Friday, 30 June 2023

अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट

 अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट


            राज्यात लिंबुवर्गीय फळांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी लिंबुवर्गीय फळपिकांसाठी अमरावती जिल्ह्यातील मासोद (ता. चांदूर बाजार) येथे "सिट्रस इस्टेट" तयार करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            राज्यात संत्रा-मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भात १.३४ लाख हेक्टर इतके आहे. संत्र्याचे आरोग्यदायी गुणधर्म पाहता अधिकाधिक उत्पादने घेणे व त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र या भागातील शेतकऱ्यांना कमी उत्पादकता, जुने तंत्रज्ञान, पारंपरिक सिंचन, यांत्रिकीकरणाचा अभाव अशा अडचणींना तोंड द्यावे लागते. सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून निर्यातक्षम नवीन वाणांचे उत्पादन शक्य होऊ शकेल. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने फळबागा विकसित होऊ शकती

ल.



संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ

 संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ


            संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            या दोन्ही योजनांत सध्या एक हजार रुपये इतके मासिक अर्थसहाय्य करण्यात येते. आता त्यात पाचशे रुपये वाढ झाल्याने ते दिड हजार रुपये इतके होईल. एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थींना सध्या १ हजार १०० तर दोन अपत्ये असलेल्या लाभार्थींना १ हजार २०० इतके मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. यात अनुक्रमे ४०० रुपये व ३०० रुपये अशी वाढ देखील करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही योजनांत मिळून ४० लाख ९९ हजार २४० लाभार्थी आहेत. निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे २ हजार ४०० कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.


-----०-----

Thursday, 29 June 2023

कंटोला.. कर्कोटकि, करटोलि,,( Spine gourd)...*

 *कंटोला.. कर्कोटकि, करटोलि,,( Spine gourd)...*


     उन्हाळा संपला, आणि आता पावसाळा चालू होईल, पावसाचि सततधार चालू होईल, , मग बाजारात या सर्व पावसाळि भाज्यांचि वर्दि लागेल, त्यात प्रमूख आहे.."" करटोलि''.. कारल्यासारखि दिसणारि, आणि सर्वात प्रचंड पौष्टिकतेने युक्त अशि मौसमि , आगळि वेगळि भाजि आहे.. अहो लोक मोठ्या आतूरतेने वाट बघत असतात हिचि, , कारण मग क् ही ,, पाहुणि,, भाजि वर्षभर गायब असते.. हिच्यावर ताव मारून छान वर्षभराचि उत्तम स्वास्थाचि बेगमि करून ठेवायचि असते

 सगळ्यांना....


🌱🌱.. मधुमेहासारख्या क्लिष्ट व्याधिवर करटोलि रामबाण औषध आहे, याच्या सेवनाने रक्तशर्करा नियंत्रित होते..(२).. हि भाजि वाळवून चूर्ण करावे, डांग्या खोकला समूळ बराहोतो, चूर्ण घेतल्राने,..(३) मूळव्याध, बवासिर, या व्याधित, याचे चूर्ण व साखर एकत्रित घेतल्यास बरे वाटते,(३) मूत्र खडा वितळवण्याचि क्षमता आहे. . एक ग्लास दूधात ५ ग्रँ कंटोला पावडर घेतल्यास युरीन स्टोन विरघळतो,


🌱🌱.. ( हाईपरहिड्रोसिस) म्हणजेच ज्यांना सतत , मोठ्या प्रमाणात घाम येतो, त्यांनि याचि पावडर आंघोळिच्या पाण्यात टाकून, स्नान करावे, घाम येण्याचे थांबते,(५).. तिव्र ज्वर, मुदतिचा ताप यावर कंटोल्याचि पाने उकळवून हा काढा, रूग्णास तिन वेळा द्यावा, ज्वर उतरून हुशारि येते,(६).. करटोलित एंटि आँक्सीडेंट व विटँमिन , सी, मुबलक असल्याने, कँसरच्या पेशि नष्ट करते, व प्रतिकार शक्ति वाढवते,


(७).. गर्भवति स्रियांनि करटोलिचे सेवन अवश्य करावे

 बाळाचि उत्तम वाढ होते, १०० ग्रँम कंटोल्यात ७५ ग्रँम फोलेट असते , जे गर्भावस्थेत उपयोगि ठरते,(८).। करटोलिच्या नियमित सेवनाने उच्च रक्तदाब, नियंत्रित राहतो, यांत भरपुर विटँमिन ए असल्याने डोळे निरोगि, व सशक्त राहतात,(८) कंटोलामद्दे फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचन निट होते, व बद्धकोष्ठ दूर होते,.


