Tuesday, 30 May 2023

लोखंडाची भांडी स्वयंपाकासाठी वापरावी का?*

 *लोखंडाची भांडी स्वयंपाकासाठी वापरावी का?* 

आपण स्वयंपाक करतो तेव्हा स्टील, अॅन्युमिनिअम याबरोबरच लोखंडी तसेच तांब्या-पितळ्याची भांडी वापरतो. पूर्वीच्या काळी स्टील आणि अॅल्युमिनिअम आणि नॉन स्टीक यांसारखी भांडी फारशी उपलब्ध नव्हती तेव्हा तांबे, पितळ आणि लोखंडाचीच भांडी स्वयंपाकासाठी वापरली जायची. आता पुन्हा नव्याने लोखंडी भांडी वापरण्याचे फॅड आले आहे. जुने ते सोने म्हणत हल्ली अनेक घरांत लोखंडी कढई, लोखंडी तवा, पळी आवर्जून वापरली जाते. शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळावे यासाठी अनेकदा डॉक्टरही लोखंडी भांड्यांचा वापर करायला सांगतात. भाजी, आमटी किंवा अगदी मूगाची खिचडी करण्यासाठी ही लोखंडी भांडी आवर्जून वापरली जातात. यामध्ये केलेले पदार्थ काही प्रमाणात काळे होत असल्याने कुटुंबातील मंडळी नाक मुरडतात. पण यात केलेल्या पदार्थांना येणारी लोखंडाची चव वेगळाच स्वाद देते. आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर ती भरुन निघण्यासाठी लोखंडी भांड्यांचा वापर उपयुक ठरतो. हे सगळे खरे असले तरी लोखंडी भांडी वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...

१. भाजी, आमटी, कढी या गोष्टींना फोडणी देण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी लोखंडी कढईचा आवर्जून वापर करु शकतो. 

२. पुऱ्या, भजी, इतर तळण हेही आपण लोखंडी कढईमध्ये करु शकतो. पालेभाज्याही लोखंडी कढईमध्ये केलेल्या चालतात. 

३. आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्यास अन्नपदार्थ शिजवल्यानंतर त्यामध्ये लोखंडी पळी घालून ठेवावी. त्यामुळे पदार्थात पळीतील लोह उतरते आणि शरीराला लोह मिळण्यास मदत होते. 

४. पोळी किंवा भाकरीसाठी इतर नॉन स्टीक किंवा इंडालियमचे तवे वापरण्यापेक्षा लोखंडी तवा वापरलेला केव्हाही चांगला.

५. आमसूलाचे सार, टोमॅटो सार आवर्जून लोखंडी कढईमध्ये करावेत. त्याला एक वेगळा स्वाद तर येतोच पण या पदार्थांबरोबर लोहाची प्रक्रिया होते जे शरीरासाठी चांगले असते. 

६. लोखंडी कढईमध्ये दही किंवा दह्याचे पदार्थ करणे टाळावे. लिंबाचा वापरही लोखंडी कढईत टाळावा.

७. अन्नपदार्थ केल्यानंतर तो लोखंडी भांड्यात ठेवला तर तो काही वेलाने काळसर दिसायला लागतो. त्यामुळे तो खाण्यासाठी चांगला की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. पण लोखंडी कढईमध्ये आपण ५ ते ६ तास अन्नपदार्थ ठेऊ शकतो. त्याहून जास्त तास ठेऊ नये. 

८. लोखंडी कढईला गंज आलेला नाही ना हे पाहावे. यासाठी लोखंडी कढई स्वच्छ धुवून, कोरडी करुन, नीट वाळवून मगच ती वापरावी.

*Nutritionist & Dietitian* 

 *Naturopathist* 

 *Dr. Bhorkar* 

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

🌺🌺

उष्माघात*_*उन्हामुळे मृत्यू का होतो* ?

 _*उष्माघात*_*उन्हामुळे मृत्यू का होतो* ?

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

*आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*.

घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे.

पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.

- जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

*शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं* (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)

- *स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात*.

*रक्तातलं पाणी कमी झाल्या* मुळे *रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना* (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

- माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व *आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे*..

*ऊष्माघात टाळा*.

*उन्हाचा पारा चढत आहे*.. त्यामुळे *उष्माघात टाळण्या* साठी खालील उपाययोजना करा..

शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.

- *काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या*.

शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.

- *डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा*.

- आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.

- कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा.

*दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा*.

- लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.

*अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास* तत्काळ डाॕक्टरांचा सल्ला घ्या.

