Wednesday, 8 November 2023

कळसुबाई आणि एव्हरेस्ट यांच्यात फरक काय ?

 कधी विचार केलाय,

कळसुबाई आणि एव्हरेस्ट यांच्यात फरक काय ?



त्या दिवशी मुलं-मुली प्रचंड खुशीत होती. कारणच तसं होतं. ते महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर पोहोचले होते. ही सर्वसामान्य मुलं. ना ट्रेकिंगची सवय, ना विशेष फिटनेस. तरीही ऐन उन्हाळ्यात शिखरावर पोहोचली होती.


मग गप्पा सुरू झाल्या. सह्याद्री, त्यातली शिखरं, डोंगर, खडक याबाबत माहितीची देवाण-घेवाण. अनेक मुद्दे नव्याने समजत होते. असाच एक मुद्दा आला- सह्याद्रीतलं सर्वोच्च शिखर कळसुबाई आणि हिमालयातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यांच्यातील तुलनेचा. दोघांमधल्या बऱ्याच फरकांची चर्चा झाली. त्यातील सर्वांत महत्त्वाचा फरक म्हणजे- एकाची उंची वाढते आहे, एकाची कमी होत आहे. त्यासाठी सह्याद्री समजून घ्यावा लागतो आणि हिमालयसुद्धा!


हे सारं अगदी सहज घडतं, सभोवतालचा परिसर फिरता फिरता. कारण तो "भवताल" चा नेचर कॅम्प असतो-

कळसुबाई शिखर, सांदण दरी, भंडारदरा परिसर, कोकणकडा यांचा अनुभव व ज्ञान देणारा.

असाच कॅम्प १० वर्,ांपुढील मुला-मुलींसाठी १६ ते १८ नोव्हेंबर २०२३ या काळात आहे.


तुम्ही येणार का?


नावनोंदणीची लिंक:

https://bhavatal.com/Ecocamp/Bhandardara3


संपर्क:

9545350862 / 9922063621 


- भवताल टीम

--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन


        मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.


            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार,महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्जा, खासदार इम्तियाज जलील, खासदार फौजिया खान, आमदार अबु आजमी, आमदार फारूख शाह, अल्पसंख्यांक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यालयाची पाहणी केली.


            अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयामुळे परिसरातील अल्पसंख्यांक नागरिकांची कामे अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.

नमो ११ कलमी कार्यक्रम'

 नमो ११ कलमी कार्यक्रम'

मुंबई उपनगर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्या उदघाटन

 

            मुंबई,दि.७: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात 'नमो ११ कलमी कार्यक्रमराबविण्यात येत आहे. त्याचअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपक्रमांचा शुभारंभ बुधवार दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवारमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे होणार आहे.

           बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हा नमो ११ कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नमो दिव्यांग शक्ती अभियान- मुलुंड,नमो कामगार कल्याण अभियान-चांदिवली, नमो आत्मनिर्भर ग्राम अभियान- वांद्रे (पश्चिम), नमो दलित सन्मान अभियान- घाटकोपर (पूर्व), नमो तीर्थ स्थळ सुधार अभियान- विलेपार्ले (पूर्व)नमो आदिवासी स्मार्ट स्कूल अभियान- मागाठाणे- बोरीवली (पूर्व), नमो क्रीडा मैदान आणि उद्यान अभियान मालाड (पश्चिम), नमो सौर ऊर्जा कार्यालय अभियान- वांद्रे (पूर्व), नमो शेत तळे अभियान अंधेरी (पश्चिम), नमो शहर सौंदर्यीकरण अभियान- कांदिवली (पूर्व), नमो महिला सशक्तीकरण अभियान- कुर्ला (पूर्व) येथे विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

         उद्या होणाऱ्या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या योजनेमधून बचत गटांना आर्थिक मदत देणे५० कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करणेपात्र महिला मच्छिमार महिला लाभार्थींना शीतपेट्यांचे वाटप करणे, महिला बचत गटांच्या सेंद्रीय उत्पादनासाठी विशेष बाजारपेठ भरविणे,जिल्हाधिकारी कार्यालय येथे सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन करणे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप करणे, दिव्यांगांना इलेक्ट्रीक साहित्याचे वाटप करणेमाता रमाबाई आंबेडकरनगर येथे गंधकुटीर समाजकल्याण केंद्राचे भूमिपूजन करणेअंबोजवाडीमालवणी येथे क्रीडा मैदानाचे भूमिपूजनपार्लेश्वर मंदिराच्या परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन करणे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत

डोंबिवलीकर प्रतिष्ठानतर्फे सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून डिजिटल ॲकॅडमी सुरु होणार

 डोंबिवलीकर प्रतिष्ठानतर्फे सेंटर ऑफ एक्सलन्सच्या

 माध्यमातून डिजिटल ॲकॅडमी सुरु होणार

मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पुढाकार

 

            मुंबईदि. ७ : डोंबिवली परिसरातील तरुणाईला तंत्रज्ञान क्षेत्रात "जॉब रेडी" करणारे डिजिटल प्रशिक्षण केंद्र सुरु होत आहे. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिम्समशीन लर्निंगडेटा अ‍ॅनालिसिस यासारख्या नोकऱ्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रात सतत कर्मचारी हवे असतात. त्याच अनुषंगाने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीकर प्रतिष्ठान व टीएनएस इंडिया फाऊंडेशन यांनी नामांकित कंपनी कॅपजेमिनीच्या सहकार्याने डोंबिवलीत सेंटर ऑफ एक्सलन्स समजली जाणारी डिजिटल अकॅडमी स्थापन केली आहे. या ॲकॅडेमीचे उदघाटन उद्या बुधवार ८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आभासी माध्यमातून करण्यात येणार आहे. 

            डिजिटल ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थींना सर्व अद्ययावत उपकरणांनी युक्त अशी अत्याधुनिक लॅब उपलब्ध होणार असून कुठल्याही शाखेचे पदवी किंवा इंजिनिअरिंगचे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. प्रत्येक वर्गात ३५-४० विद्यार्थी  यानुसार एकूण ५००पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. अत्यंत महत्वाचे म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयटी आणि आयटीईएस क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. डोंबिवलीकर तरुणाईला कौशल्य विकासासोबतच रोजगाराची संधी मिळायला हवी यासाठी डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्यावतीने हा नवीन उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

            या एक्सलन्स सेंटरमध्ये 'कॅम्पस टू टेक्निकल करिअर्स (C2TC)' हा उपक्रम राबवला जाणार आहे. कौटुंबिक उत्पन्न वार्षिक ५ लाखांच्या पेक्षा खाली असलेल्यांकरिता असून हा कोर्स पूर्ण मोफत असेल.  हा उपक्रम सुरू करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि डॉ. संतोष भोसले यांच्या आयआयकेअर फाऊडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.

             हे सेंटर ऑफ एक्सलन्स वृंदावन कॉम्प्लेक्सगणेशनगरडोंबिवली पश्चिम येथे डोंबिवलीकर प्रतिष्ठानची स्थापना होणार आहे.  १८ ते २५ वर्षे या वयोगटातील वंचित तरुण-तरुणींना आयटी आणि आयटीईएस क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा मानस असून मुली/महिलांच्या कौशल्य विकासावर विशेष भर देण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

००००

सावित्रीदेवी फुले महिला शासकीय वसतिगृह सुरु करण्याचे कालबद्ध नियोजन करावे

 सावित्रीदेवी फुले महिला शासकीय वसतिगृह सुरु करण्याचे

 कालबद्ध नियोजन करावे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबई,दि.7 :  सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयातील विद्यार्थिंनीचे शासकीय वसतिगृह वांद्रे येथे स्थलांतर करण्यासाठी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. हे वसतिगृह डिसेंबर 2023 पर्यत सुरू होण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

            मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज वसतिगृह तातडीने सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,  उपसचिव अजित बाविस्कर उपसचिव प्रताप लुबाळसहसंचालक हरिभाऊ शिंदेकार्यकारी अभियंता मनोज राणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीवांद्रे येथील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयांसाठी तयार करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून विद्यार्थिनींसाठी आवश्यक असलेले साहित्य, सीसीटीव्ही, महिला सुरक्षारक्षक तातडीने नियुक्त करावेत. तसेच पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, फायर ऑडिट यासारख्या आवश्यक सर्व परवानगीचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन डिसेंबरमध्ये हे वसतिगृह सुरू करण्याचे नियोजन करावे.

००००

भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार -- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार

-- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत

अधिग्रहीत  जमिनींच्या भूसंपादन मावेजा संदर्भात बैठक

 

            मुंबई दि 7 :-जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजासाठी  निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत केलेल्या जमिनींचे भूसंपादन संदर्भातील बैठक झाली.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,आमदार मंगेश चव्हाणजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरउपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

            उपलब्ध निधीतून मावेजा प्राधान्याने अदा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

            पुरवणी मागण्यांद्वारे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.

-----000------


 


 भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल

-भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक

 

राज्यपालउपमुख्यमंत्र्यांकडून भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे

 राजभवन येथे स्वागत

 

            मुंबई दि. 7 : भारतातील 1.40 अब्ज लोकांमध्ये 'आपण साध्य करु शकतोहा विश्वास जागरूक झाला असून पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेला भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती होईलअसा विश्वास  भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी आज येथे व्यक्त केला.

            राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी (दि. ७) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे राजभवनमुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत केलेत्यावेळी ते बोलत होते.

