Saturday, 6 May 2023

करिअरविषयक मार्गदर्शनासाठी राज्यात लवकरच हेल्पलाइन

 करिअरविषयक मार्गदर्शनासाठी राज्यात लवकरच हेल्पलाइन


शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 500 रुपये विद्यावेतन

              - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा


छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचा शुभारं

            मुंबई, दि. 6 – राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे, त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन (स्टायफंड) देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. 


            कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन करून या राज्यस्तरीय उपक्रमाचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, डॉन बॉस्को संस्थेचे संचालक फादर अँथनी पिंटो, माजी नगरसेवक हरीश भांदिर्गे आदी मान्यवर उपस्थित होते. 


            सुमारे 3 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले. शिबिराच्या ठिकाणी विविध करिअर विषयक संधी, रोजगार-स्वयंरोजगार विषयक शासकीय योजना, देशातील आणि परदेशातील विविध शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक कर्जविषयक योजना आदींची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सना विद्यार्थ्यांसह पालकांनीही भेट देऊन माहिती घेतली. याठिकाणी विद्यार्थ्यांसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन करण्यात येत होते. यासोबतच दिवसभर शिक्षण आणि करिअरविषयक क्षेत्रातील तज्ज्ञानी विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, देशात मागील काही वर्षात औद्योगिक, कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. त्या बदलांना अनुसरून विविध कौशल्ये असलेले रोजगार या क्षेत्रामध्ये व्यापक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. पण या कौशल्याचे प्रशिक्षण कोठे घ्यायचे, त्यासाठीच्या प्रशिक्षण संस्था कुठे आहेत, प्रवेशप्रक्रिया कशी असते याची माहिती ज्ञान अनेकांना नसते. त्यामुळे अनेक युवक-युवती पारंपरिक शिक्षण, प्रशिक्षणच घेताना दिसतात. या युवकांसाठी भविष्याची विविध नवीन क्षितिजे खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम, स्किल्स त्यांना माहीत व्हावेत यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात दि. 6 मे ते 6 जून 2023 पर्यंत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन केले जाणार आहे. राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे आणि बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


 


स्किलिंग, अपस्किलिंग गरजेचे - प्रधान सचिव मनिषा वर्मा


 


            कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, आपले ज्ञान, कौशल्य सतत अद्ययावत ठेवणे ही आता काळाची गरज बनली आहे. बदलत्या तंत्रज्ञानास अनुसरून सतत अद्ययावत ज्ञान मिळविणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच कौशल्य विकास विभाग आता स्किलिंग, अपस्किलिंगवर भर देत आहे. कौशल्य विकास विभागामार्फत आयोजित या करिअर शिबिरांमधून राज्यातील विद्यार्थ्यांना करिअर करण्याची नवनवीन क्षितिजे खुली होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


            कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी यांनी प्रास्ताविक केले, तर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या नवनवीन अभ्यासक्रमांविषयी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर 

यांनी माहिती दिली.


००००


जामुन एक ऐसा वृक्ष जिसके अंग अंग में औषधि है।

 *जामुन

Share by < R k Mishra  retired dy director DSYS 
एक ऐसा वृक्ष जिसके अंग अंग ,  
औषधि है।*🍇


🍇अगर जामुन की मोटी लकड़ी का टुकडा पानी की टंकी में रख दे तो टंकी में शैवाल, हरी काई नहीं जमेगी और पानी सड़ेगा भी नहीं। 


🍇जामुन की इस खुबी के कारण इसका इस्तेमाल नाव बनाने में बड़ा पैमाने पर होता है।


🍇पहले के जमाने में गांवो में जब कुंए की खुदाई होती तो उसके तलहटी में जामून की लकड़ी का इस्तेमाल किया जाता है जिसे जमोट कहते है। 


🍇दिल्ली की निजामुद्दीन बावड़ी का हाल ही में हुए जीर्णोद्धार से ज्ञात हुआ 700 सालों के बाद भी गाद या अन्य अवरोधों की वजह से यहाँ जल के स्तोत्र बंद नहीं हुए हैं। 


🍇भारतीय पुरातत्व विभाग के प्रमुख के.एन. श्रीवास्तव के अनुसार इस बावड़ी की अनोखी बात यह है कि आज भी यहाँ लकड़ी की वो तख्ती साबुत है जिसके ऊपर यह बावड़ी बनी थी। श्रीवास्तव जी के अनुसार उत्तर भारत के अधिकतर कुँओं व बावड़ियों की तली में जामुन की लकड़ी का इस्तेमाल आधार के रूप में किया जाता था।


