Wednesday, 5 April 2023

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गतबारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजू र

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गतबारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजू

            मुंबई, दि. 5 : उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्याने मागील वर्षापेक्षा अडीचशे टक्के अधिक काम करून शासनाने भरीव कामगिरी केली आहे.


            चालू आर्थिक वर्षात राज्याने एकूण 12 हजार 326 कर्ज प्रकरणे मंजूर केली असून यात रुपये 276 कोटी रुपये इतक्या अनुदान रकमेचा समावेश आहे. राज्याची ही कामगिरी मागील वर्षाच्या 250% पेक्षा अधिक आहे. यात 50% महिला व 20% मागासवर्गीय उद्योग घटकांचा समावेश आहे. मंजूर कर्ज प्रकरणांमध्ये 5 हजार 596 घटक हे उत्पादन क्षेत्रातील असून 6 हजार 731 घटक हे सेवा क्षेत्रातील आहेत.


            वरील कर्जप्रकरणांमधून सुमारे 1 लाख रोजगार निर्मिती होणार असून राज्यातील रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात 100% पेक्षा अधिकची लक्षांकपूर्ती करुन धाराशिव (108%), अकोला (107.87%), अमरावती (104.33%), यवतमाळ (104.00%) या जिल्ह्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे.


            राज्यात मागील आर्थिक वर्षात सुमारे 5 हजार 56 कर्ज प्रकरणांना बँकेने मंजुरी दिली होती. त्यापैकी 2 हजार 820 लाभार्थींना 103 कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले होते. यातून सुमारे 40 हजार लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध झाला आहे.


महिला उद्यमींचा उत्साहवर्धक सहभाग


            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत महिला उद्यमींचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. एकुण मंजूर प्रकरणांपैकी पन्नास टक्के लाभार्थी या महिला उद्योजक आहेत. 6 हजार 395 महिलांना बॅंकेने कर्ज उपलब्ध करून दिले असून यामध्ये अनुदानाची रक्कम 160 कोटी रूपये आहे.


            एकुण उद्योजकांपैकी 20 टक्के उद्योजक हे अनुसूचित जाती आणि जमाती वर्गातील पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत. 3 हजार 148 उद्योजकांचे बँकेने कर्ज मंजूर केले आहे. आणि अनुदान म्हणून सुमारे 40 कोटी रुपये या प्रवर्गातील उद्योजकांना देण्यात आले आहेत.


युवा उद्योजकांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 


- उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह


            राज्यातील शहरी व ग्रामीण भागात सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या स्थापनेद्वारे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबविली जाते.


            महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत उद्योग संचालनालयामार्फत या योजनेचे निरीक्षण आणि अंमलबजावणी केली जाते. त्याचप्रमाणे या योजनेची अंमलबजावणी उद्योग संचालनालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा उद्योग केंद्र (DIC) व महाराष्ट्र खादी ग्रामउद्योग बोर्ड (KVIB) व बँकेद्वारे केली जाते. या वर्षी नियोजनबद्ध कार्यक्रम आखुन जास्तीत जास्त युवा उद्योजकांपर्यंत या योजनेची माहिती पोहचवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील बॅंकांसोबत सातत्याने समन्वय साधण्यात आला. खादी ग्रामोद्योग, सहसंचालक, जिल्हा व्यवस्थापक यांच्या सोबत दर आठवड्याला बैठका घेऊन आढावा घेण्यात आला.


            राज्यातील अधिकाधिक युवकांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे, यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याची माहिती उद्योग संचालनालयाचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली आहे.


            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेकरिता सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित आहे.

बायको समोर स्पष्ट बोलण्याची* हिंमत असती तर...

 🤔 *बायको समोर स्पष्ट बोलण्याची* हिंमत असती तर...?

१....दशरथानं कैकेयीला *स्पष्टपणे*

*नकार देत सांगितलं असतं,*

*की मी कांही रामाला*

*वनवासात पाठवणार नाही.* 

तू दुसरा कांही तरी वर माग 

आणि *जास्त हट्टीपणा*

*केलांस तर लक्षांत असू दे,*

*की मला अजून दोन बायका*

*आहेत,* तर कदाचित रामायण

घडलंच नसतं...!!


