सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 10 September 2023
Saturday, 9 September 2023
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ‘सखी निवास’ करिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ‘सखी निवास’ करिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई दि.९ : जिल्हयातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी राहत असलेल्या शहरात सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी केंद्र शासनामार्फत सखी निवास ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत मुंबई उपनगर येथे सहा सखी निवास भाडेतत्वावरील इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी केंद्र शासनाने निश्चीत केलेल्या संस्था तसेच एजन्सीज कडून दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोकरी करणा-या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयीस्कर पध्दतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार "मिशन शक्ती" अंतर्गत संबल" आणि सामर्थ्य" या दोन योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनेतील ‘सामर्थ्य’ या उपयोजनेत नोकरी करणाऱ्या महिलांकरीता ‘सखी निवास’ या घटक योजनेचा समावेश आहे. मुंबई उपनगर या जिल्हयात सध्या कार्यरत असलेल्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त आणखी नविन ०६ सखी निवास कार्यान्वित करावयाची आहेत.
या योजने अंतर्गतचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती केंद्र शासनाचे दि. १४ जुलै २०२२ रोजी ‘मिशन शक्ती’ या योजनेच्या मार्गदर्शक सुचना, प्रस्ताव सादर करावयाच्या अर्जाचा नमुना, अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण पध्दत, संस्था एजन्सीच्या पात्रतेचे निकष, सखी निवासासाठी आवश्यक असलेली इमारत व भौतिक सोयीसुविधा,अनुदान, कर्मचारी वर्ग, शासन निर्णय इ. सर्व सविस्तर माहिती आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://www.wcdcommpun
मुंबई उपनगर जिल्हयात केंद्र शासन पुरस्कृत ‘सखी निवास’ योजना कार्यान्वित करुन ती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना व राज्य शासनाचे शासन निर्णय व या संबंधीचे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सुचनेनुसार सदरची योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था तसेच एजन्सीकडून याद्वारे दि.१८ सप्टेंबर, २०२३ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
तरी याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत १ ला मजला, दुसरा टप्पा, आर. सी मार्ग, चेंबूर, मुंबई -७१, दूरध्वनी: ०२२-२५२३२३०८ येथे संपर्क करावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एस. नागरगोजे यांनी केले आहे.
बाहेर खाताना काळजी घ्या!😋 (मी मात्र स्वतः छोट्या गर्दी असलेल्या दुकानात गरम पोळ्या आणि भाजी खाते. परंतु भारतातील परिस्थिती वाईट आहे,हे नक्की!)_
😋बाहेर खाताना काळजी घ्या!😋 (मी मात्र स्वतः छोट्या गर्दी असलेल्या दुकानात गरम पोळ्या आणि भाजी खाते. परंतु भारतातील परिस्थिती वाईट आहे,हे नक्की!)_
कायप्पावर वाचलेल्या मूळ हिंदी पोस्टचा भागवत कृत स्वैर मराठी अनुवाद.
■■ आम्ही कधीच उष्ट आणि शिळं अन्न खात नाही !!!
पुढल्या वेळेस हे लोकांना सांगण्या अगोदर जरा विचार करून बोला ■■
काही दिवसांपूर्वी आमचे एक परिचित आम्हाला एका अतिशय प्रसिद्ध अशा रेस्टॉरंट मध्ये जेवायला घेऊन गेले होते.
मी बहुधा नेहमीच बाहेर कुठे हॉटेलमध्ये जेवायला जाणं टाळते. परंतु सामाजिक दबावाखाली कधी कधी जावं लागतं.
आजकाल जेवणात पनीरचे पदार्थ खाणं हे श्रीमंतीचे लक्षण समजलं जातं. म्हणून त्यांनी सुरुवातीला पनीरच्या काही डिशेस मागवल्या.
