Wednesday, 4 October 2023

ग्रामीण भागात क्रीडा नैपुण्याला संधी देण्यासाठीसुविधा निर्माण करणार

 ग्रामीण भागात क्रीडा नैपुण्याला संधी देण्यासाठीसुविधा निर्माण करणार


- क्रीडा मंत्री संजय बनसोडे


            मुंबई, दि. ४ : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सर्व क्रीडाविषयक सोयीसुविधांनी युक्त तालुका क्रीडा संकुल निर्मितीला प्राधान्य आहे. क्रीडा विभागाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील तालुका क्रीडा संकुलाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिले. मौजे वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील विस्तारित क्रीडा संकुलासाठी तत्वत: मंजुरी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री. बनसोडे यांनी मोहोळ क्रीडा संकुल आणि वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे तालुका क्रीडा संकुलाबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार यशवंत माने, भारत शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र साठे, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हांजे, उपसंचालक (क्रीडा) अनिल चोरमले, मोहोळ तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, उत्तर सोलापूर तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, हरिभाऊ घाडगे, समाधान कराड, भाऊसाहेब लामकाणे आदींची यावेळी उपस्थिती होते.


             मंत्री श्री. बनसोडे यांनी मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे शहर असल्याचे सांगितले. त्यामुळे येथील तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा असणे अपेक्षित आहे. क्रीडा विभागाने त्या अनुषंगाने सुधारित परिपूर्ण प्रस्ताव तत्काळ सादर करावा. त्यास शासन निश्चितपणे सहकार्य करेल. राज्य क्रीडा समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


            उत्तर सोलापूर तालुका क्रीडा संकुल सोलापूर महानगरपालिका हद्दीत येते. जेथे जागा अपुरी असल्यामुळे विस्तारीत क्रीडा सुविधा निर्माण करण्यास मर्यादा येत असल्याची बाब आमदार श्री. माने यांनी निदर्शनास आणून दिली. यावर सध्या वडाळा येथे विस्तारित क्रीडा संकुलासाठी तत्वत: मंजुरी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव तालुका आणि जिल्हा पातळीवरुन तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.


००००

सत्संग

 


मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठीशासन बांधणार ४० हजार शौचालये

 मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठीशासन बांधणार ४० हजार शौचालये


- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा


 


            मुंबई, दि. ४ : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे वांद्रे (प.) नित्यानंद नगर येथील लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयांचे आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकार्पण केले. यावेळी आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


            झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहाची मागणी आजवर दुर्लक्षित होती. ती सोडवण्यासाठी पालकमंत्री श्री. लोढा यांनी पुढाकार घेतला असून, येत्या काळात उपनगरातील वस्त्यांमध्ये ४०,००० शौचालये बांधण्यात येणार आहेत. यापैकी १२,००० शौचालये नव्याने बांधण्यात येतील, तर २८,००० शौचालयांची पुनर्बांधणी करून त्यांना नवे रूप देण्यात येणार आहे. पालकमंत्री श्री. लोढा यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या प्रकल्पासाठी पालकमंत्री निधीतून आणि मुंबई महापालिकेद्वारे ६३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


            पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, "मुंबई उपनगरातील झोपडपट्टीवासीयांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन, आखण्यात आलेल्या शौचालय उभारण्याच्या योजनेचा आज शुभारंभ झाला याचा आनंद आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी अत्याधुनिक दर्जाची, स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये उभारण्यात येतील. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण मुंबई उपनगरातील नागरिकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या कोणत्याही मागणीकडे किंवा समस्येकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ!"