 🌱🌱. करटोलिचे चूर्ण व आवळा चूर्ण , दह्यात कालवून केसांना लावल्यास केसगळति, कोंडा, अकालि केस पिकणे , या समस्या दूर होतात,(१०).. करटोलि च्या मूळाला उगाळून मस्तकाला लेप दिल्यास डोकेदूखि थांबते, याचि पाने रूचिकारक, त्रिदोषनाशक, अर्शनाशक, व श्वसनाचे सर्व विकार दुर करणारे असतात,.


🌱🌱.. करटोलि च्या मूळाला, उगाळुन काहि थेंब कानात टाकल्यास कर्णदूखि, बंद होते,(१२). करटोलिचे मूळ भाजावे व चूर्ण खरून मधात दिल्यास सर्व उदर विकार,.. अपचन, अरूचि, पोट फुगणे, बंद होते,

  (१३).. काविळित कंटोल्याच्या मूळाला उगाळून त्याचे काहि थेंब नाकात टाकावे, तसेच सोबत गूळवेल सत्व द्यावे, (१४).. करटोलिचि पाने वाटुन हा रस शुध्द खोबरेल तेलात शिजवून हे सिद्ध तेल , खाज, खरूज , दाद, आदि चर्म रोगावर लावल्यास संपूर्ण बरा होतो आजार,.(१५) अपस्मार, मिरगि, फिट व लकवा यावर करटोलिच्या मूळाचे चूर्ण द्यावे व मूळ तूपात उगाळून काहि थेंब नाकात सोडावे


.. कंटोला हि भाजि रोजच्या जेवणात जरूर ठेवावि, अतिशय मौल्यवान गुणाने भरलेलि, व स्वादिष्ट सुद्धा आहे,, फार कमि मसाल्यात हि भाजि रूचकर होते..

    🌱🌱🌱🌱..




वैभव सोलापूरचे’ कॉफी टेबल बुकचे

 वैभव सोलापूरचे’ कॉफी टेबल बुकचे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन


 


            पंढरपूर, दि. 29, (उ. मा. का.) :- सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती घेण्याबरोबरच पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव सोलापूरचे’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


            शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या कार्यक्रमाला महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, समाधान आवताडे आणि शहाजीबापू पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.


            जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधीतून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सहाय्यक वन संरक्षक बाबा हाके आणि लक्ष्मण आवारे यांचे सहकार्य लाभले.


            या कॉफी टेबल बुकमध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन काळातील शिल्प कलेचा यादव कालिन अर्धनारी नटेश्वर, माचणूर, पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, हेमाडपंथी भगवंत मंदिर, वडवळचे नागनाथ मंदिर, दहिगाव येथील जैन मंदिर, अक्कलकोट मधील खाजा सैफुल मलिक दर्गाह, सोलापुरातील फस्ट चर्च आदी धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे.


            प्राचीन वारसा असलेला सोलापूर येथील भुईकोट किल्ला, मंगळवेढा, माढा, माचणूर, करमाळा, पिलीव येथील भुईकोट किल्ला, अक्कलकोट येथील राजवाडा, चार हुतात्मा स्मारक, सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन, डॉ. कोटणीस स्मारक, वारकरी संप्रदायाची वारी परंपरा, महालिंगरायाची हुलजंती यात्रा, सिद्धरामेश्वराची गड्डा यात्रा, वडवळ नागनाथ यात्रा, उद्योग, कृषि पर्यटन केंद्र चिंचणी, कला व क्रीडा क्षेत्रातील सोलापूरचे योगदान, निसर्ग संपदा, जैवविविधता, सोलापूर शहराच्या मधोमध असलेले 200 हेक्टर क्षेत्रातील सिद्धेश्वर वनविहार, नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्य यांचाही समावेश पुस्तकात आहे. याशिवाय या ठिकाणी आढळणारे विविध प्रकारचे शिकारी पक्षी, तृणभक्षक पक्षी, स्थलांतरीत होणारे पक्षी, फ्लेमिंगो (रोहित पक्षी), विविध सर्प प्रजाती, फुलपाखरे प्रजाती, विविध कोळी प्रजाती यांचाही समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.


