Thursday, 6 July 2023

: निवांत क्षणी ऐका खुप छान हिडीओ आहे मनाला भुरळ घालतो....*😊

 


: *निवांत क्षणी ऐका खुप छान हिडीओ आहे मनाला भुरळ घालतो....*😊

: भरवुन गेले मी सुध्दा, समाजात दुष्ट माणसं असलीतरी सद्विवेक असणारे देवदूत पण आहेत

मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठीशिक्षणाची भूमिका महत्त्वाची

 मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठीशिक्षणाची भूमिका महत्त्वाची


- राष्ट्रपती मुर्मू


गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण


 


            गडचिरोली, दि. 5 : देशातील मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले.  


            गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आदी यावेळी उपस्थित होते.


            राष्ट्रपती श्रीमती मुर्मू पुढे म्हणाल्या की, गोंडवाना विद्यापीठाच्या अथक परिश्रमातून स्थानिक आदिवासी, मागास घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून चांगली संधी मिळाली आहे. अतिशय कमी खर्चात उपलब्ध झालेल्या उपयुक्त शिक्षणातून या ठिकाणी विद्यार्थी घडत आहेत. या विद्यापीठात चांगल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्याचा लाभ येथील पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती व परंपरा जपण्यासाठी होईल.


             या भागातील अनेक आदिवासी समूह राष्ट्रपती भवनात आपणास भेटण्यासाठी येत असल्याचे सांगून राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, या घटकांकडून संपूर्ण देशाला शिकण्यासारखे बरेच काही आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून स्थानिक विकासाला चांगली चालना दिली आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपले प्रयत्न व जिद्द कायम ठेवावी. गोंडवाना विद्यापीठाचे नाव जागतिकस्तरावर जाईल याची मला खात्री आहे.


            गोंडवाना विद्यापीठाची ओळख एक परिपूर्ण आदिवासी विद्यापीठ व्हावी, अशी इच्छा व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस पुढे म्हणाले की, विद्यापीठासाठी 170 एकर क्षेत्रावर येत्या काळात 1500 कोटी रुपये खर्च करून विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. विद्यापीठाने गेल्या 12 वर्षात चांगली प्रगती केली आहे. 39 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे. महाविद्यालय बाह्य असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.


            केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, गडचिरोली जिल्हा मागास, दुर्गम आहे. याचे कारण पायाभूत सुविधांचा अभाव होता. मात्र आता रस्ते, उद्योग, शिक्षण, आरोग्य आदी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री व वनमंत्री यांनी या जिल्ह्यासाठी अनेक कामे मंजूर केली आहेत. रेल्वे, विमानतळ, लोहप्रकल्प यामुळे येथे गुंतवणूक वाढणार आहे. या सर्व प्रक्रियेत गोंडवाना विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत कार्यक्रमासाठी येथे येऊन राष्ट्रपती महोदयांनी गडचिरोली जिल्ह्याचा सन्मान वाढविला आहे. गडचिरोली जिल्हा हा जल, जंगल, जमीन आणि खनिज संपत्तीने समृद्ध आहे. या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारचे लोहखनिज असून 20 हजार कोटींची गुंतवणूक येथे होत आहे. या जिल्ह्याच्या विकासात गोंडवाना विद्यापीठाचेही योगदान महत्त्वाचे आहे. राज्य सरकार विद्यापीठासाठी जमीन तसेच निधीची कमतरता कधीही पडू देणार नाही. गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ, रेल्वे आदी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून येथे रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्याची आदिवासी संस्कृती ही आपला एक समृद्ध वारसा आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून या संस्कृतीचे जतन होऊन ती आणखी विकसित होईल. या जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळ संपुष्टात येत आहे. येथील नागरिक आता मुख्य प्रवाहात येऊन जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावत आहे, असेही ते म्हणाले.


            प्रारंभी राज्यपाल श्री. बैस यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले.


राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक व आचार्य पदवी प्रदान


            राष्ट्रपतींच्या हस्ते अमित रामरतन गोहने (मानव विज्ञान विद्याशाखा), अर्पिता पुरुषोत्तम ठोंबरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा), लोकेश श्रीराम हलामी व सदाफ नफीस अहमद अन्सारी (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा), संतोष प्रकाश शिंदे (आंतर विज्ञान विद्याशाखा) यांना सुवर्णपदक, तर सारिका बाबूराव मंथनवार यांना शिक्षणशास्त्र या विषयात आचार्य पदवी प्रदान करण्या

त आली.


००००



 


शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता

 शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. 5 : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


            शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास व या कार्यालयासाठी 13 जून 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील मान्यतेनुसार सहा पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. ही पदे सध्याच्या त्या-त्या संवर्गाचा एक भाग राहतील. यामध्ये एक अपर जिल्हाधिकारी, एक नायब तहसीलदार, एक लघुलेखक, एक अव्वल कारकून, दोन लिपिक- टंकलेखक, अशी पदे असणार आहेत. अहमदनगर अपर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रात नेवासा, शेवगाव, पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड असे आठ तालुके राहतील. अपर जिल्हाधिकारी, शिर्डी, यांच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, राहुरी असे एकूण सहा तालुके राहतील.


