सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 2 April 2023
सैंधव मिठ-
*सैंधव मिठ-*
https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv
आज आपण सैधव मीठाची जन्मकहाणी पहाणार आहोत व याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत.
हिमालयन मीठ (सैंधव) हे मिठाच्या खाणींमधून मिळवले जाते. हे मीठ ज्याप्रकारे पृथ्वीवर निर्माण झाले, ती अतिशय रोचक भौगोलिक घटना आहे. पाचशे दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्र आटल्यानं प्रचंड मिठागरं तयार झाली. पृथ्वीवर जी प्रचंड उलथापालथ त्या काळात झाली, त्यात या मिठागरांच्या आजूबाजूचे मोठाले दगड त्यावर येऊन मिठागरं त्या पर्वताखाली दाबली गेली. त्यातूनच आजच्या मिठाच्या खाणी तयार झाल्या. या खाणींचा शोध पाकिस्तानातील एका प्रांतात अलेक्झांडरच्या सैनिकांना लागला. या सैनिकांना काही घोडे मिठाचा अंश असलेले दगड चाटत असताना दिसले. त्यावरून तिथल्या मिठाच्या खाणींचा अंदाज आला. अकबराच्या काळात त्यानं मिठाचं प्रमाणीकरण केलं. खेवरा त्याचं नाव. त्यानंतर मिठाची खरेदी-विक्रीही सुरू झाली. नंतरच्या काळात ब्रिटिशांनीदेखील खाणींमधून मीठ बाहेर काढायच्या पद्धती विकसित केल्या. 1827 साली ‘रूम आणि पिलर’ या पद्धतीनं मिठाचं उत्पादन आणि काढणी सुरू केली. अकबर आणि ब्रिटिशांच्या काळात मीठ काढण्याची जी कौशल्यं रुजली त्यानुसार आजही मीठ काढलं जातं. आता उत्तर पाकिस्तानात असलेल्या झेलम ते सिंधू नदीच्या 186 मैल परिसरात या मिठाच्या खाणी सापडतात. हिमालयाच्या या रांगांत या भागात सहा मुख्य खाणी आहेत, त्यातलं मीठ हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, वेगळं आणि शुद्ध असतं. मीठ काढण्याच्या या अनेकविध पारंपरिक ज्ञानावर आधारित पद्धतीनं मिठाची शुद्धता अबाधित राहिली. आजही त्याच प्रकारे या खाणींचं उत्खनन होऊन सैंधव मीठ मिळवलं जातं. या संपूर्ण हिमालयन भागात प्रचंड मोठय़ा प्रमाणात मिठाचे साठे आहेत. या मिठामध्ये झिंक, लोह, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजं असल्यामुळे हे आरोग्याला अतिशय हितकारक मानलं जातं. अर्थात या मिठात आयोडिनचं प्रमाण कमी आहे, मात्र त्यात अनेकविध खनिजं भरपूर प्रमाणात सापडतात.जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.
सर्व प्रकारच्या मीठांमुळे शरीराचा पीएच संतुलित राहणे,गॅस व जळजळ कमी करणे,पचनाला चालना देणे हे फायदे होतात.पण हिमालय मीठामुळे अन्नाला अधिक चांगली चव येते.याचे कारण असे की फक्त याच मीठात ११८ मिनरल्सपैकी ८४ ते ९२ मिनरल्सचे घटक आढळतात.तसेच ते १०० टक्के नैसर्गिक असते.ते अनरिफाईंड असल्यामुळे त्यात प्रदुषित व सोडीयम घटक कमी असतात.हे मीठ मेडीकल थेरपी साठी देखील वापरण्यात येते.यात जवळपास सर्वच प्रकारची मायक्रोन्युट्रीयन्टस आहेत बाजारातून हीच जर विकत आणायची ठरवली तर हजारो रुपये लागतील.या मिठाला पहाडी मीठ असे ही म्हटले जाते. या मिठामुळे असलेल्या इतर तत्वांमुळे या मिठाचा रंग शुभ्र दिसत नाही.पूर्वीच्या तुलनेत आता लोकांमध्ये स्वत:च्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यायामासोबतच आहाराकडेही जरा बारकाईनं पाहिलं जात आहे. स्वयंपाकात मीठ हे लागतंच. पण मिठाच्या कमी जास्त प्रमाणाचा आरोग्यावर चांगला वाईट परिणाम होतो. म्हणूनच आता मीठ घेतानाही लोक जास्तच जागरूक झाले आहेत. आणि म्हणूनच मिठामध्ये अनेक प्रकार असले तरी आरोग्याचा विचार आला की सैंधव मिठाला प्राधान्य दिलं जातं. या मिठाच्या अन्न पदार्थांमधील वापरामुळे शरीरातील रक्तदाब स्थिर ठेवून शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन साधलं जातं. यात पोटॅशिअमची मात्रा जास्त असते, तर सोडिअमची मात्रा त्यामानानं कमी असते. म्हणूनच सैंधव मीठ दोषशामक मीठ असल्याचं मानलं जातं.पण दिवसाला सहा ग्रॅमपेक्षा जास्त मात्रेत हे मीठ खाऊ नये. कोणत्याही मिठाचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास ते शरीराला अपायकारक ठरतं. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हे मीठ वापरताना अतिशय काळजीपूर्वक वापरावं. सैंधव मीठ हे मात्रेनुसारच वापरतो आहोत ना याकडे लक्ष ठेवावं.
