Tuesday, 30 May 2023

एन.एस.एफ.डी.सी. कर्जासाठी अर्ज केलेल्यांना

 एन.एस.एफ.डी.सी. कर्जासाठी अर्ज केलेल्यांना


मुंबई शहर व उपनगर कार्यालयात संपर्काचे आवाहन


               मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी जिल्हा कार्यालयामार्फत एन.एस.एफ.डी.सी. मुदती कर्ज योजना, महिला समृध्दी योजना, लघु ॠण योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले होते. ज्या अर्जदारांनी जिल्हा कार्यालय, मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे अर्ज दाखल केले होते, त्यांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी केले आहे.


               एन.एस.एफ.डी.सी., नवी दिल्ली यांच्याकडून कर्ज प्रस्तावासाठी निधी प्राप्त झालेला आहे. ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते, त्यांच्या कर्ज प्रस्तावातील त्रुटींच्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन कर्जाचे वितरण करावयाचे आहे. तरी सर्व अर्जदारांनी तत्काळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, गव्हर्नमेंट लेदर वर्किंग स्कूल कम्पाऊंड, खेरवाडी बांद्रा (पूर्व) मुंबई-४०००५१ या कार्यालयाशी संपर्क साधावा.

राज्यातील ४२४ अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठीचार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार


राज्यातील ४२४ अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठीचार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासन करणार

ग्रामपंचायतीतील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

                मुंबई, दि. ३० : राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ४२४ अंगणवाड्या दत्तक देत आहोत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासनातर्फे राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायती मधील ५५,७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


               सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन,एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, विपला फाऊंडेशन, ग्रामसेवा प्रतिष्ठान, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट, कार्बेट फाऊंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायती मधील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून 'अंगणवाडी दत्तक' धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.४ आक्टोबर २०२२ रोजी अंगणवाडी दत्तक धोरणासंदर्भात शासनाने सूचना निर्गमित केल्या होत्या. या धोरणांतर्गत कॉर्पोरेट संस्था, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. शासन अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत ४ ऑक्टोबर २०२२ पासून विविध १५६ सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ४,८६१ अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. आज विपला फाऊंडेशनने पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ३६८, ग्रामसेवा प्रतिष्ठानने रायगड आणि ठाणे मधील ३०, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टने मुंबई उपनगर आणि नाशिक मधील १०, कार्बेट फाऊंडेशनने सिंधुदुर्ग आणि पुणे मधील १६ अंगणवाड्या क्षमता वृद्धीसाठी दत्तक घेतल्या आहेत.


*****

राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्सच्या गतीमान विकासावर भर

 राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्सच्या गतीमान विकासावर भर


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


महाराष्ट्राच्या उद्योगांना आकर्षित करण्याच्या धोरणाचे केंद्राकडून कौतुक


राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी शिखर संनियंत्रण समितीची बैठक


               मुंबई, दि. 30 : राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्संच्या विकासाला अलिकडच्या काळात प्राधान्यक्रम दिला असून तेथील विकास कामे गतिमानतेने व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. केंद्र सरकारने देशभरात विविध औद्योगिक टाऊनशिपमध्ये उद्योग समुहासाठी 239 प्लॉट वितरित केले होते. त्यातील महाराष्ट्रात शेंद्रा-बिडकीन येथे 200 प्लॉटचे वितरण केल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. त्यावर केंद्रीय समितीने महाराष्ट्राच्या उद्योगांना आकर्षित करण्याच्या धोरण आणि कार्यप्रणालीचे कौतुक केले.


               राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉरच्या विकास आणि अंमलबजावणीबाबत शिखर संनियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीस दिल्लीहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक, जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल तर मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी उपस्थित होते.


               मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, शेंद्रा-बिडकीन येथील प्रकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केला आहे. याठिकाणी 197 प्लॉटचे वाटप केले आहे. यातील 150 प्लॉट उद्योगांसाठी आणि 47 प्लॉट हे निवासी वापराकरिता आहेत. सध्या 77 प्लॉटवर विकास कामे सुरू असून 27 उद्योगांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले आहे. येणाऱ्या वर्षांत गुंतवणूकदारांना उच्च पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार असल्याने आणखी 50 उद्योगांचे उत्पादन सुरू होईल, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याठिकाणी वीज पुरवठ्याचा परवाना मिळाला असून काही महिन्यात याठिकाणी कमी दरात उद्योगांना वीज दिली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


               औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम वेळेवर पूर्ण करावे, शिवाय औरंगाबाद-पुणे हरित महामार्गाची अधिसूचना निघाली असून यासाठी भूसंपादन लवकर व्हावे, या मार्गावर रेल्वे लाईनसाठी अतिरिक्त जागेचे भूसंपादन केल्यास दोन्ही प्रकल्पाच्या विकासाला गती येईल, करमाड (जि.औरंगाबाद) येथील रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे सायडिंग व मालाची चढउतार करण्याची व्यवस्था करावी, या मागण्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्राकडे केल्या.


