Wednesday, 6 September 2023

आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचेकार्ड वितरण प्रक्रियेस गती द्यावी

 आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचेकार्ड वितरण प्रक्रियेस गती द्यावी

केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत

 

            मुंबईदि. ५ : केंद्र सरकारची आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे,  असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी आज दिले.

              केंद्रीय आरोग्य सचिव श्री. पंत यांनी आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना निर्देश दिले. बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान सचिव नवीन सोनावैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशीआरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमारवैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकरराज्य आरोग्य विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकरअतिरिक्त संचालक नितीन अंबाडेकरस्वप्निल लाळेसहसंचालक विजय कंदेवाडसहसंचालक (तांत्रिक) विजय बाविस्कर आदी उपस्थित होते.

              पुढील वर्षी नियोजित पीआयपीचे (प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन प्लॅन) प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना देत आरोग्य सचिव श्री. पंत म्हणाले कीपीआयपी व पीएम अभिम अंतर्गत जास्तीत जास्त निधी खर्च करावा.  दर्जेदार काम आरोग्य क्षेत्रात उभारावे. जेवढा जास्त खर्च कराल,  तेवढा निधी केंद्र शासनाकडून मिळेल. तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारतींची निविदा प्रक्रिया गतीने राबवावी.

              बैठकीत आयुष्मान भव मोहीम 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  तसेच राज्य शासनाचे विविध निर्णयराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देण्यात येणारा निधी व झालेला खर्चप्रधानमंत्री जन आरोग्य योजनावैद्यकीय शिक्षण विभागाचे निर्णय आदींचाही आढावा घेण्यात आला. बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभाग,  वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते

मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी समितीनेदोन महिन्यांत अहवाल सादर करावा

 मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी समितीनेदोन महिन्यांत अहवाल सादर करावा


- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. 5 : मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.


            मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.


            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मराठी भाषा विद्यापीठ समितीचे अध्यक्ष सदानंद मोरे, समितीचे सदस्य डॉ. विद्या पाटील, प्रो. राजेंद्र नाईकवाडे, डॉ.अविनाश आवलगावकर, महंत कारंजेकर, डॉ.रमेश वरखेडे, डॉ.दिलीप धोंडगे, डॉ. रुपाली शिंदे, डॉ. केशव देशमुख, डॉ.छाया महाजन, मराठी भाषा विभागाचे सहसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री.पाटील म्हणाले की, मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी सर्व समिती सदस्यांनी सर्वांगीण अभ्यास करावा. या विद्यापीठात मराठी भाषेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.


             विद्यापीठाची स्थापना या वर्षाच्या आत करण्यासाठी समितीचा अहवाल महत्त्वाचा आहे. तो प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात येणार आहे.त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर करावे लागेल. सर्वांनी लवकरात लवकर संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.


            बैठकीत अभ्यासक्रम कशाप्रकारे राबवले जातील याबद्दल चर्चा करण्यात आली. तातडीने या विद्यापीठाच्या कामकाजास प्रारंभ व्हायला हवा. थीम पार्क क्षेत्रातच याची स्थापना करण्यात येईल व इमारत तयार झाल्यानंतर नव्या ठिकाणी सर्व विभाग स्थलांतरित केले जातील." असे त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी अध्यक्ष श्री. मोरे यांचे स्वागत करून अहवाल सादर करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


0000

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2022-23 साठी निवड झालेले शिक्षक – प्रवर्गनिहाय यादीप्राथमिक शिक्षक

 क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2022-23 साठी निवड झालेले शिक्षक – प्रवर्गनिहाय यादीप्राथमिक शिक्षक


