Wednesday, 7 June 2023

बाल हृदय रुग्णांसाठीप्रत्येक जिल्ह्यात उपचार केंद्र आवश्यक

 बाल हृदय रुग्णांसाठीप्रत्येक जिल्ह्यात उपचार केंद्र आवश्यक


- राज्यपाल रमेश बैस


            नवी मुंबई, दि. 7 :- “हृदयरोगाने आजारी मुलांपेक्षा जास्त वेदना त्यांच्या पालकांना सहन कराव्या लागतात. मुलांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी श्री सत्य साई संजीवनी केंद्रासारख्या संस्था प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आहेत. रोगांचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो”, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            नवी मुंबई खारघर येथील “श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अँड ट्रेनिंग इन पेडियाट्रिक कार्डियाक स्कील्स”चा 5 वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी ते बोलत होते.


            यावेळी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास, पूज्य सद्गुरु मधुसूदन साई पदव्युत्तर संस्था रोहतकच्या कुलगुरू अनिता सक्सेना, प्र-कुलगुरू कृष्णा डॉ.विद्यापीठ, कराडचे डॉ.प्रवीण शिनगारे आदी उपस्थित होते.


            “आजपर्यंत हजारो बालकांवर या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले असून त्यांचे नवीन आयुष्य सुरू झाले असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, आजारी हृदयाला बरे करण्यासाठी आपल्याला चांगल्या हृदयाची गरज आहे आणि रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला निरोगी मनाची गरज आहे. जन्मजात हृदयरोग ही एक गंभीर समस्या आहे.भारतात जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांची अंदाजे संख्या दरवर्षी दोन लाखांपेक्षा जास्त आहे. म्हणूनच या आजाराबाबत जनजागृती करणे सर्वात महत्त्वाचे आहे. रोगाचे निदान आणि उपचार यावर लक्ष केंद्रीत करून प्रतिबंध हे आमचे प्राथमिक ध्येय असले पाहिजे. गर्भवती मातांनी गर्भधारणे दरम्यान निरोगी जीवन शैलीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे”. 


            “जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये रोगाचे निदान शोधून त्यावर उपचार करण्याच्या सुविधाही वाढवायला हव्यात. या रुग्णालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, वैद्यकीय तज्ञ आणि प्रगत उपकरणे पुरवली जावीत.असे केल्याने, मोठ्या रुग्णालयांवरील भार लक्षणीयरित्या कमी करता येईल आणि मौल्यवान जीव वाचवता येतील. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे असून या उपक्रमाला शासनाचा नेहमीच पाठिंबा असतो. श्री सत्य साई संजिवनी रिसर्च फाउंडेशन जन्मजात हृदयविकारावर संशोधन करत असल्याचे पाहून आनंद व्यक्त करत संस्थेशी संबंधित शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचे त्यांच्या संशोधन कार्याबद्दल अभिनंदन करुन यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी शुभेच्छा दिल्या.


            कार्यक्रमाच्या प्रारंभी रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या बाल रुग्णांना राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्या

त आले.


0000


ग्रामीण खेळ

 


मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ'

 




मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ'


मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत


मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 7 : नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन'चा (8169681697) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            दरम्यान, मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास बंदरे विकास व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन' वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


            मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्या माध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे १,१५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृश्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळीवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण


            मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, मुंबई महानगरपालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महानगरपालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून १५ जूनपर्यंत तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. दि. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले.


अशी आहे 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन' सुविधा


            बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाइन' कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रिज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.


            भ्रमणध्वनी वापरकर्त्यांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही अद्ययावत, सहजसोपी, अशी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारीसंबंधीचे छायाचित्र व ठिकाण/ जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाइनमध्ये नोंदवली जाईल. यानंतर, ती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन संबंधित अधिकारी/कर्मचारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे.


            घनकचरा व डेब्रिज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाइनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ॲप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची/संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रा

र निराकरणाचा आढावा घेतील.


