Tuesday, 2 May 2023

चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी* *पाणी का प्यावे?*

 *चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी* *पाणी का प्यावे?* 


*सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता?*


*कपभर चहा किंवा कॉफी घेता.... ?*


अनेकांना ही सवय आहे. असे आपल्यापैकी अनेकजण करतात. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. ही सवय चुकीची असल्याची जाणीव अनेकांना आहे. परंतु, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी काहीही घेतल्यास आरोग्यावर सारखाच विपरीत परिणाम होतो, हे खूप लोकांना माहीत नाही.


कॉफी किंवा चहा घेण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे, याची अनेकांना कल्पना नाही. सकाळी किंवा संध्याकाळी, चहा किंवा कॉफी घेण्याआधी थोडं पाणी अवश्य प्या. ही सवय आरोग्यदायी आहे.


*चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?*


चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी पिण्यामागचे कारण म्हणजे त्यामुळे पोटातील ॲसिडिटी कमी होते. चहा सुमारे ६ ph म्हणजे ॲसिडिक असतो आणि कॉफी ५ ph म्हणजे ॲसिडिक रेंज थोडीसी कमी आहे. म्हणून तुम्ही जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेता तेव्हा ॲसिडिटी वाढते. तसंच काहीशी अल्सर्स आणि कॅन्सरच्या धोक्याची शक्यता असते. जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेण्याआधी पाणी प्यायलात तर पोटातील ॲसिडची पातळी काहीशी सौम्य होते व पोटाच्या व इतर आरोग्याची हानी कमी होते. त्याचबरोबर चहाच्या अधिक ॲसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.

          खरं जर चहा किंवा कॉफी आपले भारतीय पेय नाहीच. त्यामुळे ते पिणे टाळणे उत्तमच. पण अगदीच प्यायचा झाला तर वरीलप्रमाणे काळजी अवश्य घ्या.


 *


सहजपणे करू शकत असाल 'या' गोष्टी तर समजून घ्या तुम्ही पूर्णपणे फिट आहात....

 *सहजपणे करू शकत असाल 'या' गोष्टी तर समजून घ्या तुम्ही पूर्णपणे फिट आहात.....!*


सगळ्यांनाच जास्त आणि निरोगी जीवन जगण्याची इच्छा असते. पण आपण आतून किती फिटी किंवा निरोगी आहोत हे माहीत करून घेणं जरा अवघड असतं. अशात एक्सपर्ट्सनी अशा काही फिजिकल एक्टिविटीबाबत सांगितलं आहे ज्याद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्ही आतून किती फिट आहात. चला जाणून घेऊ त्या एक्टिविटीबाबत....


*एका पायावर बॅलन्स करणे...*

हे तुम्हाला फारच बालिश वाटू शकतं, पण जर तुम्ही तुमचं शरीर एका पायावर उभं राहून व्यवस्थित बॅलन्स करू शकत असाल तर हा इशारा आहे की, तुमचा ब्रेन फार हेल्दी आहे. अशात हे बघणं फार गरजेचं असतं की, तुम्ही 60 सेकंदासाठ केवळ एका पायावर उभे राहून शरीराचं वजन उचलू शकता किंवा नाही. जर तुम्ही असं 20 सेकंदासाठीही करू शकत नसाल तर समजा की, तुम्हाला पुढे जाऊन मेंदुसंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, एका पायावर उभे राहण्याच्या 10 सेकंदाच्या बॅलन्स टेस्टमध्ये अयशस्वी ठरणाऱ्या वृद्ध वयस्कांना पुढील 10 वर्षात मृत्यूचा धोका अधिक असतो.


*चेअर टेस्ट...*

ही टेस्ट करण्यासाठी एक खुर्ची घ्या. या खुर्चीला हात ठेवण्याची जागा असू नये. खुर्चीवर बसा आणि नंतर हे बघा की, तुम्ही किती वेळा खुर्चीवरून उठून बसू शकता. यूकेमध्ये करण्यात आलेल्या एका स्टडीमधून समोर आलं की, जे वयस्क 20 सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळात 10 वेळा असं करू शकले त्यांची जास्त आणि निरोगी जीवन जगण्याची शक्यता त्या लोकांपेक्षा जास्त होती जे असं करू शकले नाहीत. हा टास्क करण्यासाठी तुमच्या लोअर बॉडीच्या मसल्स मजबूत असणं गरजेचं असतं.


