सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 4 July 2023
खास महिलांसाठी सुंदर व उपयुक्त संदेश* 👌👌
*खास महिलांसाठी सुंदर व उपयुक्त संदेश* 👌👌
*'Healthy WOMEN'.......*
वाढत जाणारे वजन, दुखणारे गुडघे, पित्ताचा त्रास, कंबरदुखी, पाळीचा त्रास, कमी हिमोग्लोबिन, दम लागणे, टाचा प्रचंड दुखणे, रात्री झोप न येणे, अनामिक दडपण जाणवणे, केस गळणे, भेगा पडणे, त्वचा कोरडी कोरडी होत जाणे अशा असंख्य तक्रारी शरीरात मुक्कामी येऊ लागतात.
या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते पण खरंच यासाठी वेळ कुठून आणायचा? हाच यक्षप्रश्न सुटत नसतो.
या सगळ्या *fire fighting lifestyle* मध्ये जर आपलं निरोगीपण टिकलं तर आणि तरच या *अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त* मिळून *Super woman* होता येईल!
*Energy boosting:*
पाव किलो खारीक पावडर, पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी *cerelac* तयार करता येईल.
दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही *energy level maintain* ठेवता येईल.
बस्स पांच मिनिटवाला नाश्ता with देशी अंदाज:
नाश्ता *compulsory* प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात, तुपसाखर पोळी, लोणी-साखर पोळी, राजगिरा लाही व दुध, लाह्यांचे पीठ व ताक, नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी, पुलाव, थालीपीठ, उपमा, शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.
*ओट्स, कॉर्नफ्लेक्स, packed juices, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी* यांना ठामपणे *"NO"* म्हणायचे.
किचन क्लिनिक:
फोडणी करतांना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून *हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास* दूर सरतील.
एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू हे *combination* आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे *anaemia ला bye bye*
ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की *पचनाच्या तक्रारी चक्क गायब.*
कणकेत चिमूटभर चुना add करून, कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापरून *हाडांना strong* ठेवता येईल.
*Fitness मंत्र :
सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठी देऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास. दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून *टाचदुखी ला कायमचा निरोप* देऊया.
==============
सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मित्र-मैत्रिणी शोधून खूप हसूया.
आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना, मनाच्या खॊल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढूया. स्वतःची ओळख घडवून आणत, निरामयतेच्या वाटेने जाता जाता *"फिरुनी नवे जन्मेन मी"* हे promise स्वतःशीच करूया !
...🙏🙏🙏
_*(
सतेचा सारीपाट
सतेच्या सारीपाट साठी सगळेच खेळत असतात, कंसा मामा,नारायण, अताचे काका पुतणे घरोघरी आहेत.विजयी कोण होते हे नियती चे फासे ठरवते.
जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी स्थानिक सुट्टया केल्या जाहीर*
वृत्त क्र.517 दि.03 जुलै 2023
*जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी स्थानिक सुट्टया केल्या जाहीर*
अलिबाग,दि.03(जिमाका) :- रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व कार्यालयांकरिता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार दि.1 मार्च 2023 च्या अधिसूचनेद्वारे 3 स्थानिक सुट्टयापैकी 1 स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने या अधिसूचनेद्वारे सन-2023 या वर्षाकरिता बुधवार, दि.30 ऑगस्ट 2023, नारळी पोर्णिमा/रक्षाबंधन व गुरुवार, दि.7 सप्टेंबर 2023 रोजी गोपाळकाला या 2 स्थानिक सुट्टया जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जाहीर केल्या आहेत.
००००००००
Monday, 3 July 2023
राज्यात 80 फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित
राज्यात 80 फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित
विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री
राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. 3 : राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागांमध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे; अशा तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज विधानभवनाच्या प्रांगणात प्रातिनिधिक स्वरुपात पाच फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील, आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
श्री.विखे पाटील म्हणाले की, हे फिरत्या पशुवैद्यकीय पथक जीपीएस ॲक्टिव्हेटेड असून राज्यातील दीड कोटी पशुधन जपण्यासाठी हे महत्वाचे पाऊल राज्य शासनामार्फत उचलण्यात आले आहे. एका फिरते पशुवैद्यकीय पथकासाठी साधारणपणे १४ लाख ३५ हजार खर्च येत असून एकूण ८० फिरते पशुवैद्यकीय पथके राज्यात कार्यान्वित होत आहेत. पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १९६२ टोल फ्री क्रमांकावर येणाऱ्या राज्यस्तरावर स्थापीत कॉल सेंटरद्वारे पशुपालकांच्या फोन कॉल प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व व गर्भधारणा तपासणी इत्यादी प्रकारच्या पशु आरोग्य सेवा पशुवैद्यकीय संस्थामार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. तथापि पशुधन आजारी पडल्यास या पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेवून जावे लागते, पशुरुग्ण जर चालण्यास सक्षम नसेल तर पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते. बहुतांश पशुपालकांना हा अधिक भार परवडणारा नसल्यामुळे या अभावी मृत्यु होवून पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. राज्यातील पशुधनाची क्षमता वाढवण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे व त्याकरीता उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे असून हे पथक महत्वाची भूमिका बजावणार आहे.
