Tuesday, 28 February 2023

वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वनाचे रक्षण व संवर्धन करण्‍यात सिंहाचा वाटा – ना. सुधीर मुनगंटीवार

 



वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वनाचे रक्षण व संवर्धन करण्‍यात सिंहाचा वाटा – ना. सुधीर मुनगंटीवार

वनपरिक्षेत्र अधिका-यांच्‍या राज्‍यस्‍तरीय अधिवेशनाला उपस्थिती.

नागपूर,दि.२८ : वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वनखात्‍याचा अतिशय महत्‍वाचा भाग आहे. यांच्‍यामुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्‍यास मदत होते, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. फॉरेस्‍ट रेंजर्स असोसिएशन, महाराष्‍ट्र द्वारे आयोजित राज्‍यस्‍तरीय अधिवेशनात बोलताना ना. मुनगंटीवार यांनी वरील वक्‍तव्‍य केले. प्रत्‍येक आर.एफ.ओ. कडे वनविभागाची पूर्ण जबाबदारी असते व ती जबाबदारी पूर्ण गांभीर्याने प्रत्‍येक आर.एफ.ओ. पार पाडत असतो याचे मला समाधान आहे, असेही बोलताना पुढे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाला फॉरेस्‍ट रेंजर असोसिएशनचे महाराष्‍ट्र अध्‍यक्ष कांतेश्‍वर बोलके, अरूण तिखे, असोसिएशनचे सरचिटणीस निलेश गावंडे, नागपूरचे मुख्‍य वनसंरक्षक रंगनाथ नायकडे, संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष विनोद देशमुख, संस्‍थेचे माजी सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आर्यनमन विजेता विशाल बोदडे यांचा ना. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी प्रास्‍ताविक करताना असोसिएशनचे सरचिटणीस निलेश गावंडे यांनी आर.एफ.ओ. च्‍या विविध अधिकार व समस्‍यांवर सादरीकरण केले. यामध्‍ये मुख्‍यतः कर्मचारीवर्गांची कमी असल्‍यामुळे काम करण्‍यास अडचणी येतात तसेच वेतनश्रेणीवर सुध्‍दा त्‍यांनी सादरीकरणात सांगीतले.

याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की,


फॉरेस्‍ट सर्व्‍हे ऑफ इंडिया यांच्‍या एका अहवालानुसार महाराष्‍ट्राचे हरीत क्षेत्र २५५० स्‍वेअर किमीने वाढले आहे. तसेच मॅनग्रोज चे क्षेत्र सुध्‍दा वाढले आहे. वनक्षेत्राशी संबंधित ज्‍या गोष्‍टी चांगल्‍या होत आहेत. त्‍यामध्‍ये तुमचा तसेच वनविभागाच्‍या सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्‍या काही वर्षात विदर्भात वाघांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. त्‍यांचे संवर्धन व संरक्षण ही जबाबदारी सुध्‍दा तुम्‍ही सर्वजण उत्‍तम पध्‍दतीने करता ही आनंदाची गोष्‍ट आहे. वनविभागाच्‍या संवर्धनामध्‍ये तुमच्‍यासहीत सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे व महाराष्‍ट्र वनविभाग देशात नंबर एकवर राहण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावा असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमात आपण अनेक विषय आपण मांडलेत. यात ब-याच मागण्‍या सुध्‍दा आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेन असे आश्वस्त ना.

क्रिडा क्षेत्रात उत्‍तम काम करणारी संस्‍था म्‍हणजे क्रिडा भारती

 क्रिडा क्षेत्रात उत्‍तम काम करणारी संस्‍था म्‍हणजे क्रिडा भारती – ना. मुनगंटीवार

क्रिडा भारतीच्‍या विदर्भ प्रांत अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थिती.

नागपूर,दि.२८: व्‍यक्‍तीच्‍या मानसिक स्‍वास्‍थ्‍याबरोबर शारीरिक स्‍वास्‍थ्‍य उत्‍तम असणे ही आवश्‍यक गोष्‍ट आहे. त्‍यासाठी कुठल्‍यातरी क्रिडा प्रकाराशी प्रत्‍येकाने संलग्‍न असणे आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने क्रिडा भारती क्रिडा क्षेत्रामध्‍ये लोकांना जोडणारे काम करीत आहे ही अतिशय कौतुकास्‍पद बाब आहे व त्‍याबद्दल मी त्‍यांचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