****

येत्या दोन वर्षात पालिकेचे सुसज्ज कार्यालय उभे करावे

 येत्या दोन वर्षात पालिकेचे सुसज्ज कार्यालय उभे करावे



- आमदार अतुल भातखळकर यांची मागणी


- मालाड पूर्वला पी उत्तर-पूर्व विभागाच्या तात्पुरत्या कार्यालयाचे लोकार्पण  


मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभेत मालाड पूर्वला महापालिकेच्या पी उत्तर-पूर्व विभागाचे तात्पुरते का होईना पण कार्यालायचे लोकार्पण झाले याबद्दल समाधान व्यक्त करत येणाऱ्या २-३ वर्षाच्या आत नव्या जागेवर सुसज्ज कार्यालय उभे केले पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. पालिकेच्या पी उत्तर –पूर्व या कार्यालयाचे लोकार्पण आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडले, यावेळी आजोजित समारंभात आमदार भातखळकर बोलत होते.


आमदार भातखळकर म्हणाले, मालाड पूर्वला हे कार्यालय व्हावे, यासाठी २०१७ मध्ये विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास विभागाने निर्णय घेतला होता. या कार्यालयासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, या प्रयत्नांना यश आले याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. आ. भातखळकर म्हणाले, या रामलीला मैदानाचा वापर खेळासाठी होत आहे त्यामध्ये कोठेही बाधा येता कामा नये. याशिवाय या कार्यालयासाठी लवकरात लवकर पश्चिम द्रुतगती मार्गावरील भूखंडाचे अधीग्रहण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.


सध्या या कार्यालयामध्ये पाणी, कचरा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र अशा सामान्य लोकांशी संबंधित विभाग आज सुरु झाले आहेत. या कार्यालासाठी आवश्यक असलेली पदस्थापना झाली असल्याने येथे आठवडयातुन किमान दोन दिवस सहाय्यक आयुक्तांनी बसावे, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी यावेळी बोलताना केली. 

आपल्या समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहा ,उपाय नक्कीच सापडेल....*😊

 *आपल्या समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहा ,उपाय नक्कीच सापडेल....*😊


वेड्यांच्या दवाखान्या

समोर एकाची कार पंक्चर झाली. तो पटकन गाडीतून खाली उतरला. 


चार नट काढून मागचं चाक काढलं. पंक्चर झालेलं चाक काढून तिथे स्टेपनी लावली आणि परत जेव्हा चार नट लावायला गेला तेव्हा लक्षात आलं की, चार नट बाजूच्या गटारात पडले आहेत. 


जे आता काढणे शक्य नाही. 

अवघड परिस्थिती झाली. समस्या वेगळीच होती. 

गाडी हवेत, चारी नट बाजूच्या गटारात पडलेले, सापडत नव्हते. पंक्चरच्या जागी लावायला नवीन चाक आहे. 

पण नट नसल्यामुळे ते बसू शकत नाही. 

त्याने वेड्याच्या दवाखान्याकडे बघितलं. एक वेडा गॅलरीत उभा राहून त्याच्याकडे बघत होता.


"मला मदत करणार का? मला शहरात जायचंय ?” समोरच्या कारवाल्याने त्या वेड्याला विचारलं.


"मग जा की.”


"नाही. गाडी नाहीये."


"ती काय समोर उभी आहे."


"अहो, ती पंक्चर आहे."


"प्रॉब्लेम काय आहे?"


त्याने सगळं त्या वेड्याला सांगितलं.


तो म्हणाला, “सोपं आहे. समस्येमध्येच समाधान आहे. तुमच्याकडे तीन चाकं आहेत.

 प्रत्येक चाकाला चार नटं आहेत. आणि एक चाक तीन नटांवर राहू शकतं. 

तुम्ही प्रत्येक चाकाचा एक एक नट काढा आणि चौथ्या चाकाला तीन नट लावा. "


आता मात्र याचे डोळे मोठे झाले. चमकून त्याने, "खरंच की.' असं म्हटलं.


खरंतर समस्या ही आधीपासून नव्हती. फक्त त्या समस्येकडे बघायला दृष्टी नव्हती. 


हे असं शक्यच नाही, या विचारानेच त्याला बांधून ठेवलं होतं.


 इंग्रजीत आपण त्याला म्हणतो, चॅलेंज युवर अझम्शन्स.


 म्हणजे आपण मानलेल्या गोष्टींवर प्रहार करा. समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहा.


