Saturday, 8 July 2023

उद्योजक व्यापाऱ्यांना सरकारचे पूर्णपणे सहकार्य - आयुक्त ओमप्रकाश दिवटे

 उद्योजक व्यापाऱ्यांना सरकारचे पूर्णपणे सहकार्य - आयुक्त ओमप्रकाश दिवटे


महाराष्ट्र चेंबर ची कार्यकारणी सभा इचलकरंजीत उत्साहात संपन्न


इचलकरंजी : राज्य सरकारच्या विविध योजना विना विलंब उद्योजक व्यापार्‍यांपर्यंत पोहोचविल्या जातील. उद्योगांच्या सर्वांगीण वाढीसाठी उद्योजक व्यापाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य राहील, अशी ग्वाही इचलकरंजीचे नूतन महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.


            महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एग्रीकल्चर ची तेरावी कार्यकारणी समितीचीच्या सभेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


            अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी होते. इचलकरंजी येथील कल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही सभा झाली.


            कल्लाप्पा आवाडे जनता सहकारी बँक इचलकरंजीचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, जवाहर साखर कारखान्याचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, महाराष्ट्र बँक फेडरेशनच्या उपा ध्यक्षा वैशाली आवाडे यांच्यासह राज्यभरातून आलेल्या चेंबरच्या सदस्यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. विषय पत्रिकेतील सर्व विषय खेळीमेळीत पार पडले


            आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले, राज्य सरकारच्या सर्व योजना व्यापारी उद्योजकांपर्यंत पोहोचवल्या जातील युवकांना रोजगार मिळवण्यासाठी मनपा आणि उद्योजका तर्फे संयुक्तपणे प्रयत्न केल्यास बेरोजगारीचा टक्का कमी होईल त्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सहकार्य अत्यंत गरजेचे आहे.


          कल्लाप्पा आवाडे जनता सहकारी बँक इचलकरंजी चे अध्यक्ष स्वप्निल आवाडे म्हणाले इचलकरंजी आणि उद्योगाचे अतूट नाते आहे. तत्कालीन काळात माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांनी उद्योग वाढीसाठी दूरदृष्टीने अनेक निर्णय घेतले. त्यामुळेच इचलकरंजी चे नाव जगात टेक्सटाईल सेंटर म्हणून ओळखले जाते मॉडर्न लूमसाठी इचलकरंजी प्रसिद्ध आहे आहे. टेक्स्टाईल पार्कची उभारणी इचलकरंजीत झाली आहे. सरकारच्या विविध योजना आणून तळागाळापर्यंत पोहोचवल्या उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा मोठा वाटा आहे . महाराष्ट्र चेंबर चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांनी घालून दिलेल्या आदर्श आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीचे काम व्यापार उद्योजक करत आहेत.


..2


            महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे त्यासाठी महाराष्ट्र चेंबर कॉमर्स चे मोठे योगदान आहे आणि भविष्यात पुढे सातत्याने राहणार आहे महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात क्रमांक एकवर आणण्यासाठी सर्वच व्यापारी आणि उद्योगांचा मोलाचा वाटा आहे इचलकरंजी शहराचेही राज्याच्या औद्योगिक विकासात मोठे योगदान योगदान आहे महाराष्ट्र चेंबरने केंद्र आणि राज्य सरकारला दिलेली धोरणे आणि अहवालाचा मोठा फायदा झाला. सरकारने चेंबरच्या मदतीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या विकासासाठी घेतले आहेत.


            यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते नूतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचा सत्कार झाला व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा, चेंबरचे उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, शुभांगी तिरोडकर, तनसुख झांबड, करुणाकर शेट्टी , माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर आदी उपस्थित होते.


            इचलकरंजीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य नितीन धूत, मयूर शहा यांनी संयोजन केले. उपाध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी सूत्रसंचालन केले.


 




शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको

 शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांचे प्रश्न, बीडीडी चाळीसंदर्भात राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


       मुंबई, दि. ७: नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले.