श्रीमती स्पृहा सुरेश इंदू, चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा, चेंबूर मुंबई; डॉ.पूनम दीपक शिंदे, राजर्षी शाहूनगर हिंदी शाळा, धारावी, मुंबई; श्रीमती सीमा कृष्णकांत तायडे, मुंबई पब्लिक स्कूल, मालवणी व्हिलेज, मालाड, मुंबई; डॉ. नेहा नीलेश संखे, मीरा-भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक चार, मिरे, जिल्हा ठाणे; संदीप दत्तात्रेय वारगे, जिल्हा परिषद शाळा हटाळे, जिल्हा रायगड; श्रीमती वरूणाक्षी भारत आंद्रे, जिल्हा परिषद शाळा चिंचणी नंबर ३, जिल्हा पालघर; श्रीमती माधुरी राजेश शेजवळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे, जिल्हा पुणे; वैभव विठ्ठल पोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी, जिल्हा पुणे; लक्ष्मीकांत एकनाथराव इडलवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव, जिल्हा अहमदनगर; बाळासाहेब पुंडलिक बोडखे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2, जिल्हा सोलापूर; श्रीमती नलिनी बन्सीलाल अहिरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणगंगानगर, जिल्हा नाशिक; गोकुळ त्र्यंबक पाटील, जिल्हा परिषद निकुंभे, जिल्हा धुळे; पंकज गोरख भदाणे, जिल्हा परिषद शाळा, बोडीपाडा, जिल्हा नंदुरबार; डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील, जिल्हा परिषद मराठी शाळा कंडारी, जिल्हा जळगाव; सचिन कुंडलिक देसाई, विद्यामंदिर बशाचामोळा, जिल्हा कोल्हापूर; धन्यकुमार प्रल्हाद तारळकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदने नायकुडे वस्ती, जिल्हा सातारा; प्रसाद राजाराम हसबनीस, जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी, जिल्हा सांगली; लक्ष्मण सहदेव घाडीगावकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सागवे कात्रादेवी, जिल्हा रत्नागिरी; दीपक तानाजी डवर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सौंदाळे, जिल्हा सिंधुदुर्ग; डॉ. विनोद पांडुरंग शिनकर, श्री सरस्वती जीवन प्रशाला औरंगपुरा, औरंगाबाद; निलेश नंदकुमार जोशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवलगाव, जिल्हा जालना; अण्णासाहेब अशोक घोडके, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी, जिल्हा बीड; योगेश बळिराम ढवारे, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू, जिल्हा परभणी; शंकर देवराव लेकुळे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोंढूर, जिल्हा हिंगोली; डॉ. सतीश नारायणराव सातपुते, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शासकीय वसाहत, लातूर; दीपक गुरुबसआप्पा भांगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इज्जतगाव, जिल्हा नांदेड; विक्रम बलभीमराव पाचंगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी, जिल्हा उस्मानाबाद; श्रीमती विजया संजय कोकमवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलोरी, जिल्हा नागपूर; खुशाल किसन डोंगरवार, पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी, जिल्हा भंडारा; परमानंद रामलाल रहांगडाले, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातोना, जिल्हा गोंदिया; संतोष दामोदर नन्नावार, लोक विद्यालय तळोधी, जिल्हा चंद्रपूर; सुजय जगदीश बाछाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर, जिल्हा गडचिरोली; अंकुश जगन गावंडे, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दाभा, जिल्हा अमरावती; उमेश हिम्मतराव सराळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजवाडा, जिल्हा अकोला; संतोष कान्होजी पट्टेबहादूर, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कुरळा, जिल्हा वाशिम; सुरेश बन्सी उतपुरे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घिरणी, जिल्हा बुलढाणा; संदीप मधुकरराव कोल्हे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकळी, जिल्हा यवतमाळ.


 


माध्यमिक शिक्षक


श्रीमती मनीषा महेंद्र शिंदे, स्वामी शामानंद हायस्कूल भटवाडी, घाटकोपर; डॉ. हेमाली प्रदीप जोशी, द बोरिवली एज्युकेशन सोसायटी, आरसी पटेल हायस्कूल, बोरिवली; डॉ. स्वाती जयदीप खैरे, द ग्रेटर मुंबई एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, विलेपार्ले; श्रीमती शमा खलीकुज्जमान तारापूरवाला, अंजुमन इस्लाम सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल, भायखळा; अविनाश मुरलीधर कुलकर्णी, पुणे विद्यार्थीगृहाचे विद्या भवन हायस्कूल नेरूळ, नवी मुंबई; राजेंद्र बाजीराव पालवे, सु. ए. सो. चे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली, जिल्हा रायगड;