ही पोस्ट फक्त पंधरा नव्हे तर हजारो लोकांना पाठवा. फक्त चांगली बातमी येईल याची अपेक्षा न करता चांगल्या बातम्या तयार करा

🙏🙏🙏🙏

_*

शूगर झालेल्या लोकांनी मरेपर्यंत allopathi गोळ्या खाण्यापेक्षा एक वेळ नक्की आपल्या संस्थेचा Antox D व Antox tea हा

 *शूगर झालेल्या लोकांनी मरेपर्यंत allopathi गोळ्या खाण्यापेक्षा एक वेळ नक्की आपल्या संस्थेचा Antox D व Antox tea हा फॉर्मूला वापरा.*

*100 % result no side effects*

*बरेच लोक पैशाचा विचार करून आयुर्वेदिक चांगली औषध घेण्याचे टाळतात व allopathic गोळ्या खात राहतात. पन याच गोळ्या भविष्यात आपले अवयव निकामी करतात. व नंतर यांना बरे करण्यासाठी परत आपले लाखो रुपये दवाखान्यात जातात.*

*ज्यांना आपली शूगर नॉर्मल होताना पहायचे आहे त्यांनी नक्की आपल्या संस्थेचा Antox D व Antox tea हा फॉर्मूला वापरा.*

*व ज्यांना फॉर्मूला घेणे possible नाही आहे. त्यांनी स्वतः च्या घरी नियमित पणे काढे करून घ्यावे. व प्रयत्न हाच करावा की allopathic गोळी कमी कशी करता येईल.*

समर्थ सोशल फौंडेशन, जनरल हॉस्पिटल कोल्हापूर 

*Contact - 7875481853*

धन्यवाद. 🙏🙏

जिवन गाणे गात रहावे.

🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 गर्जा महाराष्ट्र माझा*तुमच्या सारखी किंवा तुमच्या पेक्षा जास्त चांगली असलेली माणसे तुम्हाला कधीच नावे ठेवणार नाहीत, नावे तीच माणसे ठेवतील ज्यांना खात्री असते की ती तुमच्या एवढी चांगली होऊ शकत नाहीत.*

😊

🙏

*शुभ सकाळ*जो व्यक्ती स्पष्ट, साफ, सिधी बात करता हैं उसकी वाणी तीव्र और कठोर जरूर होती हैं किंतू ऐसा व्यक्ती कभी किसी को धोखा नही देता......

आपका दीन मंगलमय हो 🙏माणसाने “शिक्षणा”आधी “संस्कार”, ”व्यापारा” आधी “व्यवहार”आणि ”देवा”आधी “आईवडीलांना” समजुन घेतले तर, “जीवनात” कोणतीच अडचण येणार नाही !*

*🍁🍁🍁🍁**जब तक किस्मत का सिक्का हवा में है, तब तक खुद के बारे में फैसला कर लो....*

*क्योंकि जब वो नीचे आएगा, तब अपना फैसला खुद सुनाएगा....!!*

🙏🙏🙏🙏🙏

ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू कारण गढूळ पाण्याला नका... ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दया. गाळ आपोआप खाली बसते...... *जीवन में हमेंशा राय लेने की जरुरत नहीं होती हैं! कभी कभी सम्भाल लेने वाले हाथ, सुन के लेने वाले कान और समझ के लेने वाले दिल की भी जरुरत होती हैं!*

       *सुप्रभात*चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिसेने हळुहळु जाणे केव्हाही चांगले..

🚩🚩 🚩🚩: *समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो,काहीजण त्यातुन मोती उचलतात,काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात,हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...!!!*

🌹💐🙏

 🙏Shri Swami Samarth 🙏

शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचेभारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

 राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचेभारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

— वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

            मुंबई, दि. 29 : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास श्री. तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून उद्या त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

            सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे नियुक्त राहण्याची सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, सचिन तेंडुलकर आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी उद्या दि. ३० मे २०२३ रोजी सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम होईल. सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.

            राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून 'महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान' म्हणजेच 'स्वच्छ मुख अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.

Monday, 29 May 2023

स्काऊटस आणि गाइडसचे कामकाजजुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा

 स्काऊटस आणि गाइडसचे कामकाजजुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा

- मंत्री गिरीश महाजन

            मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाइडस या संस्थेचे जुन्या नियमानुसार कामकाज करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस या संस्थेच्या राज्य मुख्य आयुक्त पदाची निवडणूक घेण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे यांची उपस्थिती होती.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाइडस या संस्थेची नव्याने तयार करण्यात आलेली नियमावली मंजुरीसाठी शासनास पाठविण्यात आली आणि त्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ही नियमावली भारत स्काऊटस आणि गाइडस राष्ट्रीय कार्यालय, नवी दिल्ली यांना पाठविण्यात आली आहे.

            आमदार श्री. बावनकुळे यांच्या शिष्टमंडळाने जुन्या नियमावलीनुसार कामकाज सुरू ठेवण्याची विनंती केली असल्याने त्याबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्यातील स्काऊटस आणि गाइडसचे पदाधिकारी उपस्थित होते.

0000

Featured post

Lakshvedhi