Saturday, 1 April 2023

मुंबईतील समुद्राचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर व्हावा

 मुंबईतील समुद्राचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर व्हावा


                                                                    - राज्यपाल रमेश बैस


राज्यपालांच्या हस्ते हीरक महोत्सवी राष्ट्रीय नौवहन दिनाचे उद्‌घाटन


            मुंबई, दि. 31 : मुंबईला समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा जलवाहतुकीसाठी पुरेसा उपयोग व्हावा. या दृष्टीने माल वाहतूक आणि प्रवाश्यांची वाहतूक या दोन्हीकरिता जल परिवहन सेवा सुरु करण्याबद्दल शक्यतांची तपासणी केली जावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. 


         राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 31) राज्यातील राष्ट्रीय नौवहन सप्ताह आणि हीरक महोत्सवी राष्ट्रीय नौवहन दिनाचे उद्‌घाटन राजभवन, मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.


            जगभरातील विविध व्यापारी जहाजांचे संचलन करणाऱ्या भारतीय नाविकांची संख्या 5.61 लाख इतकी असून जगातील नाविकांच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्के इतके आहे. या क्षेत्रात रोजगाराची संख्या आणखी वाढावी व त्याकरिता सागरी प्रशिक्षण संस्था वाढवाव्यात तसेच सुरु असलेल्या प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण केले जावे, असे राज्यपालांनी सांगितले.  


            शेजारी देशांच्या अर्थव्यवस्था संकटात असताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायांवर उभी असून समुद्री व्यापार क्षेत्र देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने योगदान देईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. 


समुद्री व्यापार क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी : राजीव जलोटा


            जगभरातील नाविकांपैकी 12 टक्के नाविक भारतीय असून सन 2030 पर्यंत हे प्रमाण 20 टक्के इतके वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे नौवहन महासंचालनालयाचे महासंचालक राजीव जलोटा यांनी यावेळी सांगितले.


            भारतीय नौवहन क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढत असून आजच्या घडीला 3 हजार 327 महिला जहाज कर्मचारी म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे श्री. जलोटा यांनी सांगितले. 


            देशभरात सागरी प्रशिक्षण देणाऱ्या 156 संस्था असून त्या देशातील नाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले. 


      राष्ट्रीय नौवहन दिनानिमित्त श्री. जलोटा यांनी राज्यपालांच्या जॅकेटवर राष्ट्रीय नौवहन दिवसाचे पदक लावले तसेच त्यांना नौवहन व्यापाराचे स्मृतिचिन्ह भेट दिले.  


            कार्यक्रमाला नौवहन महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक कुमार संजय बरियार, उपमहासंचालक डॉ. पाडूरंग राऊत, भारतीय नौवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी के त्यागी, संचालक व राष्ट्रीय नौवहन दिवस उत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष अतुल उबाळे, शिपीग मास्टर मुकुल दत्ता तसेच जहाज व्यापार संबधी विविध संस्थाचे आणि नाविक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


0000


Maharashtra Governor inaugurates Diamond Jubilee National Maritime Day Celebrations


            Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the National Maritime Week and the Diamond Jubilee of the National Maritime Day Celebrations at Raj Bhavan Mumbai on Friday (31 Mar).


DG Shipping, Chairman of Mumbai Port Trust and Chairman, NMDC (Central) Committee Rajiv Jalota pinned the first miniature batch of maritime day on the jacket of the Governor to mark the inauguration.


 


            Additional DG Shipping Kumar Sanjay Bariar, Deputy DG Shipping & Member Secretary, NMDC (Central) Committee Dr. Pandurang K. Raut, CMD of Shipping Corporation of India Capt B K Tyagi, Director and Chairman of NMDC organizing committee Atul Ubale, Shipping Master Mukul Dutta and stakeholders and representatives of maritime industry and seafarers union were present.


