Saturday, 29 April 2023

निरोगी रहा

 हे काही नियम पाळा निरोगी रहा.

१)रोज ४०शी नंतर पाण्यात गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्या.

२)दिवसात कमीत कमी तीन लिटर पाणी घ्या.

३)भोजनाची वेळ पाळा.

४)चौरस आहार घ्या.जिभेचे चोचले टाळा,जाऊ तिथे खाऊ धोरण टाळा.

५)जेवणा पुर्वी अर्धातास व जेवणानंतर एक तासाने पाणी प्या.

६)रोज तुळस,बेल,कडुलिंबाची पाच पाच पाने कुटून गोळी गिळा.

७)जंकफूड, पाव,चहा ,बेकरी आयटम कमी खा.

८)रोज त्रिफळा सकाळी दुधा बरोबर पुरक व रात्री गरम पाण्या बरोबर रेचक म्हणून घ्या.

९)सकाळी उठल्या वर थोडे पाणी घेऊन तोडातली पहीली लाळ गुळण्या करुन प्या अँसिडीटी कमी होईल.

१०)सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना गरमपाणी घ्या.

११)महीन्यातून एकदा ऐरंडेल घ्या कोठा म ऊ होतो.

१२)जेवणात मेथीचा प्रयोग करा,सकाळी उठल्या उठल्या मेथीचे दाणे चाऊन खा.

१३)महीन्यातून एकदा तरी लंघन उपवास करा हलके अन्न खा.

१४)प्राणायाम, योगा,चालणे कमीत कमी ४५मिनिटे करा.

१५)मन एखाद्या ठिकाणी एकाग्र करा.

१६)संगीताचा शरीरावर पुर्ण पाँझिटिव्ह इफेक्ट होत असल्याने सकाळी इनस्ट्रुमेंन्टल धून ऐकत जा.

स्वतः ला तणाव विरहित ठेवा.

आणि आनंदी जगा.

   ..आणि हो मोबाईलच्या आहारी जाऊन जागरण करू नका.

 पहा पटतंय का मंडळी.

ता.क.दुपारी बिलकुल झोपू नका .डायबेटीस चा धोका वाढतो


वैद्य.गजानन


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*

 *मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*


*केळी* - कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. (मुलांना सतत कफ व सर्दी च्या तक्रारी नसल्यास)


*साय असलेले दूध* - यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.


*भात -* यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चिकू* - यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.


*मासे* - यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.


*सोयाबीन* - सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.


*डाळ* - यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चीज* - यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.


*अंडी*- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.


*दही* - यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.


*संत्री* - यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.


*डाळिंब* - यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.


*पालक* - यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.


*पनीर* - यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी

 महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी

     -ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर.

            मुंबई, दि. 28: महाराष्ट्र देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा असल्याचे गौरोवोद्गार ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काढले.


            महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. राज्याच्या जडणघडणीचा हा प्रवास ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्याकडून 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या पुढील समाज माध्यमांच्या लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

            महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हा कार्यक्रम पाहता येतील.

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR   


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.

co/MAHARASHTRADGIPR


महाराष्ट्र दिनी माहीम, शिवाजी पार्क, वरळीत उड्डाणांना प्रतिबंध

 महाराष्ट्र दिनी माहीम, शिवाजी पार्क, वरळीत उड्डाणांना प्रतिबंध


          मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर दि. ०१ मे २०२३ रोजी माहीम, शिवाजी पार्क आणि वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाण क्रियांना प्रतिबंध असल्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी काढले आहे.


            या परेड समारंभाच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उत्सवासाठी एकत्र येणे अपेक्षित आहे. त्याकरिता शिवाजी पार्क परिसरातील अवांछित कारवाया रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश ०१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 


00000

दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रीमंडळ व इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती

 दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रीमंडळ व इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती.

            मुंबई, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’या कार्यक्रमात मंत्रीमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा दिलखुलास कार्यक्रम प्रसारित होईल.


            सहायक संचालक सागरकुमार कांबळे आणि निवेदक रिताली तपासे यांनी मंत्रीमंडळ निर्णयांची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.


000

येवला आणि सिन्नर येथे दिवाणी न्यायालय;अधिसूचना जारी

 येवला आणि सिन्नर येथे दिवाणी न्यायालय;अधिसूचना जारी.

            मुंबई दि. २८ : दिवाणी न्यायालयीन अधिनियमानुसार नाशिक जिल्ह्यातील येवला आणि सिन्नर येथे दिवाणी न्यायालय सुरू करण्याबाबतची अधिसूचना विधि व न्याय विभागाने जारी केली आहे.


            येवला आणि सिन्नर येथील दिवाणी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश हे या न्यायालयाचे पीठासीन अधिकारी असतील. येवला आणि सिन्नर या न्यायालयाच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या सीमा या संबंधित महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रांशी समव्यापी व समाविष्ट असतील असे या अधिसूचनेत नमुद केले

 आहे.


.रूग्णालयात रूग्णांना अद्ययावत सुविधा पुरवाव्या

 .जे.रूग्णालयात रूग्णांना अद्ययावत सुविधा पुरवाव्यात

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १६२ तक्रारींचे निराकरण

       मुंबई,दि.२८ : जे.जे. रूग्णालयातील रूग्णांना अद्ययावत सुविधा देण्यात याव्यात तसेच खाटांची संख्या वाढवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.


             पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १५८४ तक्रारी दाखल झाल्या असून, १६२ तक्रारींचे तत्काळ निराकरण मंत्री श्री. लोढा यांनी केले.       


           मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील ई वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे परिमंडळ १ च्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे, सहायक आयुक्त अजयकुमार यादव यासह अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.      


          या परिसरातील ना.म.जोशी मार्गावर सौंदर्यीकरण करावे, स्थानिकांचे निवृत्ती वेतन तत्काळ सुरू करण्यात यावे, संजय गांधी निराधार योजनेचे नव्याने आलेले अर्ज तपासून घेवून मानधन देण्याची कार्यवाही करावी, अशा विविध तक्रारींची दखल घेऊन तत्काळ निराकरण करण्यात आले. 


            दरम्यान महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच या ठिकाणी बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली.      


         एफ दक्षिण वॉर्ड येथील स्थानिक महिलांना समस्यांबाबत तक्रार करावयाची असल्यास त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) अंतर्गत ३१ मे पर्यंत दुपारी ३ ते ५.३० या वेळेत https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर अर्ज दाखल करावेत.

Featured post

Lakshvedhi