            अहमदनगर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर तसेच अपर जिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी यांच्या कार्यक्षेत्रातील तालुके, त्याअंतर्गत महसूल मंडळे, तलाठी साजे व त्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गावांची यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्यास्तरावर करण्यात यावी.अपर जिल्हाधिकारी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, अहमदनगर आणि नियंत्रक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक हे काम पाहतील.


००००

हळद*..एक गुणकारि औषध...

 *हळद*..एक गुणकारि औषध...


 माहिती आवडली तर नक्की शेअर करा 📲


 हळदीमुळे अन्नाला रूची तर येतेच, पण हळद हि आमदोष पचवण्याकरता मदत करते, आव होणे, जुलाब, याकरता हळद गुणकारि आहे. जंतावर ते एक प्रभावि औषध आहे. ः। रोज सकाळि १/२ चमचा हळद व १/२ चमचा वावडिंग हे मिश्रण मधासोबत घेतले तर, आणि शेवटि एंरडेल तेलाचा एनिमा घेतला तर संपूर्ण जंत निघून जातात.

           🌾. अति रक्तस्राव होतो जेव्हा जखमेतून.,,हळद,, दाबून ठेवलि तर बंद होतो. संसर्ग न होता जखम पूर्ण बरि होते. डोळे येतात, तेव्हा हळदिच्या पाण्याने धुवावे. डोळ्यांचि आग, लालसरपणा, सूज, डोळ्यातून येणारा स्राव बंद होतो. 

      शरिराच्या कुठल्याहि भागाला जर मूका मार लागला, पाय ,हात लचकला, तर हळकुंड व आंबेहळद उगाळून लेप लावावा.


🌾.. चेहर्यावर पिंपल, पुरळ, काळे डाग येत असल्यास, हळद व चंदन उगाळून लेप लावावा. भारतिय संस्क्रुतीत लग्नाच्या आधि वर वधुच्या अंगाला हळद लावण्याचा प्रघात आहे. म्हणून ऐरविसुद्धा साबण न वापरता। हळद+साय+ दहि+ मसूरिच्या डाळीचे पिठ या मिश्रणाने स्नान करावे कायम.


🌾 रोज रात्रि झोपण्यापूर्वि हळद गरम पाण्यातून घेतल्यास चरबि कमि होते., खोकला असतांना, कफ पडत नसेल तर, झोपण्यापूर्वि हळकुंडाचा तुकडा भाजून घेउन, चावून रस गिळावा. आराम होतो.. स्रियांच्या डिलिव्हरिनंतर, गर्भाशय संकुचित होण्याकरता, गर्भाशयाचि ताकद वाढवण्याकरता, जंतु संसर्ग होउ नये यासाठी, बाळंतिणिच्या आहारात हळद समाविष्ट करतात.


🌾ः कानांतून पाणि जात असेल तर, हळद. वावडिंग, वेखंड याची धुरि देतात., अग्निमांद्य, झाल्यास, ओलि हळद, आले, लिंबूरस, व सैंधव मीठ, याचे लोणचे उपयुक्त आहे.. मधुमेहि रूग्णांनि १/२ चमचा हळद, आवळयाचा रस, व मधासोबत घेतल्यास शुगर नियंत्रित राहते.


🌾.. तसेच पाव चमचा हळद, पाव चमचा दालचिनिचे चूर्ण, हापण उपचार आहे मधुमेहावर. वारंवार आवाज बसणे, घसा बसणे, कफाचि सर्दि यावर हळद+दूध कोमट करून पिणे.. हळद भूक वाढवते, पोटातला अग्नि प्रज्वलित करते.. हळदीत,,करक्युमिन,, रसायन असते जे कँसर रोगावर काम करते पेशिंचि वाढ बंद करते.

     गुडघेदुखि बंद करते. , संधिवाताकरता खुप गुणकारि आहे..

         🌾🌾🌾🌾


   सुनिता सहस्रबुद्धे..... 






कृषक कल्याणकारी संस्था,अलिबाग, वृक्षारोपण कार्यक्रम






महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी

 महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी


- अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण


            नवी दिल्ली,5 जुलै : महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रिया सध्या मर्यादित आहे. या प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केली.


            केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने येथील वाणिज्य भवनात राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.


            केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि अश्विनीकुमार चौबे, विभागाचे सचिव तसेच विविध राज्यांचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री यावेळी उपस्थित होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव विजय वाघमारे, उपसचिव अतुल सुपे यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, धानाची शेती जिथे केली जाते तिथल्या ठराविक लोकांनाच धान खरेदीची परवानगी मिळत असल्याने ही प्रक्रिया मर्यादित आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नाही. या प्रक्रियेची व्याप्ती वाढवून ग्रामपंचायत, बचत गट, अन्न प्रक्रिया संस्थांना धान खरेदीची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. ही परवानगी देत असताना त्यांच्याकडून जमा रक्कम घ्यावी किंवा बँकेकडून हमी घेण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी केल्या.