            आज सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास श्री. ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री. ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


            राज्यात अद्याप चांगल्या पावसाला सुरूवात झालेली नाही. पेरण्यांचे प्रमाणही कमी आहे, अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावू नका, असे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने २० एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली होती. या बैठकीत नाशिक जिल्हा बॅंक सक्तीने वसुली करत असल्याचा मुद्दा चर्चीला गेला होता.


            आज झालेल्या भेटीत श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास आदी विषयांवर चर्चा केली.



००००


Farmers should not be Forced for Loan Recivery


- Chief Minister Eknath Shinde


Raj Thackeray meets the Chief Minister


to Discuss Issues Pertaining to Farmers and BDD Chawl


      Mumbai, July 7: Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde today in connection with the efforts being made by the Nashik District Bank to recover the loans from the farmers. The Chief Minister instructed the officials of the Nashik District Central Bank over phone not to force the farmers for loan recovery.


      Today at around 4.15 pm, Mr. Thackeray met Chief Minister Mr. Shinde at Varsha . On this occasion, the Chief Minister welcomed Mr. Thackeray with a bouquet.


      The rains have not yet started well in the state. Sowing quantity is also less. Despite such circumstances the Nashik District Cooperative Bank is still pushing hard the small farmers of the district for loan repayment, Mr. Thackeray said.


      On this occasion, Chief Minister Shri Shinde spoke with the officials of Nashik District Central Bank through telephone and advised that they should not force the farmers for loan recovery. In this regard, on April 20, 2023, a delegation led by Mr. Thackeray met Mr. Shinde at the Sahyadri Guest House. In this meeting, the issue of forceful recovery by Nashik District Bank was discussed.


      In today's meeting with the Chief Minister, Mr. Thackeray discussed matters like redevelopment of Worli BDD Chawl 

along with farmers' issues.



कमी शुल्कात परदेशातील उच्च शिक्षण उपलब्धकरण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा

 कमी शुल्कात परदेशातील उच्च शिक्षण उपलब्धकरण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा


       - राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि.७ : राज्यातील विद्यार्थ्यांना कमी शुल्कात परदेशातील नामांकित विद्यापींठामध्ये उच्च शिक्षण घेता यावे,यासाठी विद्यापीठांनी परदेशी विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करावेत असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.


            एसएनडीटी महिला विद्यापीठ,चर्चगेट, मुंबई येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचा १०८ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, विभागप्रमुख, प्राध्यापक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.


            राज्यपाल बैस म्हणाले, आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असून सुद्धा परदेशात उच्च शिक्षण घेता येत नाही.आणि परदेशातील विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या देशात उच्च शिक्षण घेता येत नाही म्हणून परदेशातील ज्या विद्यापीठांचे विद्यार्थी आपल्याकडे येतील त्या विद्यापीठांमध्ये त्याच शिक्षण शुल्कात आपले विद्यार्थी शिक्षण घेतील असा करार करावा, असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.


            राज्यपाल म्हणाले, या विद्यापीठाचा 107 वर्षांचा प्रदीर्घ आणि गौरवशाली प्रवास आहे. महिला विद्यापीठाने केवळ ज्ञानाद्वारे महिलांना सक्षम केले नाही तर लाखो कुटुंबांचा सामाजिक-आर्थिक स्तरही उंचावला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने उच्च शिक्षणातील महिलांसाठी एकूण नोंदणी प्रमाण (GER) सध्याच्या 27.9 टक्क्यांवरून 2035 पर्यंत 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.


            महिलांसाठी व्यावसायिक आणि कौशल्यावर आधारित विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर अनेक महिलांचे शिक्षण अपूर्ण राहते.त्यासाठी विद्यापीठाने स्वतःचा मुक्त आणि दूरस्थ शिक्षण विभाग सुरू करून उच्च शिक्षणापासून वंचित महिलांपर्यंत पोहोचावे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पोषक वातावरण निर्माण करून त्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण कसे देता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करावा.असेही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले.