प्लेट मध्ये ठेवलेले पनीरचे वेगवेगळ्या आकारांचे तुकडे बघून मला थोडसं विचित्रच वाटलं. असं वाटलं की त्या तुकड्यांना मुद्दाम कापून शिजवलेलं आहे.
मी वेटरला बोलावून त्या हाॅटेलच्या कुकला बोलावून आणण्यास सांगितलं. कुक आल्यावर त्याला मी विचारलं, "पनीरचे तुकडे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे का बरं आहेत?" तेव्हा तो बोलला, "ही आमची स्पेशल डिश आहे."
त्यावर मी त्याला म्हटलं की मी आणखीन एक डिश माझ्याकरता पॅक करून घरी घेऊन जायचा विचार करतेय. पण मला ही तुमची स्पेशल डिश माझ्यासमोर बनवून दाखवा.
आख्ख रेस्टोरंट माझ्या वाढलेल्या आवाजानं जणू हादरून गेलं होतं...
हॉटेलमधील अनेक लोक आपलं जेवण थांबवून माझ्याकडे बघू लागले...
हाॅटेलचा स्टाफ वेगवेगळ्या सबबी सांगू लागला. शेवटी पोलीसच्या भीतीने वेटरनं कबूल केलं की जेवणारे लोक अनेकदा प्लेटांमध्ये अन्न, भाज्या कोशिंबीरी आणि पोळ्या वगैरे टाकून निघून जातात. हॉटेलमधल्या स्वयंपाक घरातून हे सारं फेकून दिल्या जात नाही. पनीर व भाज्यांमधील मोठे तुकडे एकत्र करून व पुन्हा त्यांची भाजी बनवून ग्राहकांना डिश दिली जाते.
बशांमध्ये शिल्लक राहिलेली कोशिंबीर नवीन ऑर्डर साठी वापरली जाते. बश्यांमध्ये टाकून दिलेले सुक्या चिकन व मांसांचे तुकडे पुन्हा कापून ते करीमध्ये नव्यानं टाकले व शिजवले जातात. शिळ्या आणि सडक्या भाज्या सुद्धा करीच्या रूपाने पुन्हा वाढल्या जातात...
*हे मोठमोठ्या हॉटेलमधलं वास्तव आहे. यापुढे जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये खायला अथवा जेवण करायला जाल तेव्हा उरलेलं अन्न एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये टाकून सोबत घेऊन जा आणि बाहेर जाऊन एखाद्या जनावराला तरी खाऊ घाला किंवा मग ती पिशवी कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्हीच स्वतः फेकून मगच पुढे जा.
अन्यथा कदाचित तुमचं उष्ट अन्न दुसरा कुणी खाईल किंवा तुमच्या प्लेट मधील अन्न कदाचित दुसऱ्या कुणी प्लेटमध्ये टाकून दिलेलं उष्ट अन्न असू शकेल.
दूसरा किस्सा भगवान कृष्णाची जन्मभूमि वृंदावन येथील आहे. वृंदावनवा पोहोचल्यावर, मी मंत्रमुग्ध होऊन तिथल्या पवित्र भूमीकडे पाहात होते. दिल्लीहून लांबचा प्रवास करून आल्यावर आम्हा सर्वांनाच कमालीची भूक लागली होती. म्हणून एका स्वच्छ दिसणाऱ्या उपहारगृहामध्ये आम्ही प्रवेशलो. उगीच ऑर्डरला वेळ लागू नये म्हणून आम्ही डिश ऐवजी जेवणाच्या थाळ्या मागवल्या.
एका स्वच्छशा ट्रे मधून वरण, भाजी,भात, रायतं व सोबतच एक टोपलीतून चपात्या आणल्या गेल्या.