२...रामानं देखील सीतेला 

*स्पष्ट पणे नकार देत*

*सांगितलं असतं, की मी*

*कांही हरिणाच्या मागं*

*जाणार नाही ऊन खूप आहे.* 

आज रविवार आहे 

आणि जंगलात कशाला हवंय 

तुला तेच हरीण. मला जमणार

नाही ..!! तरी देखील रामायण 

घडलं नसतं.


*थोडक्यात तात्पर्य :* 

*बायकोला वेळीच नकार देणं.आवश्यक आहे*

*आणि हे ज्या दिवशी जमेल,* त्यावेळी 

*कुठलेही रामायण घडणार नाही*

पण, *प्रभू रामचंद्रांना जे जमलं*

*नाही, ते आपल्याला तरी कसं*

*शक्य होणार...???* 


*असो. चालल॔य तसंच चालू द्या,*

*उगाच भांडण नको .....!!!!!!*




😂😂हसत रहा...मस्त रहा😍

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा

 सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा


            "सततचा पाऊस" ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            ‘अतिवृष्टी’ ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासांत 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेती पिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे देखील शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. अशा प्रकरणी शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक आहे.


            मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या 29 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित बैठकीत, सततच्या पावसाची सध्या कोणतीही परिभाषा नसल्याने आणि ती निश्चित करणे आवश्यक असल्याने, शेती पिकांचे नुकसान झालेल्या योग्य शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावाकरिता योग्य निकष निश्चित करण्यासाठी कृषी विभागाने समिती नियुक्ती करावी, असा निर्णय झाला होता. त्यानुसार सततच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावाकरिता योग्य निकष निश्चित करून शासनास शिफारशी करण्याकरिता कृषी व पदुम विभागाच्या 21 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन आदेशाद्वारे मा.अपर मुख्य सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती.


            या समितीने सततच्या पावसासाठी निकष निश्चित करण्याबाबत तयार केलेल्या अहवालात शेती पिकांच्या नुकसानीकरिता विहित दराने मदत देण्याकरिता सततच्या पावसासाठी काही निकष सुचविले होते. हा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला.  


            दि. 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत महसूल मंडळामध्ये सलग पाच दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान 10 मि.मी. पाऊस झाल्यास; आणि त्याच महसूल मंडळात या कालावधीत मागील 10 वर्षाच्या (दुष्काळी वर्ष वगळून) सरासरी पर्जन्यामानच्या तुलनेत 50 टक्के (दीडपट) किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, सततच्या पावसाचा पहिला ट्रीगर लागू राहील.


            अशा महसूल मंडळामध्ये पहिला ट्रीगर लागू झाल्याच्या दिनांकापासून 15 व्या दिवसापर्यंत सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI) निकष पुढीलप्रमाणे तपासण्यात येतील. 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत खरीप पिकांचे सामान्यकृत वनस्पती निर्देशांक फरक (NDVI) जर ०.५ किंवा त्यापेक्षा कमी आल्यास, सततच्या पावसाचा दुसरा ट्रीगर लागू राहील. तथापि ज्या तारखेला सतत पावसाची सुरुवात झाली, त्या दिवसाचा NDVI हा 15 व्या दिवसाच्या NDVI पेक्षा जास्तच असायला पाहिजे. 


            सततच्या पावसाचा दुसरा ट्रीगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यात येईल आणि 33 टक्के पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले असल्यास मदत देण्यात येईल. त्याचप्रमाणे, जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीतील सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासनास प्राप्त झालेल्या सर्व प्रलंबित प्रस्तावांकरिता वरील निकष वापरून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने मदत देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.


            यापुढे राज्य शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या "अतिवृष्टी" या नैसर्गिक आपत्तीकरिता देखील 24 तासामध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवून याबरोबरच सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या ट्रीगरमधील "सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI)" हा अतिरिक्त निकष शेती पिकांच्या नुकसानीकरिता लागू करण्यात येणार आहे. दुष्काळाव्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी देखील हा नि

कष लागू राहील.