🍇स्वास्थ्य की दृष्टि से विटामिन सी और आयरन से भरपूर जामुन शरीर में न केवल हीमोग्लोबिन की मात्रा को बढ़ाता। पेट दर्द, डायबिटीज, गठिया, पेचिस, पाचन संबंधी कई अन्य समस्याओं को ठीक करने में अत्यंत उपयोगी है।


🍇एक रिसर्च के मुताबिक, जामुन के पत्तियों में एंटी डायबिटिक गुण पाए जाते हैं, जो रक्त शुगर को नियंत्रित करने करती है। ऐसे में जामुन की पत्तियों से तैयार चाय का सेवन करने से डायबिटीज के मरीजों को काफी लाभ मिलेगा।


🍇सबसे पहले आप एक कप पानी लें। अब इस पानी को तपेली में डालकर अच्छे से उबाल लें। इसके बाद इसमें जामुन की कुछ पत्तियों को धो कर डाल दें। अगर आपके पास जामुन की पत्तियों का पाउडर है, तो आप इस पाउडर को 1 चम्मच पानी में डालकर उबाल सकते हैं। जब पानी अच्छे से उबल जाए, तो इसे कप में छान लें। अब इसमें आप शहद या फिर नींबू के रस की कुछ बूंदे मिक्स करके पी सकते हैं। 


🍇जामुन की पत्तियों में एंटी बैक्टीरियल गुण होते हैं. इसका सेवन मसूड़ों से निकलने वाले खून को रोकने में और संक्रमण को फैलने से रोकता है। जामुन की पत्तियों को सुखाकर टूथ पाउडर के रूप में प्रयोग कर सकते हैं. इसमें एस्ट्रिंजेंट गुण होते हैं जो मुंह के छालों को ठीक करने में मदद करते हैं। मुंह के छालों में जामुन की छाल के काढ़ा का इस्तेमाल करने से फायदा मिलता है। जामुन में मौजूद आयरन खून को शुद्ध करने में मदद करता है।


🍇जामुन की लकड़ी न केवल एक अच्छी दातुन है अपितु पानी चखने वाले (जलसूंघा) भी पानी सूंघने के लिए जामुन की लकड़ी का इस्तेमाल करते। 


*☘️एक कदम आयुर्वेद की ओर☘️*

Oooooooooommmmmmmmmm






 

पांढरी किंवा पिवळी कावीळ वरील उपाय

 पांढरी किंवा पिवळी कावीळ वरील उपाय : केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !

आरोय टीप्स

 पांढरी किंवा पिवळी कावीळ वर उपाय केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !


मेडिकल सायन्सने कितीही जरी प्रगती केलेली असली तरी कावीळ हा रोग आहे तो आयुर्वेदिक उपायाने जेवढ्या लवकर बरा होतो तेवढ्या लवकर दवाखान्यामध्ये तो कधीही बरा होत नाही.


कावीळ साठी तुम्हाला माहीत असेल की ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे औषध तुम्हाला दिली जातात काही ठिकाणी नाका मध्ये ड्रॉप टाकले जातात काही ठिकाणी तुम्हाला दह्यामध्ये औषध दिल जात तर काही ठिकाणी केळीमध्ये औषध दिलं जातं.


तर हे केळी मधल औषध आहे ते तुम्हाला सांगणार आहे केळी मधलं औषधे सगळ्यात सोप आहे आणि सर्वांना करता येईल अस आहे आणि सहज उपलब्ध होणार आहे म्हणून हा उपाय कोण घेणार आहोत


पावसाळ्याचे दिवस आहेत तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कावीळ होण्याचं जास्त प्रमाणामध्ये जाणवते. कारण कावीळ पाण्यामधून जास्त प्रमाणामध्ये होत असते. रक्तामधील बिलिरुबिन पातळी वाढली तर आपली त्वचा रंग बदलून ती पिवळसर दिसायला लागते आणि आपण त्याला कावीळ झाली असे म्हणतो.


कावीळ ही ही दोन प्रकारची असते. एक पांढरी कावीळ आणि दुसरी पिवळी कावीळ. कोणतीही कावीळ असू देत या औषधाने ती सहज रित्या निघून जाते.