फायदे
१. सैंधव मीठामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल कऱण्यास मदत होते. तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
२. तणाव कमी करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. सैंधव मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते शांतपणे झोप येते.
३. पित्त झाल्यावर आलं लिंबू आणि सैंधव मिठाचे चाटण थोडं थोडं खाल्यास पित्त मुळे आणि इतर कारणांमुळे होणारी उलटी थांबते
४. अंगदुखी कमी करण्यासही सैंधव मिठाचा वापर होतो.
५. सायनसचा त्रास असलेल्यांनी सैंधव मीठाचे सेवन करणे गरजेचे असते. मुतखड्याचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करुन प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो.
६. अस्थमा, डायबेटीज आणि आर्थराइटिसच्या रुग्णांनी नियमितपणे सैंधव मिठाचे सेवन करावे.
७. कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
८. आयरनचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यास उपयुक्त असते.
९सैंधव मीठ त्वचेसाठी अतिशय फायद्याचं आहे. मृत त्वचा या मिठानं निघून जाते. त्वचा पेशी मजबूत होऊन त्वचा तजेलदारदेखील दिसते.
१० काही आजारपणामुळे, विकारांमुळे नखांच्या खाली जे पिवळसर डाग पडलेले असतात, ते काढण्यासाठीदेखील सैंधव मिठाचा उपयोग होतो.
११ केसांसाठी कंडिशनर म्हणून सैंधव मिठाचा वापर शाम्पू सोबत करता येतो. केस गळती, केसांचं तुटणं कमी होतं.
१२सैंधव मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं टॉन्सिल्सवर आराम पडतो.
१३ श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, डोकेदुखी, खोकला वगैरे लहान-मोठय़ा शारीरिक समस्यांवर सैंधव मीठ अतिशय गुणकारी आहे.
१४ हे मीठ रेचक म्हणून पोटाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या पाण्याची वाफ श्वसनसंस्थेच्या लहान-मोठय़ा कुरबुरींसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.
१५ सैंधव मीठ संधिवातावर, काही कीटक चावल्यावर जखम बरी करण्यासाठीदेखील वापरलं जातं.
१६ स्ट्रेस अर्थात ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे. कारण अगदी क्षुल्लक असतं मात्र त्यातून अनेकदा चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, भूक न लागणे असे आजार डोकं वर काढतात. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सेंधा मिठाचं सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते. शांत होण्यास मदत करते.
१७साध्या पाण्यात घालून या मिठाचं सेवन करता येतं. ते रोज खाल्लं तर अस्वस्थता आणि ताणतणाव कमी व्हायला मदत होऊ शकते. गरम पाण्यात हे मीठ टाकून अंघोळ केल्यासही ताण कमी होतो आणि ताजतवानं वाटतं.
१८ वातावरणातील प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. गाड्या, बसेसच्या धुराने होणारे वातावरणातले प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. निसर्गाचा तोल सांभाळण्याचं कामही मीठ करतं.
