Sunday, 5 November 2023

माणूस संकटकाळात माणसाचा कसा आधार होऊ शकतो, सूर्यफूल चे उदाहरण घ्या

 *माणूस संकटकाळात माणसाचा कसा आधार होऊ शकतो, याच उत्तम उदा. बुद्धाने दिलं आहे*

बुद्ध म्हणतो....

🌻जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तस तशी सूर्यफुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात म्हणजेच सुर्यप्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच.

पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. 

ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते ?

तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां ?

तर नाही.

तर काय घडते त्यावेळी?

*ही फुले खाली किंवा वरती नाही वळत तर ती वळतात समोरासमोर एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी!!*

अगदी..माणसाने ही निसर्गाची प्रक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे.*

 समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल शैली उपयोगात आणली पाहिजेत जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे !

तर सर्वांना सदिच्छा देऊया व आपणही सूर्यफुलासारखे 🌻 वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊयात व आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊयात.!!* गुडमॉर्निंग

Saturday, 4 November 2023

कारागृहांमध्ये बंदीजनांकरीता उपलब्ध होणार स्मार्टकार्ड फोन सुविधा

 कारागृहांमध्ये बंदीजनांकरीता उपलब्ध होणार स्मार्टकार्ड फोन सुविधा

 

            मुंबईदि. 03 :- येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंदीजनांकरीता स्मार्टकार्ड फोन सुविधा प्रायोगिक तत्वावर कार्यान्वीत करण्यात आली आहे. अशा प्रकारे स्मार्टकार्ड फोन सुविधा राज्यातील सर्व कारागृहांतील बंदीजनांकरीता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

            ही सुविधा उपलब्ध करून देताना कारागृहांची सुरक्षा व महाराष्ट्र कारागृहातील नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. कारागृहातील अंतर्गत सुरक्षा ही कारागृहाची जबाबदारी असल्याने या स्मार्ट फोन सुविधेचा गैरवापर होणार नाहीयासाठी कारागृह अधिक्षक उपाययोजना आखणार आहेत.

            यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्मार्टकार्ड फोन सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. याबाबत येरवडा कारागृहाचा अहवालही प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व कारागृहात स्मार्टकार्ड फोन सुविधा कार्यान्वीत करण्याबाबत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षककारागृह व सुधारसेवापुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. 

गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य


 

गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य

मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर

 

            मुंबईदि. 3 :- म्हाडाकडे अर्ज प्राप्त झालेल्या सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत 15 हजार 870 गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली असून लवकरच गिरणी कामगारांना प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याचे मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले आहे.

            बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार मुंबईतील 58 गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतील कापड गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक क्षेत्र प्रत्येकी एक तृतीयांश प्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकाम्हाडा आणि मालक यांना देण्याची तरतूद आहे. म्हाडाचा वाटा निश्चित झालेल्या 37 गिरण्यांपैकी 33 गिरण्यांचा 13.78 हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हाडास प्राप्त असून; त्यापैकी 26 गिरण्यांच्या जमिनीवर तीन टप्प्यांमध्ये 13,636 गिरणी कामगार सदनिका व 6,409 संक्रमण सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे.

            पाच गिरण्यांच्या एकूण सहा ठिकाणी क्षेत्रफळ आकाराने लहान असल्यामुळे जागा अदलाबदल करून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या सात गिरण्यांच्या भूखंडावर सुमारे 594 गिरणी कामगार सदनिका तर सुमारे 295 संक्रमण सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. जमिनीचा वाटा निश्चित झालेल्यांपैकी चार गिरण्यांच्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा प्राप्त झाल्यानंतर सुमारे 984 गिरणी कामगार सदनिका तर सुमारे 492 संक्रमण सदनिका बांधता येऊ शकतात.

            टप्पा एक मध्ये एनटीसीच्या आठ गिरण्यांच्या म्हाडासाठी निश्चित झालेल्या वाट्यापैकी 31,501 चौ.मी. क्षेत्र प्राप्त झालेले आहे. उर्वरित क्षेत्रही मिळणे अपेक्षित असून या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी 704 सदनिका तर 352 संक्रमण गाळे अशा एकूण 1056 सदनिका बांधता येऊ शकतील. तसेच सेंच्युरी मिल मधील 13,091 चौ.मी. जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला असून उर्वरित चार हजार 888 चौरस मीटर जमिनीचा ताबा प्राप्त झाल्यानंतर सदर ठिकाणी मिल कामगारांसाठी 474 सदनिका व 236 संक्रमण गाळे अशा सुमारे 710 सदनिका बांधता येऊ शकतील. एकूण 58 गिरण्यांपैकी पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजुरी प्राप्त नसल्यामुळे अकरा गिरण्यांच्या जमिनीचा वाटा निश्चित झालेला नाही. तसेच नवीन डीसीआर अंतर्गत दहा गिरण्यांचा म्हाडाचा वाटा निरंक आहे.

            डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांना सदनिका वितरण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील जमिनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आठ जागांची पाहणी करण्यात आल्यानंतर सहा जागांवरील भूखंड गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यास योग्य आहेअसे अभिप्राय शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत. या आठ जागांपैकी दोन ठिकाणच्या जमिनींचे अधिकार महाराष्ट्र शासनाकडे असल्याने त्या जमिनी प्राप्त होण्याबाबत जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालयात पाठपुरावा सुरू आहे.