त्याची लक्षणे काय असतात तर खूप अशक्‍तपणा जाणवतो डोकेदुखी ताप भूक कमी होणे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे मळमळ होणे त्याचबरोबर तुमचे डोळे आणि तुमची जीभ पिवळसर रंगाची होणे ही काविळीची सामान्य लक्षण असतात. पित्तरस रक्तामध्ये मिसळला तर आपल्या त्वचेला जास्त पिवळा रंग येत असतो आणि जीवाणूंचा संसर्ग होऊन यकृताला सूज येते आणि तेव्हा आपल्याला या आजाराचे स्वरूप आहे ते गंभीर होत असत.


त्याला इंग्रजीमध्ये हिपॅटायटीस असं म्हणतात टायफाईड होऊन या आजारामुळे त्याला बाधा होऊन कावीळ होऊ शकते. तर कावीळ एक सामान्य आजार आहे सर्वांना होऊ शकतो त्याचा वेळेवर जर उपाय केला तर कावीळ कुठल्याही प्रकारची असली तरी ती सहजपणे बरी होते.


कावेळीसाठी केळीमध्ये दिले जाणारे औषध सर्वत्र प्रसिद्ध औषध असते. हे औषध कसं करायचं आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला औषध दिलं जातं औषध देणारा कडे जातो आणि हे औषध काय आहे ते दोन-तीन दिवस आपण घेऊन येतो केळीमध्ये आणि आपण खात असतो तर हे इतकं सामान्य औषध आहे की तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एवढ्या सामान्य गोष्टींमधून कावीळ आहे सहजपणे बरी होते.


 या उपायासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. केळीच्या बऱ्याच जाती आहेत गावठी आणि जवारी. त्याच्यामध्ये कुठलीही केळीची जात या उपायासाठी चालते तुम्हाला जर गावठी केळी असेल तर अतिउत्तम. तरी त्यासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. हे केळ पिकलेले असावा


 या उपायासाठी आपण अर्ध केळी घेऊया तुम्ही पाहिले असेल ज्या ठिकाणी तुम्ही हे औषध घेतलेल आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अर्ध्या केळीमध्ये औषध दिलं जातं. तर अर्धी केळी आपल्याला मधून कापून घ्यायचे आहे यामध्ये एक ग्रॅम चुना घालायचा आहे एक ग्राम म्हणजे एका गव्हाच्या धान्यात दाण्या एवढा घालायचा आहे.


केळ सोलून ते मधोमध कापून त्यामध्ये चुना लावल्यानंतर याची चव असते ती थोडीशी कडसर लागते. तेव्हा आपल्याला ते चांगल्या पद्धतीने असो मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्या माणसाला काविळ झालेली आहे त्या माणसाला उपाशी सकाळी उपाशीपोटी खायला द्यायच आहे.


अशा पद्धतीने तुम्ही औषधे घेतलेल असेल. केळीमध्ये दिलं जाणारं कावीळचे औषध सलग जर तुम्ही पाच दिवस घ्यायचं आहे हे उपाय उपाशीपोटी करायचा आहे तर कितीही प्रमाणात तुम्हाला कावीळ झालेली असेल तर ती सहजरीत्या उतरते.


कावीळ झाली असेल तर सलग पाच दिवसांमध्ये या पद्धतीने औषध तुम्ही घेऊन पहा. तुम्ही एखाद्या ठिकाणी केळी मध्ये दिलेले औषध पाहिला असेल तर या पद्धतीने तुम्ही कावीळ वर उपाय करा. कावीळ सहजरीत्या उतरून जाते. हे सहज रित्या उपलब्ध होणार आणि सर्वांना करता येणारा साध सोप औषध आहे. तुम्हाला पहिल्या दिवसापासून याचा फरक जाणवेल


 यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळायची आहेत. तुम्हाला पूर्ण विश्रांती घ्यायची आहे आणि विश्रांती घेत असताना तुम्हाला तिखट वगैरे पदार्थ तेलकट आहे तूपकट हे पदार्थ खायच टाळायचे आहे. दारू पूर्णपणे टाळायची. त्याचबरोबर मांसाहार करणे पूर्णपणे टाळायच आहे. जरी कावीळ पाच दिवसांमध्ये उतरली तरी21 दिवसांपर्यंत तुम्हाला हे पथ्य पाळायचे आहेत.