सचिन दगडू पाटील, पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, जिल्हा पालघर; संपत माणिक गर्जे, भारतीय जैन संघटनेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी, पुणे; श्रीमती हर्षा बाळकृष्ण पिसाळ, लक्ष्मणराव आपटे प्रशाला, डेक्कन, पुणे; मंगेश गुलाब कडलग, रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय, सात्रळ, जिल्हा अहमदनगर; तानाजी रामचंद्र माने, शरदचंद्र पवार प्रशाला, अवंतीनगर, जिल्हा सोलापूर; रावसाहेब खंडेराव जाधव, श्री अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस, जिल्हा नाशिक; संजय दगाजीराव पाटील, शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खंबाळे, जिल्हा धुळे; रवींद्र अरुण गुरव, नेमसुशील माध्यमिक विद्यामंदिर तळोदा, जिल्हा नंदुरबार; डॉ. सीमा भास्कर सैंदाणे, लाडकुबाई विद्यामंदिर भडगाव, जिल्हा जळगाव; सुधीर आप्पया आमणगी, माध्यमिक विद्यालय कसबा - आरळे, जिल्हा कोल्हापूर; डॉ. शुभांगी तानाजी कुंभार, जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल, वर्ये, जिल्हा सातारा; प्रशांत प्रकाशराव चव्हाण, क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर सोनी, जिल्हा सांगली; जयसिंग माणकू पाटील, बॅ. नाथ पै विद्यालय व जुनिअर कॉलेज, हर्णे, जिल्हा रत्नागिरी; श्रीमती सुषमा प्रवीण मांजरेकर, विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग; डॉ. संतोष पांडुरंग भोसले, देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय, औरंगाबाद; कल्याण नरसिंगराव सोळुंके, मत्स्योदरी विद्यालय अंबड, जिल्हा जालना; महेश चंद्रकांत गाडे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ताडसोन्ना, जिल्हा बीड; श्रीमती छाया उमाजी गायकवाड, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, परभणी; अशोक हनुमंतराव सुरवसे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली; डॉ. संदीपान गुरूनाथ जगदाळे, दयानंद कला महाविद्यालय, लातूर; शेख इरफान अहमद मोहम्मद अशरफ, जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव, जिल्हा नांदेड; भैरवनाथ खंडू कानडे, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय चिकुंद्रा, जिल्हा उस्मानाबाद; डॉ. ज्योतीमणी रॉक्यू, दीनानाथ हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज धंतोली, नागपूर; युवराज दयाराम खोब्रागडे, जिल्हा परिषद हायस्कूल पालंदूर, जिल्हा भंडारा; महेंद्र भुवराज सोनेवाने, शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल, गोरेगाव, जिल्हा गोंदिया; श्रीमती स्मिता अनिल चिताडे, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर; श्रीमती जयश्री विजय खोंडे, धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी, जिल्हा गडचिरोली; गणेश जानराव मस्के, कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आर्वी, जिल्हा वर्धा; अतुल रमेशराव पडोळे, जनता गर्ल्स हायस्कूल शेंदुर्जना घाट, जिल्हा अमरावती; बबलू श्रीराम तायडे, जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभारी, जिल्हा अकोला; डॉ. संतोष दामोदर पेठे, यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजळाबा, जिल्हा वाशिम;


श्रीमती सुवर्णा नंदकिशोर कुलकर्णी, आदर्श विद्यालय चिखली, जिल्हा बुलढाणा; साईनाथ मारोतराव चंदापुरे, श्री गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर, उमरखेड, जिल्हा यवतमाळ.


