Wednesday, 13 September 2023

एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार

 एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार

            मुंबई, दि. १३ :- एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.


            मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एम.एस.आर.टी.सी) अर्थात एस.टी. महामंडळ व रेल्वेच्या आय.आर.सी.टी.सी. यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला.


            यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन (https://www.bus.irctc.co.in) प्रवाशांना एसटीचे तिकीट देखील आरक्षित करता येणार आहे. 


            रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीटदेखील आरक्षित करणे शक्य होईल. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.


            या करारप्रसंगी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन - नैनुटिया, आय.आर.सी.टी.सी. च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सीमाकुमार आदी उपस्थित होते.


0000



 

राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरणबिघडवण्याचे काम कोणी करू नये

 राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरणबिघडवण्याचे काम कोणी करू नये

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 13 : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाजबांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असा खोडसाळपणा कुणी करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.


            घडलेले मुद्दे, प्रसंग आणि घटना मोडतोड करून सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत असताना या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार योग्य नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मक बोलू या, अशी चर्चा मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार करीत असताना आमचा संवाद ‘सोशल मीडिया’वरून चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे.


            मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली आणि सकारात्मक भूमिका घेतली असताना, संवादाचा मार्ग प्रशस्त केला असताना खोडसाळपणे आणि व्हीडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत.


            आपल्या राज्याची ही संस्कृती नाही. राज्यात असलेले सकारात्मक वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवाहन केले आहे.


००००

कांदिवली पूर्व विधानसभेत होणार ‘मेरी माटी मेरा देश’चा जागर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 कांदिवली पूर्व विधानसभेत होणार ‘मेरी माटी मेरा देश’चा जागर

ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन


आमदार अतुल भातखळकर यांची माहिती


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशासाठी बलिदान दिलेल्या महान स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण व्हावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानचे आयोजन कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात करण्यात आले आहे. रविवार, १७ सप्टेंबर रोजी विधानसभा क्षेत्रातील सर्व वॉर्डामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

रविवारी वॉर्डनिहाय व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. जमा करण्यात आलेली माती एकत्र करण्यासाठी ‘अमृत कलश’ घेउन सर्वत्र रथयात्रा निघणार असून यामध्ये माती एकत्र केली जाणार आहे. वॉर्ड क्रमांक २३ मध्ये सकाळी १०.३० वाजता पोयसर येथील पं. दिनदयाळ उपाध्याय मैदान येथे खा. गोपाळ शेट्टी हे मार्गादर्शन करणार आहेत. वॉर्ड क्रमांक २४ मध्ये सकाळी १०.३० वाजता ठाकूर कॉम्प्लेक्स येथील प्रमोद नवलकर उद्यान गेट येथे गणेश खणकर, वॉर्ड क्रमांक २७ मध्ये सकाळी १० वाजता लोखंडवाला सर्कल आणि वॉर्ड क्रमांक २८ मध्ये सकाळी १०.३० वाजता माँ वैष्णोदेवी मित्र मंडळ शेड, हनुमाननगर येथे आमदार अतुल भातखळकर, वॉर्ड क्रमांक २९ मध्ये सकाळी १० वाजता नारीशक्ती चौक, अशोकनगर येथे महामंत्री संजय उपाध्याय, वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये सकाळी १० वाजता प्रभू निकेतन हॉटेल जवळ, मालाड पूर्व येथे आमदार योगेश सागर, वॉर्ड क्रमांक ४४ मध्ये सकाळी १० वाजता बापा सीताराम चौक, धनजीवाडी येथे जे. पी. मिश्रा, वॉर्ड क्रमांक ४५ मध्ये सकाळी १०.३० वाजता राणी सती फाटक येथे मंडल अध्यक्ष आप्पा बेलवलकर हे मार्गदर्शन करणार आहेत.



देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण व्हावे, त्यांच्या योगदानाची माहिती नव्या पिढीला व्हावी, या हेतूने हे अभियान राबवले जात आहे. यानिमित्ताने वॉर्ड निहाय ७५ झाडे लावण्याचाही उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असेही आमदार भातखळकर म्हणाले.

कामगारांसाठीच्या 'तपासणी ते उपचार' योजनेतप्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार

 कामगारांसाठीच्या 'तपासणी ते उपचार' योजनेतप्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार


                         - कामगारमंत्री सुरेश खाडे 


 


            मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी 'तपासणी ते उपचार' ही आरोग्य योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान चाचणी केंद्र संलग्न करण्यात येणार आहेत. यात कामगारांच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून पाच हजारांची औषधे आणि २३ तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या योजनेत कामगाराच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळणार असल्याची माहिती कामगारमंत्री तथा कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी दिली.  


            महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ विविध योजना राबवत असून यापुढेही कामगारांचे आरोग्य, घरकुल, मुलांचे शिक्षण यावर भर देणार असल्याचे, मंत्री श्री. खाडे यांनी सिटू संघटनेने कामगारांसाठी केलेल्या विविध मागण्यासंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले.   


            कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ आणि सिटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात झाली. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, कामगार कल्याण मंडळाचे सचिव विवेक कुंभार, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सिटूचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, महासचिव कॉ. भरमा कांबळे, उपाध्यक्ष कॉ. शिवाजी मगदूम व इतर सदस्य उपस्थित होते.


            कामगारांच्या पाल्यांना बी.फार्म. करण्यासाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते, या रकमेत वाढ करण्यासोबतच पी.एच.डी. आणि एम.फील. करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. बांधकाम कामगारांना 'मध्यान्ह भोजन' ही योजना अतिशय उत्तमप्रकारे सुरू आहे. यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून लाखो नोंदणीकृत कामगारांना मोफत जेवण मिळत असल्याचेही मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले.  


            मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी कामगारांना नाक्यावर थांबण्यासाठी शेड उभारणी करणार असून त्याठिकाणी पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कामगारांच्या मदतीसाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करणार असून कामगार विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे. त्याचबरोबर राज्यात मोठ्या संख्येने बांधकाम चालू आहे. यातून मंडळाचा उपकर वाढविण्यासाठी कामगार संघटनांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी केले.   

आयुष्मान भव’ अभियान में महाराष्ट्र उत्कृष्ट काम करके दिखाएगा

 आयुष्मान भव’ अभियान में महाराष्ट्र उत्कृष्ट काम करके दिखाएगा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की ग्वाही


            मुंबई, दि. १३ : स्वस्थ जीवन के लिए हमारे यहाँ 'आयुष्मान भव्' ऐसा आशीर्वाद दिया जाता है. इसी भावना से देशवासियों के स्वस्थ जीवन के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना से साकार ‘आयुष्मान भव’ अभियान की शुरुआत राज्यभर में की जाएगी. महाराष्ट्र देश में उत्कृष्ट काम करने के साथ-साथ लोगों को स्वास्थ्य सेवा उपलब्ध कराई जाएगी, यह ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज पर दी.


            आज से 'आयुष्मान भव' अभियान की शुरुआत देश में हुई है और राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने इस देश व्याप्ती अभियान का शुभारंभ किया है. इस दौरान राज्य के अभियान का शुभारंभ सह्याद्री अतिथिगृह में राज्यपाल रमेश बैस और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथो किया गया, इस अवसर पर मुख्यमंत्री श्री. शिंदे बोल रहे थे. स्वास्थ्य मंत्री डॉ. तानाजी सावंत उपस्थित थे.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि राज्य में हमारी सरकार ने मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कक्ष के माध्यम से नागरिकों को आधार दिया गया है. पिछले सालभर में १०० करोड से अधिक रुपयों की मदद दी गई है. सभी सरकारी अस्पतालों में मरीजों को मुफ्त में चिकित्सा सेवा देने का निर्णय लिया गया है. इसके अलावा महात्मा जोतिराव फुले जनस्वास्थ्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री स्वास्थ्य योजना के अंतर्गत एकत्रित रूप से २ करोड कार्ड का वितरण भी किया जाएगा. मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि अब ५ लाख रुपये तक की स्वास्थ सुरक्षा मिलेगी. महाराष्ट्र स्वास्थ्य के क्षेत्र में देश में अग्रसर है और आम लोगों को केंद्र स्थान पर रखते हुए स्वास्थ्य विषयक योजनाए और उपक्रम चलाए जा रहे है.


            आयुष्मान कार्ड के माध्यम से आम लोगों को समय पर इलाज करवाना संभव होगा और इसके लिए "आयुष्मान भव" यह महत्वांकाक्षी अभियान १७ सितम्बर से ३१ दिसंबर २०२३ तक चलाया जाएगा. इस अभियान में पात्र लाभार्थियों का आयुष्मान कार्ड पंजीकरण कर कार्ड का वितरण भी किया जाएगा.


विविध उपक्रमों का शुभारंभ


            इस अवसर पर मुख्यमंत्री के हाथो राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम में उल्लेखनीय काम करनेवाले "निक्षय मित्र" व जिलों को गौरवान्वित किया गया. महात्मा ज्योतिराव फुले जन स्वास्थ्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री स्वास्थ्य इस एकत्रित योजना के कार्ड वितरण की शुरुआत भी इस अवसर पर की गई. राज्य में इस योजना के २ करोड कार्ड का वितरण किया गया है.


 इस कार्यक्रम में स्वास्थ्य आधार ॲप, महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲप, और राज्य के स्वास्थ्यवर्धिनी केंद्र के अधिकारियों के लिए "समुदाय आरोग्य अधिकारी ॲप " का भी शुभारंभ किया गया.


केंद्र स्थान पर आम नागरिक


            मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि यह अभियान चलाते समय गांव स्तर गुणवत्तापूर्वक स्वास्थ्य सेवा देना जरुरी है. राज्य के आम नागरिक को केंद्र स्थान पर रखकर ही आयुष्मान सभा, आयुष्मान समारोह, अंगणवाडी व प्राथमिक शालाओं के बच्चों की स्वास्थ जाचं, रक्तदान अभियान, अवयवदान जनजागरण अभियान, स्वच्छता अभियान, १८ वर्ष के आयु के ऊपर के पुरुष के लिए स्वास्थ जाचं, ऐसे अभियान चलाए जाएंगे. राज्य सरकार ने सार्वजनिक स्वास्थ्य विभाग के सभी सरकारी अस्पतालों में मरीजों को चिकित्सा सेवा, जाचं नि:शुल्क करने का निर्णय भी लिया गया है. मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कक्ष के जरिये पिछले सालभर में ११२ करोड से अधिक रुपये की मदद किए जाने की जानकारी भी उन्होने इस दौरान दी.


२ अक्तूबर को आयुष्यमान ग्रामसभा


            २ अक्तूबर को आयुष्यमान ग्रामसभा होगी और वह आयुष्मान भारत स्वास्थ योजना के जनजागरण के लिए महत्त्वपूर्ण साबित होगी. आयुष्मान ग्रामसभा में पात्र लाभार्थियों की सूची के साथ-साथ इसके पहले जिन लाभार्थियों ने आयुष्मान भारत जन स्वास्थ योजना का लाभ लिया है, ऐसे लाभार्थियों की सूची और प्रधानमंत्री जन स्वास्थ्य योजना के अंतर्गत संलग्नित अस्पतालों की सूची अद्ययावत हो, ऐसी सूचना भी दिये जाने की बात मुख्यमंत्री ने इस अवसर पर कही.


अवयवदान को महत्त्व


            अवयव दान यह सबसे बडा और पुण्य का कार्य है, यह कहते हुए मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि आयुष्मान सभा में इस पर जनजागरण किया जाए. क्षय बीमारी के मरिजों को पोषक आहार देने के लिए ‘निक्षय मित्र’ बनाने का उपक्रम भी राज्य के आम नागरिकों को सास्थ्य विषयक सेवा उपलब्ध कराने के लिए उपयोगी साबित होगा.


0

00


पाणलोट क्षेत्र विकासाकरिता सुधारित मापदंडास मान्यता

 पाणलोट क्षेत्र विकासाकरिता सुधारित मापदंडास मान्यता


- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड


            मुंबई, दि. 13 : ‘मृदसंधारणाच्या उपाय योजनांद्वारे जमिनीचा विकास’ योजनेंतर्गत जुने मंजूर पाणलोट व नवीन पाणलोटांना मंजूरी देऊन पाणलोट पूर्ण करण्याकरिता, इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२२,०००/- व डोंगराळ क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु. २८,०००/- मापदंड निश्चितीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.