0000



 

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला

 *एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार* 

*मकरंद करंदीकर*


विंदा करंदीकर यांची मूळ कविता (जी मुळात लईभारी हे :-) ). मराठीच्या बहिणी असलेल्या अनेकानेक भाषांमधे. 


🙏🏻 *विठ्ठल* 🙏🏻  

     (मूळ कविता)

पंढरपूरच्या वेशीपाशी

आहे एक छोटी शाळा

सर्व मुले आहेत गोरी

एक मुलगा कुट्ट काळा ॥

दंगा करतो मस्ती करतो

खोड्या करण्यात आहे

अट्टल

मास्तर म्हणतात करणार काय?

न जाणो असेल विठ्ठल ॥

✍️ *©️विंदा करंदीकर*

================

      🎯 *इट्टल*

(नगरी बोली)

पंडरपुरच्या येसिपासी

हाये येक छुटी साळा

सर्वी पोरं हायेत गुरी

योक मुल्गा कुट्ट काळा

दंगा कर्तो मस्ती कर्तो

खोड्या कर्ण्यात बी आट्टल !

मास्तर म्हंती करनार काय ?

न जानू ह्यो आसन इट्टल !!! 

🖊 *काकासाहेब वाळुंजकर*

     - अहमदनगर

=================

    🎯 *इट्टल*

(मराठवाडी बोली)

पंडरपूरच्या येशीपशी

हाय बारकी साळा एक

सगळी पोरं हायत गोरी

कुट्ट काळं त्येच्यात एक

आगावपणा करतंय पोराटगी करतंय

आवचिंदपणाबी करण्यात हाय 

आट्टल...

गुरजी मनत्यात करावं काय?

एकांद्या टायमाला आसंलबी इट्टल!

🖊 *डॉ.बालाजी मदन इंगळे*

        - उमरगा

=================

 🎯 *इठ्ठल*

(लेवा गणबोली)

पंढरीच्या येशीपाशी

आहे एक छोटुशी शाया

सर्वे पोऱ्हय गोरे

एक पोऱ्या कुट्ट काया 

दंगा करतो मस्ती करतो

खोड्या कऱ्यात आहे अट्टल

मास्तर म्हने करे काय

न जानो अशीन इठ्ठल

🖊 *प्रशांत धांडे*

       - फैजपूर

=================

   🎯 *ईठ्ठल* 

(अहिराणी रुपांतर)

पंढरपूरना शीवजोगे

एक शे धाकली शाया;

सम्दा पोरे शेतस गोरा

एक पोर्‍या किट्ट काया ||

दांगडो करस, मस्त्या करस

खोड्या कराम्हा शे अट्टल;

मास्तर म्हने काय करो ?

ना जानो हुई ईठ्ठल ||

  ✍️ *नितीन खंडाळे* 

            चाळीसगाव

=================

🎯 *इठ्ठल*

 (तावडी अनुवाद)

 पंढरपूरच्या येसजोय

 आहे एक छोटी शाया

 सम्दे पोरं आहेती गोरे

  एक पो-या कुट्ट काया ll

 दंगा करतो मस्ती करतो

 खोड्या क-यामधी आहे अट्टल

 मास्तर म्हनता करनार काय?

ना जानो असीन इठ्ठल ll

 ✍️ *प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे*

        - जळगाव

=================


🙏🏻 *विट्टल* 🙏🏻  


(आदिवासी बोली. केळवे, पालघर.)