*पायाच्या बोटांना स्पर्श...*

हे करण्यासाठी जमिनीवर बसा आणि दोन्ही पाय सरळ करा. त्यानंतर हातांनी दोन्ही पायांच्या अंगठ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असं करू शकत नसाल तर हा इशारा आहे की, तुम्हाला पुढे जाऊन हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अभ्यासकांनी सांगितलं की, फ्लेक्लिबल बॉडी, फ्लेक्सिबल आर्टरीजकडे इशारा करते. तुमच्या लाइफस्टाईलमुळे तुमच्या आर्टरीज कठोर होतात. त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका जास्त वाढतो.


*किती वेगाने चढता पायऱ्या...* 

गॅलिसियामध्ये यूनिवर्सिटी हॉस्पिटल कोरूनाच्या अभ्यासकांनी केलेल्या एका रिसर्चनुसार, जर तुम्ही न थांबता पायऱ्या सहजपणे चढू शकत असाल तर तुमचा वेळेआधी मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. अभ्यासकांना आढळलं की, ज्या लोकांना पायऱ्या चढण्यात समस्या होते, त्या लोकांचा मृत्यू वेळेआधी होण्याचा धोका अधिक असतो. सोबतच कॅन्सरचा धोकाही अधिक असतो.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार,


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



कण कण चे तीळ अद्भुत फायदे*

 *तिळाचे .. अद्भुत फायदे*


१) रोज २५ ग्रँम तिळ चावून खाल्यास दात मजबूत होतात. हिरड्यांचे आजार होत नाही..

२) तिळाच्या तेलात लसुण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कानदुखि, व बहिरेपण, कानातून पू येणे, रक्त येणे कर्णनाद हे बंद होते.

३) ८ चमचे तिळ व गूळ व १० मिरे हे एकत्रित वाटून मग एक ग्लास पाण्यात आटवून अर्धा ग्लास करावे

  व थोडे थोडे घेतल्यास मासिक धर्म मोकळा येतो, कंबर व पोट दुखत नाहि...... 

४) डोकेदुखिः। तिळाचि पाने विनेगारमध्ये टाकुन वाटून याचा लेप मस्तकावर केल्यास डोकेदुखि थांबते.

५) संग्रहणि, आंव, आमातिसारः ६ ते १२ ग्रँम तिळ व कच्चे बेलफळाचा गर एकत्रित करून हे मिश्रण खावे आराम पडतो.

६) बद्धकोष्ठः। तिळ लोणि व खडिसाखर एकत्रित करून खाल्यास मळ नीट बांधून येतो व कडक शौचास होत नाही. किंवा ६० ग्रँम तिळ व ६० ग्रँम गूळ एकत्रित करून लाडू खावा.

७) काळ्या तिळाचे तेल एक थेंब डोळ्यात घातल्यास डोळे निरोगि राहतात, 

८) तिळाचे मूळ व पानांचा काढा करून याने छान केसांचि मालिश करावी. पांढरे केस काळे होतात.

.. तसेच तिळाचे फूल व गोखरू काटा हे वाटून मग याचा लेप डोक्यावर दिल्यास टक्कलावर केस उगवू लागतात... रोज एक चमचा तिळ खावे. केस घनदाट होतात, कोंडा दूर होतो.

९) तिळ चार चमचे घेउन एककप पाण्यात टाकुन अर्धा कप करा व ते पिल्यास सर्दि, खोकला दूर होतो.

१०) बहूमूत्रः। सारखी सारखि युरिन लागत असेल तर ४० ग्रँम तिळ व २० ग्रँम ओवा एकत्रित वाटून यात ६० ग्रँम गूळ मिसळून ५-५ ग्रँम स.सं घ्यावे.

११) लहान मूले अंथरुणात युरिन करतात. तेव्हा ४० दिवस रोज एक तिळगूळाचा लाडू खाउ घातल्यास ही समस्या दूर होते.

१२) भाजणे, चटका बसल्यासः। कधि चुकुन चटका बसला किंवा अंग भाजले असता, तिळ पाण्यात वाटून याचा लेप त्या लेप द्यावा. दाह होत नाही. व फफोला येत नाही. 

