Wednesday, 1 March 2023

आधुनिक न्यायवैद्यक तंत्रज्ञान काळाची गरज

 आधुनिक न्यायवैद्यक तंत्रज्ञान काळाची गरज


  - माजी लोकायुक्त एम. एल. टहलियानी


          मुंबई, दि 28: आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुलनेत गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा राज्याचे माजी लोकायुक्त एम. एल.टहलियानी यांनी केले.


            राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त न्याय सहाय्यक संस्थेच्यावतीने वार्षिक राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान प्रदर्शनाचे (नॅशनल फॉरेन्सिक एक्सपो- 2023) मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, न्याय सहाय्यक भौतिकशास्त्र विभागप्रमुख ना. मा. फटागरे, डॉ होमी भाभा विद्यापीठाचे अविनाश दलाल, माजी आमदार अतुल शाह यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.


            माजी लोकायुक्त श्री. टहलियानी म्हणाले की, पुढील काळात न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तंत्रज्ञानाला खूप महत्व असणार आहे. गुन्हेगार आपला पुरावा मागे राहू नये यासाठी प्रयत्न करत असतो. पुरावे नष्ट करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. अशा प्रकारचे गुन्हेगार शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप गरजेचे आहे. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी फॉरेन्सिक तंत्रज्ञान उपयोगी पडेल आणि अनेक प्रकरणांचा उलगडा होईल. न्यायवैद्यक अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून अहवाल देताना स्पष्टता आणि पारदर्शक दिला पाहिजे. 26/11 च्या दहशतवादी हल्ला प्रकरणांमध्ये न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने फायदा झाला, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


न्यायवैद्यक तंत्रज्ञानाची न्यायदानात महत्वाची भूमिका 

                                        - कुलगुरू डॉ. रजनीश कामत


            राष्ट्रीय विज्ञान दिवस हा महत्वाचा दिवस असून या दिवसाची यावर्षीची संकल्पना ‘वैश्विक कल्याणासाठी वैश्विक विज्ञान’ (ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिइग) अशी आहे. न्याय व्यवस्थेत न्यायवैद्यक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आज सायबर गुन्हेगारीत वाढ होतांना दिसत आहे, असे गुन्हे घडू नयेत म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. आज बरेच लोक तंत्रज्ञानचा वापर करत आहेत. निर्भया प्रकरणामध्ये न्यायवैद्यक तंत्रज्ञानाच्या वापरमुळे फायदा झाला. तंत्रज्ञान वापरण्याबाबत नागरिकांना जागरूक केले पाहिजे, असे कुलगुरु डॉ.कामत यांनी सांगितले.


            गुन्हे स्थळ दृश्य पुनर्रचना, छाप पुरावे, रक्त नमुना विश्लेषण, आपत्ती प्रकरणातील व्यक्तींची ओळख, मृत्यू वेळेचा अंदाज, वैज्ञानिक तंत्र, फसवणुकीचा शोध, शोध आणि विश्लेषण, विष आणि औषधे, पेंट आणि काचेचे विश्लेषण, प्रयोगशाळा प्रणाली आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.


            सायबर विभागाकडून 20 मिनिटांचा ऑनलाईन शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम याठिकाणी ठेवण्यात आला आहे.


000000

नवी दिल्लीत आदि महोत्सवाची सांगता

 



नवी दिल्लीत आदि महोत्सवाची सांगता

महाराष्ट्राच्या दालनांना उत्तम प्रतिसाद.

            नवी दिल्ली, २८ : आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून राजधानी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आदि महोत्सवाची केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत सोमवारी सांगता झाली. या ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात राज्यातील आदिवासी दालनांना उत्तम प्रतिसाद मिळाला.


            येथील ध्यानचंद स्टेडियम येथे आदि महोत्सवाचे उद्घाटन 16 फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, ट्रॉयफेडचे अध्यक्ष रामसिंह राठवा उपस्थित होते.