     

पंढरपूरचं येशीपाय

हाय एक बारकुशी शाला

सगली पोरं हाईत गोरी

एक पोर तं काला कुट ॥

दंगा करं मस्ती करं

खोड्या कराया तं अट्टल

मास्तर सांगं करशी काय..?

कलंssहू नाय आसल विट्टल ॥


विकास पाटील.

कृषिन, केळवे.


======((((======


     🎯 *इठ्ठल*

(बागलाणी अहिराणी) 

पंढरपूर नी येसपन

शे एक उलशी शाळा

सर्वा पोऱ्या गोरापान

येकच पोरगा कुट्ट काळा!

दंगा करस मस्ती करस

खोड्या काढा मा शे अट्टल

मास्तर म्हणतस करवा काय

न जाणो व्हयी इठ्ठल!

  🖊 *वैभव तुपे*

        - इगतपुरी 

=================

🎯 *इठ्ठल*

(आदिवासी तडवीभिल

बोली)

पंढरपूरची शिवंजवळं

ह एक लहानी शायी

सबन पोऱ्हा हती गोऱ्या

एक पोऱ्या ह कायाकुच

गोंदय करतो मस्ती करतो

खोळ्या करवात ह अट्टल

मास्तर म्हणतंहती करशान काय ?

कोणाल माहित हुईन इठ्ठल

🖊 *रमजान गुलाब तडवी*

- बोरखेडा खुर्द ता. यावल

=================

  🎯 *विठ्ठल*

( वऱ्हाडी बोली )

पंढरपूरच्या येशीजोळ

लहानचुकली शाळा हाये;

सबन लेकरं हायेत उजय

यक पोरगं कायंशार॥

दांगळो करते, मस्त्या करते

खोळ्या कर्‍याले अट्टल.

गुर्जी म्हंतात कराव काय?

न जानो अशीन विठ्ठल ॥

✍️ *अरविंद शिंगाडे*

           - खामगाव

=================

 🎯 *इठ्ठल*

 (वऱ्हाडी अनुवाद)

पंढरपूरच्या वेसीजोळ

आहे एक लायनी शाळा

सारी पोर आहेत गोरी

एकच पोरगा डोमळा ॥

दंगा करते, दांगळो करते

खोळ्या करण्यात आहेत

पटाईत...

मास्तर म्हणते कराव काय

न जाणो अशीन इठ्ठल ।।

✍️ *लोकमित्र संजय*

            -नागपूर

=================

     🎯 *इठ्ठल*

      (आगरी अनुवाद)

पंढरपूरचे येशीजरी

यक हाय बारकीशी शाला

सगली पोरा हायीत गोरी

यक पोऱ्या कुट काला।।

दंगा करतंय मस्ती करतंय

खोऱ्या करन्यान हाय

अट्टल...

मास्तर बोलतान कराचा काय?

नायतं तो हासाचा इठ्ठल!

✍️ *तुषार म्हात्रे*

     पिरकोन (उरण)

=================

    🎯 *इट्टल*

(मालवणी अनुवाद)

पंडरपूराच्या येशीर 

एक शाळा आसा बारकी।

एकच पोरगो लय काळो:

बाकीची पोरां पिटासारकी।।

दंगो करता धुमशान घालता;

खोड्ये काडण्यात लय अट्टल।

मास्तर म्हणतंत करतंलास काय?

हयतोच निगाक शकता इट्टल।।

✍️ *मेघना जोशी*

         - मालवण

=================

  🎯 *इठ्ठल*

(पारधी अनुवाद)

पंढरपूरना आगंमांग

छ येक धाकली शाया ;

आख्खा छोकरा छं गोरा

यकजच छोकरो कुट्ट कायो!!

वचक्यो छं मस्त्या करस 

खोड करामं छं अट्टल 

मास्तर कवस करानू काय ? 

कतानै आवस व्हसो तेवतो इठ्ठल !!

✍️ *प्रविण पवार* 

             धुळे

=================

   🎯 *इठ्ठल*

(बंजारा अनुवाद)

पंढरपूरेर सिमेकन,

एक हालकी शाळा छ!