१९ या मिठाच्या सेवनानं चरबी कमी होते. या मिठातल्या खनिज तत्त्व इन्शुलिनला रिअँक्टिव्ह असल्यानं साखर खाण्याची किंवा गोड खाण्याची इच्छा कमी होते. हे मीठ वजन वाढीवर नियंत्रण ठेवायलाही मदत होते.
२० रक्तदाब स्थिर ठेवणं, चयापचय क्रिया नियंत्रित करणं, वायुसरणावर नियंत्रण आणि भूक वाढ यासाठीही या मिठाचा उत्तम उपयोग होऊ शकतो.
*किती मीठ खावे.*
वर्ल्ड हेल्थ ऑरर्गनाजेशनच्या सल्लानूसार आपण योग्य प्रमाणातच मीठ सेवन केले पाहीजे.त्यांनी सांगितलेले योग्य प्रमाण म्हणजे दिवसभरात २ ग्रॅम मीठ सेवन करणे कारण मानवी शरीराला दिवसभर फक्त ५०० मि. ग्रॅम सोडियमची गरज असते जी यातून भागविली जाऊ शकते.एक चमचा हिमालय मीठामध्ये ४०० मिग्रॅ सोडियमचे घटक असतात
एका ऑस्ट्रेलियन कंपनीच्या संशोधनानूसार भारतीय ब्लूएचओ ने दिलेल्या प्रमाणापेक्षा ११९ टक्के अधिक मीठ सेवन करतात.असे आढळले आहे की भारतीय लोक दिवसभरात १०.९८ ग्रॅम मीठाचे सेवन करतात जे दिलेल्या योग्य प्रमाणाच्या पाचपट अधिक अाहे.एक चमचा मीठ म्हणजे ६ ग्रॅम मीठाचे प्रमाण ज्यामध्ये २३०० मिग्रॅ सोडियम घटक असतात.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात अर्धा चमचा मीठाचे सेवन करणे योग्य असू शकते हे मात्र लक्षात ठेवा.
पोस्ट आवडल्यास नांवासह शेअर करा. पोस्ट लिहण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतलेला आहे.
वैद्य. गजानन
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे,*
*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,*
*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,*
*त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*
कार्गो आणि प्रवाशी जलवाहतूकीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची उल्लेखनीय कामगिरी
कार्गो आणि प्रवाशी जलवाहतूकीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची उल्लेखनीय कामगिरी
: मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि.01: कार्गो हाताळणीमध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 37 टक्के इतकी लक्षणीय वाढ करीत उल्लेखनीय आणि विक्रमी कामगिरी केली आहे. सन 2022-23 मध्ये 71 दशलक्ष टनांहून अधिक मालाची हाताळणी केली असून मागील वर्षी 52 दशलक्ष टन मालाची हाताळणी झाली होती. याशिवाय प्रवासी जलवाहतूकीत बोर्डाने प्रभावी कामगिरी केली आहे. सागरी उद्योगातील उत्कृष्टतेसाठी बोर्डाची वचनबद्धताच यातून दिसून येते,अशा शब्दात बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे.
राज्याच्या बिगर-प्रमुख बंदरांचा विकास आणि नियमन करण्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आपली कार्यक्षमता सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. त्याचे प्रत्यंतर यावर्षी दिसून आले आहे. नवीन व्यवसायांना आकर्षित करण्यात आणि त्याचा विद्यमान ग्राहकआधार वाढविण्यात बोर्डाला यश आले आहे. उद्योगातील प्रमुख भागधारक आणि संबंधित घटकांशी धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमुळेही कार्गो हाताळणीत लक्षणीय वाढ होण्यास हातभार लागल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी म्हटले आहे.
