Monday, 10 July 2023

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे

 जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे


मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन


       मुंबई दि. १० : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे,यांच्या अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज २५ जुलै २०२३ पर्यंत सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.


            जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाकरिता प्रत्येकी २ युवक, २ युवती आणि २ संस्था असे प्रतिवर्षी एकूण ०६ पुरस्कार देण्यात येणार आहेत.


पुरस्कार पात्रतेचे निकष :


(अ) युवक/युवती पुरस्कार


(१) पुरस्कारवर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय १३ वर्ष पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.


(२) अर्जदार हा मुंबई शहर जिल्ह्यात सलग ५ वर्षे वास्तव्यास असला पाहिजे.


(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्र इ. जोडावेत.


(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.


(ब) संस्था युवा पुरस्कार


(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.


(२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अक्ट १९५० नुमार पंजीबद्ध असावी


(३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे इ. जोडावेत.


            वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज पाठविण्याची मुदत वाढवली असून इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज, दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल - दुसरा मजला धारावी पश्चिम मुंबई ४०००१७ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ८४५९५८५८४१ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


000

राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितर मुंबई, दि.

 राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितर


मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग नाट्य स्पर्धेतील राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिक वितरण सन 2021-22 साठीचे मंगळवार, दिनांक 11 जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


            सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी सायंकाळी 7 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार असून लोकसभा सदस्य राहुल शेवाळे आणि विधानसभा सदस्य सदा सरवणकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.


            यानिमित्त 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संस्कृत नाट्य स्पर्धेतील, 18 व्या बालनाट्य स्पर्धेतील आणि तृतीय दिव्यांग नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सवही होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.


            बुधवार, दि.12 जुलै रोजी दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील प्रशांत चव्हाण लिखित आणि भरत मोरे दिग्दर्शित ‘वाचवाल का’? हे नाटक सादर होणार आहे. गुरुवार, दि. 13 जुलै रोजी डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व दिग्दर्शित ‘इन द सेल ऑफ सर्व्हायवल’ हे मराठी नाटक आणि शुक्रवार दि. 14 जुलै रोजी ‘मोक्षदाह’ हे नाटक सादर केले जाणार आहे. रवींद्र नाट्य मंदिर येथेच सायंकाळी 7 वाजता या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.   




आयुर्वेदातील आहाराचे नियम:

 आयुर्वेदातील आहाराचे नियम:


*नियम १ : आपल्या पोटाचे चार भाग करावेत . त्यातील दोन भाग हे घन आहारासाठी ठेवावेत , एक भाग हा द्रव आहारासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा , जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो . आहार हा योग्य रीतीने पचला , तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते .

*नियम २ :

 सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे . लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त , तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो .

*नियम ३ : जेवणाआधी आर्धा ते पाऊण तास एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो.

*नियम ४ : कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये . अस वारंवार केल्यास मळमळणे , वा छातीत जळजळणे सुरू होते , तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही. कारण दोहोंच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या असतात.

*नियम ५ : अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये . पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो . 

*नियम ६ : दुपारी जेवणानंतर लगेचच जास्त वेळ झोपू नये. असे वारंवार केले गेल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते .

*नियम ७ : सकाळचे व दुपारचे जेवण हे दोन घास जास्त असले तरी चालेल , मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे. रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसून येतात . 

*नियम ८ :

 आहार हा ताजा बनवलेला . फ्रिजमधील थंड नसावा . तसेच फ्रिजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते.

*नियम ९ :

 पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही , म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये . असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांनादेखील कारणीभूत ठरू शकते. दोन जेवणांमध्ये किमान चार तासांचे अंतर असावे.

*नियम १० : दुपारच्या जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे . त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि खाई खाई होत नाही . 

*नियम ११ : रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे . ( केवळ फोडणीपुरते नाही ) तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते , प्रतिकार शक्ती कायम ठेवते , तसेच ते एक उत्तम रसायनदेखील आहे . शक्यतो देशी गाईचे तूप हे उत्तम , मात्र घरी बनवलेले म्हशीचे तूपदेखील उत्तम असते . 

 *नियम १२ :

 दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये . जसे फुट कस्टर्ड , शिकरण . असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचा रोगनिर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकते . कारण आयुर्वेदामध्ये हा विरुद्ध आहार मानला जातो.

*नियम १३ : अतिकोरडे , अतितेलकट , अतिगरम , अतिशीत , अतिस्निग्ध असा आहार नसावा . सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते . आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला , तर निश्चितच आरोग्य हे उत्तमच राहणार.