            राज्याच्या वतीने या ठिकाणी दालने उभारली होती. याअतंर्गत तीन वारली चित्रकारांची दालने, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची दोन दालने, आदिवासी समाज जीवनातील खाद्य पदार्थांचे दालन, एक आदिवासी शेतकरी उत्पादित कंपनीच्या वस्तूंचे दालन आणि आणखी एक सेंद्रीय वस्तूंच्या उत्पादनाचा स्टॉलही होता. या दालनांना राजधानीतील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया स्टॉलधारकांनी दिली.


            राज्याच्या दालनाला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भेट‍ दिली होती. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी ही भेट दिली. 


            आदि महोत्सवामुळे आदिवासी कारागीरांना लाभ झाला असल्याचे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा सांगता सोहळ्यात म्हणाले. तीन कोटींपेक्षा अधिक आर्थिक व्यवहार या महोत्सवात झाला असल्याचे श्री. मुंडा यांनी सांगितले. याप्रसंगी सहभागी लाभार्थींना आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले.


            200 पेक्षा अधिक दालने या महोत्सवात होती. याअंतर्गत आदिवासी समाजातील समृद्धता आणि सांस्कृतिक पंरपरेचे दर्शन घडविले गेले. हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष (भरडधान्य/ श्री अन्न) म्हणून साजरे केले जात असल्यामुळे येथे आदिवासी समाजात रोजच्या आहारात वापरण्यात येणाऱ्या भरड धान्याचे दालन विशेष आकर्षण ठरले. तसेच हस्तकला, हातमाग, मातीची भांडे, दागदागिने, अलंकार, सजावटीच्या वस्तू इत्यादी आदि महोत्सवाचे आकर्षण होते.


०००००



 


 

राज्य सेवा (मुख्य) परीक्षाच्या मुलाखतीनंतरदोन तासांत गुणवत्ता यादी जाहीर.

 राज्य सेवा (मुख्य) परीक्षाच्या मुलाखतीनंतरदोन तासांत गुणवत्ता यादी जाहीर.

            मुंबई, दि.२८: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा, २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ डिसेंबर २०२२ ते दि. २८ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या.


            या मुलाखती पार पडल्यानंतर आज लगेच २ तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पामधील सिंचनतूट भरून काढण्यासाठी पाणीसाठा निर्माण करणार

 विधानसभा लक्षवेधी :

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पामधील सिंचनतूट भरून काढण्यासाठीपाणीसाठा निर्माण करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


          मुंबई, दि. 28 : उर्ध्व पैनगंगा हा मोठा जलसिंचन प्रकल्प असून यामध्ये अपेक्षित पाणीसाठा क्षमता उपलब्ध होत नाही. त्यामुळे या प्रकल्पाची यशस्वीता वाढविण्यासाठी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये उच्च पातळी श्रुंखला प्रस्तावित करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सिंचनातील तुट भरुन काढण्यासाठी पाणीसाठा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.


          याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, राजेश पवार, मोहनराव हंबर्डे, संजय गायकवाड यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री.फडणवीस बोलत होते.


          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यपाल यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनाचा अनुशेष घोषित केला आहे. या अनुशेषांची पूर्तता करण्यासाठी 14 योजनांना मान्यता दिलेली आहे. या 14 योजनांमध्ये जांभरुन बृहत लघू पाटबंधारे योजनेचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष दूर करण्यासाठी खरबी बंधाऱ्याचा पाणी वापर 17.62 दशलक्ष घनमीटरने कमी करुन जांभरुन बृहत लघु पाटबंधाऱ्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.


             हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष भरुन काढताना दुसऱ्या जिल्ह्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन उर्ध्व बाजूस कोणताही नवीन प्रकल्प घेतला जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. जेणेकरुन धरणाच्या पाणी वापरात तुट येणार नाही, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केले.


000

वसतिृह sc,,nt,vjnt,obc,sbc

 



जिंदगी

 



जय हो


 

Featured post

Lakshvedhi