Tuesday, 12 September 2023

इलेक्ट्रीक तोलन उपकरणाच्या वापराबाबतलवकरच दूध उत्पादकांसमवेत बैठक

 इलेक्ट्रीक तोलन उपकरणाच्या वापराबाबतलवकरच दूध उत्पादकांसमवेत बैठक


- मंत्री छगन भुजबळ


            मुंबई, दि. 12 :- दूध खरेदी – विक्रीसाठी अनिवार्य केलेल्या इलेक्ट्रीक तोलन उपकरणांच्या वापराबाबत तक्रारदार दूध उत्पादक शेतकरी व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.


            दूध संकलन केंद्रांवर दूध मापनासाठी 10 ग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, 10 ग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रिक तोलन उपकरण वापरात दूध उत्पादक आणि दूध विक्री करणाऱ्या संस्थांना अडचणी येत आहेत. यात दूध उत्पादकांचा तोटा होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना यांच्यासमवेत आज बैठक घेण्यात आली.


            या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. सुरेश मेकला, विलास पवार, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी दयानंद पाटील, केरबा पाटील, श्यामराव पाटील, विश्वास पाटील, संजय पाणारी उपस्थित होते.


            दहा ग्रॅम वजन काट्यावर वजन घेत असताना काटा स्थिर होण्यास वेळ लागतो. पर्यायाने दूध संकलनास वेळ लागत असल्यामुळे संघाने ठरवून दिलेल्या वेळेत दूध संकलन होत नाही. सोबतच दुधाच्या गुणावर परिणाम होऊन संस्थेचा व पर्यायाने दूध उत्पादकांचाही तोटा होत आहे. वजन काटा वेळेत स्थिर होत नसल्याने दूध उत्पादक आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे सध्याचा इलेक्टिक तोलन उपकरण वापरण्याची सक्ती रद्द करण्याची मागणी यावेळी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना यांनी केली. यावर मंत्री श्री. भुजबळ यांनी संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चेअंती निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.


००००

तारदेव मुंबईतील सर्वात मोठे नेत्र चिकित्सालय (चॅरिटी

 🙏


 तारदेव मुंबईतील सर्वात मोठे नेत्र चिकित्सालय (चॅरिटी) सुमारे 6,000 चौरस फूट, संपूर्ण वातानुकूलित, संपूर्ण संगणकीकृत.


 नवीन रूग्णांकडून टोकन रक्कम रु. 200. पाठपुरावा फक्त रु. 100.


 सर्व शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया अत्यंत सवलतीच्या दरात केल्या जातात.


 मोतीबिंदू ऑपरेशन : प्रति डोळा फक्त 5000/- रुपये


 भेटींची गरज नाही.


 दिवसाला 400 रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता.


 वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00.


 रविवार बंद


 गुरुवारी रात्री 9.00 ते 12 आणि दुपारी 3.00 ते 5.00


 आधार कार्ड अनिवार्य


 पत्ता:

 व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियातर्फे चॅरिटी आय क्लिनिक.

 फिल्म सेंटर इमारत

 तळमजला

 समोर. फोम होम

 68, तारदेव रोड

 मुंबई 400 034.

 Te: 022 3543 4662



 कृपया इतरांना फॉरवर्ड करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.

जनहितार्थ , blackmailing? घा बरू नका, धडा शिकवा

 


चरखा कातणाऱ्या मजुराला मजुरी किती द्यावी?गांधीजींच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी विनोबांनी सहा महिने मागून

 चरखा कातणाऱ्या मजुराला मजुरी किती द्यावी?’ - या गांधीजींच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी विनोबांनी सहा महिने मागून घेतले. सहा महिन्यांनी ते गांधीजींना भेटायला परतले तेव्हा त्यांचं वजन तीस पौंड कमी झालेलं होतं.

‘विनोबा, हे काय झालं?’ - गांधीजींनी विचारले 

‘गेले सहा महिने रोज आठ तास कातून त्यातून मिळालेल्या सहा पैसे मजुरीमध्ये जगून पाहिलं. अशी अवस्था होते. कातणाऱ्यांची मजुरी चारपट वाढवली पाहिजे’ - विनोबा उत्तरले.


अशी तज्ज्ञ समिती पुन्हा झाली नसणार!

१३ वर्ष पायी फिरून, एकूण जवळजवळ सत्तर हजार कि.मी. प्रवास करून, ४५ हजार एकर जमीन दान मिळवून, भूमीहिनांकरिता भूमी दान चळवळ सुरू करणारे 


विनोबा भावे यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन!.....🙏🙏🙏

आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी

 आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी


- संचालक दिगांबर दळवी


            मुंबई, दि. 12 : भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना शिक्षणासोबत रोजगार प्राप्त होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकास केल्यास त्यांना परदेशात मोठ्या पगाराची संधी असल्याचे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी केले


            दादर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. दळवी बोलत होते. यावेळी सहसंचालक अनिल गावित, उपसंचालक रमण पाटील, श्री. निकम, श्री. कथले, प्राचार्य व्ही. जी. संखे, प्राचार्य व्ही. एन. खेवलकर, प्राचार्य श्रीमती भोर आदी उपस्थित होते.


            कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्यातील 418 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासिकांचे उद्घाटन आज झाले. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेत अभ्यासिका सुरू केली आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासाबरोबर इतर परीक्षा, स्पर्धा परीक्षा यांचे प्रशिक्षण गरीब विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका लाभदायक आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी अभ्यासिकेचा वापर व्हावा. जर्मनी, जपान या देशांमध्ये महाराष्ट्रातील 70 विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन नोकरी करीत आहेत. आणखी आयटीआय प्रशिक्षण घेणारे साडेतीन हजार विद्यार्थी परदेशी पाठवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याकरिता जपान, जर्मनी येथील भाषेचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचाही प्रयत्न शासन करणार आहे.


            श्री पाटील यांनी सांगितले की, अभ्यासिकेच्या माध्यमातून कौशल्य विकसित करण्यास मदत होणार आहे. ही अभ्यासिका संध्याकाळी सहा ते नऊ या काळात सुरू राहणार असून यासाठी स्वतंत्र कर्मचारी, सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेवून आपले भविष्य घडवावे, असेही आवाहन करण्यात आले.


            अभ्यासिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. आभार श्रीमती भोर यांनी मानले.


0000

निराधार मुलांच्या संगोपनासाठीतर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार

 निराधार मुलांच्या संगोपनासाठीतर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार


- केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी


            मुंबई, दि. 12 : काही मुले वेगवेगळ्या कारणांमुळे आपले आई- वडील गमावतात. व निराधार होतात. अशा मुलांना अनाथ म्हणणे अयोग्य आहे. या मुलांचे आपण सर्व जण पालक आहोत. या संस्थेचे कार्य क्षेत्राचा विस्तार होण्याच्या दृष्टीने निराधार मुलांच्या संगोपनासाठी केंद्रीय महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘तर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात येईल, असे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.


            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी ‘तर्पण’ संस्थेच्या वतीने प्रतिभा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी बोलत होत्या. यावेळी ‘ऑॅर्फन रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ॲकॅडमी सेंटरचे’ केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात उद्घाटन करण्यात आले. निराधार मुलांना मोबाईल, लॅपटॉपचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी तर्पण संस्थेचे अध्यक्ष, आमदार श्रीकांत भारतीय, श्रेया भारतीय यावेळी उपस्थित होते.


            केंद्रीय महिला व मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, निराधार मुलांचे जीवन जगणे हा एक संघर्ष असतो. हा संघर्ष ‘तर्पण’ सारख्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था सुसह्य करतात, ही बाब कौतुकास्पद आहे. सामाजिक क्षेत्रात स्वयंसेवी संस्थ उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यापैकीच एक ‘तर्पण’ संस्था आहे. या संस्थेचे कार्य अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. या संस्थेची शाखा राजधानी नवी दिल्लीत कार्यान्वित करावी. असेही त्यांनी सांगितले. उपस्थित मुलांना त्यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजाला सशक्त करण्यासाठी व सशक्त भारत निर्माण करण्यासाठी सृजनात्मक कार्य , योगदान देणे गरजेचे आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले .


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील, ‘तर्पण’ संस्थेचे अध्यक्ष श्री. भारतीय यांनी मनोगत व्यक्त केले.


००००

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने ठरेल उपयुक्त

 उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार

विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने ठरेल उपयुक्त


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. १२ : विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने उपयुक्त इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


            राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली (English Communication, Values and Life Skills) या अभ्यासक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार झाला.


             मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर आणि इन्फोसिस उन्नती फाऊंडेशन, बंगळूरचे रमेश स्वामी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, इन्फोसिसचे मुख्य अधिकारी संतोष अंतपुरा उपस्थित होते.


            मंत्री. श्री. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये व विकास याबाबींवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. एसजीबीएस उन्नती फाऊंडेशन बंगळूर या संस्थेमार्फत तयार करण्यात आलेला १६५ तासांचा इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली (English Communication, Values and Life Skills) या विषयातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्याकरिता आवश्यक कौशल्य प्रत्यक्ष वर्गात शिकविले जाणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असेल, असेही मंत्री. श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


              विद्यार्थ्यांनी ९० टक्के उपस्थितीसह अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत हा अभ्यासक्रम कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, व नागालॅण्ड या राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तेलंगणा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये तो सुरू होणार आहे.

Featured post

Lakshvedhi