सुरुवातीचे काही घास घेताना लक्षात आलं नाही, पण मग नंतर मला काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं. मग लक्षात आलं की पोळी थोडी आंबूस लागते आहे, मग भाजीकडे माझं लक्ष गेलं तेव्हा लक्षात आलं की भाजीतील प्रत्येक तुकड्याचा रंग वेगळा आहे. मग भाताची चव घेऊन बघितली. तिथेही काहीतरी गडबड वाटली. सगळं जेवण तसेच टाकून आम्ही उठलो आणि मग काउंटर वर मी जेवणाचं बिल किती झालं म्हणून विचारलं तर हाती साडेसहाशे रुपयांचे बिल ठेवल्या गेलं.
मी म्हटलं, "भाऊ! पैसे तर मी देईन, पण एकदा मला तुमचा भटारखाना दाखवा." तो एकदम गडबडून गेला आणि मला विचारू लागला, "कां? काय झालं?"
मी म्हटलं, "जो पैसे देतो त्याला जेवण साफ बनतंय की नाही हे पाहण्याचाही हक्क आहे."
तो काही बोलण्या आधीच मी हॉटेलच्या भटारखान्यात शिरले.
आत शिरल्यावर स्वयंपाक घरात कसलाही पदार्थ शिजत नाहीये हे पाहून माझ्या आश्चर्याला काही पारावार उरला नाही. एका टोपलीत कांही पोळ्या ठेवल्या होत्या. फ्रिज उघडून बघितला तर आंत उघड्या भांड्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या शिजलेल्या भाज्या ठेवलेल्या दिसत होत्या. कांही भाज्यांना तर चक्क बुरशी लागली होती.
फ्रिजमधून सडका वास बाहेर पडत होता. आचाऱ्याला दरडावून विचारल्यावर ह्या साऱ्या भाज्या एक आठवड्याइतक्या शिळ्या असल्याचं त्यानं कबूल केलं. वाढताना याच शिळ्या भाज्यात तेल टाकून व कढईत गरम करून आपण त्यात कोथिंबीर व टमाटू टाकून डिशमध्ये ग्राहकांना सर्व्ह करीत असतो हेही त्यानं मान्य केलं.
कणिक आपण केवळ एक दिवसाआडच मळतो.
किती किती तास वीज जाते तेव्हा खाद्यपदार्थ खराब होऊ लागतात. ते लपविण्यासाठी त्यांत तिखट आणि भरपूर मसाले टाकून डिशेस सर्व्ह केल्या जातात. तिंबलेली शिळी कणिक खराब झाली असेल तर तीच नान साठी सर्रास वापरली जाते.
मी रेस्टॉरंटच्या मालकास बोलले "तुम्हीही कधीतरी यात्रा करीत असालच, ईश्वर करो, जेव्हा पुढील यात्रेच्या वेळेस तुम्ही भुकेनं अगदी व्याकुळ झाला असाल तेव्हा तुम्हाला बिलकूल असंच जेवण मिळावं जसं तुम्ही तुमच्या ग्राहकांना खाऊ घालता." माझं हे बोलणं ऐकून त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला....
आज आपल्याला संकटं, धोके व फसवणूकीपासून केवळ आपली जागरूकताच वाचवू शकते. कारण आता देवालाही दुष्टांनी घेरलेलं आहे.
भारतातून योग्य आणि अयोग्य यांतील फरक संपत चालला आहे....
प्रत्येक दुकानात वा प्रतिष्ठानात एका कोनाड्यात देवाचं मोठं वा लहान मंदिर पहायला मिळेल, व्यापारी सकाळी येताच देवाच्या मूर्ती समोर धूप, दीप लावतो, गल्ल्याला नमस्कार करतो आणि मग दुकानातील सामानासोबतच स्वतःचा आत्मा विकण्याचा धंदा सुरू होऊन जातो!!!
देवाजवळ मागणं मागताना दुकानदार हा विचार करीत नाहीत की ते स्वतः जगाला काय देतायत!!
जागरूक व्हा!!
दुसरा कुठलाच उपाय नाही.
*कमीत कमी पाच समूहांना नक्की अग्रेषित करा.
Forwarded...
