Sunday, 30 July 2023

पचनसंस्थेसाठी बडिशेप.....*

 *पचनसंस्थेसाठी बडिशेप.....*


*१. उत्तम औषध...*

 रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.


*२. पोटात गॅस...*

 होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते.


*३. अपचनाच्या सर्व तक्रारींत...*

 बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे इ. थोडक्यात, सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.


*४. मुलांना दात येताना...* जुलाबाचा त्रास होतो, त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण घ्यावे.


 *५. वीर्यवृद्धी करते.*


*६. भूक लागत नसेल...* तर रोज बडिशेप खावी. त्यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे.


*७. स्मरणशक्ती...* सुधारण्यासाठी व बुद्धी तरतरीत ठेवण्यासाठी बडिशेप चूर्ण+ तूप, चाटण द्यावे.


*८. तापामध्ये अंगाची आग होत असेल...*

 जिभेला शोष पडत असेल तर बडिशेपेचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा.


*९. मासिक पाळीचे वेळी...* पोटात दुखत असेल, तर त्यासाठी एक चमचा बडिशेप रोज तीन वेळा चावून खावी. 


*१०. लघवी कमी होत असेल...*

तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर एक चमचा बडिशेपेचा काढा करून प्यावा.


*११. उलट्या होत असल्यास...*

 अर्धा चमचा बडिशेप चूर्ण, एक चमचा

मोरावळ्यांत टाकून चाटण करणे.


*१२. कोरडा खोकला...*

 असेल तर, एक चमचा बडिशेप चूर्ण + एक चमचा पत्री खडीसाखर बरोबर घेणे.


*१३. सूज व वेदना...*

असतील तर बडिशेप, सैंधव पूड व ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे.


*१४. बडीशेप सरबत...*

बडिशेप ४ वा ५ चमचे घेऊन ती एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात ४ वा ५ चमचे साखरेचा पाक करून घालावा. म्हणजे चांगले सरबत तयार होते. उपयोग - या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते. शिवाय ते पौष्टिक आहे.


*१५. स्वादिष्ट विरेचन चूर्ण...*

 बडिशेप, ज्येष्ठमध व सोनामुखी प्रत्येकी १५० ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात ३०० ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. उपयोग - रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे.

त्याने पोट साफ होते. तसेच मूळव्याध, तोंड येणे इ. उष्णताविकार व त्वचाविकार बरे होतात.


*१६. बलदायी पेय (Energy Drink )...*

बडिशेप एक चमचा, एका वेलचीचे दाणे व दोन खजुराच्या आठळ्या ( बिया काढाव्यात. ) हे सर्व मिसळून दोन कप पाण्यात रात्री भिजत घालावे. सकाळी मिक्सरमधून काढावे म्हणजे बलदायी पेय तयार होते, ते रोज सकाळी ताकदीसाठी प्यावे.


*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



भवताल" जुलै २०२३ चा अंक प्रसिद्ध !

 "भवताल" जुलै २०२३ चा अंक प्रसिद्ध !


नमस्कार.

"भवताल मासिका"चा जुलै २०२३ चा अंक प्रसिद्ध झाला आहे. तो सोबत शेअर करत आहोत.

त्यात पुढील लेखांचा समावेश आहे=


• दिल्ली बुडाली, पण कशामुळे?

• कामशिल्पांचा अर्थ आणि प्रतीकात्मकता

• चातक नव्हे, चमत्कार !

• कोकणातील कातळशिल्पांचे गूढविश्व

(भवताल बुलेटीन)



• आक्रमक वनस्पती हत्तींच्या मुळावर

• मानवनिर्मित घटक पक्ष्यांसाठी हानिकारक

• गुरुत्वाकर्षणाच्या छिद्रामागे महासागरातील मोठे खडक?

• सोन्याच्या साठ्याखाली सर्वांत जुनी हिमनदी?

(इको-अपडेट्स)


आपणाला हा अंक पाठवत आहोत. अंकाचे कव्हर आणि नावनोदणीची लिंक देत आहोत. ती आपल्या संपर्कात पोहोचवून लोकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

तसेच, आपण वर्गणी भरली नसल्यास ती भरून ‘भवताल’ च्या कार्याला पाठबळ द्यावे, ही विनंती.