त्याने भराभरा प्रत्येक चाकाचा एक एक नट काढला आणि चौथ्या चाकाला तीन नट लावून गाडी तयार झाली.


त्याने त्या वेड्याकडे बघितलं आणि म्हणाला, “अरे, तुला

कोणी अॅडमीट केलं इथे? तू तर अजिबात वेडा नाहीस.'


तो म्हणाला, “मी वेडा आहे पण एवढी साधी गोष्ट न कळायला मी मूर्ख नाही."


 असंच होतं. ज्या वेळेला आपल्या आयुष्यात आपण आजूबाजूला चाललेल्या अनेक गोष्टी अशाच आहेत, असं मानून बसतो त्या वेळेला त्यात नवीन मार्ग दिसत नाही.


 नवीन मार्ग न दिसल्यामुळे आपण अनेकदा तिथेच फिरत राहतो.


समस्या ज्या कारणासाठी आपल्या आयुष्यात आली आहे त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही.* 

🙏🌹

अयोध्येत राम मंदिर बांधायचे असे ठरले,

 अलिबाग तालुक्यातील नागाव गावातील श्री मिलिंद रामचंद्र वाड व सौ मुग्धा मिलिंद वाड यांना अयोध्येत राम पुजेचा मान मिळाला. अयोध्येत राम मंदिर बांधायचे असे ठरले, तेव्हा नरेंद्र मोदींनी सांगितले नुसते मंदिर बांधायचे नाही तर त्या आधी प्रत्येक प्रतिपदेला पाच जोडप्याला आमंत्रित करुन त्यांच्या हस्ते पुजा करायच्या म्हणजे काही तरी चांगले कार्य करायचे असं काहीसं ठरवले.

  आणि त्या नंतर कसं करायचे वगैरे ठरले,नंतर एक फाॅर्म काढले ते भरुन द्यायचे,कोणाची इच्छा असेल पुजा करायची त्यांनी तो फाॅर्म भरायचा ज्यांचा नंबर लागेल त्यांना ते फोन करायचे आणि सांगायचे तुमचा अमुक तारखेला नंबर लागलाय तर तुम्ही येणार आहात का जोडीने पुजा करायला तर आपण हो सांगितले तर ती तारीख निश्चित आणि नसेल जमत आपल्याला तर आपण सांगायचे आम्हाला तारीख बदलुन मिळेल का,आमची यायची इच्छा खुप आहे पण त्या तारखेला जमत नाही तर तारीख बदलुन द्या,तर ती लोक सांगायची पुढच्या तारखेची माणस तयार असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही,मग , श्री.मिलिंद वाड,सौ.उषा वाड चा हाच problem झाला होता त्यांना १७ तारीख आली होती पण गणपती असल्यामुळे त्यांना शक्य नव्हते तर त्यांनी तारीख बदलुन दिली आणि त्यांना ३० तारीख मिळाली त्यांचा योग चांगला होता आणि जबरदस्त इच्छाशक्ती होती त्यामुळे त्यांचा नंबर लागला आणि त्यांना पुजेचा मान मिळाला, त्यांनी दिवसभराचा कार्यक्रम आखून दिला होता त्याप्रमाणे पुजा,शरयु नदिची आरती, जेवण वगैरे असा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, त्यांनी त्यांची तिथे रहाण्याची वगैरे व्यवस्थित सोय केली होती.

खर सांगायच झाल तर श्री मिलिंद वाड व सौ उषा वाड यांना हा मान आज मिळाला फार मोठे भाग्य आहे त्यांचे.त्यांच्या बरोबर सौ.उषा वाड यांच्या मातोश्री श्रीमती लिमये या सुद्धा त्या वेळी त्यांच्या बरोबर उपस्थित होत्या.

जय श्रीराम 🚩🚩🚩🙏🏿🙏🏿🙏🏿💐💐💐

ग्राम पंचायत निवडणुका अलिबाग रायगड

 


Featured post

Lakshvedhi