक्ती गीतेसदाबहार गाणी हा अजरामर गीतांचा खजिना आहे. बाबूजींनी स्वरबद्ध केलेली गीते आजही रसिक श्रोत्यांच्या मनाला भुरळ घालत असून त्यांनी गायलेली गाणी रसिकांच्या ओठावर रेंगाळत आहेत.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीया चौकात निर्माण केलेल्या शिल्पातून सुधीर फडके तथा बाबूजींच्या स्मृती चिरंतन जपल्या जातील. बाबूजींचे व्यक्तिमत्त्व प्रेरक असून ते भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल. अशी व्यक्तिमत्वे कायम मनात जपू या असे आवाहन ही त्यांनी केले. चौकात केलेली बाबूजींच्या शिल्पाची रचना चौकातून जाणाऱ्या-येणाऱ्याला प्रेरणा देईल व चौकात स्वर सम्राटाचे स्वरतीर्थ निर्माण झाल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होईलअसेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            बाबूजींनी संगीताची साधना करून रसिकांच्या मनात आपले दृढ स्थान निर्माण केले असल्याचे सांगून मंत्री श्री. लोढा यांनी महानगरपालिकेतर्फे या चौकाचे नामकरण केल्याबद्दल महानगरपालिकेचे त्यांनी अभिनंदन केले.

            श्री विश्वेश्वरानंद महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.

            प्रारंभी नृत्य कला निकेतन ग्रुपने भरतनाटयम् सादर केले.

०००००

वृत्त वाहिन्यांनी लोकहिताच्या निर्णयांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे

 वृत्त वाहिन्यांनी लोकहिताच्या निर्णयांना

लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 1 : राज्याची प्रगती आणि समृद्धी हेच राज्य शासनाचे ध्येय आहे. सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मराठी वृत्त वाहिन्यांनी शासनाच्या लोकहिताच्या निर्णयांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मराठी चित्रपट आणि रंगमंच क्षेत्रातील कलावंतांमध्ये गुणवत्ता असून, हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या चित्रपट क्षेत्राच्या प्रगतीसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            टिव्ही 9 मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप - मराठी टिव्ही आणि फिल्म अवॉर्ड्स 2023’ मधील प्रमुख पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व कलावंतांचे आणि विजेत्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.


            मुख्यमंत्री म्हणाले की, कलावंत हे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका निभावतात. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप दिल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते. टिव्ही 9 हे देशातील मोठे नेटवर्क आहे. टिव्ही 9 चा हा पहिलाच पुरस्कार सोहळा असून त्यात मराठी कलावंतांचा पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल त्यांनी टीव्ही 9 चे अभिनंदन केले.


मराठी कलावंतांनी रंगमंच जीवंत ठेवले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मराठी लोकांनी कलात्मकता आणि सर्जनशीलता जपली असून मराठी कलावंतांनी रंगमंच जीवंत ठेवले असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.


            टिव्ही 9 ने साधलेल्या प्रगतीचे कौतुक करून बायोस्कोप ला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त टिव्ही 9 ने त्याच नावाने आपले पहिले पुरस्कार देण्याची सुरूवात केल्याबद्दल त्यांनी टिव्ही 9 नेटवर्कचे अभिनंदन केले. 


            मराठी चित्रपटांनी आपला दर्जा कायम राखला असल्याचे सांगून त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे यावेळी अभिनंदन केले.


            प्रारंभी टिव्ही 9 नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक बरूण दास यांनी प्रास्ताविकाद्वारे आपल्या वाहिनीची भूमिका मांडली.


            यावेळी सुभेदार या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा तर अभिनेता रितेश देशमुख यांना वेड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वाळवी चित्रपटातील भूमिकेसाठी शिवानी सुर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली तर सुभेदार चित्रपटासाठी दिगपाल लांजेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. मालिका विभागामध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा, सचिन गोखले यांना याच मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तसेच जुई गडकरी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर ‘जय जय स्वामी समर्थ’साठी अक्षय मुडावदकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


0000

पोयसर नदी रुंदीकरणातील बाधितांना याच परिसरात मिळाली घरे! चावी वाटपानंतरच नदी रुंदीकरण कामाचा प्रारंभ, आमदार अतुल भातखळकर यांच्या पाठपुराव्याला यश

 पोयसर नदी रुंदीकरणातील बाधितांना याच परिसरात मिळाली घरे!