कोणत्याही प्रकारची काय वेळ झाली असेल तर अर्धा केळी मध्ये चुना घालून सलग पाच दिवस हा उपाय केला तर कावीळ सहजरित्या उतरून जाईल. तर हा उपाय अवश्य करून बघा आणि याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर द्या.


.. अतिशय मौल्यवान माहिती.. 👆


*⭕️

एरंडेल तेल*

 *एरंडेल तेल*



एरंडेल तेलाला आयुर्वेदात अमृताची उपमा देण्यात आली आहे. एरंडेल तेलाचे आरोग्यविषयक अनेक उपयोग आहेत ते कोणते ते आपण पाहूया.


१. पोट साफ होण्यासाठी


एरंडेल तेल घेतल्याने पोटात न दुखता जुलाब होऊन पॉट साफ होते. वृद्धांच्या पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही हे रोज घेता येते. सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात एक चमचा एरंडेल तेल घ्यावे.


२. डोळ्यांच्या विकारांवर


रांजणवाडी किंवा डोळ्याच्या इतर तक्रारींवर यासाठी एरंडेलाचा थेंब बोटावर घेऊन तो काजळासारखा पापण्याच्या आत फिरवावा. तसेच एरंडेल तेल पापण्यांना लावल्याने पापण्यांची देखील दाट होतात.


३. आमवात आणि सांधेदुखी


युरिक ऍसिड वाढणे आमवात, सायटिका, गाऊट, गुडघेदुखी हे हल्लीच्या तरुण वयात देखील होऊ लागले आहेत. ज्यांना या समस्या आहेत त्यांनी आहारात रोज सकाळी रात्री थोडं तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. ८-१५ दिवस करून पाहावे. दुखऱ्या सांध्यांना सुंठ पावडर एरंडेलचा लेप लावल्यास आराम पडतो.


४. लहान मुलांसाठी


लहान मुलांना मधातून किंवा कणकेची पोळी करताना त्यात एरंडेल व चिमूटभर सुंठ पावडर टाकून ती द्यावी. हे असे महिन्यातून किमान एकदा तरी मुलांना द्यावे. पूर्वी नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही मध एरंडेलाचे चाटण देण्याची पद्धत होती.


५. गर्भवतींसाठी


गर्भवतींनी ‘सिझेरियन’ टाळायचे असेल तर नववा महिना लागताच रोज एक चमचा एरंडेल घ्यावे.( हे घेताना एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.


६. रक्तदोषात गुणकारी


अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे.


७. उत्तम झोप साठी  


अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. सतत विचार सुरु राहणे यामुळे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे नक्कीच गुण येतो.

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


एकावे ते नवलच

 ✨ इंग्रजांनी रोवलेला एक वैशिष्ट्यपूर्ण ‌दगड(पोलपोस्ट) जो मनकांहळ्ळी, जिल्हा हासन, कर्नाटक येथे आहे. या दगडाच्या उजव्या बाजूला पडलेले पावसाचे 🌧️पाणी कावेरी नदीतुन पुर्व दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात जाते/जाऊन मिळते आणि डाव्या बाजूला पडलेले पावसाचे🌧️पाणी नेत्रावती नदीतुन पश्चिमेला अरबी समुद्रास जाऊन मिळते. निसर्गाची अजब-गजब किमया जी वर्षांनुवर्षे अविरतपणे सुरू आहे. ह्या नैसर्गिक आणि अद्भुत कलाविष्कारास सविनय नमन🙏. ज्या व्यक्ती ने निरिक्षण पुर्वक हे शोधून काढले त्यालाही नमन 🙏आणि सरतेशेवटी ज्याने ही माहिती पाठविली त्याचेही अभिनंदन👌👏.👍👍💐💐💐


Friday, 5 May 2023

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून 8 हजारांहून अधिक रुग्णांना 60कोटी 48 लाखांची आर्थिक मदत

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून

8 हजारांहून अधिक रुग्णांना 60कोटी 48 लाखांची आर्थिक मदत


               मुंबई, दि. 5 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या 10 महिन्यांत 8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत दिली आहे.


            मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 1031 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 1237 रुग्णांना 10 कोटी 27 लाख, मार्च 2023 मध्ये 1469 रुग्णांना 11 कोटी 95 लाख तर एप्रिल मध्ये विक्रमी 1984 रुग्णांना 9 कोटी 93 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi