Wednesday, 13 September 2023

औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण विषयाच्या नि:शुल्क पुनर्गुणमूल्यांकनामध्ये ७१ विद्यार्थी उत्तीर्ण

 औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण विषयाच्या

नि:शुल्क पुनर्गुणमूल्यांकनामध्ये ७१ विद्यार्थी उत्तीर्ण

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबईदि. १२ : यंत्र अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण (Industrial Engineering & Quality Control) या विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे नि:शुल्कपणे पुनर्गुणमूल्यांकन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाला देण्यात आले होते. त्यानुसार मंडळांनी राबविलेल्या पुनर्गुणमूल्यांकन प्रक्रियेत  ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा-२०२३ चा निकाल २९ जून २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता. अंतिम वर्ष यंत्र अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण या विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवेदने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळास प्राप्त झाली होती. या विद्यार्थ्यांच्या प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने उत्तरपत्रिकेचे पुनर्गुणमूल्यांकन नि:शुल्कपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ७ ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत उत्तरपत्रिकेचे पुनर्गुणमूल्यांकन करण्यात आले. या प्रक्रियेत ७१ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका मंडळाकडून नव्याने निर्गमित करण्यात येतील, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला

 मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला

चालना देण्यासाठी आराखडा तयार करावा

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई, दि. १२ : मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मार्फत आराखडा तयार करावाअसे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक कृषी मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमारमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

            यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या 2022-23 या वित्तीय वर्षाच्या लेख्यांना मान्यता देण्यात आली. मराठवाड्यात सोयाबीन, सीताफळ तसेच इतर कृषी व फळ प्रक्रिया उद्योगाच्या विस्ताराची क्षमता मोठी आहे. त्याचा सविस्तर अभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा. शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त लाभ होण्याच्या दृष्टीने महामंडळाने व्यापक आराखडा करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

नंदुरबार जिल्ह्याच्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 नंदुरबार जिल्ह्याच्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला

राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 

            नवी दिल्ली12 : हरणखुरी, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथील याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कारानेराष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले.

            नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये जागतिक अन्न व कृषी संस्था आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित कृषी जैवविविधता आणि शेतकरी हक्क’ Global Symposium on Farmers' Rights' (GSFR) या पहिल्या जागतिक परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीस हा पुरस्कार वर्ष 2020-21 साठी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सविता नाना पावरा आणि मोचडा भामटा पावरा यांनी स्वीकारला. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ही समिती बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन अंतर्गत कार्यरत आहे.

            12 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीदरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत जगभरातील 59 देशांमधून शास्त्रज्ञ आणि संसाधन व्यक्ती सहभागी होतील. या सत्रादरम्यान स्थानिक आणि स्थानिक समुदाय आणि जगातील सर्व प्रदेशातील शेतकऱ्यांनी दिलेले योगदान आणि त्यांना पुरस्कृत कसे करावे या विषयावर चर्चासत्र आयोजित केले जातील.

            केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा वनस्पती वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहापात्राकृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. हिमांशू पाठक (DARE)  आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

            यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेले, ‘प्लांट अथॉरिटी भवन’ पीपीव्हीएफआर प्राधिकरणाचे कार्यालयआणि ऑनलाइन वनस्पती विविधता नोंदणी पोर्टलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीची माहिती

              धडगाव तालुक्यात ‘बाएफ’ संस्थेमार्फत २०१० पासून  सुरु असलेल्या स्थानिक जैवविविधता  संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. लोक सहभागातून पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धनउत्पादन आणि प्रसाराचे काम सुरू झाले. या माध्यमातून मकाज्वारीभरड धान्य पिकेकडधान्यांच्या शंभराहून अधिक वाणांचे संवर्धनअभ्यास आणि लागवड केली जाते. धडगावअक्कलकुवा तालुक्यातील 15 गावांमध्ये मकाज्वारीकडधान्येतेलबिया आणि भाजीपाला पिकांच्या १०८ स्थानिक पीक वाणांचे संवर्धन आणि बियाणे उत्पादन केले जाते. हरणखुरीचोंदवडे गावात दोन सामूहिक बियाणे बॅंकामार्फत मकाज्वारी आदी पिकांचे २५ टन बियाणे उत्पादन आणि १७० टन धान्य उत्पादन आणि विक्री करण्यात आली आहे. तसेच ज्वारीच्या जवळ - जवळ 19 जाती  शोधून काढल्या आहेत. त्यांचे शुध्दीकरणाचे काम केले असून यापैकी पाच जाती पीक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरणशेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे नोंदणीकृत करुन घेण्यात आल्या आहेत. 

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 170दि.12.09.2023

श्रावण आला ग, चला उद्योजिनी


 

एैस पैस गप्पा नीलमताईंशी" या पुस्तकाचे

 एैस पैस गप्पा नीलमताईंशी" या पुस्तकाचे

बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन

            मुंबई, दि. 12 : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या राजकारण व महिलांचे प्रश्न या क्षेत्रांबरोबर एक लेखिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. बुधवार १३ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते "एैस पैस गप्पा नीलमताईंशी" या पुस्तकाचे राजहंस प्रकाशन,पुणे या संस्थेद्वारे प्रकाशन करण्यात येणार आहे.


                   या प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लेखक सदानंद मोरे, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह या पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या श्रीमती करुणा गोखले, सहभागी होणार आहेत.


            कार्यक्रमाचे संयोजन शीतल म्हात्रे, अंजली कुलकर्णी, जेहलम जोशी, सुनीता मोरे यांनी केले आहे.



००००


 


मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तआठही जिल्ह्यांत विविध कार्यक्रम

 मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तआठही जिल्ह्यांत विविध कार्यक्रम


सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा 

            मुंबई, दि. 12 : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या संदर्भातील तयारीचा आढावा घेतला.


            मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा तो इतिहास पुन्हा नव्या पिढीला कळावा, त्याकाळी निजामाविरुद्ध दिलेल्या लढ्यातून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करावा, विविध कार्यक्रमांचे नियोजन करुन आठही जिल्ह्यांत ते आयोजित करावेत याबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक उपस्थित होते.


             यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आठही जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती संबंधित अधिकारी यांच्याकडून घेतली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजनही औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे करण्यात येणार आहे. याशिवाय, मुक्तीसंग्रामाचा इतिहास, तेथील हुतात्म्यांचे स्मरण, स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव, आझादी दौड, प्रदर्शन, व्याख्यानमाला, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठही जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी व्हावा, मुक्तीसंग्रामातून मिळवलेल्या या स्वातंत्र्याचे मोल त्याला कळावे, यासाठी कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


            आठही जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा पोहोचावा, यासाठी त्यांनी सूचना दिल्या. प्रधान सचिव श्री. खारगे यांनीही संबंधित जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधून तेथे आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची माहिती घेतली आणि त्यांना सूचना केल्या. दिनांक 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीत आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. काही जिल्ह्यात यानिमित्त सप्ताहाभर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.                                                  


0000





 

Featured post

Lakshvedhi