Thursday, 6 April 2023

नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता४३.८० किमी अंतराची मेट्रो मार्गिका उभारणार

 नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता४३.८० किमी अंतराची मेट्रो मार्गिका उभारणार


            नागपूर शहरातील मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे नागपूरमध्ये ४३.८० किमी अंतराची मार्गिका उभारण्यात येईल.


            या प्रकल्पाकरिता ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा सुधारित खर्च येईल. या मध्ये मार्गिका क्रमांक १-ए मिहान ते एमआयडीसी ईएसआर (१८.६५ कि.मी.). मार्गिका क्रमांक २- ए ऑटोमेटिव्ह चौक ते कन्हान नदी (१३ कि.मी.). मार्गिका क्रमांक ३ए लोकमान्य नगर ते हिंगणा (६.६५कि.मी.). मार्गिका क्रमांक ३-ए – प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (५.५० कि.मी.) असे मेट्रो मार्ग असतील. जानेवारी २०१४ मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा एक प्रकल्प राबवण्यास सुरवात झाली होती. यामध्ये ४०.०२ कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग आणि ३२ स्थानके उभारण्यात आली. या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले

 आहे.


अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार

 अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार


१४ नव्या पदांना मान्यता


            अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            या करिता अध्यापकीय पदांची युनिटनिहाय पुनर्रचना करुन सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. सध्या या संवर्गात १३८ पदे मंजूर आहेत आणि संस्थानिहाय कमाल विद्यार्थी संख्या १३७ आहे. या निर्णयामुळे मंजूर विद्यार्थी पद संख्या १३७ वरून २०९ इतकी होणार आहे. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर ज. जी. समूह रुग्णालय, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमध्ये ही पदे निर्माण करण्यात येतील.


-----०-----

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार

 देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार

जमिनीच्या आरक्षणात फेरबदल


            मुंबईतील गोवंडी येथील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या जमिनीवरील आरक्षणात फेरबदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे या जमिनीवर प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार आहे.


महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ बृहन्मुंबई विकास योजना-२०३४ मधील न.भू.क्र.१ (भाग), मौ. देवनार, देवनार डम्पिंग ग्राऊंड, गोवंडी, मुंबई या जमिनीवरील महापालिका शाळा, इतर शिक्षण , खेळाचे मैदान, विद्यार्थी वसतिगृह व उद्यान/बगीचा ही आरक्षणे वगळून भूखंड भरणी स्थळाचे नामनिर्देशानसह उद्यान, बगिचाचे आरक्षण दाखवणाऱ्या फेरबदलास मान्यता देण्यात आली. याठिकाणच्या खेळाच्या मैदानावरील साधारणतः ३१ हजार २०० चौ.मीटर क्षेत्राचे आरक्षण वगळण्यात आले आहे.


-----०

महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदानप्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’, तर अन्य चौघे ‘पद्मश्री’ ने सन्मानित

 महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदानप्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’, तर अन्य चौघे ‘पद्मश्री’ ने सन्मानित


 


            नवी दिल्ली, 5 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 55 मान्यवरांना आज ‘पद्म पुरस्कारा’ने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने, तर अन्य चार मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.


            राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्मपुरस्कार प्रदान सोहळा झाला. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आदी उपस्थित होते.


            प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’ तर गजानन माने, परशुराम खुणे, रवीना टंडन आणि कुमी वाडिया यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रा. धर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. धर हे सांख्यिकीय भौतिकशास्त्रावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांना विज्ञानातील प्रतिष्ठेचा जागतिकस्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार (Boltzmann Medal) घोषित झाला आहे.


राज्यातील 4 मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान


            गजानन माने यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. माने यांनी कुष्ठ रोग्यांसाठी आपले जीवन समर्पित केले.


            श्री. खुणे यांनी नक्षल प्रभावित भागात लोककलेच्या माध्यमातून पुनर्वास आणि सामाजिक कुप्रथांविषयी लोक जागृती केली.


            अभिनेत्री रविना टंडन या 25 वर्षांपासून चित्रपट सृष्टीत काम करीत असून अनेक चित्रपटांमंधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.


            कला क्षेत्रातील कुमी वाडीया कोरल संगीत ‘कंडक्ट’( संचलन) करणाऱ्या प्रथम भारतीय महिला आहेत. त्यांनी आजवर देश विदेशात विविध कार्यक्रम सादर केलेले आहेत.


             एकूण 55 पद्म पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. 3 मान्यवरांचा पद्मविभूषण, 5 मान्यवरांचा पद्मभूषण आणि 47 मान्यवरांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव झाला.

असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि योगदानातून भारतीय जनता पक्षाचे रूपांतर

 असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि योगदानातून भारतीय जनता पक्षाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. राष्ट्रवादी विचारधारा अंत्योदयाचा सिद्धांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.


 कांदिवली पूर्व विधानसभेतील आ. भातखळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा 44 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आ. भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.


 आ. भातखळकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कुशल नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास तसेच 'राष्ट्र प्रथम' या मंत्राला आदर्श ठेवून सर्व समावेशक कार्यशैलीतून भारतीय जनता पक्षाकडून देशात विकास सुरू असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कांदिवली पूर्व विधानसभेतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


यावेळी कांदिवली पूर्व विधानसभेत ८ प्रभागात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा झा

ला.


