Monday, 3 July 2023

व्हिटॅमीन सी ची कमी झाल्यास काय होते.*

 *व्हिटॅमीन सी ची कमी झाल्यास काय होते.*


* हिरड्यांना सूज येते.


*हिरडीतून रक्त येते.


* जॉइट पेन.


* अॅनिमिया.


* त्वचा रोग.


* दात तुटणे. * रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन मनुष्य सारखा


* केसांची गळती/ टक्कल पडणे.


आजारी पडतो.


*वारंवार सर्दी, शिंका, गळके नाक. *हाडे कमजोर होऊन दूखायला लागतात.


* अधिक रक्तस्राव होतो, हेवा फ्लो.


* नखे तुटायला लागतात.


* त्वचेवर फंगस, वेगवेगळे आजार होतात.


* शरीरात थकवा जाणवतो.


*रक्तपित्त होऊन नाक, कान, डोळे, योनी, गुदद्वार या मधून रक्त येते.


* मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते.


* जखमेतून पू पस वाढतो.


* तोंडातून घाण वास येतो.


* पॅरेलिसीस, लकवा होण्याची शक्यता वाढते.


* पचनक्रीया प्रभावित होते.


* श्वेतप्रदर, रक्तप्रदर हे दोष वाढतात. * भूक कमी होते.


* गर्भपात होण्याची शक्यता वाढते.


* सीटचे त्रास उद्भवतात. * अँलर्जी ची शक्यता वाढते.


* फुफ्फुस कमजोर होतात.


* लहान मुले सारखी चिडचिड / किरकिर


करतात.


*जीभेवर फोड येतात.


* स्कार्वी नांवाचा आजार होतो.


* या शिवाय वारंवार पोटदुखी, युरीन होताना


त्रास होतो, कमजोरी, उलट्या होणे, अंगात कंप


भरतो.


वैद्य. गजानन

Sunday, 2 July 2023

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

 












अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. 


            आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.


            यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

Medicine म्हणजे काय


 

पचनसंस्थेसाठी बडिशेप.....*

 पचनसंस्थेसाठी बडिशेप.....*

*१. उत्तम औषध...*


 रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.

*२. पोटात गॅस...*

 होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते.


*३. अपचनाच्या सर्व तक्रारींत...*


 बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे इ. थोडक्यात, सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.

L

*४. मुलांना दात येताना...* जुलाबाचा त्रास होतो, त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण घ्यावे

 *५. वीर्यवृद्धी करते.*

*६. भूक लागत नसेल...* तर रोज बडिशेप खावी. त्यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे.

*७. स्मरणशक्ती...* सुधारण्यासाठी व बुद्धी तरतरीत ठेवण्यासाठी बडिशेप चूर्ण+ तूप, चाटण द्यावे.

*८. तापामध्ये अंगाची आग होत असेल...*


जिभेला शोष पडत असेल तर बडिशेपेचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा.

*९. मासिक पाळीचे वेळी...* पोटात दुखत असेल, तर त्यासाठी एक चमचा बडिशेप रोज तीन वेळा चावून खावी. 

*१०. लघवी कमी होत असेल...*


तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर एक चमचा बडिशेपेचा काढा करून प्यावा.

L

*११. उलट्या होत असल्यास...*


अर्धा चमचा बडिशेप चूर्ण, एक चमचा


मोरावळ्यांत टाकून चाटण करणे.

*१२. कोरडा खोकला...*


 असेल तर, एक चमचा बडिशेप चूर्ण + एक चमचा पत्री खडीसाखर बरोबर घेणे.

*१३. सूज व वेदना...*


असतील तर बडिशेप, सैंधव पूड व ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे.

*१४. बडीशेप सरबत...*

बडिशेप ४ वा ५ चमचे घेऊन ती एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात ४ वा ५ चमचे खडीसाखरेचा पाक करून घालावा. म्हणजे चांगले सरबत तयार होते.


उपयोग - या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते. शिवाय ते पौष्टिक आहे.

*१५. स्वादिष्ट विरेचन चूर्ण...*


बडिशेप, ज्येष्ठमध व सोनामुखी प्रत्येकी १५० ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात ३०० ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. उपयोग - रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे.


त्याने पोट साफ होते. तसेच मूळव्याध, तोंड येणे इ. उष्णताविकार व त्वचाविकार बरे होतात.


*१६. बलदायी पेय (Energy Drink )...*


बडिशेप एक चमचा, एका वेलचीचे दाणे व दोन खजुराच्या आठळ्या ( बिया काढाव्यात. ) हे सर्व मिसळून दोन कप पाण्यात रात्री भिजत घालावे. सकाळी मिक्सरमधून काढावे म्हणजे बलदायी पेय तयार होते, ते रोज सकाळी ताकदीसाठी प्यावे.

संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*








 

चेहऱ्यासाठी टिप्स*

 *चेहऱ्यासाठी टिप्स*

 

*चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी :*


१) पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल.


२) नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल. 


३) पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.


४) त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे.


५) कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे. 


६) साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.


७) सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग 

उजळण्यास मदत होईल.


८) आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.


तेलकट त्वचेसाठी उपाय :


१) १ चमचा दह्यामध्ये प्रत्येकी १ चमचा मुलतानी माती आणि पुदिना पावडर अर्धा तास भिजवून ठेवा. तो लेप चेह-यावर १५ मिनिटे लावून ठेवा. जेव्हा चेह-यावरील लेप सुकेल तेव्हा कोमट पाण्याने धुवा.


२) १ चमचा मुलतानी माती, १ चमचा कडूलिंबाची पानांचा रस पाण्यामध्ये भिजवून ठेवा. अर्ध्या तासाने एका अंड्याच्या बलकामध्ये ती मुलतानी माती मिक्स करून तो लेप चेह-यावर लावून ठेवा. १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. cp



फक्त आणि फकत तुझीच आहे


 

पुरस्कार

 


Featured post

Lakshvedhi