Friday, 6 October 2023

भावंडामध्ये असलेले प्रेम शेवटपर्यंत टिकवता आले तर ते जीवन किती आनंदमय असेल याची कल्पना जरी केली तरी आतुन

 भावंडामध्ये असलेले प्रेम शेवटपर्यंत टिकवता आले तर ते जीवन किती आनंदमय असेल याची कल्पना जरी केली तरी आतुन आनंद आणि समाधान उसळी मारते. ज्यांना हे प्रत्येक्षात उतरवता आले ती भावंडे आणि त्यांना जन्म देणारे आईवडील खरोखरच भाग्यवान आहेत.

पोटचे आले की पाठच्याचा विसर पडतो आणि ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांची परवड सुरू होते.असे चित्र सर्रास पहायला मिळत आहे, याचे कारण आपली कुटुंब व्यवस्था पूर्ण कोलमडून गेली आहे, संवाद संपला आहे.

आपले दुःख व्यक्त करायला जवळचे कोणीच नाही, असा भाव तयार होऊ लागला आहे. यामुळे माणूस एकलकोंडा होऊन मनोरूग्ण बनू लागला आहे,

याचा शेवट आनंद हरवून फक्त नैराश्य उरले आहे. आणि

मी काय मिळविले? याचे उत्तर शून्य आहे. हे शून्य मोठे असले काय आणि छोटे असले काय त्याचे मुल्य समान आहे. आपण जसा कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, तसा भावंडांनाही वेळ दिला पाहिजे.

: स्वतःला प्रश्न विचारून पहा.

कोणतेही काम नसताना आपण आपल्या बहिणीकडे किंवा भावाकडे सहज भेटायला किती वर्षे गेलो नाही. मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही.

खाऊच्या एका घासासाठी पाठीत धपाटा मारणारी मोठी बहीण, चिमटा काढून पळून जाणारी धाकटी बहीण आपण बाहेरून आलो तर काहीतरी आणले असेल म्हणून खिशाकडे हाताकडे पाहणारा धाकटा भाऊ, आजही तसेच आहेत फक्त आपला भाव आणि स्वभाव बदलला.

वय कितीही होऊ द्यात.

👉थोरल्याने अधिकार गाजवलाच पाहिजे

👉आणि धाकट्याने हट्ट केलाच पाहिजे.

आपण जेथे असू तेथे आपली भूमिका आपल्याला पार पाडता आली पाहिजे.

हे शक्य आहे त्यासाठी वर्षातून किमान एकवेळ पूर्ण एक दिवस सर्व भावंडांनी एकमेकासाठी द्या.त्यादिवशी आपले आईवडील आणि आपली भावंडे मिळून एक दिवस एकत्र येऊन, एक दिवसाची सहल आयोजित करा, कुवत असेल त्याने सर्व खर्च करा, कुवत

नसेल तर तो एक दिवस सुट्टी घेऊन फक्त सर्व

भावंडे आईवडीलांसोबत रहा आणि अनुभव

घेऊन पहा. 

हा अनुभव आईवडील व

भावंडांच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दात व्यक्त न करता येणारा आहे,

🙏🌹

जब तक मेरा बाप जिंदा है,


 

अवघे वयमन किती


 

Thursday, 5 October 2023

मातंग समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 मातंग समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक


- मंत्री शंभूराज देसाई


     


            मुंबई, दि. 4 : मातंग समाजापर्यंत विविध योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मातंग समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.


            मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. मंत्री श्री. देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही बैठक घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे मातंग समाजाच्या मागण्याबाबत सकारात्मक आहेत. मुंबईत आझाद मैदान येथे मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्यावतीने यावेळी मी उपस्थित राहून सकारात्मक चर्चा केली होती. याबाबत दोन बैठका घेतल्या आहेत, असे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.


             या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, तसेच मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजाच्या प्रश्नांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.