सारी पोरपोऱ्या गोरे,

एक छोरा कालोभुर छ!

दंगो करचं मस्ती करचं!

खोडी करेम छ अट्टल!!

मास्तर कचं कांयी करू?

काळोभूर न जाणो इ इठ्ठल!!

✍️ *दिनेश राठोड*

 *चाळीसगाव*

=================

    🎯 *विठ्ठल*

(वंजारी अनुवाद)

पंढरपुरना हुदफर 

हे एक बारकुली शाळ

हंदा पाेयरा हे गाेरा 

एक पाेयराे निववळ काळाे

केकाटत ,मसती करत

खाेडयाे करवामा हे अटट्ल

 मासतर केत करवानाे काय

 न जाणाे हिवानाे विठठ्ल

✍️ *सायली पिंपळे*

            - पालघर

=================

  🎯 *विठ्ठल*

      (हिंदी अनुवाद)

पंढरपूर नगरमें द्वारसमीप

है एक अनोखी पाठशाला

सुंदर सारे विद्यार्थी वहाँ के

एक बच्चा भी हैं काला...।

उधम मचाये मस्तीमे मगन

है थोड़ा सा नटखटपन

गुरुजन कहे क्या करे जो

हो सकता हैं विट्ठल...।

✍️ *सुनिल खंडेलवाल*

       पिंपरी चिंचवड़, पुणे

=================

  🎯 *विट्टल*

      (कोळी अनुवाद)

पंढरपूरश्या वेहीवर , 

एक हाय बारकी शाळा।                           

 जखली पोरा गोरी गोरी।     

त्या मनी एक हाय जाम काळा।      

दन्गो करता न मस्तीव करता        

खोडी करनार अट्टल।    

न मास्तर हानता काय करु            

न जाणो यो हयेन विट्टल।   

✍️ *सुनंदा मेहेर*

   माहीम कोळीवाडा मुंबई

=================

  🎯 *इठ्ठल* 

   (आगरी अनुवाद)

 पंढरपुरचे हाद्दीव,

 हाय येक बारकीच शाला.

 सगली पोरा हान गोरी,

 येक पोर जामुच काला.

 उन्नार मस्ती करतय जाम,

 खोऱ्या करन्यान वस्ताद हाय.

 गुरूजी सांगतान करनार काय,

 नयत त आसल तो इठ्ठल.

 ✍️ *निलम पाटील* बिलालपाडा,नालासोपारा

=================

     🎯 *विट्टल*

(झाडीबोली)

पंढरपूराच्या सीवेपासी

आहे एक नआनसी स्याळा

सर्वी पोरे आहेत भुरे

एक पोरगा भलता कारा 

दंगा करतो मस्ती करतो

गदुल्या करण्यात अव्वल

मास्तर म्हणत्ये करणार काय ?

न जानो असल विट्टल !

✍️ *रणदीप बिसने*

       - नागपूर

=================

       🎯 *इठ्ठल*

(परदेशी बोली)

पंढरपुरका येशीपास

हय एक छोटी शाळा

सब पोर्ह्यान हय गोरा 

एक पोऱ्यो कुट्ट काळो

दंगा करं मस्ती करं

खोड्या करबामं हय अट्टल

मास्तर कहे कई करू ?

कोनकू मालूम व्हयंगो इठ्ठल 

🖊 *विजयराज सातगावकर*

         - पाचोरा

=================

🎯 *विठ्ठल*

(पोवारी बोली )

पंढरपूरक् सिवजवर

से एक नहानसी शाळा

सप्पाई टुरा सेती गोरा

एक टुरा से भलतो कारा

दिंगा करसे मस्ती करसे

चेंगडी करनो मा से अव्वल

मास्तर कव्हसे का आब् करू?

नही त् रहे वु विठ्ठल !!

✍️ *रणदीप बिसने*

     - नागपूर

=================

🎯 *विठ्ठल*

(कोकणी सामवेदी बोली)

पंढरपूरश्या वेहीपा

एक बारकी शाळा हाय

आख्ये पोरे गोरेपान

पान एकूस काळोमस

खूप दंगोमस्ती करत्ये

खोडयो काडण्यात अट्टल

मास्तर हांगात्ये,

का कऱ्यासा,

कुन जाणे, ओस हायदे विठ्ठल ??

