Monday, 6 November 2023

कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा:

 कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार पुतळ्याचे अनावरण

 

            मुंबईदि. ६: काश्मिरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत.

            आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मिरमधील कुपवाडा येथे बसविण्यात आला आहे. २० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई राजभवन येथून समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याचे ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. तेथून राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून कुपवाडाकडे हा पुतळा मार्गस्थ करण्यात आला होता.

            महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास सुमारे २२०० किलोमीटर अंतर पार करीत एका आठवड्यात कुपवाडा येथे पोहोचला. रस्त्यातील महत्वाच्या शहरांमधील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी या पुतळ्याचे पूजन करतानाच स्वागतही करण्यात आले. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हामहाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

            कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशीच करण्यात आले. त्यासाठी शिवनेरीतोरणाराजगडप्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आले होते. हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ बाय ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.

            पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे अशा पद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १८०० ट्रक माती टाकून भराव करण्यात आला.  याभागातील हवामानभूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे. 

००००

 

देवीची ओटी*

 *देवीची ओटी*


आज एक मुलगी ठाणे स्टेशन ला ५ रू मीटर नी ताजेतवाने तोरण विकत होती...*


बाजूचे सगळे २०/३० रू  ला विकत होते, 


मी तीला विचारलं, 

*सगळे २०/30 रूपयांनी विकत आहेत, तुझा शेवटचा माल शिल्लक राहिला आहे म्हणून पाच रुपयांनी विकतेस का..?*


 ती थोडं थांबली व मला म्हणाली...

दादा, आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर बसून विकतेय फुल ..बाप नाही आई निघून गेली.. आजी सांभाळते मला


 सकाळी ₹१००/- दिले आजीने डाळ तांदूळ आणायला...

विचार केला, म्हातारीला गिफ्ट द्यावं...


म्हणून ट्रेन पकडून ठाण्यात आले दुपारी ३ वा फुल दोरा सुई विकत घेतली ₹८०/-  खर्च झाले ...


पहिले मी पण विस रुपयांना विकले, 


*आजीने दिलेल्या १००/- रुपयाचे ३००/- रुपये केले. आता उरलेले पाच तोरण विकले, तर ठिक नाहीतर,  घराला बांधीन पहिली कमाई म्हणून...*


मी शांत पणे खिश्यात हात घालता १०० रुपये काढून तिला दिले आणि म्हंटले पोरी हे पैसे ठेव , मला तोरण नको माझ्या कडून तुला तुझ्या मेहनतीचे गिफ्ट , घरी जा ह्यातील एक  तोरण तू दरवाज्याला लाव आणि हो हे घे अजून ५० रुपये, जाताना तुला अणि आजीला काहीतरी गोड घेऊन जा...


कालंच बायको म्हणत होती... 


*देवीची ओटी जरा वेगळ्या पद्धतीने भरू...*


आज तिची इच्छा पूर्ण झाली.

मी येथे गीतेच्या सर्व १८ अध्यायांचे सार केवळ १८ वाक्यांत देत आहे.

 मी येथे गीतेच्या सर्व १८ अध्यायांचे सार केवळ १८ वाक्यांत देत आहे.


 वन लाइनर गीता -

 तुम्ही हे सर्वांना फॉरवर्ड करून प्रसारित कराल का?  प्रत्येकाने हे 4 दिवसात जास्तीत जास्त लोकांना पाठवण्याची विनंती केली आहे.  हे केवळ तुमच्या राज्यातच नाही तर संपूर्ण भारताला पाठवले पाहिजे.