 


आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक प्राथमिक


बापू शंकर ढोडरे, जिल्हा परिषद शाळा दोऱ्याचापाडा, जिल्हा ठाणे; शरद महादेव नागटिळक, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेगाव, जिल्हा रायगड; संजय हरिश्चंद्र पाटील, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यामंदिर हमरापुर, जिल्हा पालघर; संतोष रामचंद्र थोरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडाळे, जिल्हा पुणे; नरेंद्र खंडू राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीर्थाचीवाडी, जिल्हा अहमदनगर; श्रीमती माधुरी केवळराव पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे, जिल्हा नाशिक; विलास शिवाजीराव जमदाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी, जिल्हा नाशिक; श्रीमती वैशाली प्रभाकर सोनवणे, जिल्हा परिषद शाळा धोंगडे दिगर, जिल्हा धुळे; श्रीमती रोहिणी गोकुळराव पाटील, जिल्हा परिषद मराठी शाळा लोथ, जिल्हा नंदुरबार; अनिल शिवाजी माळी, जिल्हा परिषद शाळा वरुळ, जिल्हा नंदुरबार; श्रीमती कल्पना देविदास माळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसाडे, जिल्हा जळगाव; सुरेंद्र गंगाधर कुडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी, जिल्हा नांदेड; महेंद्र प्रेमलाल सोनेवाने, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचाळा, जिल्हा नागपूर; सुरेश गजाननजी कश्यप, जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा डवकी, जिल्हा गोंदिया; संजय विस्तारी येरणे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी, जिल्हा चंद्रपूर; अशोक धाडूजी बोरकुटे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहुर्ली, जिल्हा गडचिरोली; दिलीप रावजी नाकाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैतानपार, जिल्हा गडचिरोली; जितेंद्र सत्यनारायणजी राठी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतादेही, जिल्हा अमरावती; दीपक वसंतराव पडोळे, जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा, घोन्सी केंद्र केळापू

र, जिल्हा यवतमाळ;



शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्याबाबत

 शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्याबाबत

सकारात्मक निर्णय घेणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान


 


            मुंबई, दि. ५ : विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, तरूण पिढी आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे शासनाचे धोरण असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            सन 2022-23 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय 108 शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याहस्ते सहकुटुंब गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री कपिल पाटील, विक्रम काळे, किरण सरनाईक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह पुरस्कार विजेते शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


            समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन 2021-22 पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून हे पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येत आहेत. एक लाख दहा हजार रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


            पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य शासन शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी नवनवीन योजना आणि उपक्रम राबवित आहे. शिक्षक हा यातील महत्त्वाचा घटक आहे. ते ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याने पालकांनंतर गुरूजनांना महत्व दिले जाते. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचे शासनाचे ध्येय असून शिक्षणाचे महत्त्व जोपासण्यासाठी शासनामार्फत आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवून यात अधिक योगदान देण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र सरकारचे राज्याला पाठबळ असून त्या माध्यमातून राज्यात सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात शिक्षण विभाग आणि शिक्षकांचेही मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.


शिक्षक राज्य शासनाचे ब्रँड अम्बॅसेडर ठरावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार


            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे. त्यामुळे शिक्षणाकडे भविष्याची गुंतवणूक म्हणून पाहणे गरजेचे आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे काम बलशाली देश घडविण्यामध्ये सहाय्यभूत ठरले पाहिजे, तसेच इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले पाहिजे, असे सांगून यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षक राज्य शासनाचे ब्रँड अम्बॅसेडर ठरले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षकांना दिलेल्या पुरस्कारांमुळे त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळते असे सांगून शिक्षकांना यापुढील काळात स्वत:ला सतत अपडेट आणि अपग्रेड करीत रहावे लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


            श्री.पवार म्हणाले, राज्य शासन सर्वाधिक खर्च शिक्षण क्षेत्रावर करीत आहे. हा खर्च सत्कारणी लागला पाहिजे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा, स्वच्छता, आनंददायी वातावरण आवश्यक असते. यासाठी उद्योजकांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कामे करण्याचाही शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री प्रगती करीत आहे, याचे श्रेय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना असून त्यांच्या नावे दिला जाणाऱ्या पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील भिडे वाडा येथे सावित्रीबाईंचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी प्रगतीशील भारत घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून वाचायला शिकवणारा शिक्षक समाजाला घडवतो आणि वाचवतो अशा शब्दांत शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. समाजात शिक्षकांना विशेष दर्जा असून विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागा असल्याची माहिती त्यांनी दिली.


शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविणार – दीपक केसरकर


            पुढची पिढी घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षक करीत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार दिले जात असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शालेय शिक्षण विभाग काम करीत आहे. यात शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे सांगून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे शासनाचे धोरण असल्याचे श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले. जनगणना आणि निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे विभागाच्या परवानगीशिवाय लादले जाऊ नये यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन याबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिक्षकांचे मुख्यालय किती किलोमीटर अंतरापर्यंत असावे हे देखील लवकरच निश्चित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी उद्योगांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी वापरता येईल का याबाबत विभागामार्फत प्रस्ताव देण्यात आला असून शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पाच ते दहा वर्षांसाठी शाळांमधील सुविधांच्या विकासाची जबाबदारी उद्योगांकडे देता येईल, असे त्यांनी सांगितले.


            शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हिताचे विविध निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने 61 हजार शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न सोडविण्यात आला, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली, शिक्षकांच्या सतत होणाऱ्या बदल्या थांबविण्यात आल्या, शिक्षण सेवक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक आदींच्या मानधनात तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली. त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केले, आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, पायमोजे शासनामार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडविण्यात आणि सक्षम नवीन पिढी घडविण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


            शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रास्ताविकाद्वारे शिक्षण प्रणालीत असलेले शिक्षकांचे महत्व अधोरेखित करून शिक्षक पुरस्कारासाठीच्या निवड प्रक्रियेची माहिती दिली.

नव्या दोन एमआयडीसीमुळे अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत होणार वाढ - मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

 नव्या दोन एमआयडीसीमुळे अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत होणार वाढ

- मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी

           

            मुंबईदि. ५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी म्हणून राज्यात नव उद्योग आणि नव रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्या दोन नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी मिळाली असून भविष्यात अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत वाढ होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

            उद्योगमहसूल विभागमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाची महत्त्वाची बैठक आज सह्यादी अतिथीगृह येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूलपशूसंर्वधन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीस महसूल विभागउद्योग विभागमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्द‍िष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने 'एक ट्रिलियनडॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहेत्याच दृष्टीने राज्यात नवे उद्योग आणि नव रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नवीन उद्योगास चालना मिळावीबेरोजगारांच्या हातांना काम मिळावेतसेच गावातील स्थानिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसीच्या संदर्भात मागणी केली होती. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यासाठी वडगाव गुप्ताविळद येथे ६०० एकरावर फेज २ व शिर्डी येथे साईबाबा शिर्डी एमआयडीसी अशी ५०० एकर वर दुसऱ्या एमआयडीसीला उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी तत्त्वत: मंजुरी दिल्याची माहिती श्री. विखे पाटील यांनी दिली.

            शासनाच्याच जमिनीवर भूसंपादनाविना विकसित करण्यात येणारी ही राज्यातील पहिलीच एमआयडीसी असल्याचे मंत्री श्री. विखे -पाटील यांनी सांगितलेतसेच याबैठकीत जुन्या एमआयडीसीच्या संदर्भातील निंबळक एमआयडीसी येथील समांतर रस्त्यालासुपा एमआयडीसीला ५० कोटी रुपयांचे अद्ययावत असे अग्न‍िशमन (फायर) स्टेशनतसेच अंतर्गत रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

 महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

 

        नवी दिल्ली,  दि. 05 : शालेयउच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक मोबाईल , उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, -ट्यआकाशवाणी, सॉफ्टवे, हार्डवेर आदींचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या  शिक्षकांना  सन्मानित करण्यात आले.

        नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्रदान  समारंभाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह आदी उपस्थित होते.

 यावेळीमहाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष 2023 चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये  शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजळे, उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आरसी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ.चंद्रगौडा रावसाहेब पाटीलआयआयटी मुंबईतील डॉ. राघवन बी. सुनोज तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शिल्पनिदशकस्वाती देशमुख या शिक्षकांचा समावेश आहे.

                           श्रीमती मृणाल गांजाळे

पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळापिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना २०२३ या वर्षाचा शालेय विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार   (National Teachers Award 2023) प्रदान करण्यात आला. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून एका शिक्षिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना यापूर्वी २०१९ मधील राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार व २०२२ मधील राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. 