कार्यक्रमाला अध्‍यक्ष म्‍हणून श्री. विजय मुनीश्‍वर, प्रमुख अतिथी म्‍हणून क्रिडा भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री प्रसाद महानकर, अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, स्‍वर्णिम गुजरात क्रिडा विद्यापीठाचे कुलगुरू श्री. अर्जुनसिंग राणा, अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्‍य श्रीमती मधु यादव, क्रिडा भारतीची विदर्भ प्रांत उपाध्‍यक्ष डॉ. योगेश सालफळे, शहर अध्‍यक्ष शरद सुर्यवंशी, संजय लोखंडे उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्‍हणाले की,हे वर्ष देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाचे आहे. त्‍यामुळे यावर्षी क्रिडा भारतीने जास्‍तीत जास्‍त खेळाडूंपर्यंत पोहण्‍याचा प्रयत्‍न करावा व जास्‍तीत जास्‍त विद्यार्थ्‍यांना खेळासाठी उद्युक्‍त करावे. मी राज्‍यात सांस्‍कृतीक विभागाचा मंत्री आहे. येणारे वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या राज्‍य अभिषेकाचे ३५० वे वर्ष असणार आहे. जुन २०२३ ते मे २०२४ पर्यंत या निमीत्‍ताने राज्‍यामध्‍ये निरनिराळे कार्यक्रम विभागातर्फे आयोजित केले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंब तलवार व अफजल खानाचा वध करणारी वाघनखे इंग्‍लंडमधील संग्रहालयात ठेवलेली आहेत. मी इंग्‍लंडच्‍या पंतप्रधानांशी पत्रव्‍यवहार करून या वस्‍तु भारताला परत करण्‍यासंदर्भात विनंती केली आहे. इंग्‍लंडच्‍या सरकारने या संदर्भात सकारात्‍मक भुमीका घेतली असून यासंदर्भात लवकरच चांगला निर्णय होईल याची मला खात्री आहे.

संपूर्ण महाराष्‍ट्रात स्‍मार्ट सिंथेटीक ट्रॅक हे फक्‍त तीन ठिकाणी आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो की हे तिन्‍ही ट्रॅक चंद्रपूर जिल्‍हयात आहेत. सैनिक स्‍कुल, बल्‍लारपूर स्‍टेडियम व चंद्रपूर स्‍टेडियम या ठिकाणी हे ट्रॅक आहेत. यामुळे खेळाडूंना सराव करण्‍यास मदत होते व ऑलिम्‍पीक स्‍तरावर जाण्‍यासाठी खेळाडूंना प्रोत्‍साहन मिळते, असे ना. मुनगंटीवार याप्रसंगी म्‍हणाले.

‘बुंद बुंद से सागर बनता है और व्‍यक्‍ती व्‍यक्‍ती से देश बनता है’ हे सुत्र ठेवून क्रिडा भारती काम करीत आहे याचा मला अतिशय आनंद आहे. अनेक राष्‍ट्रीय व आंतराष्‍ट्रीय खेळाडू या संस्‍थेशी जुळले आहेत व पुढेही नवनविन सदस्‍य या संस्‍थेशी जुळतील याची मला खात्री आहे असे याप्रसंगी ना. मुनगंटीवार म्‍हणाले.

याप्रसंगी विद्यार्थ्‍यांनी निरनिराळी प्रात्‍यक्षीके सादर केली तसेच जुन्‍या काळातील शस्‍त्रातांचे प्रदर्शनही यावेळी ठेवण्‍यात आले. कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातुन क्रिडा भारतीचे पदाधिकारी, क्रिडा शिक्षक तसेच विविध क्रिडा प्रकारातील खेळाडू उपस्थित होते.

कृषि महोत्सवात कृषि विभागाच्या अफलातून नियोजनाचा लखलखाट यशश्वी

 कृषि महोत्सवात कृषि विभागाच्या अफलातून नियोजनाचा लखलखाट यशश्वी


कृषी महोत्सवात झाला शेतकऱ्यांचा सन्मान; हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा कृषि महोत्सवाची सांगता


बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच लाखो शेतकऱ्यांच्या साक्षीने अभूतपूर्व कृषि महोत्सव हर्षात संपन्न झाला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या समारोपदिनी जिल्ह्यातील 1965 पासून महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केलेल्या शेतकऱ्यांचा सोहळा आयोजित केला होता. दरम्यान आदर्श शेतकऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कृषि महोत्सवात आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवेंच्या अफलातून नियोजनाचा लखलखाट यशश्वी झाल्याचे चित्र दिसत होते.



 शेतकऱ्यांच्या आयुष्यात आधुनिक शेती आणि नवतंत्रज्ञपूरक शेती व्यवसायात उजेड पडणारा ऐतिहासिक महोत्सव साजरा करून बीडच्या कृषी विभागाने एक इतिहास रचला आहे. दरम्यान या शेवटच्या निरोपाच्या कार्यक्रमाच्या सत्राच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती त्रिवेणी भोंदे, संचालक उमेद, बाबासाहेब जेजुरक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड, सुभाष साळवे, प्रकल्प संचालक आत्मा, दत्ता बारगजे इन्फंट इंडिया, एस. एस. मडके उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव, बी. आर.गंडे प्रकल्प उपसंचालक बीड, गरांडे जिल्ह्या गुण नियंत्रण अधिकारी, बनकर ,सेंद्रिय शेती कृषी भूषण शिवराम घोडके, अभिमान अवचार, बाबासाहेब पिसोरे आदींची उपस्थिती होती.  


यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक बी. आर.गंडे प्रकल्प उपसंचालक आत्मा बीड यांनी केले. पुरस्कार प्राप्त शेतकरी जीवनराव बजगुडे यांनी पूर्वीची शेती आणि आजची शेती यामधील यव्यवस्था याविषयी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब पिसोरे यांनी मनोगत व्यक्त करताना अतिशय उत्कृष्ट्या रित्या कृषी महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल कृषी विभाग व आत्मा यांचे विशेष अभिनंदन केले. विशेष करून आत्माचे सुभाष साळवे यांचे शेतकऱ्यांमधून कौतुक झाले. तसेच शेतकऱ्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. प्रल्हाद गवारे यांनी मनोगत व्यक्त करताना भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये काळानुरूप बदल करून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे सांगितले. सेंद्रिय शेती कृषी भूषण शिवराम घोडके यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी विभाग सदैव शेतकऱ्याच्या सोबत राहतो, शेतकऱ्यांसाठी कृषि विभाग अनेक प्रकारच्या योजना राबवत असून शेतकऱ्यांची वेळोवेळी दखल घेतली जाते अशा भावना व्यक्त करत शेतकऱ्यांचा योग्य सन्मान केला जातो असे सांगितले. अभिमान अवचार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्याला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी शेतकऱ्यांनी मांडलेले प्रश्न आणी समस्या सोडवल्या जातील असे सांगितले. तसेच कृषी विभाग आपल्या पाठीशी असून सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहच करण्याचा प्रयत्न केलेजात आहेत. पुरुषाच्या बरोबरीने महिलांना सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे कारण महिला शेतीमध्ये जास्त काम करतात. शेती हा व्यवसाय म्हणून केली पाहिजे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेती परवडते. सेंद्रीय शेती केली तर उत्पादन खर्च कमी करून आपले आरोग्य अबाधीत राखले जाते. सध्या महिला बचतगटाच्या महिला आपले उत्पादनाची विक्री स्वतः करतात त्यामुळे त्याना चांगला फायदा होत आहे. भविष्यात गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केली तर शासनाच्या अनेक योजना आपल्यापर्यंत पोहचू शकतात. कृषी महोत्सवात उमेद गटाची मोठया प्रमाणात विक्री झाली असे जेजुरकर यांनी सांगितले. यावेळी जिल्याह्यातील सर्व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कृषी महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबर नागरिकांनी मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला. कार्यक्रम माचे सूत्रसंचालन जुबेर पठाण तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बीड यांनी केले. आभार गोरख तरटे तालुका कृषी अधिकारी आष्टी यांनी केले. 

महात्मा फुले कार्यक्रम मुरुड



 

भवताल February


 भवताल’चा फेब्रुवारी २०२३ चा अंक प्रसिद्ध

भवताल’चा फेब्रुवारी २०२३ चा अंक प्रसिद्ध!

 भवताल’चा फेब्रुवारी २०२३ चा अंक प्रसिद्ध!

नमस्कार.


भवताल मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक प्रसिद्ध झाला आहे. तो सोबत शेअर करत आहोत.

अंकात पुढील लेखांचा समावेश आहे.

· यंदाच्या पावसावर ‘एल-निनो’चा प्रभाव किती?


· रस्त्यावर प्राणी मरू नयेत म्हणून...


· बकऱ्यांच्या कळपातील काळवीट


· पर्यावरणविषयक घडमोडींचे ‘इको-अपडेट्स’


· विविध उपक्रमांचे ‘भवताल बुलेटीन’


आपण अंकासाठी नावनोंदणी केल्यामुळे आपणाला हा अंक देत आहोतच. जोडीला अंकाचे कव्हर आणि नावनोंदणीची लिंक देत आहोत. ती आपल्या संपर्कात पोहोचवून लोकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.



तसेच, आपणही वर्गणीसह अंकाची नावनोंदणी करून ‘भवताल’ च्या कार्याला पाठबळ द्यावे, ही विनंती.

नावनोंदणीसाठी लिंक:

https://www.bhavatal.com/connectus/masik-nondani-information

- संपादक, भवताल मासिक

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

महाराट्रतले फेमस मंकी कॅचर *

 महाराट्रतले फेमस मंकी कॅचर *हकीम शेख व टीम* हे आपल्या चौल, रेवदंडा, नागाव, वांनरांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न आणि पर्यायी मार्गदर्शन करण्या साठी आपल्या कृषी प्रदर्शनात ( चौल मुखरी मंदिर )येथे

दि.5/3/23 रोजी ठीक 10:30 वा. येणार आहेत

तसेच सापांची माहिती व समज गैरसमज वर चर्च्या सत्र कर्यक्रम

आयोजन केले आहे.

(ज्याला शक्य होईल त्याने उपस्थित राहणे )

              🙏🏻🙏🏻🙏🏻

         *अधिक माहिती साठी*

                  *संपर्क*

कृषक कल्याणकारी संस्था

अध्यक्ष :-

रवींद्र पाटील:-8975932044

प्राणी मित्र (निसर्ग प्रेमी )

राकेश काठे :-9271170881

Featured post

Lakshvedhi