            मंत्री श्री. देसाई म्हणाले की, कर्नाटक व पंजाब राज्याने त्यांच्या राज्याकरिता अनुसूचित जातीचे जातीनिहाय उपवर्गीकरण केले आहे. त्या संदर्भात अवलंबिलेल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी पंजाब व कर्नाटक या राज्यांना भेट देण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या शिष्टमंडळात मातंग समाजाच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल. लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीनुसार संबंधित विभागाकडून अनुपालन अहवाल मागविण्यात येईल. या आयोगाच्या 82 शिफारशी पैकी 68 शिफारशी तत्त्वतः मान्य केल्या आहेत. मातंग समाज योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यांमध्ये जनजागृती शिबिरे आयोजित करावीत असे निर्देश संबंधितांना यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी दिले. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आर्टी) स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. तसेच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे चिरागनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याकरता विविध विभागांचे अभिप्राय मागविण्यात यावेत, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.


*****

धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार

 धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार


- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            मुंबई दि. ४ : धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


            वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंचच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री. विखे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्री श्री. विखे पाटील यांना दिले. दरम्यान, शिष्टमंडळाशी सविस्तर प्राथमिक चर्चा करून मंत्री श्री. विखे पाटील यांनी विषय समजून घेतले. तसेच लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, मेंढपाळ विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष संतोष महात्मे, मेंढपाळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक पल्लवी लांडे, संचालक प्रवीण भुजाडे यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदीरजनीश सेठ यांची नियुक्ती

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदीरजनीश सेठ यांची नियुक्ती


            मुंबई दि. 5 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर राज्याचे माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या आदेशानुसार श्री. सेठ यांच्या नियुक्तीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.


            ही नियुक्ती त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी

 राहील.


सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून राज्यात आदर्श शाळांची निर्मिती करणार

 सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून

राज्यात आदर्श शाळांची निर्मिती करणार

- मंत्री गिरीष महाजन

            मुंबईदि. 5 : राज्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन आणि कार्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून आदर्श शाळा निर्मितीचे उदिष्ट यशस्वी होऊ शकतेअसे  प्रतिपादन ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

            ग्राम विकास विभागांतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने अलीकडेच मुंबई येथे राज्यातील कार्पोरेट कंपन्यांची सी.एस.आर. परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेव्हीएसटीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजाराम दिघे उपस्थित होते. तसेच परिषदेमध्ये जेएसडब्ल्यू फाऊंडेशनरिलायन्स फाऊंडेशनएसटीएलइन्फोसिसमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.सिध्द‍िविनायक ट्रस्टराष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्सॲक्स‍िस बँकरोबोटिक्स इंडियामॅरीको आदी प्रमुख कंपन्यांसह विविध कंपन्याचे अधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले होते.               

            मंत्री श्री. महाजन म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनमार्फत सन २०२० पासून आदर्श शाळा विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यातून आदर्श शाळांची निर्मिती होत आहे.

              प्रधान सचिव श्री. डवले यांनी व्हीएसटीएफमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सीएसआर मार्फत विविध गावांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांना शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी कार्पोरेट कंपन्याना सामंजस्य करार करण्याचे आवाहन केले.

            परिषदेमध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिघे यांनी मिशन महाग्राम अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले.  तसेच त्यांनी आदर्श शाळा विकास कार्यक्रमाची माहिती देऊन परिषदेत सहभागी कार्पोरेट कंपन्यांसोबत स्वतंत्र बैठका घेऊन सामंजस्य करार करण्यात येईलअसे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाणे ता. शिंदखेडा, जिल्हा धुळे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारगाव जिल्हा अहमदनगर या शाळांचे ग्राम विकास मंत्री श्री. महाजन यांचे हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. शाळांमध्ये गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी आदर्श शाळा विकास कार्यक्रमाच्या संकल्पना पुस्तिकेचे प्रकाशन केले.

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य अभियान व्यवस्थापक दिलिपसिंह बायस यांनी, तर आभार प्रदर्शन राज्य अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल रंगारी यांनी केले.

0000

Featured post

Lakshvedhi