डॉ. राघवन बी. सुनोज

प्रा. राघवन बी. सुनोज मूळचे तिरुवनंतपरमचे आणि आयआयटी मुंबईचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना अध्यापन आणि संशोधनासाठी सन २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला. रसायनशास्त्रमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले असून 2001 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरकडून त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला आहे. वर्ष 2012 पासून ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

प्रो.केशव सांगळे  

प्र. केशव सांगळे यांना उच्चशिक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील शैक्षणिक योगदानसंशोधनशोधनिब, विद्यार्थी मार्गदर्शनशैक्षणिक प्रशासनपायाभत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्थाराज्य व राष्ट्रीयस्तरावर केलेली मदतराज्य व देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्ष केल्याबद्दल सन 2023 या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. चंद्रगौडा  रावसाहेब पाटील

डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना उच्च शिक्षणातील तंत्रज्ञान वापरसमाज उपयोगी संशोधन तसेच नाविन्यपूर्ण व विद्यार्थीभिमुख शिक्षण पध्दतीचा विकास व वापरसाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला.   

स्वाती योगेश देशमुख  हस्तकला (क्राफ्ट्स कौशल्य) प्रशिक्षक

अत्यंत समर्पित आणि कुशल संगणक कौशल्य प्रशिक्षणात उल्लेखनीय कारकीर्दीची दखल घेतस्वाती योगेश देशमुख यांना वर्ष 2023 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना 22 वर्षांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अनुभवासह, विद्यार्थ्यांना संगणक-संबंधित विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा गौरव केला गेला. त्यांनी आजपर्यं 500+ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण आणि मदत करून सर्वसमावेशकता आणि समर्पण दर्शविले आहे.

       या वर्षापासूनराष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 50 शालेय शिक्षकउच्च शिक्षण विभागातील 13 शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 12 शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र50,000 रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

*********

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 167दि.05.09.2023

- पुरस्कार विजेत्यांबाबतची माहिती-

श्रीमती मृणाल गांजाळे

श्रीमती मृणाल गांजाळे- शिंदे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षणाचे आदान-प्रदान, गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण दिले. त्यांचे सन २०१९-२०२० या वर्षात इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्तीधारक १७ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थी नवोदय २ विद्यालयासाठी निवड पात्र ठरले. प्रधानमंत्री विद्या वाहिनीवर शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर सत्रात CIET-NCERT मार्फत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले मागील वर्षी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी देखील दिल्ली येथे त्यांच्या शैक्षणिक कामाचे कौतुक करून सन्मान केला. राष्ट्रीय आय.सी.टी मेला मध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे.

डॉ. राघवन सुनोज

            डॉ.सुनोज यांनी सेंट जोसेफ स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असूनयुनिव्हर्सिटी कॉलेज, तिरुवनंतपरममध्ये शिक्षण घेतले आहे. डॉ. सुनोज यांनी बगळर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून पीएच.डी प्राप्त केली. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन केल्यानंतर, ते वयाच्या 29 व्या वर्षी आयआयटी मुंबईमध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. डॉ. सुनोज यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CISR) 2019 मध्ये प्रतिष्ठित 'शांतीस्वरूप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार' प्रदान केल आहे.

 

प्र. केशव सांगळे

            प्र. सांगळे हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थामुंबई येथे  संरचना अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख आणि संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्थापत्य  अभियांत्रिकीमधील पदविका शासकीय तंत्रनिकेतन पुणेपदवी व पदव्युतर पदवी शासकीय अभियांत्रिकी  महाविद्यालय,  कराड येथे घेतली. त्यांनतर त्यांनी पीएचडी ही पूर्ण केली.

