Monday, 3 July 2023

गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवे

 *‘गोम’ चावल्यास हे घरघुती उपाय प्रत्येकालाच माहित हवेत, उपाय केले नाही तर होतील गंभीर परिणाम, पहा तुमच्या ‘कानात’ गोम गेली तर काय उपाययोजना करायची ते..…*


   पावसाळा सुरु झाला की या या हंगामात बाहेर पडतात ते किडे. यात सगळ्यात भयानक किडा म्हणजे गोम. याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही. गोम चावल्यावर किंवा कानात घुसल्यावर काय करायला हवे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरतील.


 *काय करावे गोम कानात घुसल्यावर किंवा चावली तर-* 

         गोम ही सापासारखी विषारी मानली जाते. गोम सापासारखीच चावल्यानंतर शरीरात विष सोडते व ते माणसाच्या जीवावर बेतू शकते. गोम चावल्यावर माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि खूप वेदनाही होतात. हे ऐकून तुम्हाला खूप नवल वाटेल कि गोम चावणे म्हणजे जीवघेणे नाही. पण अत्यंत वेदनादायक मात्र नक्कीच आहे. कधीतरी या वेदना असह्य होऊ शकतात.

        असेही पाहिले जाते कि गोम चावण्याच्या व्यतिरिक्त कानात घुसते. आणि असे कानात घुसणे खूप भयानक आणि धोकादायक आहे. हा प्राणी अंधारात राहतो आणि म्हणूनच तो कानात घुसतो. पावसात गोम खूप पाहायला मिळतात. कानात घुसणे खूप त्रासदायक असते. तसेच गोम कानातही चिकटते आणि तिला नंतर बाहेर काढणे खूप कठीण होऊन बसते.

         गोम चावल्यानंतर तिचे विष संपूर्ण शरीरात पसरते यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. जर तुमच्या कानात गोम गेली तर पाण्यात सैंधव मीठ घालून कानात घालावे म्हणजे कानाच्या बाहेर येते व गोम मरते. याशिवाय जर गोम शरीरात चिकटली तर तिच्या तोंडावर साखर घाला म्हणजे ती शरीर सोडून देईल. हळद व सैंधव मिठाचे मिश्रण गायीच्या तुपात मिसळून कानात लावल्याने सुद्धा फायदा होईल. याने गोमीचे विष कमी होईल.

         जर का तुमच्या आजूबाजूला किंवा घरात कोणाच्या कानात गोम घुसली किंवा कोणाला गोम जर का चावली. तर या सगळ्या उपायांनी नक्कीच फायदा होऊ शकतो. हे उपाय नक्की करून पहा आणि इतरांना ही सांगा.

जर माणसाला गोम चावली तर ते नक्कीच प्राणघा’तक नाही. योग्य उपाय वेळीच केल्यास नक्कीच माणूस त्यातून वाचू शकतो. पण जर का योग्य उपाय वेळेत नाही झाले. तर मात्र ते जीवावर बेतू शकते.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षणप्रशिक्षण कार्यक्रम’ लढण्याचे बळ देणारा

 ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षणप्रशिक्षण कार्यक्रम’ लढण्याचे बळ देणारा


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


 


            मुंबई, दि. 3 : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवीत आहे. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे, लढण्याचे प्रशिक्षण या उपक्रमातून दिले जाणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


             ‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू होत आहे. या कार्यक्रमाचा प्रातिनिधिक स्वरूपात मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त राहुल मोरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड, अभिनेत्री अदा शर्मा, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या सदस्य ॲड. लीना चव्हाण, मंजुळा नायर, मिशन साहसी संघटनेचे रोहित ठाकूर, मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी. विद्यापीठाच्या 200 विद्यार्थिनी देखील उपस्थित होत्या.


                 मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महिलांवर होणारे अत्याचार आणि हल्ले याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्व-संरक्षणाचे धडे देण्यासाठी हा उपक्रम खूप महत्वाचा आहे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची आणि लढण्याची ताकद या उपक्रमातून शिकता येणार आहे. याचा राज्यातील शाळकरी व महाविद्यालयीन युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


            या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.


स्व-संरक्षणाच्या प्रशिक्षणातून युवतींचा आत्मविश्वास वाढेल : डॉ.अनुपकुमार यादव


            महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वे राज्याभिषेक वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार युवतींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बाल विकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने आजपासून 15 जुलै दरम्यान प्रत्येकी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.युवतींचे मनोबल उंचाविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र ठेवलेले आहे. तसेच ‘तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके’ या विषयावर सायबर सेल तज्ञ अधिकारी मार्गदर्शन तसेच स्व-संरक्षणाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.