१३) तिळाचे फूलांच्या ४ मिलिलिटर रसात २ चमचे मध व २५० मिलिलिटर दूध मिसळून पिल्यास मूत्रखडा विरघळून बाहेर पडतो.

१४) आमवात... संधिवातः। ४ ग्रँम तिळ व सुंठ एकत्रित करून हे दोन वेळा घ्यावे आराम पडतो.

१५) श्वेतप्रदरः। तिळ कुटून पावडर करावी व यात मध मिसळून घ्यावे.

१६) लठ्ठपणाः। तिळाच्या तेलाने मालिश केलि असता मेद झडतो. व शरिर सुडौल बनते.

१७) पायातला काटा जर निघत नसेल तर तिळाचे तेल व मीठ एकत्रित करून तिथे लावावे. काटा वर येतो.

१८) इसब, एक्जिमा, सोरायसिसः १ मिलिलिटर तिळाच्या तेलात कणेर झाडाचि मूळी शिजवून मग हे सिध्द तेल प्रभावित जागेवर लावल्यास हे सर्व रोग बरे होतात.

१९) स्मरणशक्ति करताः। तिळ व गूळ याचा रोज एक लाडू खावा.

२०) सायटिकाः ५० मिलिलिटर तिळाच्या तेलात १० लसणाच्या पाकळ्या शिजवून मग या तेलाने मालिश करावि.

...#*#*#*#*....... वरिल फायदे बघता तिळ हे संपूर्ण शरिर स्वास्थाकरता उपयोगि आहेत..


        आयुर्वेद अभ्यासक.... सुनिता सहस्रबुद्धे


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



काय राव तुम्ही भी, लई बाई


 

खऱ्याची दुनिया* राहिली नाही.

 तुम्हाला म्हणून सांगतो! *खऱ्याची दुनिया* राहिली नाही. त्यात बहुतेक सर्व जाहिराती या फसव्याच असतात. त्याचं झालं असं की, दोन महिने झालं माझ्याकडे असलेला पांढरा शुभ्र शर्ट मी स्वतःच (चोरून) धूतोय. कारण बायकोकडे जर दिला तर ती आकाश-पाताळ एक करेल .

*'एकाच धुलाईत डाग गायब' असा दावा करणाऱ्या दोन तीन नामांकित कंपन्याचे डिटर्जंट, साबण वापरले. पण काही केल्या शर्टवरचा लिपस्टिक चा डाग जाता जाईना.*


 आता बोला कसा विश्वास ठेवायचा .... ---------------👄 😜

Monday, 1 May 2023

राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न

 राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न


सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया


                                                              -राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन



            मुंबई, दि. 1 : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले. 


            छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निसार तांबोळी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे प्रधान सचिव, माहिती महासंचालक जयश्री भोज यांच्यासह वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी, तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाऊन ध्वजाला मानवंदना दिली. सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


            राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी आपल्या भाषणात जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबरोबरच महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा अनेक विभूतींनी महाराष्ट्राला सामाजिकदृष्ट्या समृद्ध केल्याचा त्यांनी उल्लेख केला.


            राज्यपाल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. यानिमित्ताने 2 ते 9 जून 2023 या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शासनाने 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.


            राज्य शासन करीत असलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून राज्यपाल म्हणाले, कोविडनंतर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. राज्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. स्टार्टअप आणि इको सिस्टीम वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. कोविडच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रितीने सामना करीत महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केल्याचे सांगून राज्यातील जनतेने आपले आरोग्य सांभाळावे असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना शासनामार्फत विविध विभागांमध्ये 75 हजार शासकीय नोकर भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू असून याअंतर्गत राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षम करण्यासाठी 18 हजार 331 शिपाई भरती प्रक्रियाही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.  


