लोकशाहीर आण्णा भाऊसाठे नाट्यगृह,येरवडा, पुणे, पुणे
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 1 October 2023
जिल्हाधिकारी कार्यालयाने राबवली स्वच्छता मोहिम एक तारीख एक तास मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद
जिल्हाधिकारी कार्यालयाने राबवली स्वच्छता मोहिम
एक तारीख एक तास मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद
मुंबई, दि १:- महात्मा गांधी यांच्या जयंतीचे (२ ऑक्टोबर) औचित्याने आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने 'एक तारीख एक तास' ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आज स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविण्यात आली.
यात अधिकारी, कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग देत श्रमदान केले. या मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील ब बाहेरील परिसर, एशियाटीक सोसायटी (सेंट्रल लायब्ररी टाऊन हॉल) परिसर, सेंट्रल लायब्ररी समोरील हर्निमन सर्कल व परिसरात तसेच क्षेत्रीय वन अधिकारी सागर माळी आणि मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने कुलाबा व शिवडी फ्री-वे येथील कांदळवन परिसरातही स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, एकनाथ नवले, उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी कृष्णकांत चिकुतें, तहसीलदार अतुल सावे, तहसीलदार प्रियांका ढोले, तसेच सुमारे 60 अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी मोहिमेत सहभाग
घेतला.
गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारतासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे:
गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारतासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे:
विधानसभा अध्यक्ष ॲड्. राहुल नार्वेकर
भारत हा सर्वात मोठी लोकशाही आणि अर्थव्यवस्था असलेला देश आहे. भविष्यात स्वच्छ देश म्हणून जगात भारताची ओळख निर्माण करण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देखील अशाच प्रकारे स्वच्छ व स्वस्थ भारत ही संकल्पना अभिप्रेत होती. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची स्वच्छता हा नाविन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वच्छतेची संकल्पना रुजवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल असे सांगून, लोकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड् नार्वेकर यांनी यावेळी केले.
कौशल्य विकासासोबत लोकाभिमुख कार्यक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग: मंत्री मंगल प्रभात लोढा
शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना या उपक्रमाद्वारे अनोखी मानवंदना देण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या ४०० आय. टी. आय. संस्थांनी परिसर स्वच्छता व गड किल्ल्यांची स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
यावेळी ऑल इंडिया ट्रेड ट्रेनिंग (AITT) सन 2023 च्या परीक्षेत मुंबई शहर आय.टी. आय. च्या मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स या ट्रेडमध्ये ऋतुजा पवार, मेकॅनिक मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये जानवी धोंडींदे यांनी देशात विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
दूर्ग मित्र संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान, मराठा वॉरियर्स, संत निरंकारी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहिमेच्या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संत निरंकारी प्रतिष्ठानच्यावतीने यावेळी पथनाट्य सादर करण्यात
आले.
***
गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनासाठीजिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी देणार
गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनासाठीजिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी देणार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
350 गडकिल्ल्यांवर 418 आयटीआय राबविणार स्वच्छता मोहिम
मुंबई, दि. १: शिवछत्रपती यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त 350 गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, 'स्वच्छता हीच सेवा' या उपक्रमांतर्गत गड -किल्ल्यांची राज्यव्यापी स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. यावेळी ते बोलत होते.
कौशल्य विकास विभागांतर्गत राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) यांच्याद्वारे परिसर स्वच्छता आणि गड किल्ल्यांची स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. दीड लाख विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, मनपा अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन. उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या भौतिक प्रगतीसाठी स्वच्छ व स्वस्थ भारत असणे गरजेचे आहे. राज्याचे खरे वैभव हे गड किल्ले आणि जलदुर्ग आहेत. त्यांचे संवर्धन व स्वच्छता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन करित आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, राज्याचे वैभव जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
घरोघरी शौचालय उभारणे, हागणदारीमुक्त भारत या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मल-जल शुद्धीकरण सुरु असून, राज्यात 221 सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापनातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. प्रधानमंत्री यांच्या संदेशानुसार 17 सप्टेंबरपासून सुरू असलेला स्वच्छता पंधरवडा पुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठात राज्यस्तरीय सफाई कामगार उत्थान परिषद कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सफाई कर्मचारी आयोग वेगाने काम करेल
मुंबई विद्यापीठात राज्यस्तरीय सफाई कामगार उत्थान परिषद
कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सफाई कर्मचारी आयोग वेगाने काम करेल
- मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता अधिक वेगाने काम करेल व त्याद्वारे सफाई कामगारांचे हक्क व अधिकार त्यांना मिळतील असे प्रतिप्रादन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई विद्यापीठ व जनआधार सेवा फाऊंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सफाई कामगार उत्थान परिषद मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उदघाटन मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा शुभसंदेश वाचण्यात आला. शुभसंदेशात श्री.आठवले यांनी,``केंद्र शासन सफाई कामगारांचे जीवनमान उंचावण्याकरिता `नमस्ते` योजनेव्दारे सर्वतोपरी मदत करील, अशी ग्वाही दिली.
मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले, राज्य शासनाच्या विविध विभागाच्यावतीने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजना, अनुकंपा वारसांना नोकरी देणे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रित कंपनीच्या योजना, `नमस्ते` मोहिम, हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन करणे या अधिनियमानुसार कामगारांना आधुनिक यंत्रसामुग्री पुरविण्याचे काम सफाई कर्मचारी आयोगामार्फत होऊ शकते. तसेच सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले, सफाई कामगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणे, सुनियोजित प्रशिक्षण देऊन सर्वतोपरी त्यांच्या आरोग्याचे व जीवनाचे संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी, माजी अप्पर मुख्य सचिव ए. के. जैन, अखिल भारतीय वाल्मिकी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. रेखा बहनवाल, सफाई मजदूर कॉग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री धनराज बिरदा, सल्लागार ऍड. गीरेंद्रनाथ, जनआधार सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी गटचर्चा सत्र घेण्यात आले. यामध्ये प्रशासकीय सत्र, संशोधक विद्यार्थी सत्र व आरोग्यदूत सफाई मित्र सत्र घेण्यात आले. यामध्ये झालेल्या चर्चा व ठरावाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना निवेदन देण्यात आले.
दुपारच्या सत्रात कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशम, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी.वावा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सुभाष पारधी, आमदार सुनील कांबळे, बाटू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे , सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी विचार मांडून मार्गदर्शन केले .
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशम म्हणाले, केंद्र शासन सफाई कामगारांच्या उत्थानासाठी कटिबध्द असून कायदा व वित्तीय सहाय्याव्दारे सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यात येतील. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले, सफाई कामगारांना समाजात सन्मानाने वावरता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील असून केंद्र शासनाच्या `नमस्ते` योजनेमार्फत आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणे व योजनेव्दारे सफाई कामगारांना सहाय्य करण्यात येईल.
यावेळी जनआधार सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी जनआधार सेवा फाऊंडेशन संस्था अनेक वर्षापासून सफाई कामगारांचे कल्याण व उत्थानासाठी काम करत असून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात महाप्रितचे संचालक विजयकुमार काळम-पाटील व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अन्य अधिकारी तसेच राज्यातून मोठ्या संख्येने सफाई कामगार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चाबुकस्वार यांनी केले. तर संजय कांबळे यांनी आभार मानले.
सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल
सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
------------------
राज्यात “एक तारीख एक तास” मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद
72 हजारापेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची मोहीम
मुंबई, दि.1 : आज गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी “एक तारी
ख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनविण्यासाठी आपण टाकलेलं हे मोठं पाऊल असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची लोकचळवळ झाली आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलतांना म्हणाले. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून 72 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली असून त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले.
उद्या (2 ऑक्टो) रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. गिरगाव चौपाटी येथे शुभारंभासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ इक्बाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंद राज, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल श्री कोबी, कोस्टगार्ड महासंचालक कैलाश नेगी, अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुबोध भावे आदींची उपस्थिती होती.
या ऐतिहासिक मोहिमेत सर्वांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागासाठी धन्यवाद देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी जेव्हा पहिल्यांदा स्वच्छ भारताची घोषणा केली आणि स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले तेव्हा अनेकांनी त्यावर टीका केली आणि खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला; पण सगळी जनता जेव्हा या अभियानात उतरली आणि जो इतिहास त्यानंतर रचला तो सगळ्या जगाने पाहिला आणि टीकाकारांची तोंडं बंद झाली. प्रधानमंत्री म्हणतात त्याप्रमाणे, स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानेच राबविण्याचा कार्यक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे.
स्वच्छता कागदावर नको
‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान महत्त्वाचं आहे. ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष फिल्डवर काम दिसलं पाहिजे. आजचा दिवस झाला की संपलं, असं नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा असं होता कामा नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.
गडकिल्ले, मंदिर परिसरात स्वच्छता
राज्यातल्या गडकिल्ले, धार्मिक स्थळे, मंदिरे यांच्या परिसरात देखील स्वच्छता असली पाहिजे. ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत यासाठी देखील सर्वांनी सहभागी होऊन काम केले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचा डंका वाजत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जे पन्नास साठ वर्षात जमले नाही ते पंतप्रधानांनी गेल्या आठ नऊ वर्षांत केले आणि देशात स्वच्छतेचे काम झाले, भ्रष्ट्राचाराची सफाई झाली.
चौपाटीवर नागरिकांचा उत्साह
गिरगाव चौपाटीवर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथम ग्रीनलॉन्स स्कूलच्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळले. हे विद्यार्थी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपल्या शिक्षकांसोबत आले होते. मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले आणि त्यांचे कौतुक केले. जोगेश्वरीच्या मर्कझ उल मारिफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे विद्यार्थी सुद्धा स्वच्छतेसाठी गिरगाव चौपाटीवर आले होते. मुख्यमंत्री त्यांच्याशी देखील बोलले. आज चौपाटी येथे स्वच्छता स्वयंसेवकांच्या जोडीने अनेक संस्था देखील उतरल्या होत्या. स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक कुमार स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांसह आले होते. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, एनसीसी, गुरुनानक हायस्कूल, नवनीत कॉलेज, सागरी सीमा मंच, उत्कल सेवा समिती, नैशनलं हौसिंग बँक, सेंट झेव्हियर्स कॉलेज तसेच पोलीस, होमगार्ड्स, महानगरपलिका कर्मचारी यांनी उत्साहाने या मोहिमेत भाग घेतला. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र- स्वच्छ भारताच्या घोषणा देण्यात येत होत्या.
प्रारंभी जय जय महाराष्ट्र माझा राज्य गीताने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी स्वच्छतेची प्रार्थना देखील घेण्यात आली.
000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...