Friday, 9 June 2023

अप्रतिम संदेश

 मला आवडलाय तुम्हालाही नक्कीच आवडेल*




🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎


🌎 "बिल गेट" चे भारतीय 🌎


🌎 लोकांविषयी मत... 🌎


🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎


         *सर्वांनी हे नक्की वाचाच* 


    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏






तो म्हणतो, 


"भारत हा जगात 


सगळ्यात श्रीमंत देश आहे.


या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी "भारत हा महासत्ता होऊ शकतो,


परंतु ,


मजेची गोष्ट ही आहे कि, या देश्यातील 


लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून,


शेतकरी देवाला 


दोष देत आत्महत्या करतो...।


कारण ,


त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण 


आहे हेच त्याला कळत नाही ...।




या देश्यातील गरीब जनतेला कळत 


नाही कि तुमच्या गरिबीला कोण जबाबदार आहे ?




इथल्या तरुणाला 


कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे...?




भयाण वास्तव...




१) इथल्या तरुणाला गुलामी कळू नये 


म्हणून, क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदीरे, यांची अफूची गोळी दिलेली असते तो त्यामध्येच गुंग झालेला असतो...


तसेच,


पायी, वारी, सण, उत्सव यांच्या नादी 


लावले जाते....।




मग, ताण (Tension) आला कि दारूची दुकान जवळ असते....




करतो जीवन बरबाद...,


मग, स्वतःला दोष देतो ...




२) इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून...


भांडणे लावणाऱ्या मालिका,


 तसेच उपास- तापास, व्रत-वैकल्ये....


यांमध्ये त्या गुंग 


असतात ...




मग त्यांचे कुटुंब आणि 


त्या...




त्यांना मग कोण सहन होत नाही ...(सासू, सासरे)




३) इथला नौकरी असणारे पुरुष असतात...




ते घाण्याला लावलेल्या 


बैलासारखे राब-राब राबत असतात...




बँकेने दिलेले हफ्ते फेडण्यासाठी....




त्यालाच कळत नसते तो काय करतो ...


कारण, पगार जरी एक 


लाख असला तरी ८०,००० हफ्ते 


फेडण्यासाठी घालवत असतो ....।




एक बँकेचे कर्ज फेडले कि मग, बायको दुसरे (मोठे घर) कर्ज 


काढायला सांगते...




काम एवढे असते 


कि तो डोके वर काढू शकत नाही...






4) जेष्ट नागरिक ...


नोकरी करून शेवटी कुणीही त्याचे ऐकत नाही ...।




आश्रमाची वाट बघत असतो...




आणि,


जे लोकं जागरूक आहेत त्यांना...


अंधश्रद्धा निर्मुलन समिती, भ्रष्टाचार निर्मुलन समिती..




अनेक NGo मार्फत ..


वेगवेगळ्या पक्ष्याद्वारे गुंतून ठेवले जाते ...






मग कसा बदल होणार...?


कोण करणार...?




आता बाकी आहेत 


त्यांनी विचार करावा..




 केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते?


                             


 नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते?


                            




     केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार...😊


 


सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते? 




सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव...😊 




काय उपयोग सांग मानवा


अशा या दान धर्माचा ??😳




कधी शेतक-याला बियाणं


दान देऊन बघ... 😊




कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ.... 😊




कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ... 😊




कधी एखाद्या उपाश्याला घlस भरवुन बघ...😊




कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ...😊




कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ...😊




कधी एखाद्या वृध्दाश्रमास


दान करून बघ....😊




कधी एखाद्या आश्रमातील


निराधारांवर प्रेम करून बघ...😊




एकदा दान धर्माच्या व्याख्या


बदलून तर बघ !!😊




जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल...😇




पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत...😇




सशक्त झालेलं मस्तक


कुणाच हस्तक होत नसत...😇




आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! 😇




शाळेचे छत गळके आणि


मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?😳




शाळेत आज मुलांना बसायला


साधी फरशी नाही मंदिराला मात्र संगमरवरी ?😳




शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही...😔




आपला भारत नक्की महासत्ता होणार?😳




पायात घालायची चप्पल AC मधे विकायला ठेवतात आणि


भाजीपाला फूटपाथवर...😔




म्हणे आमचा देश कृषी प्रधान


आणि आत्महत्या करतो शेतकरी...😔




शेकडो मैल चालतो वारकरी...😳




अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो सत्ताधारी मंत्री..! 




वाचा,


विचार करा,


🙏🙏🙏


आवडले असेल तर नक्की पुढे पाठवा.....,...