0000



आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

 आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

 

अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबविण्यासाठी 12 हजार 655 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. प्रामुख्याने आदिवासी समाजासाठी एक लाख घरे बांधली जाणार असून, त्यासाठी एक हजार 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहेबिरसा मुंडा जोडरस्ते ही नवी योजना राज्यात पहिल्यांदा राबवली जाणार आहेयामध्ये हजारो आदिवासी पाडे हे रस्त्यांच्या माध्यमातून जोडली जाणार आहेतआदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून, 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांकरिता 4240.44 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहेविद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, परिक्षा शुल्क व शिक्षण शुल्क इत्यादी बाबींकरीता 459.35 कोटी तरतूद करण्यात आली आहेलोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणगुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष शिकवणीपोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण अशा प्रशिक्षण कार्यक्रमांकरिता 55.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

बांधकामविषयक योजनांकरिता 762 कोटीची तरतूद करण्यात आली आहेपेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना टक्के अबंध निधी अर्थसहाय्यरिता 271.50 कोटीची तरतूद करण्यात आली आहेठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत 118.50 कोटी तरतूद करण्यात आली आहेग्रामपंचायत तसेच गावपाडे स्तरावरील मूलभूत सुविधा कामांकरिता 390 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहेआदिवासी लाभार्थ्यींच्या घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेखाली राज्य हिष्यासाठी 275 कोटीची तरतूद करण्यात आली आहेतसेच प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत निकषात न बसणारे आदिवासी नागरिक घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी 1200 कोटीची तरतूद करण्यात आली आहेअशी आदिवासी लाभार्थ्यींच्या घरकुलासाठी एकूण 1475 कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहेकौशल्य विकास कार्यक्रमाकरिता 10 कोटीची तरतद करण्यात आली आहे याचबरोबर आदिम जमाती विकास योजनेंतर्गत 25 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

शासकीय आश्रमशाळा सम या योजनेंतर्गत आदिवासी मुलांना निवासी शिक्षणभोजनबेडिंग साहित्य तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातातसन 2017-18 पासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य तसेच साधन सामुग्री खरेदी करिता आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहेसद्य:स्थितीत विभागाच्या अधिनस्त 499 शासकीय आश्रमशाळांमध्ये सुमारे 1.97 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेतया योजनेकरिता रु.1810.50 कोटीची तरतद करण्यात आली आहे.

               राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत एकूण 556 अनुदानित आश्रमशाळा मंजूर असून त्यापैकी 64 प्राथमिक अनुदानित आश्रमशाळा व 492 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जातातया 492 माध्यमिक आश्रमशाळांपैकी 155 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालये चालविण्यात येतातसद्य:स्थितीत सुरू असलेल्या 541 अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण विद्यार्थी संख्या 2.41 लाख इतकी आहेया योजनेकरिता 1750 कोटीची तरतद करण्यात आली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना गांवतालुकाजिल्हा व विभागाच्या ठिकाणी माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणन शासकीय वसतीगृह सुरू करण्यात आली आहेतराज्यात 487 शासकीय वसतीगृहे कार्यरत असून त्यामध्ये एकूण 48 हजार 933 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहेया वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना मोफत भोजननिवास व आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येतेसन 2017-18 पासून बेडिंग साहित्यवह्यापुस्तकेशैक्षणिक साहित्य इत्यादी उपलब्ध करून घेण्याकरिता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट निधी जमा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, सन 2018-19 पासून महानगरविभागीय आणि जिल्हास्तरावरील शासकय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना आहाराकरीता थेट लाभ हस्तांतर (DBT) योजनेद्वारे लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहेया योजनेकरीता रु.546.61 कोटीची तरतद करण्यात आली आहे. 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असूननामांकित शाळेमार्फत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या शैक्षणिक व निवासी सुविधांचा खर्च शासनामार्फत करण्यात येतोया योजनेंतर्गत आजतागायत एकूण 157 नामांकित शाळांमध्ये 46 हजार 226 विद्यार्थी शिक्षण घेत आहेतशाळांची निवड व त्यांचा दर्जा निश्चित करुन दर्जानुसार थेट शाळांना निधी वितरित करण्याची ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून याकरीता 300 कोटीची तरतद करण्यात आली आहे.

               ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी भोजननिवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेनुसार पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यात येत आहेसन 2017-18 पर्यंत या योजनेंतर्गत महानगरविभाग स्तर व जिल्हा स्तर या ठिकाणी कार्यरत शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत होतासन 2018-19 पासून तालुका स्तरावरील कार्यरत शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना देखील योजनेचा लाभ देण्यात येत असून  या योजनेकरीता 120 कोटीची तरतद करण्यात आलेली आहे.

               राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत 5अबंध निधी योजना सुरू करण्यात आली आहेया योजनेकरीता 271.50 कोटी इतकी तरतद करण्यात आलेली आहे. राज्यातील बेघर तसेच कुडा-मातीची घरे असणाऱ्या आदिवासींना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना सुरु करण्यात आली आहेशबरी आदिवासी घरकुल’ योजनेंतर्गत ग्रामीण भागाकरीता शौचालय बांधकामासह प्रति घरकुल अनुदान देण्यात येतेया योजनेकरीता 1200 कोटीची तरतद करण्यात आलेली आहे.

राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमाती घटकांच्या वस्त्यांना तसेच गावांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना राबविण्यात येतेत्यामध्ये वेळोवेळी कालानुरूप आवश्यक बदल करण्यात आले आहेतशासनाने सन 2022-23 पासून राज्यातील अनुसूचित जमाती घटकांच्या वस्ती तसेच गावांचा विकास करण्याबाबत सुचविण्यात येणाऱ्या कामांना शासन स्तरावरून व जिल्हास्तरावरून मान्यता देऊन राज्य व जिल्हास्तरारून योजना राबविण्याचा व या योजनेंतर्गत घ्यावयाची कामेअंमलबजावणी यंत्रणा व इतर निकष सुधारित करण्याचा निर्णय 3 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहेया योजनेकरिता 118.50 कोटी इतकी तरतद करण्यात आलेली आहे. 

न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत प्रत्येक आदिवासी व्यक्तिस किंवा कुटुंबास लाभाची आर्थिक मर्यादा 50,000 रूआहेया योजनेंतर्गत 2 किंवा त्यापेक्षा अधिक आदिवासी लाभार्थी एकत्र आले तर सामहिक प्रकल्प किंवा कार्यक्रम सुद्धा मंजर करता येतातया योजनेकरीता एकण 40 कोटीची तरतद करण्यात आली आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणेविद्यार्थी अष्टपैलू व्हावेत म्हणून शिक्षणाव्यतिरिक्त खेळसांस्कृतिक कार्यक्रमव्यावसायिक प्रशिक्षण व विशेष पाठयेत्तर शिक्षण देणे यासाठी केंद्र शासनामार्फत नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावरील महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीमार्फत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल सुरु केले आहेतराज्यात इंग्रजी माध्यमाच्या (CBSE) 39 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मंजूर असून यापैकी 37 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल सुरू आहेतयामध्ये 8048 विद्यार्थी शिक्षण घेत आहेतसद्य:स्थितीत 12 शाळांकरीता इमारत बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित 21 शाळांचे बांधकाम विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर आहे.

            अनुसूचित क्षेत्रात कमी वजनाची बालके जन्मास येणेकुपोषण इत्यादीवर मात करणे तसेच महिला व बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी शासनाद्वारे गरोदर स्त्रियास्तनदा माता आणि 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी भारतरत्न डॉ..पी.जेअब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरु करण्यात आली आहेया योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली असून याद्वारे गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना आठवड्यातून 6 दिवस एक वेळ चौरस आहार देण्यात येत असून, या योजनेकरिता 228.20 कोटीची तरतद करण्यात आली आहे.

            विविध योजनांना आवश्यक निधी उपलब्ध करुन आदिवासींचा सर्वांगीन विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

                                                                                                शैलजा पाटील-विसंअ

000


विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

 विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद


 


            जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. ही अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान हे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. भारताच्या प्रगतीला गती देताना शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीबरोबरच नैतिक मूल्य, संस्कृती, ज्ञान याचा योग्य समन्वय करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे.


 


            देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्व आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार केले. एकविसाव्या शतकातील हे पहिले शैक्षणिक धोरण आहे. भारताला जागतिक ज्ञान-महासत्ता बनविणे, हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. या धोरणानुसार बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना, संधी, समानता, समावेशकता आणि शैक्षणिक दर्जा उंचविणे, ही उद्दिष्ट्ये ठेवली आहेत. भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आणि देशातल्या उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणेचा मार्ग प्रशस्त करणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आणि त्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झालेली आहे.     


                                        

            सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा राज्याचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला. हा सामान्य जनतेसाठीचा 'महाअर्थसंकल्प' आणि 'जनसंकल्प' होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या अर्थसंकल्पात बार्टी, सारथी, महाज्योती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) विभागीय कार्यालय नाशिक येथे उभारण्यात येणार असल्याचे ही जाहीर करण्यात आले आहे.