            यावेळी भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या सदस्य ॲड.लीना चव्हाण यांनी काळाची गरज लक्षात घेता महिलांनी देखील अडचणींना सामोरे जाण्यासाठी स्व-संरक्षण धडे घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. अभिनेत्री अदा शर्मा यांनी सध्या महिलांसमोरील वाढलेली आव्हाने पाहता अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.


**

स्त्रीशिकली कि घर शिकते.

 स्त्री शिकली कि घर शिकते. स्त्री


आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यानंतर ती सक्षम असते. कोणत्याही अडचणीवर मात करायला तयार असते. त्यामुळे स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाली पाहिजे, या हेतूने भाजप - शिवसेना सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना स्वयंरोजगारासाठीच्या वस्तू मोफत देण्याचा निर्णय केला. महापालिकेचा वाटप कोटा वाढवला. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात या वस्तू वाटप करता आल्या, असे  प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

कांदिवली पूर्व विधानसभेत हनुमाननगर येथे महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कांडप मशीन वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार भातखळकर यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रचंड प्रमाणात या वस्तू वाटप करण्यात येत आहेत, हे केवळ शिंदे-फडणवीस सरकारमुळे शक्य झाले आहे. वस्तूच्या पाच टक्के रक्कम भरून लाभार्थ्यांना वस्तू देण्याचा निर्णय बदलून वस्तू पूर्णतः मोफत देण्याचा निर्णय घेतला. महिलांना आता या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. यातून त्यांच्या घराला काही ना काही हातभार लागणार आहे.  
महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण योजना अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थी महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

प्रेरणादायक व्यक्तित्व*

 *प्रेरणादायक व्यक्तित्व


*🙏

आदरणीय योगी आदित्यनाथ जी की बहन जो समस्त समाज के लिए एक मिसाल है। जहां हर पार्टी के नेता व घरवाले राजनीति में आ जाते हैं। हमारे पहाड़ में ऐसा नहीं है। योगी आदित्यनाथ जी की बहन शशि जी जो स्वयं अपना व अपने परिवार के लिए दिन रात मेहनत करती है उनका कहना है कि राजनीति में अगर हम भी आएंगे तो हम भी उन्हीं के तरह बन जाएंगे तो ये परिवारवाद हो जाएगा। हम नहीं चाहते और भाई (योगी आदित्यनाथ) का भी यही बोलना है कि अपना कमाओ और खाओ.... मेहनत करो।

*#आनन्द बल्लभ पांड़े*

जीवन सुदंर आहे....!!"*

 *" जीवन सुदंर आहे....!!"*

                                                                   वरील फोटो मध्ये बायको सोबत भाजीपाल्याची पिशवी खांद्यावर घेतलेली व्यक्ती आहे......मराठवाडा विभागीय आयुक्त श्री.सुनील केंद्रेकर (IAS) ८ जिल्हाधिकारी त्यांना रिपोर्ट करतात. ७०-८० तहसीलदार हाताखाली काम करतात, शिवाय २०-२५ प्रांत, शेकडो क्लास १ अधिकारी सलाम ठोकतात यांना...... या केंद्रेकर यांनी मनात आणलं तर दहा-बारा नोकर हाताखाली ठेवू शकतात, परंतु या माणसाकडे भयंकर साधेपणा आहे.... 

       स्टेटस नावाचं खूळ आणि इगो नावाची भ्रांत निघून गेली की उरते ती मानव ता ! अधिकारी म्हणून ''बघणाऱ्यांचा दृष्टीकोन आणि वागणाऱ्यांचा दृष्टिकोन'' या पलीकडले व्यक्तीमत्व असते ते समान्यांतले असामान्य ! सामान्य जीवनातला जगण्याचा अनुभव केवळ लेखन करून जमत नाही. अनुभव, अनुभूती घ्यावीच लागते ! 


"साहेब, आपण स्वेच्छा निवृत्ती घेताय.... हा आम्हांस न पटणारा निर्णय आहे. देशाला तुमची अजून खूप गरज आहे. असो....

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा....!!" 💐🙏


रक्तदान 🩸करण्याचे फायदे, आरोग्याच्या दृष्टीने ब्लड डोनेशन 💉 ठरते फायदेशीर कसे ते जाणून घ्या:*

 💁🏻‍♀️ *रक्तदान 🩸करण्याचे फायदे, आरोग्याच्या दृष्टीने ब्लड डोनेशन 💉 ठरते फायदेशीर कसे ते जाणून घ्या:*


एका ठराविक वयानंतर 👦🏻👨🏻 रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. अनेकदा *‘रक्तदान हे सर्वात मोठे दान’* असे सांगत रक्त डोनेट करण्यासाठी आवाहन ही करण्यात येते. अनेकांना रक्तदानाचे महत्त्व अजूनही कळत नाही. रक्त मिळाल्याने दुसऱ्याचा जीव वाचतोच, पण स्वतःच्या आरोग्यालाही रक्तदान केल्यामुळे फायदा 🥳 मिळतो. 