पवनपुत्र अंजनी सुताय

 🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩


          🌻 *आनंदी पहाट* 🌻


  *स्वामीनिष्ठ हनुमान जन्मोत्सवाची*


⚜🚩⚜🌸🙏🌸⚜🚩⚜


     *राम रसायन तुम्हरे पासा*

     *सदा रहो रघुपति के दासा*

     *तुम्हरे भजन राम को पावै*

     *जनम जनम के दुख बिसरावै*

     *.... संत तुलसीदास*


        *भारतीय संस्कृतीतील देशविदेशातील भक्तगण आज भल्या पहाटे उठून शुचिर्भूत होत मारुतीरायाच्या उपासनेत दंग आहेत. मारुती स्तोत्र.. हनुमान चालीसा पठन सुरू आहे.*

        *ज्यांच्या जवळ रामनामाचे रामबाण औषध आहे अशा हनुमानाची केलेली भक्ती ही रामापर्यन्त पोहोचते अन् जन्मजन्मांतरीची दुःख दूर होतात.* 

        *जिथे राम तिथे हनुमान आणि जिथे हनुमान तिथे राम कारण हनुमंताच्या हृदयातच राम आहे. पवनसुत हनुमान हे जीवनात उर्जा देणारे आदर्श असे दैवत.*

        *रुद्रअवतार रामभक्त हनुमान हे गुणसागरच. बल-बुद्धी संपन्न हनुमान हे मानसशास्त्र.. राजनीती.. साहित्य.. तत्त्वज्ञान यात पारंगत होते. अत्यंत विश्वासू असे स्वामीनिष्ठेचा आदर्श. रामराज्य हनुमंताशिवाय अशक्यच होते. हनुमान हे श्रीरामाचे निस्सिम भक्त.. सेवक.. सैनिक आणि सहयोगी होते. त्यांनीच प्रभू श्रीरामाची सुग्रिवाशी भेट घडवून वानरसेना मिळवून दिली. युद्धात बिकटप्रसंगी संजिवनी आणण्यास पर्वतही खांद्यावर वाहण्याचे सामर्थ्य हनुमंताचेच.*

        *बिभीषण या शत्रूच्या भावाला अनेकांच्या विरोधानंतरही आपल्या पक्षात घ्यावे हा सल्ला प्रभू श्रीरामाला दिला. हनुमानाची विश्वासपात्रता तर एवढी की श्रीरामांनी त्यांना शत्रूराज्यातही धाडले. तर भरताची राज्य परत करण्याची मानसिकता खरच आहे का हे तपासायला रामाने हनुमंतालाच पाठवले. प्रभूच्या शब्दाला जागणारे. बुद्धी आणि बल असूनही अहंकार, लोभ, मोह, माया, पदलालसा यापासून अलिप्तच होते.*

        *हनुमानाचे भक्तीसामर्थ्य असे की या नामयोगीचे साथीदारही रामनाम घेत सागर.. भवसागर पार करु शकले. लंकादहन करुन शत्रूत घबरहाट निर्माण करुन मनोधैर्य खच्चीकरणाने विजय सुकर करणारे हे हनुमान. दास्यभक्ती असावी तर हनुमानासारखी. विजयानंतर प्रभूंनी काय हवे विचारले तर रामभक्तीचे वरदान मागितले.*

        *अचाट बुद्धिमत्ता.. सामर्थ्य असूनही जेवढी कामगिरी दिली तेवढीच पार पाडली. त्यावर ना शंका ना प्रश्न. स्वतः हालअपेष्टा सहन करुन, दैवताला विश्वासाने हृदयी स्थान देत प्राणाची बाजी लावणारे स्वामीनिष्ठ जिथे.. तिथेच रामराज्य निर्माण होते, म्हणूनच हनुमानांसारखी बलोपासना करायला आणि तरुणांकडून गावाचे संरक्षण व्हावे, स्वराज्याचे सुराज्य व्हावे.. यासाठी या भक्त आदर्शाची हनुमान मंदिरे समर्थ रामदास स्वामींनी गावोगाव स्थापन केली.*

     *मनोजवं मारुततुल्यवेगं*

     *जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्* 

     *वातात्मजं वानरयूथमुख्यं*

     *श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ॥*

        *जो मनाप्रमाणे कुठेही वाऱ्याच्या वेगाने भ्रमण करु शकणारा वेगवान, ज्याने इंद्रियविजय प्राप्त केला आहे, बुद्धिवंतांमध्ये श्रेष्ठ वानरसेनेचा प्रमुख हनुमंताला मी शरण आलोय.*

        *हनुमानांला लाभले तसे रामनामाचे कवच आपणास लाभो. चिरंजीव रामभक्त हनुमान जन्मोत्सवाने आपली भक्ती व्दिगूणीत होवो, आपल्या जीवनात सर्व संकट निवारक हनुमान बळ लाभो हीच शुभेच्छा.. !!*


🌹⚜🌹🔆🙏🔆🌹⚜🌹


  *

कीलिबिल किलबिल पक्षी बोलती

 


Featured post

Lakshvedhi