धाडस तर पहा

 


श्री समर्थ

 


जलवाहतूक व्यवस्थापनातनेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल

 जलवाहतूक व्यवस्थापनातनेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल


--उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि.5 :- जलवाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात नेदरलँड्स अग्रेसर असल्याने या क्षेत्रातील विस्तारासाठी नेदरलँड्सचे सहकार्य नक्कीच महत्वाचे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा विकास आणि जल व्यवस्थापन मंत्री मार्क हर्बेर्स आणि वाणिज्य दूत बार्ट डे जॉन यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जलवाहतूक व्यवस्थापन, बंदरे विकास व घनकचरा व्यवस्थापन यासंदर्भात चर्चा झाली.


            यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाचे ग्रोथ इंजिन आहे. ‘जेएनपीटी’ बंदर कंटेनर ट्रॅफिकचा मोठा भार उचलते. आता वाढवण बंदराच्या उभारणीद्वारे निर्यात क्षेत्रात मोठी झेप घेता येणार आहे. वाढवण बंदर हे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वाढवण बंदराची जागा देशातील सर्वोत्तम जागा आहे. वाढवण भागातील समुद्रात नैसर्गिक खोली असल्याने येथे मोठ्या आकाराची जहाजे सहजपणे नांगरता येऊ शकणार आहेत.


जलवाहतूक व्यवस्था अतिशय उपयुक्त असून किफायतशीरही ठरु शकते, या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलवाहतूक क्षेत्राला विशेष चालना दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही जलवाहतूकीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा विकास आणि जल व्यवस्थापन मंत्री मार्क हर्बेर्स म्हणाले की, उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे. बंदरे विकास, जलवाहतूक व्यवस्थापन तसेच घन कचरा व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात सहकार्याच्या अनेक संधी असून त्यादृष्टीने या क्षेत्रांत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येईल.


            जलवाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात नैसर्गिक परिस्थिती अतिशय अनुकूल आहे. महाराष्ट्रास जलवाहतूक क्षेत्रात नक्कीच सहकार्य करण्यात येईल व जलवाहतूक व्यवस्थापन अधिक बळकट करण्यास मदत करण्यात येईल, असे श्री. हर्बेर्स यांनी सांगितले.


            वाणिज्य दूत बार्ट डे जॉन यांनीही जलवाहतूक व्यवस्थापन, बंदरे विकास व घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रातील संधींबाबत सूचना मांडल्या.


            नेदर्लंड्‌समध्ये जलवाहतूक प्राचीन काळापासूनच प्रचलित असून मोठ्या प्रमाणात वाहतूक व अंतर्गत व्यापार जलमार्गानेच चालतो. देशात नद्या व कालवे मिळून मोठ्या प्रमाणावर अंतर्गत जलमार्ग असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.


------000-

रामनवमी आणि हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो.

 🙏 *रामनवमी आणि हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो..परंतु, सुंठवडा देण्यामागचे खरे कारण काय? त्याचा आपल्या आरोग्याशी काही संबंध आहे का?सुंठ वडा बनवण्याची पारंपरिक आणि योग्य पद्धत*👉


रामनवमी व हनुमान जयंती चैत्र महिन्यात येते. चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतू आणि या ऋतू मध्ये होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, अॅलर्जी असे त्रास होतात. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, वय, व्यवसाय व प्रकृतीनुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरीरात झालेल्या बदलांमुळे जडत्व येते, सुस्ती येते. तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरण पोषक असते. म्हणून या सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते. सुंठ अँटीइम्मफ्लामेंटरी, अँटीऑक्सिडेन्ट आणि कफ कमी करणारं आहे.


आलं वाळवलं की सुंठ बनतं. आलं उष्ण आहे. ते पचल्यानंतर तिखट रस बनतो तर सुंठ पचल्यानंतर गोड रस बनतो. म्हणून एकाच वेळेला शरीरातील वात व कफ कमी होतो,

म्हणून च कि काय आपल्याकडे सुंठ आणि खोकला या यासंदर्भात म्हण देखील आहे *"सुंठी वाचून खोकला.."*

सुंठाला विश्वा’ असं दुसरं नाव आहे. अनेक आजारांवर गुणकारी असल्याने त्याला *विश्वऔषध* असे म्हणतात.