००००

ग्रामीण खेळ

 Village games are sometimes better than Olympic games... Very interesting! 👌


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवाहतुकीसाठी नियोजित वेळेत खुले होणार

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवाहतुकीसाठी नियोजित वेळेत खुले होणार   

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

वाहतुकीसाठी नियोजित वेळेत खुले होणार   

                                               - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री यांनी केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी

 

            नवी मुंबईदि. 07 : ‘‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी दूर करुन नियोजित वेळेत विमानतळ वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            उलवे येथील विमानतळाच्या आज हेलिकॉप्टरद्वारे पाहणीनंतर, अदानी समूहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार महेश बालदी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकरसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकरसिडकोचे सहसंचालक कैलास शिंदेजिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसेनवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरपनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

            नवी मुंबई विमानतळ हे पुणेमुंबईगोवा यांच्यासाठी महत्वाचे आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते, उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत असेही  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरु असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की2024 पर्यंत हे विमानतळ सुरु करण्याच्या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला अधिक गती द्यावी, हा आजच्या पाहणीचा उद्देश आहे. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट जनतेला देणार आहे, असे त्यांनी सांगितले.

विमानतळाविषयी -:

            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 22 किलोमीटरचा सीलिंक महत्वाचा दुवा ठरेल.  दरवर्षी 9 कोटी प्रवासी वाहतूक होईल.  म्हणूनच मोठ्या शहरासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून 42 विमाने उभी राहतील. 5500 क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ 11.4 किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील.

                                                                       0000000

                                               -



महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची फेरनिवड

 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची फेरनिवड  



वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा


 


मुंबई : ''महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर'' संस्थेच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे.


                चेंबरच्या अध्यक्षपदासाठी ललित गांधी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी अनिलकुमार लोढा, करुणाकर शेट्टी आणि उमेश दाशरथी असे तिघांचे अर्ज दाखल झाले होते. पैकी करुणाकर शेट्टी आणि उमेश दाशरथी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चेंबरचे सरकार्यवाह सागर नागरे यांनी काम पाहिले.


                या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ललित गांधी म्हणाले की, ललित गांधी गेल्या 21 वर्षापासुन महाराष्ट्र चेंबरमध्ये कार्यरत असून गव्हर्निंग काऊन्सील सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत.


                शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या राज्याच्या शिखर संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी पुन्हा मिळणे ही दुर्मिळ व महत्वपूर्ण घटना आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह चेंबरच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागांतील व्यापार-उद्योग-कृषी व कृषीपूरक उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार आहे. छोट्यात छोट्या व्यापारी - उद्योजकांचे प्रश्नंही प्राधान्याने हाती घेतले जातील. तसेच महाराष्ट्राला संपूर्ण देशात पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या बरोबर कार्य करून यश मिळवु, असेही त्यांनी सांगितले.


                नूतन वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे दोनदा उपाध्यक्षपद भूषविले आहे. ते गेल्या २० वर्षापासून चेंबरशी संलग्न आहेत. गेले ४ टर्म त्यांनी कार्यकारिणी मंडळात प्रतिनिधित्व केले हाते. सन २०१६ ते २०२१ साली मध्ये उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. जगभरात प्रसिद्ध असलेल्या मे. भागचंद लोढा उद्योग समूहातील एम. बी. शुगर अण्ड फर्मस्युटिकल्स लि. कंपनीचे संचालक आहेत. बॉम्बे शुगर मर्चंन्ट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आहेत.


चौकट : १६ जूनला राजभवनात दिमाखदार सोहळा


दरम्यान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे ५० वे सत्र राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. येत्या १६ जून, २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता राजभवनातील दरबार हॉल मध्ये दिमाखदार सोहळ्याचे नियोजन केले असून निर्वाचित अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्षांचा पदग्रहण समारंभ या वेळी संपन्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


विविध प्रश्न मार्गी


महाराष्ट्र चेंबरच्या ९६ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच १ कोटी, ३२ लाख रुपये गेल्या वर्षभरात उत्पन्न मिळविले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे व्यापारी आणि उद्योजकांच्या विविध मागण्या मांडून त्या मार्गी लावल्या. प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापरावरील निर्बंध, कोरोना काळात उद्योजकांचे सरकारकडे प्रलंबित असलेले अनुदान थेट खात्यात जमा, विदर्भ विकास परिषद, उत्तर महाराष्ट्र विकास परिषद, राज्यस्तरीय कौशल्य विकास परिषद, महाराष्ट्र ट्रेड इंटरनॅशनल एक्स्पो (मायटेक्स) मुंबईत भरविले. महाराष्ट्र चेंबरच्या नाशिक कार्यालयासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीकडून १० हजार चौरस फुटाचा भूखंडाची मंजूरी मिळविली