🙏🙏
*!! कुंडली !!*
*!! कुंडली !!*
*एकदा नागपंचमीला डॉ. श्री. अशोक भट यांना आम्ही भेटायला गेलो होतो. १९९९ साली! त्यावेळी गारुडी नाग टोपलीत घेऊन फिरत असत.आम्ही बोलत होतो, तेव्हा खिडकीतून सहज खाली पाहिलं तर, एका गारुड्याने टोपलीतून नाग काढला व बाहेर ठेवला. वेटोळे मारलेला नाग फणा काढून बसला होता. डॉ. मला म्हणाले या बसण्याला कुंडली मारून बसणं म्हणतात.*
*मी विचारलं यात काय वेगळं आहे?आणि कुंडली का म्हणतात? कुंडली म्हणजे कुंड असलेली! कुंड म्हणजे अग्नीचा स्रोत जिथं निर्मित असतो, ती जागा म्हणजे कुंड! आणि अशा अग्नीचे जी शीर वहन करते ती वाहिनी म्हणजे कुंडलिनी.*
*कुंड(अग्नी)+असलेली+वाहिनी म्हणजेच जिच्यातून अग्नी वहातो ती असलेली जागा म्हणजे कुंडलिनी.*
*आपण पहातो, सध्या कुंडलिनी जागृत कशी करायची यावर चर्चा होताना दिसते. कुठं असते याचं द्वार? मला म्हणाले विचार करा व सांगा. पण मला काही सांगता आलं नाही. तसं मला डॉक्टरांनी शुभं करोती म्हणा अस म्हणाले. ज्या ठिकाणी "कानी कुंडल "आलं तिथं थांबा म्हणाले.*
*कुंडल म्हणजेच जिथं ती घातली जातात. ती कानातील जागा! म्हणजे त्या कुंडाची नियंत्रित करणारी वाहिनी जिथं येते, तिथं कुंडल घालतात. म्हणजेच घरातील गॅस चे बंद करायचं बटण म्हणजे कुंडल. बघा गॅसचा बर्नर म्हणजे कुंड झालं त्यात गॅस वाहून कोण नेतं तर वाहिनी आणि त्या नळीतील गॅसला म्हणजेच बर्नरमधली ज्योत कमीजास्त कोण करतं तर, ते बटण म्हणजेच कुंडल. म्हणजे मनुष्याच्या शरीरातील अग्नी नियंत्रण हे कानातील त्या पाळीतून होत जिथं कुंडलं अडकवली जातात.आता हे कसं होत हे पाहू.*
*मूलं जन्माला येतं पण त्या देहातील अग्नी नियंत्रित करण्यासाठी पहिले कान टोचतात. शरीरातील दुसरा कुठला अवयव टोचतात का? तर नाही कारण प्रत्येकाच्या शरीरातील अग्नी नियंत्रण हे कानातील त्या ठिकाणाहून होते जिथं कुंडल घालतात म्हणजे पाळी!*
*शाळेत शिक्षा करताना शिक्षक कान पकडतात. नाक, हात, डोकं पकडतात का? जसा कान पिळला, मुलगा लगेच आई गं करतो म्हणजे काय होतं तर शरीरातील ऊर्जा कान पिळल्यामुळे ढवळली जाते व वेदना होतात. जसा इकडे कान पिळला की गुदद्वाराशी वेदना होतात. तिथंच का होतात तर मूलाधार चक्राच तोंड तिथं येतं. जेव्हा लहान बाळाचे कान टोचतात तेव्हाच त्याचे मूलाधार जागृत होत व अग्नीची पहिली वेदना ती बाळाला जाणवते. थोडक्यात शरीरातील अग्निकुंड तेव्हा प्रज्वलित होतं म्हणून पूर्वीचे पुरुषसुद्धा कानात कुंडल घालायचे. लग्नात सुध्दा कान पिळतात. आवाज कुठं काढतात तर कानाखाली,पहिली कुठलीही कम्पनं कोण खेचतं तर कान. कानामागून आली आणि तिखट झाली."