प्रमोद पाठक.


_*(कॉपी पेस्ट)*_

*

Sunday, 9 July 2023

मोड आलेली कडधान्‍य खाल्‍याने होणारे फायदे.*

 *मोड आलेली कडधान्‍य खाल्‍याने होणारे फायदे.*


कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये तीन अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनीन, फायटीक अॅसीड आणि ट्रिप्सीन इनहीबीटर. टॅनीनमुळे लोहाच्या शोषणमध्ये अडथळा निर्माण होतो आणि फायटीक आम्लामुळे चुण्याचे शोषण कमी होते. ट्रिप्सीन इनहीबीटरमुळे ट्रिप्सीन नावाच्या एन्जाइम (विकर) निर्मीतीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे कडधान्याचे पचन नीट होत नाही आणि पोट जड होते.


कडधान्य रात्रभर भिजवत ठेवली तर त्यातील टॅनीन आणि फायटीक अॅसीडचे प्रमाण कमी होते. कडधान्ये मोड आणून चांगली शिजवली तर ट्रिप्सीन इनहीबीटरचा नाश होतो. शिजवतांना आमसूल आणि चिंच यासारखे थोडेसे आंबट पदार्थ टाकले तर अपोषक अथवा घातक द्रव्ये सामू बदल्यामुळे पूर्णपणे नष्ट होतात. कडधान्यांना मोड आणून खाण्याची जुनी आणि चांगली परंपरा आहे. त्यामुळे काही विशिष्ट विकरे उत्तेजीत होतात आणि त्यांच्यामुळे चांगले बदल घडवून येतात. 

मोड आलेली कडधान्‍य खाल्‍याने खालीलप्रमाणे फायदे होतात. .

1. प्रथिने पचायला सोपी होतात.


2. सर्व जीवनसत्वांची अनेक पटीने वाढ होते.


3. मोड काढण्यापूर्वी 100 ग्रॅम कडधान्यामध्ये क जीवनसत्व हे 2 ते 6 मिलिग्रॅम असते. हेच प्रमाण मोड काढल्यानंतर 27 ते 52 मिलिग्रॅम पर्यंत वाढू शकते.


4. मोड आणल्यामुळे कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो.


5. मोड काढण्याच्या प्रक्रियेत टरफलामध्ये असलेले टॅनीन आणि फायटीक अॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे लोहाचे आणि चुण्याचे शोषण वाढते. याचा शरीराला चांगला फायदा होतो.


6. मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये कडधान्य हलके होतात आणि पचायला सुलभ होतात.


7. मोड आलेली कडधान्य सुकवून ठेवता येतात. अशा सुकविलेल्या मोडामध्ये कर्बोदकांचे आणि क जीवनसत्वे मोठया प्रमाणावर वाढते.


8. सुकविलेले मोड थोडया वेळ पाण्यात टाकून पुन्हा टवटवीत करता येतात। अशी कडधान्ये प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वांनी समृध्द असतात।


9. मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय प्रमाणात वाढते. यातील कर्बोदकांची पाचकता दुपटीने वाढते आणि प्रथिनांची पाचकता जवळजवळ सव्वा पटीने वाढते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदके यांचा एक समृध्द खजीना मोड आलेली कडधान्ये. अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश म्हणजे आरोग्याची गुरूकिल्ली.

सर्वच प्रकारची कडधान्य पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग व चवळी. नंतर उडीद आणि हरभरा, कडु वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असते. कडधान्यात भरपूर पोशक तत्वे असतात. 100 ग्रॅम कडधान्यामध्ये 17 ते 25 टक्कयापर्यंत प्रथिने असतात याला अपवाद सोयाबीन आहेत. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये 40 ते 42 टक्के प्रथिने असतात. शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पुर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे एका वर्षात दर माणसी कमीत कमी 17 ते 25 किलो कडधान्य वापरणे आवश्यक आहे. म्हणजे 70 ते 80 ग्रॅम कडधान्य प्रतिदिन प्रति माणसी वापरणे आवश्यक आहे.