डॉ. चंद्रगौडा पाटील

            डॉ. पाटील हे विद्यार्थ्यांना स्वत:च्या गतीने क्लिष्ट विषयाचे अवलोकन करता यावे यासाठी मागील दोन दशकांपासून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपकरणेशैक्षणिक साहित्य व शिक्षण पध्दती विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. डॉ. पाटील यांनी विकसित केलेले एक्स-कोलॉज व कॅलफार्म नामक परस्पर संवादी सॉफ्टवेअर औषधनिर्माणवैद्यकीयपॅरामेडिकल व पशुवैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले आहे. या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे शैक्षणिक उद्दिष्टासाठी केल्या जाणाऱ्या विच्छेदनाला आळा बसून देशातील हजारो प्राण्यांचे जीव वाचले आहेत. यापूर्वी डॉ.पाटील यांना होमिओपॅथी क्षेत्रातील संशोधन कार्याबद्दल भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून देण्यात येणारा एक लाख रुपयांचा युवा वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झालेल असून डॉ.पाटील यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

 

श्रीमती स्वाती देशमुख

श्रीमती स्वाती देशमुख यांनी 4 सप्टेंबर 2010 पासून मुंबईतील सरकारी आयटीआय  लोअर परेल येथे संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग (COPA)असिस्टंट ट्रेडच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी संस्थेच संकेतस्थळ विकसित करून, शैक्षणिक यू ट्यब व्हडिओ तयार करून आणि संगणक-आधारित प्रशिक्षण (CBT) मॉड्यूल डिझाइन करून त्यांच्या संस्थेच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याव्यतिरिक्त, प्रशिक्षणार्थींसाठी एक ई-लायब्ररी स्थापन केली आहे. डिजिटल शिक्षण संसाधनांचा प्रचार केला आहे. श्रीमती देशमुख यांनी संस्थेमध्ये हाय-टेक, इंटरनेट-सक्षम कॉम्प्युटर लॅबची स्थापना करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने उपलब्ध करण्यात तसेच विविध सक्षम विद्यार्थ्यांचे सक्षमीकरणात व रोजगार सुरक्षित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.

********


 


शिर्के प्रशालेचे प्रशांत जाधव यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार शिक्षक दिनी जाहीर:माजी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केली शिफारस

 शिर्के प्रशालेचे प्रशांत जाधव यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार शिक्षक दिनी जाहीर:माजी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केली शिफारस 


रत्नागिरी

शहरातील रा.भा. शिर्के प्रशालेचे सहाय्यक शिक्षक प्रशांत जाधव यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 जिल्हयातील प्रतिष्ठीत शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा शिर्के प्रशाला रत्नागिरी येथे सहाय्यक इंग्रजी विषय शिक्षक व स्काऊट मास्टर म्हणून कार्यरत आहेत .

श्री पी.सी. जाधव यांनी आतापर्यंत १५ वर्षांच्या सेवा कालावधीत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत. तसेच मायबाप बालसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून मागील अनेक वर्ष समाजसेवेत कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची देशव्यापी कार्यरत असलेल्या व आयुष मंत्रालय व बीसीसीआयसह जी -२० देशांची मान्यता असलेल्या एज्युकेशन अँण्ड स्पोर्टस प्रमोशन फाऊंडेशन च्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्काऊट चळवळीच्या माध्यमातून देखील त्यांच्या मागदर्शना खाली त्यांच्या पथकाने राजस्थान यथे राष्ट्रीय स्तरावरील जांबोरी येथे चमकदार कामगिरी केली आहे. ज्या १८ व्या जांबोरीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले होते. श्री पी.सी. जाधव यांनी सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभरात विविध प्रबोधनपर कार्यक्रम पथनाट्ये , सेहत की राखी ,शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबवित असतात यामध्ये एमबीबीएस फाऊंडेशनची त्यांना मदत होत असते . त्यांच्या कार्याची उचित दखल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या रजिस्टर्ड संस्थेने घेतली आहे . लवकरच मुंबई यथे १६ नोव्हें रोजी भव्य कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षकरत्न पुरस्काराची शिफारस त्यांनी मार्गदर्शन केलेल्या काही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केत्याचे एमबीबीएस फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. कविता सु.जाधव यांनी सांगितले. त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक विद्यार्थी सध्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत.श्री जाधव यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल इएसपी फाऊंडेशन महाराष्ट्र ( रत्नागिरी जिल्हा ) , सलाम मुंबई फाऊंडेशन, कास्ट्राईब शिक्षक संघटना , शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती शाखा रत्नागिरी , रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसह विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Featured post

Lakshvedhi