कार्गो हाताळणीतील उल्लेखनीय कामगिरी बरोबरच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने प्रवासी जलवाहतूक क्षेत्रातही लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. बोर्डाने आपल्या सेवा वापरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवली आहे, सन 2020-21 मधील 0.82 कोटी प्रवाशांवरून सन 2021-22 मध्ये 1 कोटी 36 लाख प्रवासी आणि सन 2022-23 मध्ये 1 कोटी 87 लाखापर्यंत प्रवाशांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने वाढीव फेऱ्यासह नवीन मार्ग खुले केले आहेत आणि एकूण प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी सर्व सुविधा आणि पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केल्या आहेत. कोविड-19 महामारीमुळे सागरी उद्योगासाठी आव्हानात्मक कालावधीनंतर माल हाताळणी आणि प्रवासी वाहतुकीमध्ये महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची प्रभावी कामगिरी दिसून येत असून, ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे यश हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे आहे, कारण सागरी उद्योग व्यापार आणि वाणिज्य सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कार्गो हाताळणीतील वाढीमुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील, ज्यामुळे राज्याच्या वाढीला हातभार लागेल. उद्योगाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सुविधा आणि सेवा वाढवण्याच्या योजनांसह, येत्या काही वर्षांत आणखी विस्तार आणि वाढीचा विचार सुरू आहे. उत्कृष्टतेसाठी वचनबद्धतेसह, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सागरी क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी योग्य स्थितीत असल्याचे मंत्री भुसे यांनी नमूद केले.
000
वजन वाढवण्यासाठी घरगुती*
*वजन वाढवण्यासाठी घरगुती*
उपाय / जाड होण्यासाठी उपाय
खालील दिलेल्या घरगुती उपायांचा नियमित अवलंब केल्यास आपण वजन वाढवू शकता. चला तर मग बघूयात वजन वाढवण्याचे काही गुणकारी उपाय.
पूर्ण झोप – वजन वाढवण्यासाठी फायदेशीर
हल्लीच्या धावपळ व कामाचा अतिरिक्त ताण असल्याने आपली झोप कमी होते व त्यांचे पडसाद आपल्या शरीरावर आपल्याला जाणवतात त्यामुळे भरपूर झोप घ्या. दररोज कमीत कमी ७ तासांची झोप ही तुमच्या शरीराला गरजेची आहे. चांगली झोप घेतल्याने देखील वजन वाढण्यास मदत होते. तुमच्या शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास तुम्ही जे काही खाता त्याच्या तुमच्या शरीरावर चांगला परिणाम दिसतो. त्यामुळे तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर नियमित पणे पुरेशी झोप गरजेची आहे.
बटाटा – वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय
बटाटा – वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय
वजन वाढवण्यासाठी बटाटयाचा तुमच्या जेवणात सहभाग असणे गरजेचे आहे. बटाटामध्ये कार्बेहाइड्रेटस असते जे की तुमचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर बटाटा खाल्लाच पाहिजे. शक्यतो उकडलेला बटाटा खावा आणि तळलेला बटाटा खाणे टाळा. असे केल्याने तुम्हाला 2 महिन्यांमध्ये फरक दिसायला सुरवात होईल.
केळे – वजन वाढवण्यासाठी उपयुक्त
केळे – वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय
केळ हा एक प्रकारे संपूर्ण आहार मानला जातो.केळयात असणारे कॅलरीज व कार्बोहायड्रेट वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे दररोज किमान दोन केळी खालयाने लवकरच तुम्हाला फरक जाणवेल.
खजूर
खजूर आणि दूध – जाड होण्यासाठी उपाय
खजूर खल्ल्यानेही वजन वाढण्यास मदत होते. रोज रात्री दूधात खजूर भिजत ठेवून ते खजूर सकाळी खाल्याने व दूध पियाल्यानेही वजन वाढवण्यास मदत होतो. हा प्रयोग तुम्ही कमीत कमी २ महीने सलग न चुकता केल्यास तुम्हाला तुमच्या वजनात आमुलार्ग बदल झालेला दिसेल.
मनुका
मनुका – जाड होण्यासाठी उपाय
मनुका रात्री पाण्यात टाकून भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. मनुका हा फँटस ला हेल्दी कॅलरीजमध्ये बदलतो ज्यामुळे तुमचे वजन वाढते. मनुकासोबतच तुम्ही आक्रोड व बदाम देखील नियमित पणे खाऊ शकता. सतत दोन महिने जरी तुम्ही हा प्रयोग केल्यास तुम्हाला तुमचे वजन वाढल्याचे नक्की जाणवेल.
नारळाचं तेल
नारळाचे तेल
तुम्ही आता तुमच्या स्वयंपाकामध्ये मोहरी,सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल वापरत असाल पण काही दिवस तुम्ही जेवण हे मोहरी किंवा कोणत्याही रिफाइंड ऑईलमध्ये बनवण्यापेक्षा नारळाच्या तेलात बनवावे. नारळांच तेल हे दुबळेपणा दूर करून वजन वाढवण्यास गुणकारी आहे.दक्षिणे कडील लोक नारळाचे तेल आहारात वापरतात आपल्या कडच्या लोकांना त्याची सवय नसल्यामुळे ते आपल्याला नको वाटते परंतु नारळाचे तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.
