Monday, 6 February 2023

नाणे खातात का, छोटू ना दाखवा

 दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास राहणार वरखेड बु. तालुका शेगांव जिल्हा बुलढाणा येथील 14 वर्षीय

मंगेश विलास इंदोरे या शेतमजुराच्या मुलाने सहजच 10 रुपयाचे नाणे तोंडात ठेवले, व बघता बघता ते नाणे त्याच्या घशात गेले व त्याला घशात वेदना व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याने याबाबत वडिलांना सांगितले. वडील श्री विलास इंदोरे यांना शेगांव येथील बालरोगतज्ज्ञ डॉ सचिन प्रकाशराव सांगळे यांनी याआधी असे अन्न नलिकेत अडकलेले नाणे काढल्याचे ज्ञात असल्याने, मुलाला तात्काळ डॉ सांगळे यांच्या अग्रसेन चौक शेगांव स्थित प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल येथे आणण्यात आले, तेथे पोहचताच मुलाचा एक्स रे काढून नाणे अडकल्याची जागा निश्चित करण्यात आली. व डॉ सांगळे व त्यांच्या टीम ने वैद्यकीय क्षेत्रात नविन अविष्काराप्रमाणे शोधून काढलेल्या पद्धतीचा वापर करून फोलिज कॅथेटरच्या मदतीने *अवघ्या 40 सेकंदात* मुलाला कुठलाही त्रास न होऊ देता विनाशस्त्रक्रिया अन्न नलिकेत अडकलेले नाणे बाहेर काढले. व या कौशल्यात आपण निष्णात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

त्यांच्या या नविन पद्धतीमुळे आजवर अनेक मुलांचे प्राण वाचले असून, सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा नाणे काढतांनाचा विडिओ सर्व सोशल मीडियावर वायरल होत असून सर्वत्र कुतूहलाचा विषय बनला आहे.


कडक जोके बंड्या चा

 


ये जिवन हैं

 









कोंकणात येवा

 


Sunday, 5 February 2023

आजी आजोबा day, नात va बरोबर play

 



राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट

 राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट 

            राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी राजभवन येथे 'ग्लोरी ऑफ हेरिटेज' या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यशाळेला भेट दिली.  

            राजभवनातील विविध ठिकाणी वास्तूंची तसेच राजभवन परिसराची चित्रे साकारणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ यावेळी राज्यपालांनी जाऊन विचारपूस केली. 

            जेजे स्कूल ऑफ आर्ट येथील रेखा व रंगकला विभागाचे अधिव्याख्याता व कलाकार प्रकाश सोनवणे कार्यशाळेचे समन्वयक असून अधिव्याख्याता शार्दूल कदम यांच्यासह सुमारे 50 विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.        



कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार

 कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार.                                                                                                 - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            सिंधुदुर्गनगरी दि.4 (जि.मा.का):- “आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. 


            आंगणेवाडी येथील श्री.देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज घेतले. यानंतर झालेल्या कार्याक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार रविंद्र फाटक, राजन तेली आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अंतर्गत रस्ते देखील महत्वाचे आहेत. एमएमआरडीएच्या धर्तीवर एमआयडीसी, सीडको व एमएसआरडीसी यांना सोबत घेऊन कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणाला त्याचा खूप फायदा होईल. हे प्राधिकरण अतिशय महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले की, श्री. देवी भराडी आईच्या दर्शनाला आलेल्या लाखो भाविकांचे, भक्तांचे मी मनापासून स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा पण देतो. राज्यातील जनतेला, बळीराजाला त्यांच्या जीवनामध्ये सुख, समृध्दी,भरभराटी त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे, तसेच त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण व समाधान आले पाहिजे, अशी मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर राज्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करुया, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सागरी महामार्ग हा कोकणच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचेही काम हातामध्ये घेत आहोत. रस्त्यांचे रुंदीकरण आपण करतोय, जेणेकरुन कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल. सगळे सागर किनारे हे अतिशय सुंदर आहेत. त्यांचे सुशोभिकरण करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग नागपूर-मुंबई महामार्गाच्या धर्तीवर आपण ग्रीनफिल्ड रस्ता मुंबई- सिंधुदुर्ग फास्टट्रॅक कंट्रोल याचे देखील काम हाती घेतोय. जेणेकरुन खऱ्या अर्थाने कनेक्टीव्हिटी मिळेल. तसेच प्रदूषण कमी होईल व लोकांचा वेळ वाचेल. विकासाला चालना मिळेल. विकासाची दारे खुली होतील. कोकणामध्ये पर्यटन व मस्त्य व्यवसायालाही मोठा वाव आहे. कोकणामध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा खूप पाऊस पडत असतो. परंतु, बरेचसे पाणी हा वाहून जाते. वाहून जाणारे पाणी शॉर्टटर्म व लाँगटर्म प्रकारचे प्रकल्प केले पाहिजेत. सिंधुदुर्गात मालवण वेंगुर्ला येथे काजू व आंबा मार्केटिंग व ब्रॅडिंग यांनादेखील चालना द्यायची आहे, असेही ते म्हणाले.


            केंद्रीयमंत्री श्री. राणे म्हणाले की, हे सरकार सामान्य जनतेचे आहे. शासनाने या यात्रेसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्याने भाविकांची मोठी सोय झाली आहे.


            यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा भगवी शाल आणि रोप देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


०००००



Featured post

Lakshvedhi