Thursday, 6 July 2023

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता

 शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. 5 : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


            शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास व या कार्यालयासाठी 13 जून 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील मान्यतेनुसार सहा पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. ही पदे सध्याच्या त्या-त्या संवर्गाचा एक भाग राहतील. यामध्ये एक अपर जिल्हाधिकारी, एक नायब तहसीलदार, एक लघुलेखक, एक अव्वल कारकून, दोन लिपिक- टंकलेखक, अशी पदे असणार आहेत. अहमदनगर अपर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रात नेवासा, शेवगाव, पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड असे आठ तालुके राहतील. अपर जिल्हाधिकारी, शिर्डी, यांच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, राहुरी असे एकूण सहा तालुके राहतील.


            अहमदनगर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर तसेच अपर जिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी यांच्या कार्यक्षेत्रातील तालुके, त्याअंतर्गत महसूल मंडळे, तलाठी साजे व त्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गावांची यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्यास्तरावर करण्यात यावी.अपर जिल्हाधिकारी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, अहमदनगर आणि नियंत्रक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक हे काम पाहतील.


००००

हळद*..एक गुणकारि औषध...

 *हळद*..एक गुणकारि औषध...


 माहिती आवडली तर नक्की शेअर करा 📲


 हळदीमुळे अन्नाला रूची तर येतेच, पण हळद हि आमदोष पचवण्याकरता मदत करते, आव होणे, जुलाब, याकरता हळद गुणकारि आहे. जंतावर ते एक प्रभावि औषध आहे. ः। रोज सकाळि १/२ चमचा हळद व १/२ चमचा वावडिंग हे मिश्रण मधासोबत घेतले तर, आणि शेवटि एंरडेल तेलाचा एनिमा घेतला तर संपूर्ण जंत निघून जातात.

           🌾. अति रक्तस्राव होतो जेव्हा जखमेतून.,,हळद,, दाबून ठेवलि तर बंद होतो. संसर्ग न होता जखम पूर्ण बरि होते. डोळे येतात, तेव्हा हळदिच्या पाण्याने धुवावे. डोळ्यांचि आग, लालसरपणा, सूज, डोळ्यातून येणारा स्राव बंद होतो. 

      शरिराच्या कुठल्याहि भागाला जर मूका मार लागला, पाय ,हात लचकला, तर हळकुंड व आंबेहळद उगाळून लेप लावावा.


🌾.. चेहर्यावर पिंपल, पुरळ, काळे डाग येत असल्यास, हळद व चंदन उगाळून लेप लावावा. भारतिय संस्क्रुतीत लग्नाच्या आधि वर वधुच्या अंगाला हळद लावण्याचा प्रघात आहे. म्हणून ऐरविसुद्धा साबण न वापरता। हळद+साय+ दहि+ मसूरिच्या डाळीचे पिठ या मिश्रणाने स्नान करावे कायम.


🌾 रोज रात्रि झोपण्यापूर्वि हळद गरम पाण्यातून घेतल्यास चरबि कमि होते., खोकला असतांना, कफ पडत नसेल तर, झोपण्यापूर्वि हळकुंडाचा तुकडा भाजून घेउन, चावून रस गिळावा. आराम होतो.. स्रियांच्या डिलिव्हरिनंतर, गर्भाशय संकुचित होण्याकरता, गर्भाशयाचि ताकद वाढवण्याकरता, जंतु संसर्ग होउ नये यासाठी, बाळंतिणिच्या आहारात हळद समाविष्ट करतात.


🌾ः कानांतून पाणि जात असेल तर, हळद. वावडिंग, वेखंड याची धुरि देतात., अग्निमांद्य, झाल्यास, ओलि हळद, आले, लिंबूरस, व सैंधव मीठ, याचे लोणचे उपयुक्त आहे.. मधुमेहि रूग्णांनि १/२ चमचा हळद, आवळयाचा रस, व मधासोबत घेतल्यास शुगर नियंत्रित राहते.


🌾.. तसेच पाव चमचा हळद, पाव चमचा दालचिनिचे चूर्ण, हापण उपचार आहे मधुमेहावर. वारंवार आवाज बसणे, घसा बसणे, कफाचि सर्दि यावर हळद+दूध कोमट करून पिणे.. हळद भूक वाढवते, पोटातला अग्नि प्रज्वलित करते.. हळदीत,,करक्युमिन,, रसायन असते जे कँसर रोगावर काम करते पेशिंचि वाढ बंद करते.

     गुडघेदुखि बंद करते. , संधिवाताकरता खुप गुणकारि आहे..

         🌾🌾🌾🌾


   सुनिता सहस्रबुद्धे..... 






कृषक कल्याणकारी संस्था,अलिबाग, वृक्षारोपण कार्यक्रम






महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी

 महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी


- अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण


            नवी दिल्ली,5 जुलै : महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रिया सध्या मर्यादित आहे. या प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केली.


            केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने येथील वाणिज्य भवनात राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.


            केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि अश्विनीकुमार चौबे, विभागाचे सचिव तसेच विविध राज्यांचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री यावेळी उपस्थित होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव विजय वाघमारे, उपसचिव अतुल सुपे यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, धानाची शेती जिथे केली जाते तिथल्या ठराविक लोकांनाच धान खरेदीची परवानगी मिळत असल्याने ही प्रक्रिया मर्यादित आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नाही. या प्रक्रियेची व्याप्ती वाढवून ग्रामपंचायत, बचत गट, अन्न प्रक्रिया संस्थांना धान खरेदीची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. ही परवानगी देत असताना त्यांच्याकडून जमा रक्कम घ्यावी किंवा बँकेकडून हमी घेण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी केल्या.


            धान खरेदी करताना 0.5 टक्के घट येत असते ही घट वाढवून 1 टक्का करण्यात यावी, अशीही मागणी मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी केली. यावर केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांनी याबाबत योग्य विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.


            या परिषदेत शुगर-इथेनॉल पोर्टलचा श्री. गोयल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. परिषदेत खरीप विपणन हंगाम (KMS) 2023-24 दरम्यान भरडधान्य खरेदीसाठी कृती आराखडा विकसित करणे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (PMGKAY) प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार आणि त्याचे बळकटीकरण करणे, अन्न आणि पोषणमूल्य सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करणे यावरही चर्चा झाली. ज्या राज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने अंमलबजावणी केली आहे त्यांनी यावेळी सादरीकरण केले.


            यावेळी स्मार्ट पद्धतीने सार्वजनिक वितरण (SMART-PDS) ची अंमलबजावणी, पुरवठा साखळी उत्तम करणे, खरेदी केंद्रांचे मानकीकरण आणि रास्त भाव दुकानांचे (FPSs) परिवर्तन यावर ही चर्चा झाली.


देशातील अन्न आणि पोषणमूल्य सुरक्षा परिसंस्थेतील परिवर्तन साध्य करणे आणि 2023-24 करता पथदर्शक आराखडा तयार करण्यासाठी आव्हाने आणि संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली.


००००

रेल्वेप्रवासी महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात

 रेल्वेप्रवासी महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात


- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे


          मुंबई, दि. 5 :- महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे. अनुचित घटना होऊ नयेत म्हणून अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.


            ‘रेल्वेमधील प्रवासी महिलांची सुरक्षा’ या विषयाच्या अनुषंगाने आज विधान भवनातील सभा कक्षात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी या बैठकीत मागील बैठकांमध्ये दिलेल्या निर्देशावर कोणती अंमलबजावणी झाली याची माहिती घेतली. त्याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले. रेल्वेत क्यूआर कोड सिस्ट‍िम असावी. सुरक्षा रक्षकाची असलेली कमतरता पूर्ण करणेबाबत पाठपुरावा करावा, निर्भया निधी रेल्वे पोलिसांना उपलब्ध करावा. गर्दुले लोकांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, सामाजिक संस्थाच्या प्रश्नांबाबत काय अंमलबजावणी केली त्याचा अहवाल तयार करावा, दक्षता समिती महिला व महिला सुरक्षा कर्मचारी यांचे व्हॉटस् अप ग्रुप करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.


            विशिष्ट वेळेनुसार स्वयंसेवी प्रवासी महिलांचे व्हॉटस् अप ग्रुप करावेत, दक्षता समिती सदस्याच्या लोकेशनबाबत डॅशबोर्ड तयार करावेत, मनोधैर्य योजनेचे प्रस्ताव तयार करावे, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष रेल्वे स्थानकावर करावेत. महिलांच्या डब्यामध्ये ऑटोमॅटिक सेनेटरी नॅपकीन मशीन आणि चेंजिंग रूम असावी. रेल्वे स्टेशन व रेल्वेतील सीसी टीव्हीचे ऑनलाईन सनियंत्रण करावे, असेही निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी दिले.


             महिला प्रतिनिधींनी डार्क स्पॉट्स आणि सिग्नलला अपघात घडतात, त्याबाबत सूचना केल्या. त्याबाबत मदत करावी, तसेच एस्केलेटर चढत असताना साध्या पायऱ्या विनाआधार असतील, त्या दुरुस्त कराव्यात. याकडे संबंधीत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या संपूर्ण प्रश्नाबाबत केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही सविस्तर पत्र पाठविले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.


            रेल्वे पोलिसांशी संबंधित प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी तातडीने सहकार्य करावे, असे निर्देश गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंह यांना दिले. तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशाही सूचना पोलीस व रेल्वे प्रशासन यांना दिल्या.


            तसेच रेल्वे प्रवाशांना फटका मारून दुखापत व लूट करणाऱ्या फटका गॅगवर नियंत्रण आणल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी रेल्वे पोलीसांचे अभिनंदनही केले.