प्रथिना व्यतिरिक्त कडधान्यांमध्ये ब जीवनसत्वे, लवणे (खनिज) आणि मेद भरपूर प्रमाणात असतात। 100 ग्रॅम कडधान्यात थायमीन (जीवनसत्व ब-1) रिबोफलेवीन (जीवनसत्व ब-2) 0.18 ते 0.26 मिलीग्रॅम आणि नायसीन 2.1 ते 2.9 मिलीग्रॅम असतात. चुना 76 ते 203 मिलीग्रॅम, लोह 7.3 ते 10.2 मिलीग्रॅम, स्फुरद 300 ते 433 मिलीग्रॅम या प्रमाणात असते. सोयाबीन अपवाद आहे. त्यामध्ये 18 ते 20 टक्के मेद असते. कडधान्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, लवणे आणि मेद यांची एकत्रीत उपलब्धता हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि म्हणूनच कडधांन्याना आहारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.म्हणूच निरोगी राहायचे असेल तर कडधान्या चा जास्त उपयोग करा.


प्रमोद पाठक.



जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथके तत्पर ठेवावी

 जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथके तत्पर ठेवावी

                                 - आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत


पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आढावा


             पुणे, दि. 8: राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसाळ्यात साथरोगाच्या दृष्टिकोनातून जोखीमग्रस्त गावे ओळखून यादी करावी. त्याप्रमाणे गट तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रा. डॉ .तानाजी सावंत यांनी दिल्या.


            पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थिती यावर प्रभावीपणे त्वरित कार्य करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गावपातळीपर्यंत केलेल्या आरोग्य सेवा तयारीचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी पुणे येथे आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची यावेळी उपस्थिती होती.


            कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तयारीसाठी जिल्हास्तरावरील अहवाल रोजच्या रोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून पाहावेत ज्यामुळे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री केली जावी, जिल्ह्यातील नोडल अधिकारी त्यांचे दूरध्वनी क्रमांकांची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


            साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अद्ययावत अहवाल तयार ठेवावा, आशासेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्यासुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात. तसेच डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे व पाणी साठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे नियंत्रण ठेवावे. शीघ्रप्रतिसाद पथकाद्वारे करावयाचे कामे तसेच सूचनासाठी एक माहिती पुस्तक तयार करण्यात यावे व मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, औषध साठा अद्ययावत करून उपलब्ध ठेवण्यात यावा, साथरोगाबाबत जनजागृतीसाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे फलकही लावण्यात यावेत, असे निर्देशही यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.


            अतिरिक्त मुख्य सचिव श्री. म्हैसकर यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे सूचित केले. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी सुचविण्यात आले. यावेळी आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.


आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू,मलेरिया, जापानी मेंदूज्वर, लेप्टोस्पायरोसिस या आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे.


आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजना


 -जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.


- गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम.


- आश्रमशाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी.


- पाणी गुणवत्ता नियंत्रण 76 हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत.


- पाण्याच्या स्रोतांचा सर्व्हे व प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.


- एकात्मिक कीटक व व्यवस्थापन यात परिसर स्वच्छता, डासांचे पासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले .


-प्रयोगशाळा सिद्धता


- पुरेसा औषध साठा


-शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना .


-गावपातळीवर साथरोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे .


0 0 0

चिरतरुण राहण्यासाठी काही उपयोगी माहिती.*

 *चिरतरुण राहण्यासाठी काही उपयोगी माहिती.*



स्त्री असो की पुरुष कुणालाच म्हातारे होणे आवडत नाही. वाढते वय लपविण्यासाठी म्हणजेच तरुण दिसण्यासाठी त्याची नेहमी धडपड सुरु असते. त्यासाठी तो मिळतील ते सौंदर्य प्रसाधनांचा वापर करुन चेहऱ्यावरील सुरकुत्या लपविण्याचा प्रयत्न करतो. मात्र मिळते ती निराशाच. सौंदर्य प्रसाधनांऐवजी काही घरगुती उपाय केल्यास आपल्या त्वचा चिरतरुण राहण्यास मदत होईल.संतुलित व पौष्टिक आहारआपल्या आहारात नेहमी हिरवा भाजीपाला, ऋतूमानानुसार फळे तसेच दूधाचा समावेश असू द्या. यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळून त्वचेला पोषणही मिळते. व्यायामसुदृढ आरोग्यासाठी जसा शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे, तसाच चेहºयाच्या त्वचेसाठीदेखील व्यायाम महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्यायाम करताना इंग्रजी अक्षर इ आणि ओ बोला, म्हणजे चेहऱ्याचा चांगल्याप्रकारे व्यायाम होतो. ही प्रक्रिया ५ ते ७ मिनिट करा यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते.मूग डाळ चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी विटॅमिन इ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी सकाळी भिजवलेली मूग डाळी चावून खा. यामध्ये विटामिन इ जास्त प्रमाणात असते. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही बरेच वर्ष तरुण राहू शकताय. आवळ्याचे सेवन त्वचेच्या आरोग्यासाठी विटॅमिन सी देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. विटॅमिन सी चेहरा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. यासाठी नियमित आवळा खाल्ला पाहिजे. कारण आवळ्यामध्ये विटॅमिन सीचे प्रमाण भरपूर आहे. जे तुम्हाला तरुण ठेवण्यासाठी मदत करते. गुलाब पाणी गुलाब पाण्यासोबत २-३ थेंब ग्लिसरीन, १-२ चमचे लिंबाचा रस मिसळून झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होतेभरपूर पाणी प्या.