काळे चणे
काळे चणे
काळे चणे वजन वाढवण्यास फायदेशीर ठरतात. काळया चण्यांमध्ये प्रोटीन असतात जे की तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. खजूर आणि मनुक्या प्रमाणेच रोज रात्री थोडे काळे चणे पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. तुमचे वजन वाढण्यास नक्कीच मदत होईल.
अश्वगंधा
वजन वाढवण्यासाठी अश्वगंधा हा आयुर्वेदिक पर्याय आहे. एक ग्लास दूधात साधारण पणे २ चमचे अश्वगंधा पावडर मिसळून पिल्याने त्याचा नक्कीच वजन वाढण्यास फायदा होतो. दिवसांतून दोन वेळा याचे सेवन करावे.असे केल्यास साधारण २ महिन्यांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवेल.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे फायदे..!*
*रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे फायदे..!*
बरेच लोक आता आरोग्याबाबत खूप काळजी घ्यायला लागले आहेत. आरोग्य चांगलं रहावं म्हणून बरेच लोक दिवसाची सुरूवात फळं खाऊन किंवा ज्यूस पिऊन करतात.
मात्र, ज्यूसच्या तुलनेत फळ खाणंच अधिक फायदेशीर मानलं जातं. कारण फळांमधूनच डायट्री फायबर आणि अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात. ज्यामुळे पचनतंत्र चांगलं राहतं. आता उन्हाळा सुरू झालाय. या दिवसांमध्ये तुम्ही जर रिकाम्या पोटी डाळिंब खाल्लं तर याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
चला जाणून घेऊ रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे काय फायदे मिळतात.
*अंटीऑक्सीडेंट :*
डाळिंबामध्ये पॉलिफेनोल्स नावाचं फायटोकेमिकल्स असं जे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. डाळिंब रोज जर रिकाम्या पोटी खाल्लं तर शरीरातील पेशांनी फ्री-रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर रोज डाळिंबाचं सेवन केल्याने इम्यूनिटी बूस्ट करण्यासही मदत मिळते.
*किडनी राहते हेल्दी :*
डाळिंबातील अॅंटीऑक्सीडेंट किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तेच जर तुम्हाला किडनी निरोगी ठेवायची असेल तर डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करा. डाळिंब रिकाम्या पोटीच खाल्लं तर जास्त फायदा मिळेल.
*सूज होते दूर :*
डाळिंबामुळे शरीरातील सूज कमी करण्यासही मदत मिळते. कारण यात सूज कमी करणारे अनेक तत्व असतात. शरीरावर सूज असेल तर सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचं सेवन करा.
*अनेक आजार राहतात दूर :*
डाळिंबातील अॅंटीमाइक्रोबियल गुण याला एक प्रभावी अॅंटीबायोटिक बनवतात. ज्यामुळे संक्रमण आणि नुकसानकारक बॅक्टेरियासोबत लढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला हेल्दी रहायचं असेल डाळिंबाचं सेवन नियमितपणे करा.
डॉ. प्रमोद ढेरे,
*⭕️
Saturday, 1 April 2023
कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित रोजगारमेळाव्यात 8 हजार 322 पदांकरिता घेतल्या मुलाखती
कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित रोजगारमेळाव्यात 8 हजार 322 पदांकरिता घेतल्या मुलाखती
मुंबई, दि. 1 : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत नायगाव, दादर (पूर्व) येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी त्यांच्याकडील 8 हजार 322 पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्यात नोकरीइच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मेळाव्यात 30 उद्योग तथा कंपन्यांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले.
नायगाव, दादर (पूर्व) येथील स्प्रिंग मिल कंपाउंड येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकर, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या मेळाव्याला भेट देऊन पाहणी केली.
5 लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा
मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात पाच लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात विविध कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर मेळाव्यात विविध शासकीय मंडळेही सहभागी झाली. त्यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या त्यांच्याकडील विविध कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली.
0000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...