Thursday, 2 March 2023

विविध देशातील विविध टेक्नॉलॉजी

 

सारे देश महान

दिलखुलास' कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60' उपक्रमातील नवउद्योजकांची मुलाखत.

 दिलखुलास' कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60' उपक्रमातील

नवउद्योजकांची मुलाखत.

               मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60' उपक्रमातील नवउद्योजक कार्तिक रायचुरा, राखी जैन, संतोष पापडे, मानसी काशिकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 2 मार्च शुक्रवार दि. 3 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात एक सामंजस्य करार झाला असून याचा फायदा राज्यातील नवउद्योजकांना होणार आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजकांसाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस अॅक्सिलेटर स्थापन करण्यात आले आहे. भारतातील हा पहिलाच अॅक्सिलेटर उपक्रम आहे. या माध्यमातून 'कॉर्नेल महा-60' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नुकतेच राज्यातील 60 निवडक तरूण उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नवउद्योजकांशी 'दिलखुलास' कार्यक्रमातून संवाद साधला आहे. कार्तिक रायचुरा, राखी जैन, संतोष पापडे, मानसी काशिकर या नवउद्योजकांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून उपयुक्त माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000000


 

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फेअनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

 संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फेअनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

        मुंबई, दि. 1 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. या योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना आणि बीजभांडवल योजना कर्ज प्रस्तावाचे अर्ज 9 मार्च 2023 पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत. तसेच अर्ज स्विकृती कार्यालयीन वेळेत करण्यात येईल, इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.


        चर्मकार समाजांतर्गत असणाऱ्या चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमांप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तीन प्रतीत महामंडळाच्या कार्यालयात स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून अर्ज दाखल करावेत. त्रयस्थ अथवा मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.


       अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. यात जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा).,अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला, चालू वर्षाचा (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा), नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो तीन प्रती जोडाव्यात, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स प्रत, ओळखपत्र-आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड प्रत, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन).,व्यवसाय ज्या ठिकाणी करायचे आहे त्या जागेची भाडेपावती/करारपत्रे किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. 8), वीजबिल, टॅक्स पावती इ, बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल व दोन सक्षम जामीनदार, वाहनासाठी लायसन्स, बॅच परवाना, व्यवसायाचे ग्रा.पं./न.पा. यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्रावरील कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.


            कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, गव्हर्नमेंट लेदर वर्किंर्ग स्कूल कंपाऊंड, खेरवाडी, बांद्रा (पूर्व), मुंबई-400 051 या ठिकाणी स्विकारले जातील. मुंबई शहर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील बेरोजगार युवक युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.


000


कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती.

 कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती.

            मुंबई, दि. १ : कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायातील निदेशकांच्या रिक्त जागांची भरती जाहीर झाली असून या रिक्त जागा तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरल्या जाणार आहेत.


            या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन २, फिटर (जोडारी) २, इन्फरमेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टीम मेन्टेनन्स १, यांत्रिक प्रशीतन व वातानुकुलीकरण २, कातारी (टर्नर) ४, इन्स्ट्रूमेंट मॅकॅनिक १ इतक्या रिक्त जागा तासिका तत्वावर भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली असून संबंधित व्यवसायाचे आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र, एनसीव्हीटीचे प्रमाणपत्र, एटीएस उत्तीर्ण व दोन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.


            इच्छुक उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्राच्या प्रतींसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.


०००००

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे

            मुंबई, दि. 1 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी अमरावती विभागाचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल यांनी ही नियुक्ती केली आहे. नवनियुक्त सदस्य डॉ. पांढरपट्टे यांना आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप रा. दिघावकर, सचिव डॉ. सुवर्णा सिद्धार्थ खरात, सहसचिव सुनील अवताडे आदी उपस्थित होते. आयोगाचे अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी सदस्य डॉ. पांढरपट्टे यांचे स्वागत करून परिचय करून दिला.


            डॉ. पांढरपट्टे हे १९८७ च्या राज्य सेवा तुकडीचे अधिकारी आहेत.त्यांनी उपजिल्हाधिकारी, उपायुक्त म्हणून कोकण भवनसह कोकणात सेवा बजावली आहे. सन २००० मध्ये त्यांना अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती मिळाली. सन २०१५ मध्ये त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात आली. सिंधुदुर्ग, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव, अमरावती विभागाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. डॉ. पांढरपट्टे यांनी प्रशासकीय सेवेत राहून साहित्यिक सेवा बजावली आहे. त्यांनी उर्दू भाषेचे ज्ञान आत्मसात केले आहे. ‘गझल’ हा त्यांचा आवडता काव्य प्रकार आहे. त्यांची विविध विषयांवरील दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.


0000 

ये जिवन हैं, इसी जिवन का याही हैं






 

Wednesday, 1 March 2023

शेतकरी, विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती संदर्भात प्रशिक्षण देणार

 शेतकरी, विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती संदर्भात प्रशिक्षण देणार

- कृषीमंत्री अब्दुल सत्तार 

            मुंबई, दिनांक 28 : शेतकरी आणि कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आधुनिक यंत्रासोबत सेंद्रिय शेती आणि प्रगत शेती या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी डाबर, टाफे कंपनी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात करार करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.


            मंत्री श्री. सत्तार यांनी आज मंत्रालयात डाबर आणि टाफे कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चंद्रमणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, टाफे कंपनीचे टी. आर. केशवन, वरिष्ठ संशोधक डॉ. लक्ष्मण सावंत, डॉ. उदय खोडके, डॉ. डी. आर. कदम आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री.सत्तार म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटाच्या काळात मदत करून त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आज टाफे कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यात कंपनीतर्फे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाशी करार करण्यासंदर्भात चर्चा झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यातील हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकरी स्वयंपूर्ण होण्यास नक्की मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


आयुर्वेदिक वनस्पतींचे करणार संगोपन


             आयुर्वेदात महत्त्व असणाऱ्या अनेक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात सापडणाऱ्या या आयुर्वेदिक वनस्पतींचे संगोपन करण्यासंदर्भात डाबर कंपनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पूरक जोडधंदा उपलब्ध होईल, असेही मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.


000

Featured post

Lakshvedhi