               दिघी येथे २ हजार ४५० हेक्टरवर ही औद्योगिक नगरी उभी राहत असून यासाठी ९० टक्क्यांपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित भूसंपादन सुरू आहे. यामध्ये २ हजार २०५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. केंद्र शासनाकडून या प्रकल्पाला त्वरित मंजुरी मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. तसेच दिघी पोर्ट ते रोहा रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे लाईन प्रकल्पाची सुरूवात करावी, नियोजित प्रकल्पाच्या स्थानकापासून कोलाड रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे लाईन जोडणी मिळावी, या क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, चौपदरीकरण व्हावे. या प्रकल्पातील बोंडशेत व कुंभार्ते या गावांना पर्यावरण संवेदनशील भागामधून वगळण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.   


               सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातून दिल्ली-मुंबई, बंगळुरू-मुंबई आणि दिल्ली-नागपूर हे तीन औद्योगिक कॉरिडॉर आहेत. यामध्ये दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत शेंद्रा-बिडकीन औद्योगिक नगर- ऑरिक सिटी, दिघी पोर्ट औद्योगिक नगर (जि. रायगड)असे प्रकल्प सुरू आहेत. दिल्ली-नागपूर आणि बंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत औद्योगिक नगरी साठी सुयोग्य जागांचा शोध सुरू आहे. या औद्योगिक केंद्रांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार 49 टक्के निधी देणार आहे.


               केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या प्रस्तावांमध्ये लक्ष घालून ते मंजूर करण्यात येतील, अशी हमी वाणिज्यमंत्री श्री. गोयल यांनी यावेळी दिली.


               यावेळी देशभरातील औद्योगिक प्रकल्प, भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक राज्याने औद्योगिक प्रकल्पांची कामे प्राधान्याने करून घ्यावीत, त्या प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी यावेळी दिली. देशभरातील 11 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.


               केंद्रीय सचिव सुमिता दावरा यांनी देशभरातील सुरू असलेले प्रकल्प आणि भूसंपादन याबाबतची माहिती सादरीकरणातून दिली.


0000

बचतगटांच्या महिलांना आत्मनिर्भरतेसहशहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार

 बचतगटांच्या महिलांना आत्मनिर्भरतेसहशहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार


- मुख्याधिकारी विकास नवाळे


राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त


विकास नवाळे यांची दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत


 


               मुंबई, दि. 26 : शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित होण्यासाठी स्थानिक नागरिकांचा आणि त्यातही महिलांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. ही बाब विचारत घेऊन फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून बचतगटांमधील महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


               राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत शासकीय अधिकारी गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविणारे मुख्याधिकारी श्री. नवाळे यांनी बचतगटाच्या माध्यमातून फळझाडांची लागवड, त्यातून रोजगार निर्मिती तसेच घनकचरा व्यवस्थापनातून कंपोस्ट खत निर्मिती, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, ‘माझी वसुंधरा’ या अभियानाच्या माध्यमातून राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, कचरा लाखमोलाचा आणि शहरातील जेष्ठ नागरिक व महिलांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार, दि. 31 मे, 2023 आणि गुरुवार, दि. 1 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत ज्येष्ठ निवेदक सुषमा जाधव यांनी घे

तली आहे.


००००

जुनाट सर्दीदेखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते*

 *जुनाट सर्दीदेखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते*


ऋतू बदलाच्या काळात हमखास होणारा आजार म्हणजे सर्दी. प्रत्येकालाच कधी ना कधी सर्दीचा त्रास होतो. 


परंतु काहींना मात्र वर्षानुवर्षे सर्दी त्रास देत असते. सर्दीची योग्यवेळी चिकित्सा केली नाही तर पुढे खोकल्यापासून ते दम्यापर्यंत विविध आजार होऊ शकतात.


*सर्दीची कारणे :*


 थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी संपर्क येणे, पोट साफ न होणे, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, पचन व्यवस्थित नसणे, दिवसा झोपणे या कारणांमुळे सर्दीचा त्रास होतो. 


*सर्दीची लक्षणे*


नाकातून पाणी वाहणे, नाक बंद होणे, वारंवर शिंका येणे, डोके दुखणे किंवा जड होणे, आवाजात बदल होणे, अंग दुखणे, ताप आल्यासारखा वाटणे, दम लागणे अशी अनेक सर्दीच्या रुग्णात सामान्यपणे आढळून येतात. अनेक रुग्णांना तर 2-3 रुमाल घेऊन बाहेर पडावे लागते. नाक सतत गळत असते. अनेकांना एकावेळा 20-20 शिंका येतात. धुळीची अ‍ॅलजी असणा-यांना धुळीशी संपर्क येताच त्रास सुरू होतो. केवळ चादर झटकल्याचे निमित्त होऊन सर्दीचा त्रास सुरू होतो. औषधे घेतल्यास तात्पुरते बरे वाटते, परंतु परत सर्दीचा त्रास सुरू होतो. वीस-वीस वर्षांपासून सर्दीने त्रस्त असलेले अनेक रुग्ण मी प्रॕक्टीसमध्ये पाहिलेले आहेत. 