            धान खरेदी करताना 0.5 टक्के घट येत असते ही घट वाढवून 1 टक्का करण्यात यावी, अशीही मागणी मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी केली. यावर केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांनी याबाबत योग्य विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.


            या परिषदेत शुगर-इथेनॉल पोर्टलचा श्री. गोयल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. परिषदेत खरीप विपणन हंगाम (KMS) 2023-24 दरम्यान भरडधान्य खरेदीसाठी कृती आराखडा विकसित करणे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (PMGKAY) प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार आणि त्याचे बळकटीकरण करणे, अन्न आणि पोषणमूल्य सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करणे यावरही चर्चा झाली. ज्या राज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने अंमलबजावणी केली आहे त्यांनी यावेळी सादरीकरण केले.


            यावेळी स्मार्ट पद्धतीने सार्वजनिक वितरण (SMART-PDS) ची अंमलबजावणी, पुरवठा साखळी उत्तम करणे, खरेदी केंद्रांचे मानकीकरण आणि रास्त भाव दुकानांचे (FPSs) परिवर्तन यावर ही चर्चा झाली.


देशातील अन्न आणि पोषणमूल्य सुरक्षा परिसंस्थेतील परिवर्तन साध्य करणे आणि 2023-24 करता पथदर्शक आराखडा तयार करण्यासाठी आव्हाने आणि संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली.


००००

रेल्वेप्रवासी महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात

 रेल्वेप्रवासी महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात


- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे


          मुंबई, दि. 5 :- महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे. अनुचित घटना होऊ नयेत म्हणून अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.


            ‘रेल्वेमधील प्रवासी महिलांची सुरक्षा’ या विषयाच्या अनुषंगाने आज विधान भवनातील सभा कक्षात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी या बैठकीत मागील बैठकांमध्ये दिलेल्या निर्देशावर कोणती अंमलबजावणी झाली याची माहिती घेतली. त्याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले. रेल्वेत क्यूआर कोड सिस्ट‍िम असावी. सुरक्षा रक्षकाची असलेली कमतरता पूर्ण करणेबाबत पाठपुरावा करावा, निर्भया निधी रेल्वे पोलिसांना उपलब्ध करावा. गर्दुले लोकांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, सामाजिक संस्थाच्या प्रश्नांबाबत काय अंमलबजावणी केली त्याचा अहवाल तयार करावा, दक्षता समिती महिला व महिला सुरक्षा कर्मचारी यांचे व्हॉटस् अप ग्रुप करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.


            विशिष्ट वेळेनुसार स्वयंसेवी प्रवासी महिलांचे व्हॉटस् अप ग्रुप करावेत, दक्षता समिती सदस्याच्या लोकेशनबाबत डॅशबोर्ड तयार करावेत, मनोधैर्य योजनेचे प्रस्ताव तयार करावे, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष रेल्वे स्थानकावर करावेत. महिलांच्या डब्यामध्ये ऑटोमॅटिक सेनेटरी नॅपकीन मशीन आणि चेंजिंग रूम असावी. रेल्वे स्टेशन व रेल्वेतील सीसी टीव्हीचे ऑनलाईन सनियंत्रण करावे, असेही निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी दिले.


             महिला प्रतिनिधींनी डार्क स्पॉट्स आणि सिग्नलला अपघात घडतात, त्याबाबत सूचना केल्या. त्याबाबत मदत करावी, तसेच एस्केलेटर चढत असताना साध्या पायऱ्या विनाआधार असतील, त्या दुरुस्त कराव्यात. याकडे संबंधीत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या संपूर्ण प्रश्नाबाबत केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही सविस्तर पत्र पाठविले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.


            रेल्वे पोलिसांशी संबंधित प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी तातडीने सहकार्य करावे, असे निर्देश गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंह यांना दिले. तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशाही सूचना पोलीस व रेल्वे प्रशासन यांना दिल्या.


            तसेच रेल्वे प्रवाशांना फटका मारून दुखापत व लूट करणाऱ्या फटका गॅगवर नियंत्रण आणल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी रेल्वे पोलीसांचे अभिनंदनही केले.


            या बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक रेल्वे सुरक्षा डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलीस आयुक्त (रेल्वे) डॉ शिसवे, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे श्री. शुक्ला, विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते. तसेच महिला दक्षता समितीच्या रेणुका साळुंखे, अरुणा हळदणकर, लीला पटोडे, आशा गायकवाड, प्रतिका वायदंडे यावेळी उपस्थित होत्या.


****


संध्या गरवारे/विसंअ/

Featured post

Lakshvedhi