फिरते पशुवैद्यकीय पथक चालविणेसाठी राज्यस्तरीय कॉल सेंटर, बाह्यस्रोताद्वारे मनुष्यबळ निर्मिती, वाहनासाठी इंधन व दुरुस्ती तसेच औषधे व शल्य चिकित्सेसाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करणे यासाठी केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के अर्थसहाय्य वाटा निश्चित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत इंडसइंड बँकेची उपकंपनी भारत फायनांशियल इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालय मध्यवर्ती कॉल सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. १९६२ हा टोल फ्री क्रमांक असून मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेमधून आवश्यक पशुवैद्यकीय सेवा मिळणार आहे. केंद्र शासनाच्या पशुस्वास्थ व रोग नियंत्रण या योजनेच्या मार्गदर्शक सूचना नुसार राज्यातील प्रत्येकी एक लक्ष पशुधनास एक फिरते पशुवैद्यकीय पथक या प्रमाणे एकूण ३२९ फिरत्या पशुवैद्यकीय पथकांची निर्मिती करावयाची असून प्रथम टप्यामध्ये केंद्र शासनाकडून ८० फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यासाठी रक्कम रु. १२८० लक्ष १००% केंद्र निधी अनावर्ती खर्चासाठी (चारचाकी वाहन व अनुषंगिक साधनसामग्री व यंत्रसामग्री) प्राप्त झालेला आहे. यामध्ये प्रामुख्याने रोग निदान, औषधोपचार, लसीकरण, शल्यचिकित्सा तसेच दृकश्राव्य माध्यमांद्वारे विस्तार विषयक सेवा पशुपालकांपर्यंत पुरविणे या बाबींचा समावेश होतो.
००००
गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवे
*‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर परिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर काय उपाययोजना करायची ते..…*
पावसाळा सुरु झाला की या या हंगामात बाहेर पडतात ते किडे. यात सगळ्यात भयानक किडा म्हणजे गोम. याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही. गोम चावल्यावर किंवा कानात घुसल्यावर काय करायला हवे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरतील.
*काय करावे गोम कानात घुसल्यावर किंवा चावली तर-*
गोम ही सापासारखी विषारी मानली जाते. गोम सापासारखीच चावल्यानंतर शरीरात विष सोडते व ते माणसाच्या जीवावर बेतू शकते. गोम चावल्यावर माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि खूप वेदनाही होतात. हे ऐकून तुम्हाला खूप नवल वाटेल कि गोम चावणे म्हणजे जीवघेणे नाही. पण अत्यंत वेदनादायक मात्र नक्कीच आहे. कधीतरी या वेदना असह्य होऊ शकतात.
असेही पाहिले जाते कि गोम चावण्याच्या व्यतिरिक्त कानात घुसते. आणि असे कानात घुसणे खूप भयानक आणि धोकादायक आहे. हा प्राणी अंधारात राहतो आणि म्हणूनच तो कानात घुसतो. पावसात गोम खूप पाहायला मिळतात. कानात घुसणे खूप त्रासदायक असते. तसेच गोम कानातही चिकटते आणि तिला नंतर बाहेर काढणे खूप कठीण होऊन बसते.
गोम चावल्यानंतर तिचे विष संपूर्ण शरीरात पसरते यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. जर तुमच्या कानात गोम गेली तर पाण्यात सैंधव मीठ घालून कानात घालावे म्हणजे कानाच्या बाहेर येते व गोम मरते. याशिवाय जर गोम शरीरात चिकटली तर तिच्या तोंडावर साखर घाला म्हणजे ती शरीर सोडून देईल. हळद व सैंधव मिठाचे मिश्रण गायीच्या तुपात मिसळून कानात लावल्याने सुद्धा फायदा होईल. याने गोमीचे विष कमी होईल.
जर का तुमच्या आजूबाजूला किंवा घरात कोणाच्या कानात गोम घुसली किंवा कोणाला गोम जर का चावली. तर या सगळ्या उपायांनी नक्कीच फायदा होऊ शकतो. हे उपाय नक्की करून पहा आणि इतरांना ही सांगा.
जर माणसाला गोम चावली तर ते नक्कीच प्राणघा’तक नाही. योग्य उपाय वेळीच केल्यास नक्कीच माणूस त्यातून वाचू शकतो. पण जर का योग्य उपाय वेळेत नाही झाले. तर मात्र ते जीवावर बेतू शकते.
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षणप्रशिक्षण कार्यक्रम’ लढण्याचे बळ देणारा
‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षणप्रशिक्षण कार्यक्रम’ लढण्याचे बळ देणारा
- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 3 : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवीत आहे. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे, लढण्याचे प्रशिक्षण या उपक्रमातून दिले जाणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू होत आहे. या कार्यक्रमाचा प्रातिनिधिक स्वरूपात मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त राहुल मोरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड, अभिनेत्री अदा शर्मा, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या सदस्य ॲड. लीना चव्हाण, मंजुळा नायर, मिशन साहसी संघटनेचे रोहित ठाकूर, मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी. विद्यापीठाच्या 200 विद्यार्थिनी देखील उपस्थित होत्या.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महिलांवर होणारे अत्याचार आणि हल्ले याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्व-संरक्षणाचे धडे देण्यासाठी हा उपक्रम खूप महत्वाचा आहे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची आणि लढण्याची ताकद या उपक्रमातून शिकता येणार आहे. याचा राज्यातील शाळकरी व महाविद्यालयीन युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
स्व-संरक्षणाच्या प्रशिक्षणातून युवतींचा आत्मविश्वास वाढेल : डॉ.अनुपकुमार यादव
महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वे राज्याभिषेक वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार युवतींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बाल विकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने आजपासून 15 जुलै दरम्यान प्रत्येकी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.युवतींचे मनोबल उंचाविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र ठेवलेले आहे. तसेच ‘तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके’ या विषयावर सायबर सेल तज्ञ अधिकारी मार्गदर्शन तसेच स्व-संरक्षणाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
यावेळी भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या सदस्य ॲड.लीना चव्हाण यांनी काळाची गरज लक्षात घेता महिलांनी देखील अडचणींना सामोरे जाण्यासाठी स्व-संरक्षण धडे घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. अभिनेत्री अदा शर्मा यांनी सध्या महिलांसमोरील वाढलेली आव्हाने पाहता अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
**
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...