आता पारंपारिक पद्धतीने सुंठवडा बनवताना त्यात फक्त्त 6 घटक वापरले जातात.

 सुंठ,सुके खोबरे, खडीसाखर, धणे,ओवा,वेलची..आणि हे सर्व 6 घटक दगडी खलबत्ता वर बारीक वाटून सुंठ वडा तयार केला जातो.

 

यातील या घटकाचे फायदे जाणून घेऊया :


*सुंठाचे फायदे:*

कंबरदुखी, आमवात, संधीवात यावर सुंठ उपयुक्त आहे. मासिक पाळीच्या वेळेस उद्भवणारी पोटदुखी आणि प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्वावस्थेत आणण्यासाठी सुंठ फायदेशीर ठरते. तसंच नैराश्य येणं, भीती वाटणं, आत्मविश्वासाची कमतरता यांसारखे मानसिक त्रास होऊ नयेत म्हणून देखील सुंठ फायदेशीर आहे.


*खडी साखर चे फायदे*

चवीला गोड असणारी खडीसाखर मध्ये औषधी गुणधर्म असतात, आयुर्वेदात खडीसाखरेचे थंड, पौष्टिक, गोड, हलकी, बलवर्धक, डोळ्यांना हितकारक, उलटीवर उपयुक्त असे आरोग्यदायी गुणधर्म सांगितले आहेत.

खडीसाखर चघळल्यास कफाचा त्रास कमी होतो, घशातील खवखव, खोकला दूर होतो.

 उन्हाळ्याच्या दिवसात खडीसाखर टाकलेले पाणी पिल्याने शरीराला ताकद मिळते.

 खडीसाखर ताणतणाव कमी करण्यास, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचस हि मदत करते.


*सुक खोबरे*

नारळ कल्पतरू आहे. त्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. नारळाच्या आतील खोबरे, ओले, वाळलेले, नारळाचे दूध तीनही वेगवेगळय़ा प्रकारे आरोग्य राखण्याचे व रोगनिवारण्याचे काम करतात.

 स्मरणशक्ती आणि शारीरिक वाढीसाठी सुके खोबरे हे अत्यंत फायदेशीर ठरते.

नारळ आणि केस हे महत्वपूर्ण समीकरण आहे. सुके खोबरे हे अत्यंत बलवर्धक,शुक्रवर्धक, वीर्यवर्धक, ओजवर्धक सुद्धा आहे.


*धणे*

धणे पित्ताचे आजार असणाऱ्यांसाठी वरदान आहेत.

धण्यामध्ये विटामिन C असल्यामुळे जीवणूरोधकांचे काम करते. धणे हे पाचनक्रिया सुधारण्यास हि मदत करते.


*ओवा*

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोणाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला, तर थोडासा ओवा गरम करून खावयास देणे, हे तर आजीच्या बटव्यातले पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पण केवळ पोटदुखीवरच नाही, तर सर्दी-पडसे, शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही ओवा घेतल्याने फायदा होतो.पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी आहे. ओव्याचे सेवन केल्याने पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त, या विकारांमध्ये आराम मिळतो.


*वेलची*

 ऍसिडिटीसाठी, तणावमुक्त राहण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी, पचन क्रिया सुधारण्यासाठी वेलची मदत करते.


*आता सुंठवडा किती प्रमाणात खावा?*

सुंठवडा हा उष्ण असल्यामुळे हा कमी प्रमाणात खावा.. म्हणून च आपण प्रसाद म्हणून सुंठवडा खातो. रामनवमी नंतर 10 ते 12 दिवस रोज दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान जेवणानंतर एक चमचा सुंठवडा नक्की खा.

पित्त व उष्ण प्रकृती असलेल्यांना सुंठवडा फार सहन होईल असे नाही म्हणून त्यांनी सुंठवडा साजूक तुपासोबत खावा.


थोडक्यात काय तर आपल्या या भारतीय परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून सण साजरे केले पाहिजेत🙏🙏


*धन्यवाद*

*वृषाली आजगावकर*

*सात्विक भोजन*


हा msg जास्तीत जास्त share करावा, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीची आणि खाद्यपदार्थांचे महत्त्व सगळ्यांना कळेल🙏🙏

Featured post

Lakshvedhi