            महसूल विभागाकडील जमिनी प्राप्त झाल्यानंतर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याकरिता कालबद्ध पद्धतीने कार्यक्रम आखून बांधकाम करण्यात येईलअसेही मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. बोरीकर यांनी सांगितले आहे.

००००

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३ अर्ज भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३

अर्ज भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

 

            मुंबईदि.३ : भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३’ साठी ऑनलाइन अर्जाची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.

            हे पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील खेळाडूप्रशिक्षकसंस्था आणि विद्यापीठ यांना दिले जातात. मेजर ध्यानचंद खेलरत्न (MDKR) पुरस्कारअर्जुन पुरस्कारद्रोणाचार्य पुरस्कारध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारराष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार (RKPP) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक पुरस्कारांच्या सूचना मंत्रालयाच्या www.yas.nic.in संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. या सर्व पुरस्कारांसाठी या सूचनांचे पालन करुन पुरस्कारासाठी पात्र खेळाडू / प्रशिक्षक / संस्था / विद्यापीठांनी दि.१० नोव्हेंबर२०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत.

            ऑनलाइन अर्ज dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरताना कोणत्याही अडचणी आल्यासअर्जदार क्रीडा विभागाशी sportsawards-moyas@gov.in या संकेतस्थळावर किंवा क्र. ०११-२३३८७४३२ या दूरध्वनीवर दि.१७ नोव्हेंबर२०२३ पर्यंत सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संपर्क साधता येईल. तसेचऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सहकार्य आवश्यक असल्यास दि.१० नोव्हेंबर,२०२३ पर्यंत सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या कालावधीत टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800-202-5155 आणि 1800-258-5155 उपलब्ध आहेत.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांची आज १७८

 *आज ४ नोव्हेंबर..*

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांची आज १७८ वी जयंती..

दि.४ नोव्हेंबर १८४५ रोजी शिरढोण ,ता.पनवेल ,जि.रायगड येथे जन्म झाला. आजोबा कर्नाळा किल्याचे किल्लेदार होते. लहानपणी कुस्ती , घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नृसिंह मंदिराजवळ राहू लागले. न्या.म.गो.रानडे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा त्यांचेवर प्रभाव होता..

*विनम्र अभिवादन..*

🙏🌹

अनिलकुमार

९९६९३२०३३२


दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त

 दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांनी दिली सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

 

            मुंबई, दि. 3 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची 'सत्यनिष्ठा प्रतिज्ञादिली.

            देशाच्या आर्थिकराजकीय व सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी लाच न घेण्याची  तसेच न लाच देण्याचीतसेच व्यापक समाज हितासाठी कार्य करण्याची शपथ राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना दिली. 

            राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी उपस्थितांसमोर राज्यपालांच्या तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशांचे वाचन केले.

            भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृतकाळ महत्वाचा आहे. देश भ्रष्टाचारमुक्त झाला तर विकसित भारताचे उद्दिष्ट अधिक लवकर साध्य करता येईल. या दृष्टीने वैयक्तिक तसेच संस्थात्मक स्तरावर पारदर्शकताप्रामाणिकपणा आणि सचोटीची संस्कृती रुजविणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन राज्यपालांनी आपल्या संदेशातून केले. 

            विकसित भारताच्या दिशेने जाताना भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करणे हे शासनाचे प्रथम उद्दिष्ट आहे. दक्षता जनजागृती सप्ताहामुळे भ्रष्टाचाराची साखळी तोडण्यासाठी नागरिक जागरूक होतीलतसेच भ्रष्टाचार  निर्मूलन चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढेलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशातून सांगितले.

            दि. 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून भ्रष्टाचाराला नाही म्हणाराष्ट्रासाठी वचनबध्द व्हा’ ही संकल्पना त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे.

००००

 

Governor Bais gives Integrity Pledge to Staff, Officers of Raj  Bhavan

            Mumbai 3 : Maharashtra Governor Ramesh Bais gave the ‘Integrity Pledge' to the staff and officers of Raj Bhavan on the occasion of 'Vigilance Awareness Week' at Raj Bhavan Mumbai on Fri (3 Nov.)

            Observing that corruption is a major obstacle to the economic, political and social progress of the country, the Governor appealed to all to uphold integrity and honesty; and to ‘not to accept or give bribes’.

            The Secretary to the Governor (In-charge) Shweta Singhal read out the messages of the Governor and Chief Minister Eknath Shinde on the occasion.

            The ‘Vigilance Awareness Week’ is being observed across the state from October 30 to November 5. 'Say No to Corruption; Commit to the Nation' has been decided as the theme of the Week.

            Special Secretary to the Governor Vipin Kumar Saxena, Comptroller of the Governor's Households Arun Anandkar and Deputy Secretary Ravindra Dhurjad were present.

0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्याविविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्याविविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात


- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


 


            मुंबई दि.3 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच या योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.


             सह्याद्री अतिथीगृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा मंत्री श्री.विखे पाटील यांनी घेतला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शितलकुमार मुकणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


             यावेळी श्री विखे पाटील म्हणाले,महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरणासाठी निधी देण्यात आला आहे.महामंडळाचे भाग भांडवल वाढविण्याबाबत ही निर्णय घेण्यात येईल.राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा आढावा घेण्यात आला. महामंडळाच्या माध्यमातून शेळी समुह योजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच या योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश ही यावेळी दिले.


0000000

Featured post

Lakshvedhi