            या बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक रेल्वे सुरक्षा डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलीस आयुक्त (रेल्वे) डॉ शिसवे, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे श्री. शुक्ला, विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते. तसेच महिला दक्षता समितीच्या रेणुका साळुंखे, अरुणा हळदणकर, लीला पटोडे, आशा गायकवाड, प्रतिका वायदंडे यावेळी उपस्थित होत्या.


****


संध्या गरवारे/विसंअ/

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन* ■■■■■

 शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन*

■■■■■■■■■■■■■■■■■■■

1. नारळ पाणी -दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये.


2. भाज्यांचा रस - आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे सेवन करावे. विशेषतः हिरव्या पालेभाज्यांचा यामध्ये समावेश करावा. पालक, पुदीना यांसारख्या हिरव्या पाल्यांचा ज्यूस प्यायल्यास थकवा जाणवत नाही.

3. गोजी बेरी -गोजी बेरी फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अ‍ॅ न्टीऑक्सिडेंट्स आणि 8 प्रकारचे अमिनो अॅसिड असतात

नियमित स्वरुपात गोजी बेरीच्या एका ग्लासाचे सेवन केल्यास थकवा आणि तणाव दूर होण्यास मदत मिळते.

4. लिंबू पाणी - सकाळी तुम्ही लिंबू पाणी पित असाल, तर तुमचे संपूर्ण शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅ न्टीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असल्यानं शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मिळते.

5. ग्रीन टी -ग्रीन टीच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ग्रीन टीमुळे शरीरातील मेटाबॉलिझम चा स्तर वाढण्यास मदत होते आणि फॅट्सही बर्न होतात.

6. कोरफडीचा ज्यूस - सकाळच्या वेळेत कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. कोरफडीच्या गरामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समप्रमाणात राहण्यात मदत होते. यातील अ‍ॅ न्टी इन्फ्लेमेटरी तत्वामुळे वेदना, तणाव आणि थकवा दूर होतात.

7. आवळ्याचा ज्यूस - आवळ्याच्या ज्यूस प्यायल्याने संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. यामुळे मेटाबॉलिक रेटदेखील वाढतो आणि संपूर्ण दिवस ताजेतवाने राहता. सोबत रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺




*(

आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मानसाठी8 जुलै 2023 पर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात

 आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मानसाठी8 जुलै 2023 पर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात


          नवी दिल्ली 5 : योगविषयक जनजागृतीमध्ये प्रसारमाध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी विचारात घेऊन, आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान (AYDMS) 2023 साठी प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.


            माध्यम संस्था 8 जुलै 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान , 2023 साठी त्यांच्या प्रवेशिका आणि आशय सामग्री aydms2023.mib@gmail.com या लिंक वर पाठवू शकतील. मार्गदर्शक तत्त्वांनुसार मीडिया हाऊसेस 10 जून 2023 ते 25 जून 2023 या कालावधीत तयार केलेल्या आणि प्रकाशित केलेल्या किंवा दृकश्राव्य/दृश्य सामग्रीचे प्रसारण/प्रसारण केलेल्या लेखाच्या संबंधित क्लिपिंगसह विहित नमुन्यात तपशील सादर करणे आवश्यक आहे.


            माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने द्वितीय वर्षाच्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान’ पुरस्कारांबाबत घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान 2023 अंतर्गत, मुद्रित, दूरचित्रवाणी आणि रेडिओ अशा तीन वर्गवारीत 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 33 पुरस्कार प्रदान केले जातील. यामध्ये ''वृत्तपत्रांमध्ये योगाभ्यासाच्या सर्वोत्कृष्ट प्रसिद्धीसाठी'' 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील. "इलेक्ट्रॉनिक मीडिया (दूरचित्रवाणी ) मधून योगाभ्यासाच्या सर्वोत्तम प्रसिद्धीसाठी 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील. "इलेक्ट्रॉनिक मीडिया (रेडिओ) द्वारे योगाभ्यासाच्या सर्वोत्कृष्ट प्रसिद्धीसाठी 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील.


पुरस्काराचे स्वरुप


            या पुरस्काराच्या सन्मानाची शिफारस स्वतंत्र ज्युरीद्वारा करण्यात येईल. सन्मानामध्ये एक विशेष माध्यम/प्लेक/ ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्राचा समावेश असेल.


आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यमसन्मानाबद्दल


            भारत आणि परदेशात योगाभ्यासाचा प्रसार करण्यासाठी माध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी ओळखून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जून, 2019 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मानची (एआयडीएमएस ) स्थापना केली होती. पहिले पुरस्कार 7 जानेवारी 2020 रोजी प्रदान करण्यात आले आणि त्यानंतर कोविड 19 महामारीमुळे विलंब झाला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे सन्मान पुनरुज्जीवित करण्याचा आणि 2023 मध्ये दुसरी आवृत्ती आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.


            प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या https://pib.gov.in/indexd.aspx तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या https://mib.gov.in/ या संकेतस्थळांवर या विषयीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

Featured post

Lakshvedhi