Monday, 1 May 2023

देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज

 देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज : पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज : पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

             मुंबईदि. 1 : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

              छत्रपती शिवाजी महाराजांची या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400 च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्यसुंदर समुद्र किनाराव्याघ्र प्रकल्पजैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्रसह्याद्री पर्वत रांगासातपुडालोणार सरोवरकळसूबाई शिखरसंदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या टूरचे आयोजन करण्यात आले आहे.

             आजपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) 75 टुर पॅकेज सुरु केले आहे. भव्य महाराष्ट्र अंतर्गत सात सहलीआमची मुंबई मध्ये तीन सहलीहेरिटेज छत्रपती संभाजीनगर आठ सहलीमेस्मरायजिंग कोकण दहा सहलीकल्चरल पुणे सात सहलीस्पिरीचुअल नाशिक चार सहलीमिस्टीकल अमरावती दोन सहलीवाईल्डलाइफ विदर्भ पाच सहली अशा या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवासउपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल. टुर पॅकेजसच्या अधिक माहितीकरिता एमटीडीसीच्या चॅटबोट ९४०३८७८८६४ या क्रमांकावर फोन करू शकता किंवा टुर आरक्षित करण्यासाठी ०२२-४१५८०९०२ किंवा www.mtdc.co या संकेतस्थळाला भेट द्या. आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आरक्षण विभाग०२२-४१५८०९०२ येथे संपर्क साधू शकता.

000

             मुंबई, दि. 1 : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.


              छत्रपती शिवाजी महाराजांची या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400 च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्य, सुंदर समुद्र किनारा, व्याघ्र प्रकल्प, जैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्र, सह्याद्री पर्वत रांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या टूरचे आयोजन करण्यात आले आहे.


             आजपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) 75 टुर पॅकेज सुरु केले आहे. भव्य महाराष्ट्र अंतर्गत सात सहली, आमची मुंबई मध्ये तीन सहली, हेरिटेज छत्रपती संभाजीनगर आठ सहली, मेस्मरायजिंग कोकण दहा सहली, कल्चरल पुणे सात सहली, स्पिरीचुअल नाशिक चार सहली, मिस्टीकल अमरावती दोन सहली, वाईल्डलाइफ विदर्भ पाच सहली अशा या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल. टुर पॅकेजसच्या अधिक माहितीकरिता एमटीडीसीच्या चॅटबोट ९४०३८७८८६४ या क्रमांकावर फोन करू शकता किंवा टुर आरक्षित करण्यासाठी ०२२-४१५८०९०२ किंवा www.mtdc.co या संकेतस्थळाला भेट द्या. आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आरक्षण विभाग, ०२२-४१५८०९०२ येथे संपर्क साधू शकता.


000

मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात

 मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात


                                                            - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे


प्रसाधनगृह, आसन व्यवस्था, स्वच्छता, सुशोभीकरणयासाठी मुंबई महानगरपालिका करणार उपाययोजना


सी साईड प्लाझा आणि लेझर शो देखील आयोजित होणार


            मुंबई दि.1 : देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले.


            मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज (दिनांक 1 मे 2023) केला. त्यावेळी ते बोलत होते. या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची तसेच उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. 


            या पाहणीप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला बालविकास आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, ए विभागाचे सहायक आयुक्त शिवदास गुरव आदींसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


            मुंबई महानगरात जगभरातून पर्यटक येतात. खासकरून मरीन ड्राईव्ह परिसराला सर्वच पर्यटक हमखास भेट देतात. या पर्यटकांना तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकर नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरनिराळ्या सोयी-सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दौरा करून महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले. मरीन ड्राईव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यात यावा. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो याठिकाणी सुरू करावा, असे सांगून सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विविध सूचना केल्या.


            महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या कामांची माहिती देताना आयुक्त श्री. चहल म्हणाले की, मरीन ड्राईव्ह मध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे. व्ह्युविंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण 53 मीटर लांब व 5 मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.


            मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था रचना येत्या काही दिवसात करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्यादृष्टीने कामाला सुरूवात करण्यात येत आहे, असेही आयुक्त श्री. चहल यांनी नमूद केले.


            दरम्यान, मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) दोन प्रसाधनगृह उभारण्यात येतील, याबाबतचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. आशीष शर्मा यांनी दिली.

एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

 आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवातबसस्थानके ही होणार स्वच्छ, सुंदरएसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प

                                                            - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि १ : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तसेच यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली. सध्या मुंबई-ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.  


            यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृत महोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यांवर पण एसटी पोहचायची. आता सगळ्या ठिकाणी रस्ते झाले आहेत मात्र एसटी अजूनही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी कारण एसटीला परंपरा आहे. नवीन संकल्पना, बदल घडताहेत. प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. प्रवाशांच्या एसटीकडून अपेक्षा आहेत.


स्वच्छ सुंदर बसस्थानकाची अपेक्षा


            एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ, सुंदर बसस्थानक असावे ही प्रवाशांची अपेक्षा आहे.


            एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते त्याचप्रमाणे नवीन सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांची ओळख देखील ग्रामीण भागापर्यंत आहे, त्यांचं सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फायदा एसटीला होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


 


इलेक्ट्रिक बस सेवेमुळे प्रदूषणही कमी


            आज राज्यातल्या ९७ टक्के लोकांपर्यंत एसटी पोहचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केली आहे याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले.


 


आम्ही गेल्या आठ नऊ महिन्यात राज्यातील थांबलेल्या कामांना चालना दिली. अगदी पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी यांच्या आयुष्यात बदल घडविणारे हे निर्णय आहेत. राज्यातील ७५ वर्ष पुर्ण झालेल्या ८ कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला याचे समाधान आहे. महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. दररोज १७ ते २० लाख महिला प्रवाशी याचा लाभ घेत आहेत, यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवाशी वळताहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.


            प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, कोविडसारख्या काळातही एसटी महामंडळाने कामगिरी पार पाडली आहे. गेल्या एप्रिलमध्ये एसटीचे ३ लाख प्रवासी होते, आता ५४ लाख प्रवासी झाले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक एसटीत मोफत प्रवास करतात तसेच महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येते त्यामुळे दररोज एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या १० लाख झाली आहे.


            यावेळी बोलतांना सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी बालपणापासून आपण एसटीचा प्रवास करीत आलो असल्याचा उल्लेख केला तसेच एसटी प्रवासातल्या वाहक चालकांच्या आठवणी सांगितल्या. आधुनिक काळाशी जोडून घेण्याची गरज असून एसटीचा कारभार सर्वांपर्यंत पोहचेल याची जबाबदारी मी घेईल असेही ते म्हणाले.


            यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एक मिनिट स्वच्छतेसाठी ... एक मिनिट महाराष्ट्रासाठी या दृकश्राव्य संदेशाचे तसेच एसटीच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.


            या कार्यक्रमास परिवहन व बंदरे प्रधान सचिव पराग जैन, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" सुरू

 राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" सुरू


आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय


                                                     - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


महाराष्ट्र दिनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा विस्तार, गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा


 


            मुंबई, दि. १ : ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.


            हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रयत्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील.


            या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस नागपूर येथून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी त्या-त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आदी मान्यवरांसमवेत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. वर्षा शासकीय निवासस्थानी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरुवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालणारे हे सरकार आहे. त्यांनी देखील आरोग्य विषयाला प्राधान्य दिले होते. आज मुंबईमध्ये सुमारे २५० आपला दवाखाना कार्यरत आहेत. त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५व्या वित्त आयोगाअंतर्गत स्थापित केली जाणार आहेत. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आपण या सेवेच्या विस्ताराची घोषणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच आरोग्य विभागाने त्यावर अंमलबजावणी करीत सामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेसाठी हे दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी आरोग्य विभाग कौतुकास पात्र आहे.


            मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत ६ हजार २०० रुग्णांना एकूण ५२ कोटी रुपयांहून अधिकची मदत करता आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत लाखो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद मोदी हे देखील सामान्यांच्या आरोग्य सेवा आणि उपचारांबाबत संवेदनशील आहेत. त्यामुळे केंद्र स्तरावरून राबवण्यात येणाऱ्या आणि राज्याच्या योजना यामुळे डबल इंजिन सरकारचा राज्यातील जनतेला डबल फायदा होणार आहे. यापुढे जाऊन आपण जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये या सर्वच ठिकाणी आरोग्य सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व सामान्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य क्षेत्रातील या चांगल्या सुविधा खेड्या-पाड्यापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे, याचे समाधान आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिला, कष्टकरी-कामगार आणि बळीराजाला दिलासा देण्यासाठी जाणीवपूर्क प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पातूनही पंचामृत संकल्पनेतून सर्व सामन्यांच्या हितांच्या गोष्टींना, विकासाला प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ही अतिशय उत्तम संकल्पना आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून ३० सेवा, औषध आणि वैद्यकीय सल्ला देखील मोफत मिळणार आहे. सामान्य माणसांच्या आरोग्याची काळजी घेणार हा उपक्रम आहे. आपण अर्थसंकल्पातच या संकल्पनेसाठी तरतूद केली होती. यात ५०० दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. त्यातील आज ३१७ दवाखाने सुरु होत आहेत. हेच आपल्या गतीमान सरकारचे वैशिष्ट्य आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली आहे. यात आता ९०० शस्त्रक्रिया मोफत करता येतात. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांचे पर्यंतचे उपचार होतात. अशा रितीने राज्यातील सुमारे ८ कोटी लोकांना आता मोफत उपचार मिळू लागले आहेत. सामान्य माणसांला आरोग्य सेवा, उपचाराचा बोजा उचलावा लागू नये अशी ही तरतूद आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महिला, शेतकरी यांच्या करिताच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची तसेच गरींबाकरिता घरे विशेषतः ओबीसींसाठी घर निर्मिती, रोजगार निर्मितीवर भर याबाबतही माहिती दिली.


            आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांनी आपला दवाखाना ही संकल्पना मांडली. तिचा आपण अल्पावधीत विस्तार केला. आज आपण माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात सुमारे ४ लाख ३९ महिलांची तपासणी पूर्ण केली असून, त्यांच्यावर ७० टक्के उपचार देखील पूर्ण केले आहेत. सदृढ बालक योजनेचीही यशस्वी अमंलबजावणी सुरु आहे. मेळघाटातील कुपोषण मुक्ती याबाबत आपण प्रभावीपणे काम करत आहोत. औषध प्राधिकरणाची निर्मिती, जनआरोग्य योजना तसेच आरोग्य विभागात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर देत आहोत. संपूर्ण राज्यातील जनतेच्या आरोग्याची सुखरूपता हा मुख्यमंत्री महोदयांचा प्राधान्यक्रम आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अथकपणे प्रयत्नशील आहे. त्यातूनच आज आपण वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहोत. या योजनेतील दवाखान्यांची संख्या लवकरच वाढवली जाईल.


            सुरुवातीला आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून आपला दवाखाना योजनेच्या विस्ताराचे अनावरण करण्यात आले. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी आभार मानले.                                   


000


                                              

                            


गंभीर आजारांना दूर करण्यास मदत करतं हे फळ, आयुर्वेदात आहे फार महत्व

 *5 गंभीर आजारांना दूर करण्यास मदत करतं हे फळ, आयुर्वेदात आहे फार महत्व.....*


कोणताही आजार हा सांगून येत नाही. तर 5 असे गंभीर आजार आहेत जे एकदा झाले तर लवकर बरे होत नाहीत. या आजारांवर उपचार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा लावावा लागतो. पण आयुर्वेद या गंभीर आजारांचा उपाय म्हणून उंबरांकडे बघतं. याचा दावा काही शोधांमध्येही करण्यात आला आहे.


*उंबराचे फायदे...*

उंबराचं झाड एक औषधी झाड मानलं जातं. उंबरांवर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की, यात अ‍ॅंटी-पायरेटीक, अ‍ॅंटी इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी-मायक्रोबियल, अ‍ॅंटी-डायबिटीक इत्यादी गुण असतात. उंबराची डायबिटीस, लिव्हर डिसऑर्डर, पाइल्स, डायरिया आणि फुप्फुसासारख्या गंभीर आजारात मदत होते.


*डायबिटीसचा देशी उपचार...*

काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, उंबराचं झाड ब्लड ग्लूकोज कमी करण्यास मदत करतं. डायबिटीसचे रूग्ण वजन कंट्रोल करण्यासाठीही याचा वापर करू शकतात. पण ठोस पुराव्यांसाठी यावर आणखी शोध होणं बाकी आहे.


*लिव्हर डिसऑर्डर...*

आयुर्वेदात उंबराला लिव्हरचा आजार ठीक करण्यासाठी वापरलं जातं. याच्या पानांच्या रसात लिव्हर डॅमेज कमी करण्याचे गुण असतात. लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.


*पाइल्सवर उपाय...*

पाइल्समध्ये मलद्वारांच्या नसांमध्ये सूज येते. ही समस्या गंभीर झाली तर त्यातून रक्तही येऊ शकतं. पण उंबरातील अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण या आजाराला दूर करण्यास मदत करतात.


*डायरिया...*

अभ्यासकांनी डायरियाच्या समस्येत उंबरांची भूमिका जाणून घेण्यासाठी रिसर्च केला. त्यांनी मुद्दामहून आधी डायरियाची समस्या निर्माण केली आणि नंतर उंबराच्या पानांच्या रसाचा वापर केला. याचे परिणाम सकारात्मक आणि डायरियापासून आराम देणारे मिळाले.


*फुप्फुसाची समस्या...*

रेस्पिरेटरीमध्ये इन्फेक्शन झाल्यावर खोकला, श्वास भरून येणे, श्वास घेताना शिटी वाजल्यासारखा आवाज येणे यांसारखी लक्षण दिसतात. ही लक्षणं मॅनेज करण्यात उंबरांची मदत मिळते. याच्या वापरासाठी एखाद्या आयुर्वेदिक एक्सपर्टची मदत घेऊ शकता.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


१मे कांसाठी

  १ *मे* कांना सांभाळून घ्या.

१ *मे* कांची काळजी घ्या.

१ *मे* कांच्या संपर्कात राहा.

१ *मे* कांना मदत करा.

१ *मे* काशी विवाद टाळा 

१ *मे* कांना गोड बोला.

१ *मे* कांना उपदेश देने बंद करा.

१ *मे* कांचे विचार समजून घ्या.

१ *मे* कांशी चांगले संवांद करा.

१ *मे* कांत संघर्ष होणारी वक्तव्य टाळा.

१ *मे* कांशी गोडीगुलाबीने वागुया.

१ *मे* कांची आपुलकी ठेवुया.

१ *मे* *महाराष्ट्र दिनाच्या*

           *हार्दिक शुभेच्छा*

         🚩🙏🏻 🌹🙏🏻🚩

बहू असोत सुंदर संपन्न कीं महा! प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!

१मे काना भरवा.

,जि.प.शाळेतील 1 मे चेक ध्वज वंदन!,चांभारखिंड महाड, रायगड

 चांभारखिंड,जि.प.शाळेतील 1 मे चेक ध्वज वंदन!


Featured post

Lakshvedhi