 वन लाइनर गीता


 *अध्याय 1 - चुकीचा विचार हीच जीवनातील समस्या आहे.*

 *अध्याय २ - योग्य ज्ञान हेच ​​आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे.*

 *अध्याय 3 - निस्वार्थीपणा हाच प्रगती आणि समृद्धीचा एकमेव मार्ग आहे.*

 *अध्याय 4 - प्रत्येक कृती ही प्रार्थनेची कृती असू शकते.*

 *अध्याय 5 - व्यक्तित्वाच्या अहंकाराचा त्याग करा आणि अनंताच्या आनंदाचा आनंद घ्या.*

 *अध्याय 6 - दररोज उच्च चेतनेशी कनेक्ट व्हा.*

 *अध्याय 7 - तुम्ही जे शिकता ते जगा.*

 *अध्याय 8 - स्वतःला कधीही सोडू नका.*

 *अध्याय 9 - तुमच्या आशीर्वादांची कदर करा.*

 *अध्याय 10 - सर्वत्र देवत्व पहा.*

 *अध्याय 11 - सत्य जसे आहे तसे पाहण्यासाठी पुरेसे समर्पण करा.*

 *अध्याय 12 - तुमचे मन उच्च स्थानात ग्रहण करा.*

 *अध्याय 13 - मायेपासून अलिप्त व्हा आणि परमात्म्याशी संलग्न व्हा.*

 *अध्याय 14 - तुमच्या दृष्टीशी जुळणारी जीवनशैली जगा.*

 *अध्याय 15 - देवत्वाला प्राधान्य द्या.*

 *अध्याय 16 - चांगले असणे हे स्वतःच एक बक्षीस आहे.*

 *अध्याय 17 - आनंददायी वर अधिकार निवडणे हे शक्तीचे लक्षण आहे.*

 *अध्याय 18 - जाऊ द्या, देवाशी एकरूप होऊ या.*

 (या प्रत्येक तत्त्वाचे आत्मपरीक्षण)

                          

                   ||  ॐ तत्सत् ||


  - मी तुम्हाला वारंवार विनंती करतो की हे जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि गीतेचे महत्त्व समजावून सांगा.


   ॥ कृष्णं वंदे जगतगुरूम्॥

Sunday, 5 November 2023

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत 'पु. ल. कला महोत्सव २०२३' चे आयोजन

 पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत 'पु. ल. कला महोत्सव २०२३चे आयोजन

 

  • सुधीर मुनगंटीवार करणार उद्घाटन  

 

मुंबईदि. ४ नोव्हेंबर २०२३ :

 

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागपु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांच्यावतीने ८ ते १४ नोव्हेंबर२०२३ या कालावधीत 'पु. ल. कला महोत्सव २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन बुधवारदि.८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलांगण प्रांगणात होणार आहे. 

पु. ल. कला महोत्सवात साहित्यगायनवादननृत्यनाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित अनेक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे.

 

उद्घाटनानंतर कलांगण येथेच काफिलाकोल्हापूर या संस्थेचा मराठीहिंदीउर्दूप्रेम साहित्यावर आधारित 'जियारतहा कार्यक्रम सादर होईल.

 

गुरुवारदि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता नवीन लघुनाट्यगृहात पंडित डॉ. राम देशपांडे यांच्या 'शतदीप उजळलेया शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरेल पहाट सजणार आहे. त्यासोबतच संध्या. ६:३० वाजता ओमकार अंध-अपंग सामाजिक संस्थेचे विशेष प्रशिक्षण घेतलेले दिव्यदृष्टी असलेले कलाकार मल्लखांबाचे नेत्रदीपक सादरीकरण कलाकार सादर करणार आहेत. तर सायं.  ७:३० वाजता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळवाशी यांच्यावतीने कलांगण येथेच गायनवादन व नृत्याचा आनंददायी आविष्कार अर्थात 'संगीत संध्यारंगणार आहे.

 

शुक्रवारदि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ५:३० वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांच्यावतीने पु. ल. आणि बंगाल यांचा साहित्यिक आणि सांगीतिक भावबंध उलगडणारा 'शोंगित शिल्पी पी. एल. बाबूहा कार्यक्रम कलांगण येथे सादर होईल. यात रविंद्र संगीतासाठी अरुंधती देशमुखबाऊल संगीतासाठी डॉ. उत्तरा चौसाळकर सहभागी होणार असून जेष्ठ पत्रकार हेमकांत नावडीकर पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यकमाचे निरुपण धनश्री लेले करणार आहेत.  सायं. ७:३० वाजता कलांगण येथेच विदुषी आशा खाडीलकर आणि सहकारी 'पु. ल. एक आनंदस्वर" या पु. ल. देशपांडे यांच्या सांगीतिक कारकीर्दीवर आधारित कार्यक्रमाद्वारे रसिकांची संध्याकाळ सुरेल करणार आहेत.