🖊 *जोसेफ तुस्कानो*

           - वसई


=================

(झाडीपट्टी)

पंढरपूरच्या शिवं जवडं

यक छोटी शाडा

सर्वे पोट्टे हायेत भुरे

यक पोट्टा कुट्ट काडा

धिंगाने करते,मस्ती करते

खोड्या कराले हाये अट्टल

मास्तर म्हनतेत का करू बाप्पा

कोन जानं असन विट्टल।।

-माधवी

≠===================

पंढरपुराच्यें बाहांर आहें

बारकी एकुस साला

आखुटच पोयरें पांडरे-गोरे

एकुस होता काला

भरां करं मस्ती हों तों

भरां करं दंगल

गुर्ज्या म्हन् करांस काय?

आसंल जर्का विठ्ठल

 (वारली)

...मुग्धा कर्णिक

=======================

विठ्ठल

(चित्पावनी)


पंढरपुराचे शीमालागी

से एक इवळीशी शाळा

सगळीं भुरगीं सत गोरीं

एक बोड्यो काळीकुद्र कळा


बोव्वाळ करसे, धुमशाणा घालसे

किजबिट्यो काढसे हो अव्वल

मास्तर म्हणसे कितां करनार?

देव जाणे, सएल विठ्ठल


- स्मिता मोने अय्या (गोवा)

======================


पंढरपुरश्या येहीवर 

हाय एक बारकी हाळा

तटे हात जकली पोरं गोरी

एक पोरं घणा काळा

दंगा करते मस्तीव करते

खोड्या करव्या हाय अट्टल

मास्तर बोलते करव्याह का?

कोणला माहीत अहेल इठ्ठल।।


-वाडवळी बोली 

-केळवे माहीम

-- गौरव राऊत.

======================


ही दखनीत : (जिला बागवानी म्हणूनही ओळखतात इथे.)


पंढरपूरके हदकने

हय एक न्हन्नी इस्कूल

सब छोरदा हय गोरे

एक हय काला ठिक्कर

दंगा कर्ता मस्ती कर्ता

खोड्या कर्नेमें हय आट्टल

मास्तर बोल्ता कर्ना क्या

भौतेक इनेच आचिंगा इठ्ठल 


--इर्शाद बागवान

 आदिलनिजामकुतुबशहा जेथे होते तेथे ही भाषा तेथील मुस्लिम समाजात बोलली जाते.

यातील पेठी वर्जन म्हणजे हैदराबादेतले मुसलमान आपसात बोलतात ती भाषा (धर्माचा उल्लेख केवळ भाषा कुणाच्यात बोलली जाते याकरता) असं म्हणतात. दखनीभाषेत साहित्यनिर्मितीही झालेय. 

====================

आदिवासी पावरी बोली..

(नंदूरबार जिल्हा, धड़गाव तालुका 

आदिवासी पावरी बोली)

पंढरपूरन हिवारोपर,

एक आयतली शाला से 

अख्खा पुऱ्या 

काकडा से 

एक सुरू से 

जास्ती (जारखो) काल्लो 

कपाली करतलो, 

मस्ती करतलो 

चाड्या करण्याम

 से आगाडी पे !

काय करजे ?,

मास्तर कोयतलो,

काय मूंदु ,

ओहे इटलो ? (विठ्ठल)

- योगिनी खानोलकर

≠====================


आऊटसाइड पंढरपुर

देर इजे स्मॉल स्कूल

ऑल द किड्स आर व्हेरी फेअर

एक्सेप्ट फॉर वन ब्लॕक डुड

फनी अँड ट्रबल मेकर

ही इजे ब्रॕट ऑफ हायेस्ट ऑर्डर 

टीचर सेज व्हॉट टु डु?