सारिवाद्दासव अनंतमूळ औषधी गुण


..सारिवा म्हणजे.. अनंत मूळ.. वनस्पती.. अतिशय गुणकारी आहे.. हिच्या पासून . आयुर्वेद कंपनी 

...सारिवाद्दासव हे मौल्यवान औषध तयार करतात..या आसवाचा प्रमुख उपयोग सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर करतात.. गजकर्ण, खरूज, इसब, नायटा,दाद, सोरायसिस, या आजारांवर प्रभावी आहे..

.... आपण बघू या याचे मौल्यवान फायदे..


. मस्तिष्क विकार बरे होतात. बरेचदा स्त्रियांना बाळंतपणानंतर उन्माद येतो, डोकं हलकं होतं,अशा वेळी यांना नियमित पणे दोन चमचे हे आसव जेवणानंतर द्यावे. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण, डिप्रेशन येतं, सारिवाद्दासव घेतल्यास सकारात्मक परिणाम मिळतात.शिवाय अर्धशिशी, मायग्रेन हे आजार बरे होतात.


 मूत्रपिंडाचे सर्व प्रकारचे आजार बरे होतात,. मूत्राघात, म्हणजे. थेंब थेंब युरीन येणं, युरिन वारंवार होणे, युरिन होतांना जळजळ होणे, या सर्व त्रासांवर सारिवाद्दासव अतिशय परिणामकारक आहे, दररोज दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर घ्या. हळूहळू बरं वाटतं.


सारिवाद्दासव हे गुणधर्मानी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करते, अंगाचि आग होणं, नाकाचा घोळणा फुटणे, मुळव्याधित रक्त जाणे, युरिनमधुन रक्त येणे, कानातून रक्त येणे, हे उष्णतेचे विकार बरे होतात. भगंदर या विकारात भेगा फाटतात, रक्त येत, आग होते, अशा वेळी हे आसव काही दिवस घेतल्यास रूग्ण पूर्ण पणे बरा होतो.




रक्तात युरिक एसिड वाढल्याने, संधिवात आमवात, गुडघेदुखी कंबरदुखी, सुरू होते, सांध्यांना सूज येते, चालता येत नाही, वेदना होतात, अशा वेळी रोज दोन वेळा सारिवाद्दासव हे दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर घ्या, बरं वाटतं.. बरेचदा स्म्रुतिभ्रंश होतो, अपघातात स्म्रुति जाते, किंवा

 व्रुद्धावस्थेत, अल्झायमर मूळे मेंदू तिल पेशी सुकून विस्मरण होते. अशा रूग्णांना नियमित.. *सारिवाद्दासव* दिल्यास. फरक पडतो. आणि गेलेली स्म्रुति येते.

               उच्च रक्तदाबात चक्कर येते, रुग्ण कोमात जातो, . सारिवाद्दासव बहुमोल कार्य करते,या त्रासांवर. पिंपल्स, मुरूम, अॅक्नेमुळे चेहरा खराब होतो, काळे डाग पडतात, तेव्हा हे आसव काही दिवस घेतल्यास पिंपल्स येत नाही.कारण याने रक्त शुद्ध होते, नवीन रक्त तयार होते,

... आपण बघणार आहोत याचे प्रमुख घटक....👉


...सारिवाद्दासव मद्धे वापरले जाणारे घटक....👎


... नागरमोथा,लोध्र,पिंपळ साल,कचूर,नेत्रबला,पाठा, तमालपत्र, आवळा, गुळवेल, चंदन,लाल चंदन, छोटि विलायचि, सफेद चंदन, ओवा, कुटकि, बडी विलायचि,कुष्ठ, हिरडे, सनाय, धातकिफुले.मनुका, गुळ,वडाचि साल, अनंतमूळ,.. अश्या वनस्पती वापरून हे.. मौल्यवान..आसव तयार केले जाते..


... तेव्हा. अवश्य हे औषध घरात असू द्या...


..... आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे.

_

*

Featured post

Lakshvedhi