🩸 *Blood Donation* म्हणून इंग्रजीत याला अधिक ओळख आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून ते ६५ व्या वर्षापर्यंत रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार केवळ ३७ टक्के लोकच भारतात रक्तदान करतात. बऱ्याच लोकांना याबाबत फायद्यांची माहितीच नाही. रक्तदानाचा नक्की काय फायदा होतो ते घ्या जाणून. 


🔰 *वजन कमी करण्यास होते मदत*


तुमचे वजन जास्त वाढले असेल, तर रक्तदान 🩸 करण्याने यामध्ये फरक पडतो. अर्थात वजन कमी करणे हे *मुख्य नियमांमध्ये* बसत नाही. पण रक्तदान केल्याने वजन कमी करण्यासह सहनशक्ती ही वाढते. ब्लड सेल्सने अधिक उत्पादन होऊन आरोग्याला फायदा मिळतो.


🔰 *रोगप्रतिकारकशक्ती 💪🏻 वाढण्यास मिळतो फायदा*


पूर्ण शारीरिक आरोग्यासाठी रक्तदान फायदेशीर ठरते. रक्तदान केल्यानंतर रक्तातील प्लाज्मामध्ये ल्युकोसाईट्सची वृद्धी 📈 होते. ल्युकोसाईट्स आपल्या प्रतिकारशक्तीसाठी कार्यरत असतात. कोणत्याही गंभीर आजारांपासून 🛌🏻 वाचण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती योग्य असणे गरजेचे आहे. 


🔰 *हृदयरोगाचा 🫀 धोका होतो कमी*


नियमित रक्तदान केल्याने शरीरातील *Iron Level* नियंत्रित राहाते. रक्तातील लोहाचे प्रमाण अधिक असेल तर नसांना ब्लॉक करते आणि यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही. यामुळेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. तसंच हेमोक्रोमॅटोसिस आजारही होऊ शकतो. रक्तदान केल्याने हृदयापर्यंत रक्तप्रवाह योग्य राहून हृदयरोगाचा धोका राहात नाही. 


🔰 *कॅन्सरचा धोका कमी*


रक्तात लोह अधिक प्रमाणात झाल्यास रक्तदान हा लोह कमी करण्याचा चांगला पर्याय आहे. म्हणजेच रक्तात लोह अधिक प्रमाणात साठू नये म्हणून रक्तदान करावे. रक्तात लोह जमा झाल्यास, ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सरपासून लांब राहायचे असेल तर रक्तदान नियमित करावे.


🔰 *मानसिक आरोग्यासाठी ही फायदेशीर*


रक्तदानाचे शारीरिक अनेक फायदे आहेत, मात्र मानसिक फायदा ☺️ अधिक आहे. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा तुम्हाला एक वेगळीच सुखद अनुभूती ☺️ येते. आपल्या रक्तामुळे कोणाचे तरी प्राण वाचले आहेत ही भावनाच तुम्हाला आनंद देऊन जाते. हाच आनंद 🪄 तुमच्या मानसिक स्थितीला संतुलित राखण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आणि रक्तदान करून तुम्ही अधिक मानसिकदृष्ट्या सक्षम होता.


💁🏻‍♀️ *टीप -* रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला कोणतेही आजार असतील तर रक्तदान करू नका. तसंच डॉक्टरांकडून पूर्ण माहिती घेतल्यानंतरच रक्तदान करा.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे

 शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे काही लोकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, सतत थकवा जाणवतो. अशा आणि विविध समस्या तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे. मात्र, रक्त वाढविण्यासाठी उपाय केले पाहिजेत. त्याच्यावर आधारित काही टीप्स...शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.

एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमी प्यावा.

सफरचंदाच्या ज्युसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. कारण या मिश्रणात लोहचे प्रमाण जास्त असते. किंवा नियमित बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावाचहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.

 दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळआची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

तसेत दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या.

मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.

 टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.

या सर्व घरगुती टीप्सचा वापर केल्यास तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल आणि तुम्ही निरोगी आणि सुदृढ राहाल.

प्रमोद पाठक.


_*

Featured post

Lakshvedhi