 

शनिवारदि. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं.५ वाजाता पं. मिलिंद रायकर आणि सहकारी 'व्हायोलिनचे रंग-तरंगया कार्यक्रमात शास्त्रीयउपशास्त्रीयतसेच पाश्चात्य व चित्रपट संगीतातील व्हायोलिनच्या सूरांचे अनोखे सादरीकरण करणार आहेत. तद्नंतर सायं.७ वाजता संस्कार भारतीकोकण प्रांताचे गुणवंत कलाकार महाराष्ट्रातील विविध लोककलांचे संगीतमय सादरीकरण 'लोकरंग दिवाळी संध्याया कार्यक्रमात करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम कलांगण येथे होणार आहेत.

दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोमवारदि. १३ नोव्हेंबर २०२३ सायं. ६ वा. अभिजात रंगयात्रा या संस्थेचे कलाकार संग्रहापलिकडचे पु.ल. हा पु. ल. देशपांडे यांच्या प्रकाशित परंतु असंग्रहित साहित्यावर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत. तद्नंतर उत्स्फूर्तठाणे यांचे कलाकार अभिवाचननाट्यप्रवेश यांसह दृकश्राव्य सादरीकरणातून 'स्त्री व्यक्तिरेखा.... पु. ल. यांच्या लेखनातल्याहा कार्यक्रम कलांगण येथे सादर करणार आहेत.

 

विक्रम संवत्सर २०८०च्या प्रतिपदेला अर्थात मंगळवारदि. १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७ वाजता पं. शैलेष भागवत आणि विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मधुर स्वरांनी 'अभ्यंग संगीत साधना महोत्सव - दीपावली पहाटकलांगण येथे रंगणार आहे. 

 

तर बालदिनाचे औचित्य साधून विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी सकाळी १० वाजता नवीन लघुनाट्यगृहात, 'फुलवा मधुर बहारहे संगीत बालनाट्य कलांगणमुंबई ही संस्था सादर करणार आहे.

सायं. ५ वाजता नवीन लघुनाट्यगृहातभारतीय मूर्तीकलेवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून 'भगवतीहा स्त्री-शक्तीचा जागर करणारा  कार्यक्रम ज्येष्ठ नृत्यांगना सोनिया परचुरे आणि सहकारी सादर करणार आहेत.

 

पु. ल. कला महोत्सवाची सांगता रात्रौ ८ वाजता पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'अभ्यंग संगीत साधना महोत्सव अंतर्गत विदुषी कलापिनी कोमकली यांच्या गायनाने कलांगण येथे होणार आहे.

 

'पु. ल. कला महोत्सवांमध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तरी सर्व पुलप्रेमींनी तसेच कलासक्त रसिकजनांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा', असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

-------

युवकांना नशा केवळ देशभक्तीची हवी : सुधीर मुनगंटीवार

 

 युवकांना नशा केवळ देशभक्तीची हवी : सुधीर मुनगंटीवार

  • नशामुक्त समाज निर्मितीसाठी राज्य शासनाच्या सर्वतोपरी सहाय्याची ग्वाही

 

ठाणेदि. ४ नोव्हेंबर २०२३ (जिमाका) : 

 

आचार्य श्री महाश्रमणजी व अनुव्रत विश्वभारती सोसायटीने सुरू केलेल्या नशामुक्त समाज निर्मितीच्या अभियानात राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेलअसे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. युवकांसह समाजाला केवळ देशभक्ती व समाजसेवेची नशा असावी असेही ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

       अनुव्रत विश्वभारती सोसायटीच्या वतीने ठाण्यात आयोजित 'से यस टू लाईफ नो टू ड्रग्जया नशामुक्ती राष्ट्रीय परिषदेत श्री. मुनगंटीवार बोलत होते. 