            राज्यपाल म्हणाले, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक 1.50 लाख रूपयांवरुन पाच लाख रूपये करण्यात आली आहे. याशिवाय नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येत आहे. राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. मुंबईतील जी.टी. रुग्णालयात तृतीयपंथासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. 45 विविध उद्योग आणि उद्योग समूह यांच्यासमवेत करार करुन एक लाख 25 हजार रोजगार उपलब्ध करुन दिले आहेत. युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील किमान 500 युवकांना पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यात येणार आहे. मागील वर्षी मनरेगा मध्ये 36.32 लाख मजुरांना मजुरी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. देशातले एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी शासनाने विकासाची पंचसूत्री ठरविली आहे. जी-20 परिषदेच्या बैठका महाराष्ट्रातही होत असून यात सहभागी प्रतिनिधींनी परिषदेचे कौतुक केले आहे. समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यान 521 किलोमीटरचा रस्ता वाहतुकीस खुला झाला असून आतापर्यंत या महामार्गाचा 10 लाखांहून अधिक वाहनांनी वापर केला आहे. 


            नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत असल्याचे सांगून राज्यपालांनी सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सुद्धा आता मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेत केंद्राप्रमाणेच राज्यशासनही प्रती शेतकरी सहा हजार रुपये देणार असल्याने दरवर्षी 12 हजार रूपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विमाहप्त्याची दोन टक्के रक्कम आता शासनामार्फत भरली जाणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून नोंदणी करता येईल. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुदानाचा लाभ सुमारे 14 लाखांहून शेतकऱ्यांना मिळत आहे.


            शासनामार्फत प्रकल्पबाधित मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले असून पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांसाठी पाच लाख रूपयांची विमाछत्राची योजना राबविण्यात येणार आहे. एक कोटी 63 लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ संचाचे फक्त 100 रुपये इतक्या माफक दराने वितरण केले आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर रोख 75 हजार रूपये देण्यात येणार आहेत. महिलांना बस प्रवासात तिकीट दरात सरसकट 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. महिलांना घर खरेदीमध्ये मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्यात आली आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून मोफत प्रवास तसेच 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधील प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यासह अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचे राज्यपाल म्हणाले. 


            दिव्यांगांचे संरक्षण, पुनर्वसन, रोजगार आणि स्वयंरोजगार याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत वाढ केली आहे. आता सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंना 30 लाख आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 20 लाख रूपये दिले जाणार आहेत. नागरिकांना स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे रेती धोरण तयार करण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. अमरावतीच्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास आर्थिक साहाय्याच्या रकमेतही 15 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले. 



            मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी राज्यपालांच्या या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला. यावेळी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, निशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक, बृहन्मुंबई पोलीस दलाची वाहने (महिला निर्भया पथक), बृहन्मुंबई अग्निशमन दल वाहने (आर्टिक्युलेटेड वॉटर टॉवर आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर) यांनी सहभाग घेतला. 



नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र


            राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन सेवेत नवनियुक्त उमेदवारास नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यामध्ये तुषार संभाजी गवारी, गौरव उत्तम शिंदे, आशिष विठ्ठल दराडे, श्रीमती हेमिती विजय सावंत, श्रीमती वैशाली विजय यादव आणि श्रीमती आरती सदानंद तांदळे, श्रीमती पूजा दत्तात्रय दाभाडे, राहुल सत्यवान शिंदे, योगेश अशोक चव्हाण, प्रणव मोठाभाऊ भामरे यांचा समावेश होता.


चित्ररथ स्पर्धेचे निकाल जाहीर


            प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी झालेल्या सोहळ्यात एकूण 16 चित्ररथांचे सादरीकरण झाले होते. यामधून कृषी विभागाच्या चित्ररथाने प्रथम, सांस्कृतिक कार्य विभागाने द्वितीय तर गृह विभागाच्या (वाहतूक) चित्ररथाने तृतीय क्रमांक मिळवल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.


            कार्यक्रमाचे संयोजन राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव मिलिंद ह

रदास, कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर,


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेमहिलांच्या विशेष बाईक रॅलीचा शुभारंभ

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेमहिलांच्या विशेष बाईक रॅलीचा शुभारंभ




              मुंबई,दि.1: शिवराज्यभिषेक सोहळा 350 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याच्या निमित्ताने 350 दुचाकीसह सहभागी झालेल्या महिलांच्या विशेष बाईक रॅलीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.


              राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि अमेझिंग नमस्ते फॉउंडेशन यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यटन संचालक‍ बी.एन.पाटील उपस्थित होते. ऑगस्ट क्रांती मैदान ते दादरच्या सावरकर स्मारक पर्यंत ही रॅली आज सकाळी काढण्यात आली.                   

Featured post

Lakshvedhi