किमान 100 पैकी एकास तरी याचे मुल्य समजेल


नक्की शेअर करा👍🙏🙏🙏

इवलंसं रोपटं मी*

 *इवलंसं रोपटं मी*

तू म्हणालास तर मरून जाईन


ओंजळभर पाणी दे मला

आयुष्यभर तुझ्या कामा येईन


दिलं जीवदान मला तर 

तुला जगायला *प्राणवायू* देईन


जगवलंस मला तर 

तुझ्या देवांसाठी *फुलं* देईन


फुलवलंस मला तर

तुझ्या मुलांसाठी *फळं* देईन


तळपत्या उन्हामध्ये 

तुझ्या कुटुंबाला *सावली* देईन


तुझ्या सानुल्यांना खेळावया

माझ्या खांद्यावर *झोका* देईन


तुझ्या आवडत्या पाखरांना 

मायेचा मी *खोपा* देईन


कधी पडला आजारी तर 

तुझ्या *औषधाला* कामा येईन


झालो बेईमान जरी मी 

शेवटी तुझ्या *सरणाला* कामा येईन

.... 

.. *एक ईवलंसं रोपटं*

🌿

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ


केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय


            नवी दिल्ली 8 : सन 2023-24 या आर्थिक वर्षातील खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींत वाढ करुन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या महत्त्वाच्या निर्णयाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) मंगळवारी मंजुरी दिली आहे.


            केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2023-24 करिता सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्याबाबत मंजुरी दिल्याच्या निर्णयानुसार तूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. धान, मका आणि भुईमूगाच्या किमान आधारभूत किमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे.


            विपणन हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ ही केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणांच्या अनुषंगाने करण्यात आली आहे, यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय अधिभारीत सरासरी उत्पादन खर्चापेक्षा किमान 1.5 पट पातळीवर किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची घोषणा करण्यात आली होती. बाजरी (82 टक्के) आणि त्यानंतर तूर (58 टक्के), सोयाबीन (52 टक्के) आणि उडीद (51 टक्के) यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा अपेक्षित लाभ सर्वात जास्त असण्याचा अंदाज आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा किमान 50 टक्के लाभ असा अंदाज आहे.


            अलिकडच्या वर्षांत, सरकार या पिकांसाठी उच्च किमान आधारभूत किंमत देऊन,कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक-तृणधान्ये/श्री अन्न व्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. याशिवाय, सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांमध्ये वैविध्य आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीआय ), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (एनएफएसएम ) यासारख्या विविध योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत.


            2022-23 च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात एकूण अन्नधान्य उत्पादन 330.5 दशलक्ष टन इतके विक्रमी होईल, असा अंदाज आहे, हे उत्पादन मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 14.9 दशलक्ष टनांनी जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारकडून प्राप्त झाली आहे.


पिकनिहाय हमीभावातील वाढ (रुपये प्रति क्विंटल)


• कापूस मध्यम धागा- जुने दर - 6080, नवे दर - 6620, वाढ- 540


• कापूस लांब धागा- जुने दर - 6380, नवे दर- 7020, वाढ 640


• सोयाबीन- जुने दर- 4300, नवे दर - 4600, वाढ 300


• तूर- जुने दर - 6600, नवे दर- 7000, वाढ 400


• मका- जुने दर - 1962, नवे दर - 2090, वाढ 128


• मूग- जुने दर - 7755, नवे दर - 8558, वाढ 803


• उडीद - जुने दर- 6600, नवे दर- 6950, वाढ 350


• भुईमूग- जुने दर -5850, नवे दर- 6377, वाढ 527


• ज्वारी हायब्रीड- जुने दर - 2970, नवे दर - 3180, वाढ 210


• ज्वारी मालदांडी- जुने दर - 2990, नवे दर - 3225,वाढ 235


• भात सामान्य ग्रेड- जुने दर - 2040, नवे दर - 2183, वाढ 143


• भात ए ग्रेड -2060, नवे दर - 2203, वाढ 143


00000


अमरज्योत कौर अरोरा/वृत्त क्र.102 /8.6.2023



 

Thursday, 8 June 2023

जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल

 जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

 

       मुंबई, दि. ८ : जळगाव जिल्ह्यातील  मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन याठिकाणी होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भूसंपादनासाठीच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी, जळगाव यांच्यामार्फत मंजुरी देण्यात आली आहे.

            खेळाडूंना सराव करण्यासाठी हे शासकीय क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांचे खेळाडू सराव करतील. त्यांनी केलेला सरावअद्ययावत साधन सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शक यामुळे या भागातील खेळाडू विविध स्पर्धेत यशस्वी होऊ शकतील, असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

            क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 36 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलात विविध खेळाची मैदानेधावपटूसाठी ट्रॅकबास्केटबॉलव्हॉलीबॉल साठी मैदानटेनिस कोर्ट आदींसह खेळाडूंना लागणाऱ्या अद्ययावत सोयीसुविधांसह तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध होणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