            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, भारत देश जगाला हेवा वाटावा असा ज्ञानसंपन्न व गुणसंपन्न देश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा आत्मनिर्भर, विश्वगौरव देश होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. देशाच्या विकासात महिलांचे योगदान महत्वाचे आहे. महिलांमध्ये अधिक सहनशीलता, कल्पकता असते.


            भारतीय मूल्ये आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी महिला सक्षमीकरण महत्वाचे आहे. असे सांगून या महिला विद्यापीठासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका आत्मविश्वासाने पार पाडतात. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम विकसित करून महिला सक्षमीकरणासाठी अधिक प्रोत्साहन द्यावे. या महिला विद्यापीठाचे केंद्रीय विद्यापीठ व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे सांगून मंत्री श्री. पाटील यांनी या विद्यापीठाच्या 108 व्या स्थापना दिनानिमित्त अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठाचे सादरीकरण करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दरम्यान विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीवरील लघुपट दाखवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने करण्या

त आली.


00000 


जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी...*

 *जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी...*


बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त, नाहीतर सर्वात बेस्ट green tea, Lemon tea, अद्रक , tea १ नं. गुळाचा चहा ( १०० वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील,


*चहाचे दुष्परिणाम....*


१. दिवसाला ५ ते १० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.


 २. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत. 


३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात. 


४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे. 


५. टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो. 


६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (१० रू/चहा असे) वर्षाचे ७२०० रू होतात. ५ वर्षाचे ३६००० रू होतात. 


७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’ 


८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो. 


९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.


 १०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो. 


खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही.

डॉ. प्रमोद ढेरे,


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/HOiEuQyiTqxLY1sb5eVRd1

पात्र गिरणी कामगारांना तातडीने घरे मिळण्यासाठीअधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार

 पात्र गिरणी कामगारांना तातडीने घरे मिळण्यासाठीअधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार


-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 7 - गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करून पात्र कामगारांना घरे देण्यासाठी शासनामार्फत जे निर्णय घेणे आवश्यक असेल ते घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि गिरणी कामगार सनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिल यामधील 251 पात्र गिरणी कामगारांना घरकुलांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या.


            या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, प्रकाश आबिटकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’ चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, घर हे सर्वांचे स्वप्न असते. मुंबईच्या विकासात गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. पात्र गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या वाटपाचा 20 दिवसांतील हा दुसरा टप्पा असून कामाची ही गती यापुढेही कायम राहणार आहे. यापुढे देखील घर मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी गिरणी कामगारांची जशी पात्रता निश्चित होईल तसे चाव्या वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येतील. कामगारांना गिरण्यांच्या जागेवरच घरे देण्याचा प्रयत्न असून गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने कामगारांना आनंद होत आहे. त्यांच्या आनंदात शासन म्हणून आम्हालाही आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी आवास योजनेप्रमाणे विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून या माध्यमातून मुंबईतून बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. आज चाव्या मिळालेल्या गिरणी कामगारांचे त्यांनी अभिनंदन केले.


            मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार गतिमानतेने काम करीत आहे. यामुळेच ‘सर्वसामान्यांचे सरकार’ अशी या सरकारची ओळख आहे. ज्यांची अंमलबजावणी शक्य आहे असेच निर्णय घेतले जात आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. त्याचप्रमाणे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच छताखाली योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गिरणी कामगारांना हक्काची घरे लवकर मिळावीत यासाठी समिती नेमण्यात आली असून गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्याच्या आणि घरे वाटप करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यामुळे नक्की किती घरे द्यायची आहेत ते समजून त्यापद्धतीने घरांची उपलब्धता निर्माण करता येईल. आज 251 गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्यात येत आहेत. याचपद्धतीने यापुढे जे पात्र होतील त्यांना तातडीने चाव्या देण्याची सूचना त्यांनी केली. पात्र कामगारांना घरांची उपलब्धता व्हावी यासाठी ठाणे जिल्ह्यात 43 हेक्टर जमिनीची पाहणी करण्यात आली असून यावर जेथे घरे बांधणे शक्य असेल तिथे घरकुल बांधून तयार करण्यात येतील, असे ते म्हणाले. या माध्यमातून घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, हा विश्वास गिरणी कामगारांमध्ये निर्माण केला जात आहे. ज्यांना आज घरे मिळाली त्यांना शुभेच्छा देऊन ज्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत त्यांनाही लवकरच घरे मिळावीत यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, मुंबई आणि गिरणी कामगारांचे आगळे वेगळे नाते आहे. मुंबईच्या विकासासाठी गिरणी कामगारांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. मुंबईबरोबरच देशाच्या जडण-घडणीत तसेच राजकीय, सामाजिक चळवळीत या कामगारांचे मोठे योगदान आहे. घर हा जगण्याचा आधार असतो, नात्यांचा ओलावा असतो. त्याच अनुषंगाने स्वतःचे घर हा गिरणी कामगारांचा हक्क असून त्यांना घरांच्या चाव्या दिल्या जात आहेत याचे वेगळे समाधान आहे. गिरणी कामगारांसाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केली जात असून त्याचे वाटपही होत आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यात येत असून सर्वांना घरे मिळावीत यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार श्री. राणे यांनी प्रास्ताविकाद्वारे गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी म्हाडामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.


00000


पात्र मिल कामगारों को तत्काल निवास मिलने के लिए और घरकुल बनाएंगे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. 7- मिल मजदूरों की पात्रता निर्धारित करने के बाद पात्र मजदूरों को घर उपलब्ध कराने के लिए सरकार द्वारा आवश्यक निर्णय लिये जायेंगे, ऐसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज यहां कहा. उन्होंने कहा कि विभिन्न योजनाओं के माध्यम से आवास उपलब्ध कराये जा रहे हैं और सभी पात्र मिल मजदूरों को आवास उपलब्ध कराने के लिए और अधिक कॉटेज का निर्माण किया जाएगा, ऐसा श्री शिंदे ने कहा.   


            महाराष्ट्र गृहनिर्माण एवं क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) और गिरणी कामगार सनियंत्रण समिति के संयुक्त तत्वावधान में सह्याद्री अतिथिगृह पर आयोजित कार्यक्रम में मुख्यमंत्री श्री. शिंदे द्वारा बॉम्बे डाइंग और श्रीनिवास मिल के 251 पात्र मिल मजदूरों को घरकुल की चाबियाँ वितरित की गईं.


            कार्यक्रम में उप मुख्यमंत्री एवं गृहनिर्माण मंत्री देवेन्द्र फड़णवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाड़े, मिल मजदूर समिति के अध्यक्ष विधायक सुनील राणे, विधायक कालिदास कोलंबकर, प्रकाश आबिटकर, गृहनिर्माण विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह 'म्हाडा' के उपाध्यक्ष संजीव जयसवाल, मुख्याधिकारी मिलिंद बोरिकर आदि उपस्थित थे।


            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि घर हर किसी का सपना होता है. मुंबई के विकास में मिल मजदूरों की बड़ी भूमिका रही है. पात्र मिल मजदूरों को घर की चाबियाँ वितरित करने का 20 दिनों में यह दूसरा चरण है और काम की गति जारी रहेगी. मिल मजदूरों की पात्रता निर्धारित होते ही प्रमुख आवंटन कार्यक्रम आयोजित किए जाएंगे ताकि आवास मिलने में और देरी न हो. मजदूरों को को मिल की जगह पर मकान उपलब्ध कराने का प्रयास किया जा रहा है और मिल मजदूरों का सपना पूरा होने से मजदूर खुश हैं. उन्होंने कहा कि सरकार के तौर पर हम भी उनकी खुशी में खुश हैं. उन्होंने कहा कि मोदी आवास योजना जैसी विभिन्न योजनाओं के माध्यम से घर उपलब्ध कराये जा रहे हैं और मुंबई छोड़ चुके मुंबईकरों को वापस मुंबई लाने का प्रयास किया जा रहा है. उन्होंने आज चाबियां पाने वाले मिल मजदूरों को बधाई दी.