 

    यावेळी आचार्य श्री महाश्रमणजीडॉ. गौतम भन्सालीमीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडेअंमली पदार्थ विरोधी पथकाचे संजय कुमारनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे सचिन जैनडॉ. एस व्ही खानीलकरलेखकदिग्दर्शक मनोज मुंतशीरजितो चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल कवाडसी जी डांगीयांच्यासह विविध मान्यवरएनसीसी व एनएसएसचे विद्यार्थीपोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक अशोक कोठारी यांनी प्रास्ताविक केले.

 

      श्री. मुनगंटीवार म्हणाले कीभारत देश हा संस्कारी देश आहेया देशात सेवा व त्यागाची पूजा होते. आपल्या देशात आपल्या मनाला जिंकणारा सम्राट होतो. पण आज नशेमुळे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नशामुक्ती अभियान राबविणे आवश्यक आहे. या कामासाठी आपल्याला राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. 

 

नशामुक्ती ची सुरुवात माझ्या जिल्ह्यातून  केली. 2014 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. ज्या व्यसनाने आपल्या आईच्या डोळ्यात पाणी येते ते फक्त अश्रू नसून ते तुम्हाला पापी बनविणारे मार्ग आहे. *युवकांना केवळ देशभक्तीचीसमाज सेवेचीनशा असायला हवी.*

 

      समाजात नशामुक्ती करताना अनेक प्रश्न निर्माण होतात. हे अडथळे दूर करून नशामुक्त समाजासाठी एकत्र येऊन काम करू. आचार्य महाश्रमनजी यांच्या नशामुक्ती मिशनसाठी सर्वशक्तिनिशी राज्य शासन पाठीशी राहील. हे मिशन सज्जन शक्तीचे आहेहे मिशन देशावर मनापासून प्रेम करणाऱ्या भाविकांचे आहेअसेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

   

यावेळी श्री. पांडेश्री. भन्साली यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

0000

भवताल "माळराने" विशेषांक उपलब्ध !

 भवताल "माळराने" विशेषांक उपलब्ध !

- अंक कशा प्रकारे मिळवता येईल

महाराष्ट्राच्या नैसर्गिक स्रोतांकडे आपलं खूप दुर्लक्ष झालंय किंवा त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यापैकी महत्त्वाचे संसाधन म्हणजे, इथली माळराने अर्थात गवताळ प्रदेश! खरंतर त्यांनीच आपला महाराष्ट्र घडवलाय, पण त्यांच्याकडे आपण योग्य नजरेतून पाहिलंच नाही. "भवताल" २०२३ चा दिवाळी विशेषांक याच विषयाला वाहिलेला आहे.
हा अंक प्रसिद्ध झाला असून, आता वाचकांसाठी उपलब्ध आहे. पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये मिळेलच. किंवा नोंदणी करून थेट घरपोच मागवता येईल.

नोंदणीसाठी लिंक:

संपर्कासाठी: 
9545350862

(फोटो- अंकाला सुंदर रूप देणारे आर्टिस्ट श्री. प्रभाकर भोसले यांना तो भेट दिला.)

--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

मोठ्या फसव्या असतात ह्या जाहिराती.

 मोठ्या फसव्या असतात ह्या जाहिराती. दिवाळी तोंडावर आली की उंचपुऱ्या-गोऱ्या तुळतुळीत बायकांना नऊवारी चढवून महागड्या दागिन्यांचे खोकेच्या खोके मढवतात. पण कधी स्टुलावर चढून - भिंतीच्या कोपऱ्यातली जळमटं पाडणाऱ्या, केस पिंजारलेल्या घामाघूम बायका दाखवत नाहीत. 


दिवाळीत कमी आवाजाचे फटाके वाजवा म्हणत जाहिरात करतील. पण पाच दिवसाच्या दिवाळीसाठी पाच दिवस आधी घासणी हाती घेऊन दुपार दुपार डबे बडवणाऱ्या बायकांवर कुणीच बोलत नाही. 