एक रसाळ कथा

 एक रसाळ कथा:                                                           एका मैत्रिणीने जेवायचे आमंत्रण दिले म्हणून मी जेवायला गेलो. मैत्रिणीने पोळ्या, दोन भाज्या, भात, आमटी असा व्यवस्थित स्वयंपाक केला होता. जेवणानंतर एक बाऊल भरून आमरस दिला. तेंव्हा मी तिला म्हणालो की अग आमरस असल्यावर भाज्या करायची गरज नव्हती. आमच्या घरी आमरस असल्यावर भाज्या करीत नाहीत. त्यावर ती म्हणाली की अरे तुझी बायको आळशी आहे. तीला भाज्या करायला नकोत म्हणून ती फक्त आमरसावर भागवते. मी घरी आल्यावर बायकोने कुत्सितपणे विचारले की काय मैत्रिणीने केला की नाही पाहुणचार व्यवस्थित? मी तिला सर्व हकिकत सांगितल्यावर ती म्हणाली की अहो भाज्या केल्या नसत्या तर तुम्ही अजून दोन तीन बाऊलस् आमरस ओरपला असता म्हणून तिने दोन भाज्या केल्या. चिकट मेली!

मी मात्र विचारात पडलो🤔 ही बरोबर की ती बरोबर?😆😂😧

✊कां कुणास ठाऊक....* कांही कळलंच नाही..

 *✊कां कुणास ठाऊक....* 

*🤞कांही कळलंच नाही....*   

👍 *मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी....🤔* 



*कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,*

*कांही कळलंच नाही.*



*काय मिळवलं, काय कमावलं,*

*काय गमावलं,*

*कांही कळलंच नाही.*


*संपलं बालपण,*

*गेलं तारुण्य,*

*केव्हा आलं ज्येष्ठत्व,*

*कांही कळलंच नाही.*



*काल मुलगा होतो,* 

*केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो,* 

*कांही कळलंच नाही.*


*केव्हा 'दादा' चा बाबा*

*नंतर 'बाबा' चा*

*'आबा' होऊन गेलो,*

*कांही कळलंच नाही.*


*कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,*

*कोणी म्हणतं हाती आली काठी,*

*काय खरं आहे,* 

*कांही कळलंच नाही.*



*पहिले आई बापाचं चाललं,*

*मग बायकोचं चाललं,*

*मग चाललं मुलांचं,*

 *मग चाललं सुनेचं,* 

*माझं कधी चाललं*, 

*कांही कळलंच नाही*



*बायको म्हणते,* 

*आता तरी समजून घ्या* , 

*काय समजू,*

*काय नको समजू,* 

*मग इतकी वर्ष समजुतीने*

*कोणा बरोबर घेतली*

*कां कुणास ठाऊक*

*कांही कळलंच नाही.*

        


*मन म्हणतंय तरुण आहे मी,*

*वय म्हणतंय वेडा आहे मी,*

*या साऱ्या धडपडीत केव्हा* 

*गुडघे झिजून गेले,* 

*कांही कळलंच नाही.*



*झडून गेले केस,* 

*लोंबू लागले गाल,*

*लागला चष्मा,* 

*केव्हा बदलला हा चेहरा* 

*कांही कळलंच नाही.*



*काळ बदलला,*

*मी बदललो*

*बदलली मित्र-मंडळीही*

*किती निघून गेले,* 

*किती राहिले मित्र,*

*कांही कळलंच नाही.*



*कालपर्यंत मौजमस्ती*

*करीत होतो मित्रांसोबत,*

*केव्हा सीनियर सिटिझनचा* 

*शिक्का लागून गेला,* 

*कांही कळलंच नाही.*



*सून, जावई, नातू, पणतू,*

*आनंदीआनंद झाला,* 

*केव्हा हासलं उदास हे*

*जीवन,*

*कांही कळलंच नाही.*




*भरभरून जगून घे जीवा*

*मग नको म्हणूस की,*


*"मला कांही कळलंच नाही.*


*कवी-ना.धो.महानोर*

ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार

 ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दिवा परिसरातील 610 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण


            ठाणे, दि. 7 (जिमाका) : दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


            ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिवा येथे पार पडला. यावेळी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            यावेळी दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.


            “दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने मी भारावलो आहे. त्यांच्या प्रेमापुढे आतापर्यंत दिलेला निधीही कमी पडेल. दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा. प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील 2800 घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नाही”, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत हजार कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. दिवा स्थानकामध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वे थांबविण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागणार असून त्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात येईल. तसेच दिव्यात 150 बेडचे सुसज्ज रुग्णालयासाठीची जागा राज्य सरकारकडून मिळाली असून त्याच्या भूसंपादनासाठी 68 कोटी निधी मंजूर झाला आहे. दिवा शहरात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे तसेच ठाण्याप्रमाणे येथेही क्लस्टर योजना राबवावी, अशी मागणीही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली.


            यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दिवा वासियांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.


खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरण कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन


            दिवा येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. येथील भूमिपुत्रांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिराचे सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, खिडकाळेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्यकारभार करत आहोत. राज्यातील प्राचीन देवस्थानांचे जतन, संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे गडकोट, किल्ले यांचेही संवर्धन करण्यात येणार आहे. खिडकाळेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी जेवढा निधी लागे

ल तो देण्यात येईल.


०००००

Featured post

Lakshvedhi