Wednesday, 2 August 2023

अल्सर... पोटातले व्रणः*

 *अल्सर... पोटातले व्रणः*



 अतिचिंता, खुप मसालेदार जेवण, अतिशोक, जागरण, जेवण वेळेवर न घेणे, चमचमित आहार घेणे. या गोष्टि वारंवार होत राहिल्यास कि मग आधि आम्लपित्त व त्याचि विक्रुत अवस्था म्हणजेच... अल्सर...

 उपायः

१) सकाळि कोकम सरबत घ्या. नाश्यात साळिच्या लाह्या दूधात कालवून खा. नंतर दोन चमचे मध नुसतेच खा. कारण हे अल्सरचे जंतू नष्ट करतात.

२) ज्येष्ठमध चूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून सकाळि एक कप भात शिजवून त्यासोबत खावे. अल्सर वेगाने बरा होतो.

३) मेथिचे दाणे भिजवून नंतर उकळवा. व थोडे मध मिसळून खा.

४) शहाळ्याचे पाणि दिवसातून दोनदा घ्या. ओले खोबरे खा.

५) केळ हे एक उत्तम अल्सर लवकर बरे करण्याचे फळ आहे. दोनदा खावे दिवसातून.

६) पानकोबित लँक्टिक अँसिड असते. ज्यामूळे अमिनो अँसिड बनून पोटाला कवच मिळतं व अल्सर होत नाही. थोडि पानकोबि व गाजर याचा रस एकत्रित करून सकाळि घ्यावा. व रात्रि झोपण्याच्या आधि घ्यावा.

७) रोज जेवणानंतर दाडिमावलेह

 दोन चमचे, कामदूधा वटी, प्रवाळ पंचाम्रुत घ्यावे. रोज एक मोठा चमचा भरून गुलकंद खावा.

८) मुख्य म्हणजे आंबट, खारट, विशेषतः चिंच, टोमँटो, अननस टाळा.

 आंबवलेले पदार्थ. इडलि, दोसा, ढोकळा, दहि, खाउ नका.

  यासर्व उपायाने व पथ्याने अल्सरचा त्रास होणार नाही....



*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*




Tuesday, 1 August 2023

भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात

 


कांदिवली पूर्व विधानसभेत लोखंडवाला येथे भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन मंगळवारी आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


लोखंडवाला येथील अण्णा भाऊ साठे उद्यानात हे भित्ती शिल्प उभारण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आयुष्यभर समाजातील कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या लोकसांसाठी झगडण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हि व्यक्तिमत्वे आमच्यासाठी राजकारणाचे विषय नाहीत. ही व्यक्तिमत्वेच इतकी मोठी आहेत कि त्यांनी समाजाला, देशाला नाही तर उभ्या जगाला मार्गदर्शन करण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले

.


सोपी भाषेत गणित शिकवा मुलाना



सोपी भाषेत गणित 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तविधानभवनात आदरांजली

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तविधानभवनात आदरांजली


            मुंबई, दि. 1 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.


            याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, सह सचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव विजय कोमटवार, मोहन काकड, सुरेश मोगल व संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.


00000

काय पण वेळ आली


 आणखी काय मोटिवेशन हवंय तुम्हाला श्रावण पाळण्यासाठी? 😱😃🫣.....✌️

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन


            पुणे दि-1: लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


               यावेळी आमदार सुनील कांबळे, पुणे जिल्हा मातंग संघाचे अध्यक्ष भीमराव साठे, सहदेव ढवरे आदी उपस्थित होते.


              यावेळी पुणे जिल्हा मातंग समाज व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णभाऊ साठे जयंती समितीच्यावतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ चित्र प्रदर्शनास भेट दिली. जिल्हा मातंग संघाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.


            तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथेही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


0000

दररोज 200 - 400 टाळ्या वाजवा आणि कायम स्वरुपी स्वास्थ्य मिळवा.....*

 *दररोज 200 - 400 टाळ्या वाजवा आणि कायम स्वरुपी स्वास्थ्य मिळवा.....*


रोज ४०० टाळ्या वाजवल्याने संधिवात, गाउट, आमवात, बरा होतो. टाळ्या वाजवल्याने हाताचे रक्ताभिसरण जलद होते. Blood flow वाढतो. ज्याने थेट नसा active होउन गाउट बरा होतो.


Hand paralysis म्हणजे हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व सकाळ, संध्याकाळ ४०० टाळ्या वाजवल्याने ५ - ६ महिन्यातच बरा होतो.


internal organs ह्रुदयरोग, फुफ्फुसांचे, आजार, यक्रुताचा आजार, रोज सकाळ, संध्याकाळ ४०० टाळ्या वाजवल्याने बरे होतात.


immune system/रोग प्रतिकार शक्ती वाढते, कारण रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक अवयव प्रभावित होतो.


टाळ्या वाजवल्याने डोकेदुखी, अस्थमा, मधुमेह, नियंत्रणात राहतो, clapping सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात ठेवतात.


Hair fall व सर्व प्रकारच्या केसांसंबंधित विकार बरे होतात. कारण, हाताचा अंगठा, व बोटांच्या शिरा, नसा, या डोक्याशी जोडलेल्या असतात.


रोज जेवणानंतर ४०० टाळ्या वाजवल्याने सर्व आजार बरे होतात. फालतू चर्बी, मेद झडतो, Obesity दूर होते. टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ति वाढते.


शरिराचे सर्व जोडबिंदू हे हाताच्या बोटांशी जोडलेले असल्याने, टाळ्या वाजवल्याने Healthy body, fit mind शरीर स्वस्थ, निरोगी राहते.


*टाळ्या कशा व कधी वाजवाव्यात...*

टाळ्या वाजवणाच्या आधी हाताला बदामाचे, देशी गाईचे तूप, किंवा खोबरेल तेल लावावे. रोज सकाळी २०० व संध्याकाळी २०० टाळ्या वाजवाव्या.


२०० टाळ्या हात वर करून वाजवा आणि २०० टाळ्या सामान्य स्थितित उभे राहून वाजवा.


आपले पूर्वज हे ज्ञानी, हुशार होते, त्यांना माहित होते की मनुष्य हा धर्माशी जोडलेले प्रत्येक काम नक्की करतो, म्हणून मग देवपुजेनंतर आरती करतांना टाळ्या वाजवण्याची प्रथा सुरू झाली.

 

*👏👏 मग करा चालू आत्ताच*


*डॉ. सुनील इनामदार,*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Featured post

Lakshvedhi