चावी वाटपानंतरच नदी रुंदीकरण कामाचा प्रारंभ, आमदार अतुल भातखळकर यांच्या पाठपुराव्याला यश
[फोटो आहेत]
मुंबई :  पोयसर नदी रुंदीकरणाच्या कामात बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांना याच परिसरात घरे उपलब्ध करून आज या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आणि त्यानंतरच नदीच्या रुंदीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नातून बाधित झोपडपट्टीधारकांना आज महापालिका आर. दक्षिण विभाग कार्यालयात घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले. तसेच हनुमाननगर येथे नदी रुंदीकरण कामाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला.
महापालिका विभाग कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आज २१ बाधित झोपडपट्टी धारकांना आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते चावीचे वाटप करण्यात आले. तसेच या पूर्वी ३५ बाधिताना घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, विकास हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून करावा लागतो. लोकांच्या घरांवर बुलडोजर फिरवून विकास काही उपयोगाचा नाही. याच भूमिकेतून पोयसर नदी रुंदीकरणात बाधित झालेल्या झोपडपट्टी धारकांना  याच परिसरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. आज बाधित नागरिकांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द करताना आनंद होत आहे. आमचा विकासाला विरोध नाही उलट विकास हाच भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे, असेही आमदार भातखळकर म्हणाले.
पोयसर नदी रुंदीकरण आणि खोलीकरण कामात परिसरातील बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांना याच परिसरात घरे मिळाली पाहिजेत यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. या कामासाठी खूप संघर्ष केला होता. अखेर या प्रयत्नाना यश आले. यावेळी उपस्थित बाधित झोपडपट्टी धारकांनी चावी मिळाल्यानंतर समाधान व्यक्त करून आमदार अतुल भातखळकर यांचे आभार मानले.
Regard's

श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न

 ई-श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना

सामाजिक, आर्थिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न

 - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बेस्ट उपक्रमातील १२३ नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायम सेवेचे नियुक्तीपत्र

          मुंबई दि. ३० : असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ई-श्रम पोर्टल सुरू केले. राज्यात जवळजवळ अडीच कोटी कामगारांची नोंद या पोर्टलमध्ये झाली आहे. या ई-श्रम नोंदणी कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            बेस्टमधील नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज झाला.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीबेस्ट उपक्रमातील नैमित्तिक कर्मचाऱ्यांना उपक्रमात कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी नैमित्तिक कर्मचारी आणि त्यांच्या संघटना सातत्याने करीत होत्या. या अनुषंगाने मागील १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या १२३ नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन नियुक्ती पत्र देण्यात आले. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बाबतही लवकरच  निर्णय घेण्यात येईल. ई-श्रम पोर्टल यात नोंदीत कामगारांकरिता सामाजिक सुरक्षेचे महामंडळ तयार केले आहे. ज्याच्या माध्यमातून जे लोक असंघटित क्षेत्रात काम करतात त्यांना १४ प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यात आरोग्य कवचअकाली मृत्यू झाल्यानंतरची मदतमुलांचे शिक्षणपेन्शननिवृत्तीनंतर जगण्याची साधने इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            आमदार प्रसाद लाड यांनी मनोगत व्यक्त केले. बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल  यांनी प्रस्ताविक केले. या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकरबेस्टचे मुख्य व्यवस्थापक आर.डी.पाटसुतेकामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान

 देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145 व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ

 

            पुणेदि. 30 : देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान असून सशस्त्र दल आणि देशासाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून ही प्रशिक्षण संस्था ओळखली जातेअसे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.

            खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात (पासिंग आऊट परेड) मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. तसेच पाचव्या बटालियनच्या इमारतीच्या आगामी  बांधकामाची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली.

            यावेळी राज्यपाल रमेश बैससार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसेदेशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहानलष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल ए के सिंहराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट व्हॉइस अडमिरल अजय कोच्चर यांच्यासह संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            राष्ट्रपती म्हणाल्या की, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) हा नेतृत्वाचा पाया आहेज्यातून महान योद्धे तयार झाले आहेत. एनडीएकडून मिळालेले प्रशिक्षण आणि जीवनमूल्ये उत्तीर्ण छात्रांना (कॅडेट्स) आयुष्यात प्रगती करण्यास सहाय्य करतातअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी कॅडेट्सना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा अवलंब करून अग्रेसर रहाण्याचे आवाहन केले. सशस्त्र सेवेतील मूल्यांचे अनुसरण करून ते  प्रत्येक आव्हानाला धैर्याने आणि शौर्याने सामोरे जातीलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            एनडीएच्‍या पासिंग आऊट परेडमध्‍ये संचलन करणाऱ्या दलाच्या रूपात प्रथमच महिला कॅडेट्सचा सहभाग पाहून राष्‍ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. हा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असल्याचे त्या म्हणाल्या. भविष्यात सर्व महिला कॅडेट्स देश आणि एनडीएला नव्या उंचीवर घेऊन जातीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            शांततास्थैर्य आणि समृद्धीसाठी भारताच्या सीमांचे संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा आवश्यक असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.आम्ही 'वसुधैव कुटुंबकम्या परंपरेचे पालन करतो. परंतुदेशाच्या एकता आणि अखंडतेच्या भावनेला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे सैन्य पूर्णपणे सक्षम आणि सदैव तयार आहेअसेही त्यांनी  यावेळी नमूद केले.