*सर्दीवरील उपचार :-*


आयुर्वेदीय उपचारांच्या साहाय्याने जुनाट सर्दी देखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते. पंचकर्मापैकी एक असलेले ‘नस्यकर्म’ हे सर्दीच्या रुग्णांसाठी एक वरदानच आहे. विशिष्ट पद्धतीने औषधी तेल नाकात सोडण्याच्या प्रक्रियेला नस्यकर्म म्हणतात. नस्यकर्मामुळे नासामार्गातील दोष बाहेर पडून सर्दीची लक्षणे त्वरेने कमी होतात. अ‍ॅलर्जीमुळे होणा-या सर्दीमध्ये सुद्धा नस्याचा अतिशय उत्तम उपयोग दिसून येतो. यासोबतच काही आयुर्वेदीय औषधांचे सेवन केल्यास अनेक वर्षांच्या सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो. 

 

*काय करावे* 


◼️कोल्ड्रींक्स, आइस्क्रीमसारख्या थंड पदार्थांचे सेवन टाळावे. 

◼️केळी, काकडी, दही, टोमॅटो हे पदार्थ टाळावेत.

◼️गरजेपेक्षा अधिक पाणी पिऊ नये.

◼️पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे.

◼️केस धुतल्यानंतर लवकर कोरडे करावेत.

◼️शिंका जास्त येत असल्यास ‘क्षवथु तेल ’ नाकात टाकावे.

◼️रात्री सर्दीचा त्रास अधिक होत असेल तर झोपताना थोडे फुटाणे खावेत, त्यानंतर पाणी पिऊ नये.

◼️भाताचे प्रमाण कमी करावे.

◼️शक्यतो एसीचा वापर टाळावा.


*संकलन-* 


डॉ. प्रमोद ढेरे

Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय... ???*

💉🇩 🇮 🇧 🇪 🇹 🇪 🇸 💊

*https://youtu.be/4p1erliQjBA*

*👉Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय... ???*
      ही तुमची समस्या आहे..पण घाबरु नका...
    *👉 हे पूर्ण वाचा.....*
  *मधुमेह म्हणजे काय...?*         

      रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह..... शरीराला आववश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते..... स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो..... ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते..... पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते..... काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते..... त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते..... मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते..... आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते....
कोणती आहेत मधुमेहाची लक्षणे:-
१) सतत तहान लागणे....
2) घशा मध्ये कोरड पडणे
3) हाता-पायाची खाज सुटणे...
4) जखम बरी न हाेणे...
5) वारंवार लघवी ला येणे ..
6)लघवी करताना त्रास हाेणे...
7) डाेळ्यांची जळजळ हाेणे व नजर दोष निर्माण होणे आदी....
8)पायाच्या तळव्यांची जळजळ होणे
9)पोट साफ न होणे/पचनक्रिया मंदावणे, बिघडणे.
      पण घाबरु नका.
आपल्या सर्व समस्या साठी.....
*संपूर्ण सुरक्षित हर्बल 100% आयुर्वेदिक                                        FDA,FSSI,******   ***Approved *****
१) *अँटॉक्स D* सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते....
२) इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते....
३) आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते....
४) रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो.... ह्याशिवाय पाचक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.)पोट साफ होणे, जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच....
याच बरोबर वजन कमी करणे, High Cholesterol , Blood pressure या रोगा वर ही उपयोगी आहे़....
*अँटॉक्स D* मध्ये मधुमेहासाठी सिद्ध औषधी गुण घटक उपलब्ध आहेत... जे की शरीरातील ईंन्सुलीनला मदत करतात... आणि रक्तातील साखर नैसर्गिक नियंत्रित होते...
शरीरातील इंन्सुलीनचा साठा वाढवते....
इंन्सुलीनला मजबुत करते....
शरीरातील ग्लुकोज कमी करते....
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते....
*अँटॉक्स D व T* वापरा मधुमेह ,शुगर,daibitc वर नैसर्गिक नियंत्रण मिळवा .....
         
*संपर्क*
*आधार मधुमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर* 
    *Call☎️ 7875481853*
*फोन करा पूर्ण माहिती मिळेल*
🪀 *https://wa.me/7875481853?text=शुगरमुक्तीकिट*

*------------------------*

गौ माता

 1 किलो गोबर की आय 8000₹ देखिए कैसे 👍


Featured post

Lakshvedhi