            मित्सुबिशी कंपनीच्या अध्यक्षांशी आपली भेट झाली असताना त्यांनी तीन गोष्टींना आपण प्राधान्य देत असल्याचे आपणांस सांगितले. कृत्रिम प्रज्ञापर्यावरण समाज सुशासन व भारत हा आपला  प्राधान्यक्रम असल्याची आठवण राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी राज्यपालांना सांगितली. भारत हा आपला सख्खा शेजारी व घनिष्ठ मित्र आहे असे सांगताना अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले.

'थ्री इडियटचित्रपटात लडाखचे चित्रण दाखवल्यानंतर तेथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अनेक पटीने वाढल्याचे नमूद करून भूतानमध्ये चांगल्या चित्रपटांचे चित्रीकरण झाल्यास आपणास आनंदच होईलकारण त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेलअसे त्यांनी सांगितले.

            भूतानमध्ये मुलीच्या जन्माला फार महत्व दिले जाते. आपणांस दोन मुलांनंतर कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आपण लवकरच आपल्या तीन्ही मुलांना कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी भूतान नरेशांनी आपल्यासोबत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची राज्यपाल व उपमुख्यमंत्री यांना ओळख करून दिली.

            भूतान नरेशांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल श्री. बैस म्हणाले कीमहाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असून भूतान आणि महाराष्ट्र यांच्यातील व्यापार सहकार्य अधिक वृद्धिंगत व्हावे.  भूतानमधून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रात आणि विशेषतः पुणे येथे येतात. भूतान आणि महाराष्ट्र यांच्यातील शैक्षणिक देवाणघेवाण अधिक वाढावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र आणि भूतान यांच्यातील संबंधांचे मूळ इतिहाससांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक जनसंपर्क यामध्ये आहे. कान्हेरीअजिंठा आणि एलोरा लेणी ही भूतानच्या पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय ठिकाणे असल्याचे राज्यपालांनी स्वागत भाषणात सांगितले.

भूतानचा सांस्कृतिक महोत्सव मुंबईत आयोजित केला जावा व तसेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक महोत्सव देखील भूतानमध्ये आयोजित केला जावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन केले.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरमुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरनेमबाज अंजली भागवतक्रिकेटपटू  अजिंक्य रहाणेअभिनेते प्रशांत दामलेउद्योगपती प्रकाश हिंदुजा,  उद्योजक अजय पिरामल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

००००

India will soon be 3rd largest economy, says King Jigme Khesar Namgyel Wangchuck

Governor, Dy CM receive King of Bhutan; host State reception at Raj Bhavan

 

            Mumbai dated 7 : Stating that the 'can do ' spirit of 1.4 billion Indians has been ignited, the King of Bhutan Jigme Khesar Namgyel Wangchuck expressed confidence that India will soon become a 5 trillion dollar 3rd largest economy in the world. 

            The King of Bhutan was speaking to Maharashtra Governor Ramesh Bais and Deputy Chief Minister Devendra Fadnavis at the State reception accorded to him by the Governor at Raj Bhavan Mumbai on Tue (7 Nov.)

            King Jigme Khesar Namgyel Wangchuck said he is witnessing a new India where all Indians believe that India can achieve anything. The King told the Governor that during a meeting in Japan, the chairman of Mitsubishi, told him that the company had three priorities : Artificial Intelligence, Environmental and Social Governance and India.

            King Jigme Khesar Namgyel told the Governor that Ladakh became a popular tourist destination after the film '3 Idiots' was shot there. He expressed the hope that good films will be shot in Bhutan as well. The King introduced his delegation to the Governor and Deputy Chief Minister.

            Welcoming the King Jigme Khesar Namgyel Wangchuck to Maharashtra, Governor Ramesh Bais said the relations between Maharashtra and Bhutan are rooted in history, shared cultural heritage and excellent people-to-people contacts.  

            Stating that Maharashtra is the growth engine of India's economy, the Governor said he would like to see more business cooperation between Bhutan and Maharashtra.

            The Governor said many students from Bhutan come to Maharashtra, especially to Pune to pursue higher and professional education. He added that he would like to see greater educational exchanges between Bhutan and Maharashtra.

            The Governor complimented the King of Bhutan for bringing about the transformation of Bhutan and creating new opportunities for the people.  He expressed the hope that a festival of Bhutan would be organised in Mumbai and likewise the festival of Maharashtra should be organised in Bhutan.

            The Governor later hosted a State banquet in honour of the King Jigme Khesar Namgyel Wangchuck and his accompanying delegation.

            Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narwekar,  Guardian Minister of Mumbai Deepak Kesarkar, ace Shooter Anjali Bhagwat, cricketer Ajinkya Rahane, Actor Prashant Damle, Industrialist Prakash Hinduja, Ajay Piramal and senior government officials attended the State Banquet.

0000




Featured post

Lakshvedhi