दररोजच्या धावपळीत अनेकदा आपले स्वत:कडे लक्ष देणे राहून जाते. मात्र आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. जेवणाच्या वेळा, खात असलेले पदार्थ, अपुरी झोप, प्रदूषण, ताण यांचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम दिसून येतो. त्वचा हे परिणाम दाखविणारा महत्त्वाचा घटक आहे. शरीराचा अतिसंवेदनशील भाग असणाऱ्या त्वचेवरुनही एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा अंदाज सहज लावणं शक्य होतं. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी जाहिरातींमध्ये दाखवल्याप्रमाणे महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याची आवश्यकता नसते, तर घरगुती उपचारांनीही त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यासाठी योग्य गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. पाहूयात चिरतरुण राहण्यासाठी त्वचेची कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी…


https://chat.whatsapp.com/HOiEuQyiTqxLY1sb5eVRd1


भरपूर पाणी प्या – दिर्घकालीन डिहायड्रेशन असेल तर तुमची त्वचा लवकर सुरकुतते. उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचा त्रास होतो आणि त्याचाही त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, सरबते, ताक, नारळपाणी पिणे हा त्यावरील उत्तम उपाय ठरतो. पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर तरतरी येते. 

ताण घेऊ नका – करीयर, नातेसंबंध, कुटुंब, अभ्यास यांसारख्या विविध ताणांचा शरीरावर तसेच त्वचेवर वाईट परिणाम होतो. हा ताण घालविण्यासाठी ध्यान करणे, व्यायाम करणे, छंद जोपासणे असे उपाय करावेत. त्यामुळे तुम्ही आतून फ्रेश व्हाल आणि ताण कमी झाल्याने त्वचाही तुकतुकीत दिसण्यास मदत होईल.

क्लिंझिंग – आपण दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. त्यावेळी प्रदूषणामुळे हवेतील कण आपल्या चेहऱ्यावर चिकटतात. तसेच घाम आणि इतर गोष्टींमुळे त्वचा खराब होते. त्यामुळे ठराविक वेळाने चेहरा धुणे आवश्यक असते. आता हा चेहरा धुताना कोणताही साबण लावण्यापेक्षा आपल्या त्वचेला सूट होणारे एखादे क्लिंझिंग वापरल्यास जास्त फायदा होतो. त्यामध्ये असणारे घटक चेहऱ्याचे मॉईश्चर टीकवून ठेवण्यास उपयुक्त असतात.

मॉईश्चरायझर वापरा चेहऱ्याची त्वचा चांगली रहावी यासाठी काही उपाय करणे आवश्यक असते. चेहरा धुतल्यानंतर तो काही वेळा कोरडा पडतो. त्यामुळे सुरकुत्या आल्यासारखेही दिसते. त्यामुळे चेहरा धुतल्यावर आपल्याला सूट होईल असे एखादे मॉईश्चर हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावे. त्याचा त्वचा चांगली दिसण्यास निश्चितच फायदा होतो.जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा आपण खात असलेल्या गोष्टींचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. जास्त मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यास चेहऱ्यावर फोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे जंक फूड तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळलेलेच बरे. जंक फूडमध्ये असणाऱ्या पदार्थांमुळे शरीरातील आवश्यक घटक कमी होतात आणि त्याचा विपरीत परिणाम होतो.नक्कीच आवडेल अशी माहिती.

प्रमोद पाठक.



प्रेमस्वरूप मारते आई

 मांजरीचे पिल्लू हरवले होते, ते सापडले तेव्हा आई त्याला रागावून नंतर त्याच्या एक कानफटात मारून घेऊन गेले *मनूष्य असो वा प्राणी, आईची शैली तीच राहते* 🤣


Featured post

Lakshvedhi