 

कोल्हापूरच्या हर्षवर्धन भोसलेने पटकावले राष्ट्रपतींचे कांस्य पदक

            यावेळी एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीनुसार पहिला क्रमांक पटकावून प्रथम सिंगने राष्ट्रपती सुवर्णपदक जिंकले. जतिन कुमार या छात्राने दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक जिंकले, तर कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या हर्षवर्धन शैलेश भोसले या छात्राने तिसऱ्या क्रमांकासह राष्ट्रपतींचे कांस्य पदक पटकावले.

 

नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

 नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

           

            सिंधुदुर्गनगरीदि. 30 (जिमाका) : मालवण किनाऱ्यावरील राजकोट येथे ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंतशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरविभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकरजिल्हाधिकारी किशोर तावडेमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्योत नायरपोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल तसेच नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि राजकोट किल्ल्याच्या कामाची पाहणी केली. तसेच टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंड येथील हेलिपॅडची देखील पाहणी करून विविध सूचना केल्या.

जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरीयंस सेंटर उभारणार

 जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरीयंस सेंटर उभारणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरिएंस सेंटरचे भूमीपूजन

डबेवाल्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करू

            मुंबईदि. 30 :- मुंबईचे वैभव म्हणून गेट वे ऑफ इंडियासीएसटीवरळी सी लिंक याकडे पाहिले  जात असले तरीही जीवंत माणसं हे खरे वैभव असते. डबेवाला हे मुंबईचे  खरे वैभव आहे. त्यांचे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे डबेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसतील तरी त्यांचे एक्सपिरीयंस  सेंटर  तंत्रज्ञान वापरून जागतिक दर्जाचे उभारूयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

            मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरिएन्स सेंटरचे भूमीपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार श्रीकांत भारतीयनगरसेविका सपनाताई म्हात्रे,  मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरेनूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे नवीन अध्यक्ष उल्हास मुकेमुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीडबेवाले कंप्युटर पेक्षा हुशार आहेत. एकही चूक न होता ते अचूक काम करतातम्हणून जगभरातील विद्यापीठेनेते त्यांच्या व्यवस्थापन तंत्राचा अभ्यास करतात. जगभर या असामान्य कामाचे कौतुक केले जाते. डबेवाल्ल्यांपर्यंत पोहचायला १०-१५ वर्ष उशीर झाला असला तरी आता डबेवाल्यांशी तयार झालेला ऋणानुबंध कायम राहील. नैसर्गिक आपत्तीमध्ये डबेवाल्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत स्वखर्चातून मदत केली. डबेवाल्यांना घरे मिळवून देण्यासही उशीर झालापण आता लवकरच त्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होईल. तिन्ही रेल्वे लाईनवर घरांची योजना राबविण्यात येईल. महाराष्ट्र धर्मस्वधर्म हा वारकरी संप्रदायामुळे ताठ मानेने उभा आहे. वारकरी वारी चुकवत नाही तसे डबेवाले रोज डबा पोहोचवून वारी करतात. त्यांच्या कामातून रोज वारी घडते.

            यावेळी आमदार श्रीकांत भारतीय प्रास्ताविक करताना म्हणालेमुंबईच्या जीवनात भागवत धर्माची पताका जीवंत ठेवण्याचे काम मुंबई डब्बेवाला यांनी केले आहे. विश्वासार्हता हा डबेवाला यांचा युनीक सेलिंग पॉईंट आहे.

            मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरे म्हणालेडबेवाला संघटनेला १२५ वर्षाची वैभवशाली परंपरा आहे. या संघटनेसाठी ५२ वर्ष काम करीत असताना २५ वर्ष अध्यक्ष म्हणून राहिलो. डबेवाले घरापासून वंचित आहेत. ८० टक्के लोक भाड्याने राहतात. आमचे घराचे स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साकार करतील याची खात्री आहे, असे ते म्हणाले.

००००

Featured post

Lakshvedhi