दिवाळीत आप्तेष्टांना पत्रं लिहावीत, ग्रिटींग्ज द्यावेत - असं शाळेपासूनच शिकवलं जातं. पण घर आवरणाऱ्या घामाघूम आईसाठी पेलाभर पाणी घेऊन जावं, हे कुठंच का शिकवलं जात नाही? 


कॅलेंडर सांगतं दिवाळी पाच दिवसांची. खोटं सांगतं कॅलेंडर. दिवाळी पाच नाही पंधरा दिवसांची. दिवाळीचे पाच. तयारीचे दहा! फक्त हे दहा दिवस बायकांचे असतात म्हणून कुठे उल्लेख नसतो. 


दसरा सरला रे सरला की बायका लगेच या खोलीतलं सामान त्या खोलीत सरकवतात. आज ही खोली तर उद्या ती.. ह्या डब्यातली डाळ त्या डब्यात - त्या डब्यातले तांदूळ ह्या डब्यात, हे दहा दिवस म्हणजे कामाची नुसती खिचडी! कपाटं उपसा, दारं-खिडक्या पुसा, वापरातले वेगळी - ठेवणीतली वेगळी अशी सगळीच भांडी एकत्र घासा, जीवाची घासणी करून झिजतात बायका.. 


परत फराळाची तयारी ती वेगळीच! ह्याला उन द्या, त्याला भिजवा, अमकं आंबवा-टमकं तापवा. पुरुषांना दिवाळीत किराणामालाची लांबलचक यादी दिसते फक्त. दुकानातून घरापर्यंत सामानाचं ओझं आणताना आपल्या नाकी नऊ येत असतील, पण बारा पुड्या कढईत सुटतात तेंव्हा जेमतेम एक पदार्थ बनतो, हे गणित बायकांनाच माहित. आपल्याला ह्या डब्यात चिवडा, त्या डब्यात चकल्या, पलिकडच्या डब्यात करंज्या, त्याच्या पलिकडच्यात शंकरपाळी एवढंच काय ते पाहायची सवय. 


साधा चहा बनवायला पाच मिनिट गॅसजवळ उभं राहिलं की चहाच्या आधी आपण उकळतो, एवढं आपल्याला उकडायला होतं. घर जेऊन झोपलं की बायका रात्रभर फराळ तळत बसतात, सांगा त्यांचं काय होत असेल.. रॅक घासता घासता बोट कापतं बऱ्याचदा, त्याच बोटाने मिर्ची-मिठाचा चिवडा चिवडताना आतून त्यांना किती मजबूत फोडणी बसत असेल.. 


मात्र आपण याचा विचार करत नाही. सणासुदीत नटणाऱ्या, माहेरी जाऊन विसाव्याचे दोन क्षण शोधणाऱ्या बायकांवर आपण फॉरवर्डेड जोक फॉरवर्ड करतो.. सगळे सण बायकांचेच! बायकांची काय बाबा मजा असते! रक्षाबंधन असो, भाऊबीज असो, ओवाळणी बायकांना मिळते. पुरुषांना काय मिळतं! 


पुरुषांना सण मिळतो, कॅलेंडरवर लाल तारीख मिळते - सुट्टी मिळते. बैठकीत चार मित्रात रंगलेली मैफिल मिळते. टीपॉयवर फराळाची बशी मिळते. बायकांना हे मिळतं..? 


आपला धर्म, आपली संस्कृती, सण-समारंभ बायकांनीच इथवर ओढत आणलेत. बायका नसत्या तर आपली दिवाळी कशी असती? जरा कल्पना करा.. 


नको त्यांना तुमची मदत. फक्त त्या जे करतात त्याची जाणीव ठेवा. आणि एखादं पत्र, एखादं ग्रिटींग, एखादं चॉकलेट किंवा एखादी मैफिल त्यांच्यासाठीही राखून ठेवा. बास्स एवढंच.

Featured post

Lakshvedhi