            या योजनेचा उद्देश राज्यातील अपूर्ण पाणलोट गतिमान पद्धतीने पूर्ण करणे हा असून प्रत्येक तालुक्यातील ५०० ते १००० हेक्टरचे अपूर्ण पाणलोट निवडून ते प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेतून सलग समतल चर, ढाळीचे बांध, कम्पार्टमेंट बंडींग, मजगी शेततळे, जुनी भातशेती दुरुस्ती, बोडी दुरुस्ती व नूतनीकरण इत्यादी क्षेत्र उपचाराची कामे केली जातात. तसेच, नाला उपचारांतर्गत माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, वळण बंधारे, अनघड दगडी बांध (लुबो), अस्तित्वातील सिमेंट नाला बांधचे खोलीकरण करणे व खोलीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध इत्यादी कामे केली जातात.


            महाराष्ट्रात एकूण जीएसडीएचे 1531 मेगा पाणलोट आहेत. 57849 सूक्ष्म पाणलोट असून त्यापैकी 44185 सुक्ष्म पाणलोट मृद संधारणाचे कामासाठी योग्य आहेत. विविध योजनांतर्गत 41962 पाणलोटांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी 38220 सूक्ष्म पाणलोट पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मंत्री श्री. राठोड यांनी दिली.


            मृद व जलसंधारणाची कामे मृद संधारणाच्या उपाय योजनांद्वारे जमिनीचा विकास योजनेंतर्गत डोंगराळ क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.22,०००/- व इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.12,०००/- असे सध्याचे मापदंड आहेत.


            केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन विकास घटक २.० च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये डोंगराळ क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२८,०००/- व इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२२,०००/- मापदंड निश्चित केलेले आहेत. त्या धर्तीवर मृद संधारणाच्या उपाय योजनांद्वारे जमिनीचा विकास योजनेंतर्गत जुने मंजूर पाणलोट व नवीन पाणलोटांना मंजूरी देऊन पाणलोट पूर्ण करण्याकरिता, डोंगराळ क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२८,०००/- व इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२२,०००/- मापदंड निश्चितीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. नवीन निकषानुसार कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री. राठोड यांनी दिले आहेत.


000

आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेलअवयवदानाला महत्व

आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

 

            मुंबई, दि. १३ : आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी 'आयुष्मान भव्असा आशीर्वाद दिला जातो.  या भावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

            आजपासून देशात ‘आयुष्मान भव’ मोहिमेस सुरुवात झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी राज्याच्या मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यावेळी उपस्थित होते. 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना भक्कम आधार देण्यात आला. गेल्या वर्षभरात १०० कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत एकत्रितपणे २ कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे. आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र आरोग्याच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असून सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक योजना आणि उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून  यासाठी "आयुष्मान भव" ही महत्वाकांक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

विविध उपक्रमांचा शुभारंभ

            याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात  उल्लेखनीय काम केलेल्या "निक्षय मित्र" व जिल्ह्यांना देखील गौरविण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य या एकत्रित योजनेच्या कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली. राज्यात या योजनेचे  २ कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे.

आज या समारंभात आरोग्य आधार अॅपमहाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅपतसेच राज्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रातील अधिकाऱ्यांसाठीचे "समुदाय आरोग्य अधिकारी अॅप" यांचा शुभारंभ करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीही मोहीम राबवताना  गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभाआयुष्मान मेळावाअंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणीरक्तदान मोहीमअवयवदान जागृती मोहीमस्वच्छता मोहीम१८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहिमा राबविण्यात येतील. राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवातपासणी  नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या वर्षभरात ११२ कोटीपेक्षा जास्त  मदत केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

२ ऑक्टोबरला आयुष्यमान ग्रामसभा

            २ ऑक्टोबर रोजी आयुष्यमान ग्रामसभा होणार असून ती आयुष्मान भारत आरोग्य योजनेच्या जाणीवजागृतीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आयुष्मान ग्राम सभेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी त्याचबरोबर यापूर्वी ज्या लाभार्थ्याने आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांची यादी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत संलग्नित असेलल्या रुग्णालयांची यादी अद्ययावत असावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अवयवदानाला महत्व

            अवयव दान हे सर्वात मोठे आणि पुण्याचे कार्य आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीआयुष्मान सभेमध्ये याविषयीही जागृती करण्यात यावी. क्षयरुग्ण यांना पोषण आहार देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ बनविणे हा उपक्रमही राज्यातील सामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Featured post

Lakshvedhi