वर्गणीसाठी तपशील:

G-pay : 9822840436

UPI : abhighorpade@okhdfcbank

QR code : 

Bhavatal Magazine AC.jpg


नावनोंदणीसाठी लिंक:

https://www.bhavatal.com/connectus/masik-nondani-information


- संपादक, भवताल मासिक

9545350862


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustai

nability)

9545350862 / bhavatal@gmail.com

मुंबई उपनगरातील रस्ते दोन वर्षाच्या आत काँक्रीटकरण करणार

 मुंबई उपनगरातील रस्ते दोन वर्षाच्या आत काँक्रीटकरण करणार


: पालकमंत्री मंगल प्रभात लोढा


         मुंबई, दि.३० : अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतुकींच्या कोंडींचा सामना करावा लागत आहे, यासाठी तातडीने खड्डे भरण्यात यावेत. नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी मुंबई उपनगरातील सर्व रस्ते दोन वर्षाच्या आत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटकरण करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.


 


         मुंबई उपनगर मधील के पश्चीम वॉर्ड, के.पूर्व वॉर्ड व एल वॉर्ड येथील इर्ला मार्ग जंक्शन, व्ही. एम. मार्ग आणि एस. व्ही. मार्ग जंक्शन,सहार मार्ग जंक्शन,साकीनाका जंक्शन, कांजूरगाव इत्यादी ठिकाणी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रस्त्यांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासु, उपायुक्त रस्ते संजय महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) मनीषकुमार पटेल आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            पालकमंत्री श्री.लोढा यांनी अंधेरी येथील साकीनाका रोड, सागर हॉटेल आणि गुलमोहर रोड येथे अधिका-यांसमवेत रस्त्यांची पाहणी करून ज्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक आहे असे खड्डे कोणताही विलंब न करता भरले जावेत अशा सूचना अधिका-यांना केल्या. तसेच यावर्षी महापालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे सब-वेमध्ये पाणी भरण्याची समस्या कमी झाली असल्याबद्दल पालिकेच्या प्रशासनाचे आभार मानले. पश्चिम उपनगरांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर तयार झालेले खड्डे भरण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, मास्टीक अस्फाल्ट तंत्रज्ञान वापरून सुरू असलेल्या कामांची पाहणी पालकमंत्री श्री. लोढा केली.


०००


 



नागिणीवर नियंत्रण ठेवणारी मुद्रा.

 मधुसूदन देसाई यांची पोस्ट


नागिणीवर नियंत्रण ठेवणारी मुद्रा.


१ नागिण होण्याचे मुख्य कारण वात व पित्त यांचे असंतुलन आणि काळजी, 

चिंता या आहेत.


२ सुरभी मुळे कफ, वात व पित्त यांचे संतुलन होते.

नागिण झालेवर तेथील 

त्वचेला खाज सुटते, मुंग्या 

येणे,दाह होणे, सुईने जोरात टोचले सारखे होणे

ही लक्षणे आढळतात.


३ जलसुरभी मुद्रा आणि वायूसुरभी मुद्रा, सकाळ - 

संध्याकाळ १०-१० मिनिटे करा्वी.


४ त्वचेची आग होत असेल तर गंध उगाळून लावावा.आग होणे थांबते.


५ नागिण १-३ आठवडे 

नंतर नाहीशी होते.


मुद्रा विज्ञान चिकित्सक.



*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



_

ठाणे - नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचेकाम युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 ठाणे - नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचेकाम युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी


        ठाणे, दि. 30 :- ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना, तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांनी दिले.


           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे- नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, खडवली फाटा या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे तसेच खड्ड्यांच्या उपाययोजना संदर्भात यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष या महामार्गाची पाहणी केली. ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हे खड्डे तात्काळ मास्टिक पद्धतीने बुजविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.


            जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री यांनी आज या मार्गाची पाहणी केली.


            ठाणे नाशिक महामार्गावरील पडघा पर्यंतच्या रस्त्याचे आठपदरीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी पंक्चर आहेत किंवा कट आहेत, ते बंद करण्यात यावे. तसेच रस्ता ओलांडून गावात जाण्यासाठी असलेल्या ठिकाणी हाईट बॅरिअर लावून मोठी वाहने त्या ठिकाणाहून वळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या डाव्या बाजूनेच अवजड वाहने चालविण्यात यावीत, जेणेकरून लहान वाहने व रुग्णवाहिकांना एका बाजूने रस्ता मोकळा मिळेल, यासाठी वाहन चालकांना सूचना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.