माइट बी अवर ओन विठु


भाषांतरकार समीर आठल्ये

+91 98926 73624: 


कन्नड ( ग्रामीण ) मध्ये


पंढरापूरद अगसी हत्तीर

ऐतेव्वा वंद सण्ण सालीमठा

एल्ल हुड्रू बेळाग सुद्द

वब्बन हुडगा कर्रगंद्र कर्रग ||

गद्दला माडतान,धुम्डी हाकतान

तुंटतना माडोद्राग मुंद भाळ

मास्तर अंतार एन माड्ली ?

इवनं इद्रू इरभौद इटूमावली ?


- डॉ प्रेमा मेणशी

 बेळगावी

कर्नाटक

+91 98926 73624: 


विठ्ठल 


आगरी बोलीभाषा

============

पंढरपूरशे हद्दीन

हाय एक बारकी शाला

बिजी पोरा गोरी

त्यामन एकस यो काला


दंगा करतं नावटीगिरी करतं

खोड्या कर्णेन जाम अट्टल

गुरजी हांगतं काय करणार

काय माहीत आहेल विठ्ठल


●श्री अनंत पांडुरंग पाटील

   उमरोळी पालघर

शासन आपल्या दारी'अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्तेअनुकंपा नियुक्ती आदेश वाटप

 'शासन आपल्या दारी'अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्तेअनुकंपा नियुक्ती आदेश वाटप


            पंढरपूर, दि. 29 : 'शासन आपल्या दारी' योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आज अनुकंपा नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात योजनेचे काम गतीने सुरू असून आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक लाभाचे वितरण करण्यात आले आहे.


            शासकीय विश्रामगृह येथील आयोजित या कार्यक्रमास महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आदी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासन चांगल्या प्रकारे करत आहे. शासनाने ७५ हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मंत्रीमंडळ बैठकीत नियमितपणे याचा आढावा घेण्यात येतो. 'शासन आपल्या दारी'' योजनेच्या माध्यमातून एकाच छताखाली विविध दाखले देण्याचे काम होत आहे. योजना सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, दाखलेही एकाच छताखाली मिळतात. सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होत आहे. या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे शासन सर्व सामान्य जनतेचे आहे. सामान्य माणसाचे आरोग्य जपणारे आहे. वारी कालावधीत 3 ठिकाणी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले.


            एक जानेवारी २०२३ पासून आज अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा सूचीतील गट क व गट ड संवर्गातील एकूण ५९ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रोजगार निर्मितीचे शासनाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन अनुकंपा तत्त्वावरील उपलब्ध रिक्त जागांवर या नियुक्त्या देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.


            कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १८ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तलाठी पदासाठी आठ उमेदवारांची अनुकंपा तत्त्वावर तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग येथील कार्यालयात अनुकंपा तत्त्वावर दोन शिपाई तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या आस्थापनेवर पाच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व तीन शिपायांची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे.

भवताल कातालशिल्प

 

भवताल कट्टा ५८

 

कोकणात अनेक सड्यांवर असंख्य कातळशिल्पं कोरलेली आहेत. नवनवी शिल्पं उजेडात येत आहेत, तसे त्यांच्याबद्दलचे गूढ वाढतच आहे. त्यांचे निर्माते, त्यांचा काळ, त्यांचा अर्थ, त्यांचे नेमके प्रयोजन असे कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचा उलगडा करणारा भवताल कट्टा, शुक्रवार ३० जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.

  

विषय :

कातळशिल्पांचे गूढ विश्व

 

सहभाग :

सतीश लळित

(कातळशिल्प अभ्यासक / ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे संस्थापक)

साईली पलांडे-दातार

(इतिहास, पुरातत्त्व आणि पर्यावरण विषयांच्या अभ्यासक)

 

शुक्रवार, ३० जून २०२३

सायं. ७ ते ८.३०

 

सहभागासाठी:

झूम लिंक -

http://bitly.ws/JIAM

Meeting ID: 893 9400 5438
Passcode: 273379

किंवा

भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह.

पेजची लिंक- https://facebook.com/bhavatal

 

संपर्कासाठी:

bhavatal@gmail.com


(आपल्या संपर्कातही शेअर करावा, ही विनंती.)


- भवताल टीम


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

Featured post

Lakshvedhi