            मुख्यमंत्री ने कहा कि सरकार आम लोगों को न्याय दिलाने के लिए सक्रियता से काम कर रही है. यही कारण है कि इस सरकार को 'आम जनता की सरकार' कहा जाता है. ऐसे निर्णय लिये जा रहे हैं जिन्हें लागू किया जा सके. आम लोगों के जीवन स्तर को ऊपर उठाने के लिए विभिन्न परियोजनाएं चलायी जा रही हैं. रुकी हुई पुनर्विकास परियोजनाओं को शुरू किया जा रहा है. इसी तरह उन्होंने कहा कि 'शासन आपके द्वार' कार्यक्रम के माध्यम से एक ही छत के नीचे योजनाओं का लाभ दिया जा रहा है, ऐसा मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा. 


             उपमुख्यमंत्री श्री. फड़णवीस ने कहा कि यह सुनिश्चित करने के लिए एक समिति नियुक्त की गई है कि मिल मजदूरों को उनके उचित घर शीघ्र मिलें और मिल मजदूरों की पात्रता निर्धारित करने और घरों के आवंटन का काम तेज कर दिया गया है. इससे यह समझकर मकानों की उपलब्धता बनाई जा सकेगी कि कितने मकान दिए जाने हैं. आज 251 मिल मजदूरों को घर की चाबियां दी जा रही हैं. उन्होंने सुझाव दिया कि इस तरह से जो भी पात्र होंगे, उन्हें तुरंत चाबियां दे दी जाएं. उन्होंने कहा कि पात्र मजदूरों के लिए घरों की उपलब्धता के लिए ठाणे जिले में 43 हेक्टेयर भूमि का निरीक्षण किया गया है और जहां भी घर बनाना संभव होगा, वहां घरकुल बनाए जाएंगे. इससे घर का सपना पूरा हो रहा है, मिल मजदूरों में विश्वास पैदा हो रहा है. जिन लोगों को घर मिले हैं उन्हें बधाई देते हुए कहा कि, जिन लोगों को अभी तक घर नहीं मिले हैं, उन्हें भी जल्द घर दिलाने का प्रयास किया जा रहा है, ऐसा श्री फडणवीस ने कहा. 


             उपमुख्यमंत्री श्री पवार ने कहा कि मुंबई और मिल मजदूरों का अलग रिश्ता है. मुंबई के विकास के लिए मिल मजदूरों ने कड़ी मेहनत की है. इन श्रमिकों ने मुंबई के साथ-साथ देश के निर्माण के साथ-साथ राजनीतिक और सामाजिक आंदोलनों में भी बड़ा योगदान दिया है. घर जीवन का आधार है, रिश्तों की नमी है. तदनुसार, अपना घर मिल श्रमिकों का अधिकार है और उन्हें अपने घरों की चाबियाँ दी जाती हैं, जिसका एक अलग समाधान है. सरकार द्वारा मिल मजदूरों के लिए बड़ी संख्या में मकान बनवाकर वितरित किये जा रहे हैं. साथ ही केंद्र और राज्य सरकार की योजनाओं के माध्यम से सभी को आवास उपलब्ध कराये जा रहे हैं और उन्होंने कहा कि यह सुनिश्चित करने का प्रयास किया जायेगा कि सभी को आवास मिले, ऐसा श्री पवार ने कहा. 


             मिल मजदूर समिति अध्यक्ष विधायक श्री. राणे ने प्रस्ताविक के माध्यम से म्हाडा द्वारा मिल मजदूरों को घर उपलब्ध कराने के लिए म्हाडा की ओर से किये

 जा रहे उपाययोजनाओं की जानकारी दी.


अपचन*

 *अपचन*


                 खाण्यातील बदलामुळे किंवा शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यामुळे अनेकदा शौचास होत नाही. यामुळे पोटाचे विकार होतात. याकडे दुर्लक्ष करणं शरीरासाठी अपायकारक आहे. जर तुम्हालाही नियमित शौचास होत नसेल तर *पुढील उपाय करुन पाहा*


 -अनेकदा पेनकिलर, डिप्रेशन, उच्च रक्तदाब तसेच इतरही काही औषधं घेतल्यानं बद्धकोष्ठतेचा विकार जडू शकतो. त्यामुळे सतत औषधं घेण टाळा.