            मोठ्या प्रमाणात अवजड वाहने रस्त्यावर आल्यास ही वाहने थांबविण्यासाठी काही ठिकाणी तात्पुरत्या पार्किंगची सुविधा करण्यात यावी, त्या ठिकाणी वाहनचालकांसाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करावे तसेच इतर सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजनोली व माणकोली येथील उड्डाणपुलाखालील रस्त्यांची डागडुजी करावी, जेणेकरून गर्दीच्या काळात या ठिकाणी अवजड वाहने थांबविता येतील. तसेच माणकोली येथील वाहतुकीस अडथळा येणारी दुकाने, गाळे तेथून हटविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            ठाणे ग्रामीण पोलीसांच्या मुख्यालयासाठी निश्चित केलेल्या सापे येथील जागा, तसेच काही दिवसांपूर्वी पडघ्यातील खडवली फाटा येथे झालेल्या अपघात स्थळाची पाहणीही मुख्यमंत्री यांनी केली. जीप व कंटेनरचा अपघात दुर्देवी असून असे अपघात घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात यावी. या ठिकाणी सेवा रस्ता (Service Road)तातडीने करण्यात यावा, भिवंडी येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून आरोग्य विभागाकडून त्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, प्रकाश पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीएचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्यासह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग पोलीस, ठाणे शहर व ग्रामीण पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदीसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे महापालिका आयुक्तांना निर्देश


            आज पावसाने उसंत घेतल्याने मुंबई शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दूरध्वनीवरून दिले. तसेच मुंबई व परिसरातील रेल्वे स्थानकांजवळचे रस्ते, रेल्वे मार्गावर पाणी साचणारी ठिकाणे आदी तातडीने स्वच्छ करून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिले. तसेच एमएमआरडीच्या अखत्यारित येत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या सूचनाही एमएमआरडीए आयुक्तांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.


000


 


 


 


 


 


 



 


 


 


 


 


 


 


 


 


 




 


 


 


डोळे आल्यावर काही घरगुती उपाय

 *डोळे आल्यावर काही घरगुती उपाय.*



आपण कापूर जाळून धूरी घ्यावी. यामुळे डोळ्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.

एरंडेल तेल काजळासारखे डोळ्याला लावल्याने डोळ्यातील पु बाहेर पडण्यास मदत होते.

चांदीच्या स्वच्छ दागिन्यांना काहीवेळ पाण्यात ठेवावे व मग ते पाणी डोळ्यात थेंबभर टाकल्याने आराम मिळतो.

डॉक्टरांकडून डोळे स्वच्छ होण्यासाठी ड्रॉप्स दिले जातात त्यांचा नीट व न चुकता वापर करावा.

ग्रीन टीच्या वापरलेल्या बॅग थोड्यावेळ फ्रीज मध्ये ठेवून नंतर त्या डोळ्यावर ठेवल्याने थंडावा मिळतो.

डोळे आल्यावर सूर्यप्रकाशच नव्हे तर घरातील ट्यूबलाईटचा प्रकाशही सहन होत नाही त्यामुळे स्वच्छ गॉगल घालावा.

प्रमोद पाठक.


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*




Saturday, 29 July 2023

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरचराज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण - कृषिमंत्री धनंजय मुंडे

 शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरचराज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण - कृषिमंत्री धनंजय मुंडे


संयुक्त किसान मोर्चाचे (अराजकीय) प्रस्तावित आंदोलन मागे


 


            मुंबई (दि. 29) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. या बैठकीत शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन करून त्या मार्फत केंद्र सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी दिली.


            या बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चा अराजकीय बळीराजा शेतकरी संघटना तसेच ऊसतोड कामगार व वाहतूकदार संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सोमवारपासून पुकारण्यात आलेले आंदोलन मागे घेतल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.


                 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली असून लवकरच हे अनुदान वितरित करण्यात येईल. ऊर्जा, महसूल, पशु संवर्धन, सामाजिक न्याय आदी विभागांशी निगडित मागण्यांच्या संदर्भात संबंधित विभागांशी लवकरच स्वतंत्र बैठका घेऊन त्या मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेतले जातील. ऊसतोड कामगारांबरोबरच वाहतूकदार यांचा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामध्ये समावेश करणे, तसेच त्यांच्या विविध मागण्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे या संदर्भात विशेष सहाय्य विभागाशी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन तेही निर्णय घेतले जातील, अशीही माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी दिली.


       या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंह, उपसचिव संतोष कराड तसेच संघटनेचे राजू पाटील , संदीप गिड्डे पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते.


        हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने संदीप गिड्डे पाटील यांनी जाहीर केले तसेच सरकारने दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले.


000


 


 


 


 

Featured post

Lakshvedhi