 


            या अर्थसंकल्पात डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था पुणे, यासंस्थेच्या द्विशताब्दीपूर्ती निमित्त बांधकाम व आधुनिकीकरणासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या प्रशासकीय व परीक्षा भवन इमारतीसाठी 55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त विविध बांधकामांसाठी 77 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई विद्यापीठाच्या विस्तारासाठी 6.23 कोटी विकास निधी व 76.57 लाख रुपयांची वेतनासाठी तरतुद करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठामधील मा. बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक केंद्र व बाळ आपटे अध्यासन केंद्र यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोंडवाना विद्यापीठातील परीक्षा भवन इमारत बांधकामांसाठी 8.43 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


 


            छत्रपती संभाजीनगर मुंबई व नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठाकरीता एकूण 180 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. सदर तरतूदीमध्ये छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील इमारत बांधकाम व मुंबई येथील इमारत भाडे तसेच प्रत्येकासाठी ठोक तरतूद प्रत्येकी 5 कोटी रुपये यांचा समावेश केला आहे.


 


            राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांना विशेष अनुदान देण्यासाठी सन 2023- 24 आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याकरिता विद्यापीठासाठी 1920 कोटींची तरतूद केली आहे अशाप्रकारे उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी या अर्थसंकल्पात जवळपास 13 हजार 613 कोटी 35 लाख 11 हजार रूपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही

 रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील


महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय


          मुंबई , दि.३१ : वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जगंम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात.


          यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनास करण्यात येत होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.


          येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०२३-२४ च्या वार्षिक दर विवरणपत्र दरात कोणताही बदल न करता ते मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवल्यामुळे मालमत्ता खरेदी व विक्री करणाऱ्या दोघांनाही फायदा होतो. सामान्य नागरिकांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच बांधकाम व्यावसायिक, घरकुल विकासक, रिअल इस्टेटमध्ये काम करणारे मध्यस्थ, वकिल व सल्लागार आणि स्थावर मालमत्ता धारकांच्या व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन खरेदी-विक्रीस चालना मिळते. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या बाबी विचारात घेऊन शासनाने सन 2023-24 च्या रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे श्री. विखे- पाटील यांनी सांगितले. 

तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार...🌹*

 *🌹तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार...🌹*


*१) पोट :-* केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही....... 


*२) मूत्रपिंड :-* केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही...... 


*३) पित्ताशय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही........ 


*४) लहान आतडे :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता....... 


*५) मोठे आतडे :-* केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता....... 


*६) फुफ्फुसे :-* केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता........ 


*७) यकृत :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता...... 


*८) हृदय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही  जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता....... 


*९) स्वादुपिंड :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता...... 


*१०) "डोळे" :-*  केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता...... 


*११) "मेंदू" :-* केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता....... 


निसर्गाने "माेफत" मध्ये दिलेल्या शरीराच्या "अवयवाची" योग्य "काळजी" घ्या आणि त्यांना "बिघडवू" देऊ नका  शरीर "स्वस्थ" तरच आपण "मस्त".......


कारण----------


"शरीराचे" कोणते ही"अवयव" हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने सुट होऊन बसतीलच असे नाही म्हणून आपल्या "शरीरातील अवयवांची" नेहमी काळजी घ्या........


तुम्हीच आहात तुमच्या शरिराचे खरे राखणदार......


काळजी घ्या आपली व आपल्यांची.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*



तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार...🌹*

 *🌹तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार...🌹*


*१) पोट :-* केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही....... 


*२) मूत्रपिंड :-* केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही...... 


*३) पित्ताशय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही........ 


*४) लहान आतडे :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता....... 


*५) मोठे आतडे :-* केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता....... 


*६) फुफ्फुसे :-* केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता........ 


*७) यकृत :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता...... 


*८) हृदय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही  जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता....... 


*९) स्वादुपिंड :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता...... 


*१०) "डोळे" :-*  केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता...... 


*११) "मेंदू" :-* केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता....... 


निसर्गाने "माेफत" मध्ये दिलेल्या शरीराच्या "अवयवाची" योग्य "काळजी" घ्या आणि त्यांना "बिघडवू" देऊ नका  शरीर "स्वस्थ" तरच आपण "मस्त".......


कारण----------


"शरीराचे" कोणते ही"अवयव" हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने सुट होऊन बसतीलच असे नाही म्हणून आपल्या "शरीरातील अवयवांची" नेहमी काळजी घ्या........


तुम्हीच आहात तुमच्या शरिराचे खरे राखणदार......


काळजी घ्या आपली व आपल्यांची.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/J3gm5TqJxhO4Vs619oeA8N

खर आहे ना

 




*

Featured post

Lakshvedhi