 -एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस, एक चमचा आल्याचा आणि दोन चमचे मिसळून रिकाम्यापोटी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.


-रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे गुलकंद खाऊन त्यावर एक ग्लास गरम दूध प्यावे. हा उपाय आठवडाभर करावा. यामुळे पचनशक्ती सुधारते.


-मनुके ग्लासभर दुधात घालून दूध उकळवावे. रात्री झोपताना त्या चावून खाव्यात त्यावर गरम दूध प्यावे. असे केल्यास जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.


- मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर असते. यामुळे बिघडलेली पचनशक्ती सुधारून अन्नपचन योग्य पद्धतीने होते. शारीरिक क्रिया सुरळीत होण्यात मदत होते.


-जेवल्यानंतर पोट जड वाटत असेल तर पुदिन्याची ताजी पाने चावून खा. तसेच पुदिन्याची पाने घातलेला चहा प्या. यामुळे पचनक्रियेशी संबंधित तक्रारीत आराम मिळतो.


-भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पावडर ताकात मिसळून प्या.

यामुळे गॅस, अपचनापासून सुटका होईल.


-जास्त प्रमाणात खाल्ल्याने अपचन होऊन गॅसची समस्या उद्भवते. अशावेळी मेथीच्या दाण्यांमध्ये काळे मीठ मिसळून हे दाणे खा. बद्धकोष्ठतेवर हा रामबाण उपाय आहे. एक ग्लास पाण्यात बेकिंग सोडा मिसळून प्याल्याने अपचन निघून जाईल.


-पोटात गॅस झाल्यास आल्याचा छोटा तुकडा हळूहळू चावावा. त्याचा रस चाखावा. १५ मिनिटांतच गॅसची समस्या दूर होते. चमचा प्या.



 *Nutritionist & Dietitian* 

 *Naturopathist* 

 *Dr. Amit Bhorkar* 


 *

Friday, 7 July 2023

सुधारित वाळू / रेती धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी

 सुधारित वाळू / रेती धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील


            मुंबई, दि. 6 : राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सुधारित वाळू धोरणासंदर्भात सद्य:स्थितीचा विभागनिहाय आढावा आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला.


            यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहसचिव रमेश चव्हाण, माधव वीर, उपसचिव अजित देशमुख यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


            यावेळी मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, सुधारित वाळू/रेती धोरणामुळे लोकांना स्वस्तात वाळू मिळाली पाहिजे असा या धोरणाचा उद्देश आहे. या धोरणामुळे महसूल स्वरूपात स्वामित्व धन (रॉयल्टी) वर्षाला मिळत होती ती आज महिन्याला मिळत आहे. सामान्य लोकांना या धोरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील डेपोंची तपासणी करून पुढील पंधरा दिवसांत सर्व डेपो चालू झाले पाहिजेत, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. रेती घाट चालू होण्यासाठी पर्यावरण विभागाच्या अनुमतीअभावी काही घाट प्रलंबित आहेत. त्याबाबत तातडीने कार्यवाही करून रेती घाट सुरु करण्यात यावे, असेही ते म्हणाले.


            काही ठिकाणी जलसंपदा विभागाचे सहकार्य आवश्यक आहे, याबाबत संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून अडचणी दूर कराव्यात. अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मंत्री श्री. विखे पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.


बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने हजर व्हावे


            महसूल मंत्री श्री पाटील म्हणाले, “वाळू धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांपैकी 33 अधिकारी अजूनही रुजू झालेले नाहीत. याबाबत विभागीय आयुक्त यांनी संबंधित अधिकारी यांना तातडीने हजार होण्याबाबत नोटीस जारी करावी. सर्व अधिकाऱ्यांनी त्वरित हजर व्हावे, अशा सूचनाही मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या. राज्यात पदभरतीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे, याबाबत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, असेही मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले.


००००

Featured post

Lakshvedhi