सर्व गोष्टींमध्ये कान हे संयुक्त आहे कारण एकच मनुष्याच्या शरीराची ऊर्जा ही कान नियंत्रित करते.माणसास चक्कर येते तर ती का? कानाशी संबंध येऊन ठेपतो. बायका पहा हातातल्या बांगड्या जेव्हढ्या प्रेमानं दाखवत नाहीत तेव्हढं कानातील दाखवतात कारण पूर्ण देहाचा कुंडलिनीचा नियंत्रण हा कान करत असतो सांगायला लागत नाही आपोआप कानाची स्तुती होतेच.*
*आपण जुनी मंदिरं पहातो! बाहेर कुंड असतं! का? हातपाय धुण्यासाठी नाही, तर त्या मंदिरातील ऊर्जेचा स्रोत त्या कुंडातून नियंत्रित होत असतो. हा स्रोत किती आहे हे त्या कुंडात मध्ये उभारलेल्या खांबावरून कळत म्हणजेच तो खांब त्या कुंडात कुंडली मारून बसलेला असतो आणि त्याकरवी त्या मंदिरातील ऊर्जा नियंत्रित होत असते.कधी कोकणात गेलात तर हमखास पहा जे कुंड स्वच्छ ते मंदिर पण आतून स्वच्छच असतं. मुद्दाम पहा. कर्णाची कवचकुंडल काढून घेतली तेव्हा त्याची ऊर्जा संपली. कुंडलीत दोष आहे म्हणजे काय? तर पत्रिकेतील ग्रहांची ऊर्जा तेव्हढी चांगली नाही म्हणून दोष. अस्थीविसर्जन कुंडात, गणपती विसर्जन कुंडात, गौरी विसर्जन कुंडात, म्हणजेच ऊर्जेच्या स्रोताशी एकरूप होणं!*
*माणसाच्या शरीरातील या कुंडास कुंडलिनी म्हणतात व ती जागृत ठेवायची असेल तर कानावर लक्ष द्या.मला डॉ. म्हणाले आता नागाची कुंडल कुठं आहेत पहा. नागाचे जे वेटोळे असते ही त्याची ऊर्जेचा स्रोत असतात, पण हीच वेटोळी दुसर्याच्या घरात किंवा अंगावर बसलं तर त्या घराची किंवा माणसाची सर्व ऊर्जा संपवून टाकते आणि विष ओकते. पत्रिकेतील कालसर्प योग हे त्याचंच उदाहरण आहे. जिथे वेटोळे घातलेला नाग असतो तिथंच त्याच पूजन होते. वास्तविक पूजन नागाचे नाही तर त्यांच्यातील ऊर्जास्रोत म्हणजेच कुंडलीचे होते. जे कालसर्प पूजन करून आले असतील त्यांनी पाहिलं असेल नाग हा वेटोळे मारलेला असतो.तो गारुडी जेव्हा त्या वेटोळ्यावर हात मारतो तसा नाग फणा काढतो म्हणून शेपटावर पाय देऊ नये.*
*प्रत्येक माणसांत कुंडलिनी जागृत असते म्हणून तो जिवंत आहे. फक्त ती जेव्हा नियंत्रणात येते तेव्हा मूलाधार जागृत होतो, पण या वर सहजासहजी नियंत्रण मिळत नाही.*
*आपले कान दोन्ही हाताने झाका व डोळे बंद करा! स्वत:तील ऊर्जा कशी वाहाते हे तुमचे तुम्हीच अनुभवा. माणूस चुकतो देवासमोर जातो कान धरतो म्हणजेच स्वत:तील ऊर्जा नियंत्रित करतो.*
*प्रत्येक कृतीला शास्त्रीय अर्थ आहे त्याची अंधश्रद्धा होऊ नये...*
*🙏🏼रामकृष्ण हरी!🚩*
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...