Thursday, 30 March 2023

आरोग्य संदेश -एरंडेल तेल*

 *एरंडेल तेल*


एरंडेल तेलाला आयुर्वेदात अमृताची उपमा देण्यात आली आहे. एरंडेल तेलाचे आरोग्यविषयक अनेक उपयोग आहेत ते कोणते ते आपण पाहूया.


१. पोट साफ होण्यासाठी


एरंडेल तेल घेतल्याने पोटात न दुखता जुलाब होऊन पॉट साफ होते. वृद्धांच्या पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही हे रोज घेता येते. सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात एक चमचा एरंडेल तेल घ्यावे.


२. डोळ्यांच्या विकारांवर


रांजणवाडी किंवा डोळ्याच्या इतर तक्रारींवर यासाठी एरंडेलाचा थेंब बोटावर घेऊन तो काजळासारखा पापण्याच्या आत फिरवावा. तसेच एरंडेल तेल पापण्यांना लावल्याने पापण्यांची देखील दाट होतात.


३. आमवात आणि सांधेदुखी


युरिक ऍसिड वाढणे आमवात, सायटिका, गाऊट, गुडघेदुखी हे हल्लीच्या तरुण वयात देखील होऊ लागले आहेत. ज्यांना या समस्या आहेत त्यांनी आहारात रोज सकाळी रात्री थोडं तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. ८-१५ दिवस करून पाहावे. दुखऱ्या सांध्यांना सुंठ पावडर एरंडेलचा लेप लावल्यास आराम पडतो.


४. लहान मुलांसाठी


लहान मुलांना मधातून किंवा कणकेची पोळी करताना त्यात एरंडेल व चिमूटभर सुंठ पावडर टाकून ती द्यावी. हे असे महिन्यातून किमान एकदा तरी मुलांना द्यावे. पूर्वी नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही मध एरंडेलाचे चाटण देण्याची पद्धत होती.


५. गर्भवतींसाठी


गर्भवतींनी ‘सिझेरियन’ टाळायचे असेल तर नववा महिना लागताच रोज एक चमचा एरंडेल घ्यावे.( हे घेताना एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.


६. रक्तदोषात गुणकारी


अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे.


७. उत्तम झोपसाठी  


अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. सतत विचार सुरु राहणे यामुळे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे नक्कीच गुण येतो.

Cp.

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



_*

राम नवमी शुभ कामना

 मंगल भवन अमंगल हरि, द्रवाहु सु दशरथ अजरा बिहारी। राम सिया राम सिया राम जय जय राम। यहां आपको और आपके परिवार को राम नवमी की बहुत-बहुत शुभकामनाएं।🌹🌹


सुप्रभात

 : *शुभ सकाळ*


*आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी जन्माला आलो आहे, म्हणून आपलं आयुष्य मनोसोक्त जगा *Don't close the book when bad things happen in your life, just turn the page and begin a new chapter.*


 *A successful relation doesn’t depend on how good understanding we have?*

*But it depends on how better we avoid ‘Miss-understandings'….......*

 *Good Morning*

: *नई सुबह इतनी सुहानी हो जाए;*

*आपके दुखों की सारी बातें पुरानी हो जाएं;*

   *दे जाए इतनी खुशियां ये दिन आपको;*

    *कि ख़ुशी भी आपकी मुस्कुराहट की दीवानी हो जाएं ।*


🌹सुप्रभात🌹

शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत

 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचेपणन संचालकांचे आवाहन.

            मुंबई, दि. 29 : सन २०२२ - २०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे.


            राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.


            तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन २०२२ -२०२३ चा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.


अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे


            विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत,आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत,ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र. आवश्यक आहे.


            सदर अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक ,नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत, असे पणन संचालक यांनी कळविले आहे.


००००

Wednesday, 29 March 2023

दिलखुलास' कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त

 दिलखुलासकार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त

अपर मुख्य सचिव अनुपकुमार

           

            मुंबईदि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 31 मार्च 2023 व शनिवार दि. 1 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि पुढाकारामुळेचसंयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. अन्नसुरक्षेचे अहारातील महत्व सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून देशभरात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून मिलेट विपणन आणि मुल्यसाखळी या विषयावर सहकार आणि पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी माहिती दिली आहे. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन आपण दिलखुलास’ कार्यक्रमातून ऐकणार आहोत.

000

मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का*_

 *मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का*_


*व्यायाम* हे औषध आहे.


*सकाळ/संध्याकाळ चालणे* हे औषध आहे.


*उपवास* हे औषध आहे.


*कुटुंबासोबत जेवण* हे औषध आहे.


*हसणे आणि विनोद* हे देखील औषध आहे.


*गाढ झोप* हे औषध आहे.


*सर्वांशी मिळून वागणे* हे औषध आहे.


*आनंदी राहण्याचा निर्णय* हे औषध आहे.


*मनातील सकारात्मकता* हे औषध आहे.

*सर्वांचे भले* हे औषध आहे.


*इतरांसाठी प्रार्थना* हे औषध आहे.


कधी कधी *मौन* हे औषध असते.


*प्रेम* हे औषध आहे.


*मन:शांती* हे औषध आहे.


_आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत_


आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे?


*प्रत्येक चांगला मित्र* हे एक परिपूर्ण *मेडिकल स्टोअर* आहे.


 *🌹 🍁🌹🍁🌹🍁* *🌹🍁🌹*🙏

दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन

 दहा वर्षे पूर्ण झालेल्या आधार’ कार्डचे

नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 29 : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाहीअशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावेअसे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करावयाची आहे. प्राधिकरणाच्या २३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार माय आधार (My Aadhaar) (एसएसयूपी) पोर्टलद्वारे ऑनलाइन आधार कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी १४ जून २०२३ पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डची कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावाअसेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे

Featured post

Lakshvedhi