उर्वी उदय मांजरेकर
श्रीवर्धन नप शाळा क्र 3 रायगड
स्नेहसंमेलन.
लन
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
राज्यातील सर्व बाल सुधारगृहात कौशल्यविकास केंद्र सुरू करणार
- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह आणि मानखुर्द येथील बालगृह येथील कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
मुंबई, दि. 2 : बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. मुंबई येथील चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह व मानखुर्द येथील बालगृह येथे नव्याने सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या धर्तीवर राज्यातील बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचे केंद्र सुरू करणार आहोत. त्याचबरोबर भव्यता फाऊंडेशनच्या सहकार्याने डोंगरी व मानखुर्द येथील मुलांना त्यांचा कल लक्षात घेवून मानखुर्द आणि डोंगरी येथील मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती, कौशल्य, रोजगार व उद्योजकता आणि महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली
डोंगरी, उमरखाडी येथील चिल्ड्रन एड सोसायटीमध्ये कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी बाल विकास पुणेचे विभागीय आयुक्त राहुल मोरे, महिला व बालविकास कोकण विभागाचे उपायुक्त बापूराव भवाने, भव्यता फाऊंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष कुलीन मणियार, प्रशिक्षक वृंदा कोटक, सई अंबुकर उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, चिल्ड्रन एड सोसायटीच्या मानखुर्द येथील बालगृहामध्ये फॅशन डिझायनिंग, फ्रेम डिझाईनिंग, संगणक याचे कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. तर डोंगरी च्या निरीक्षण गृह येथे टाटा मोटर्सच्या माध्यमातून तीन महिन्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत यामध्ये मोबाईल दुरुस्ती, दुचाकी आणि इलेक्ट्रिकचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.बालगृहातील मुलांना शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे शिक्षण देण्यासाठी महिला बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. डोंगरी येथील निरीक्षणगृहातील मुलांसाठी सुरू असलेल्या संगणक प्रशिक्षण,सुतार प्रशिक्षण, शिवणकला, कला कुसरीच्या वस्तूंच्या घेतेलेल्या प्रशिक्षण वर्गासही मंत्री श्री.लोढा यांनी भेट दिली.
भव्यता फाउंडेशनच्या माध्यमातून मानखुर्द आणि डोंगरी येथे समुपदेशन वर्ग सुरू करणार
- कुलीन मणियार
भव्यता फाउंडेशनचे संस्थापक श्री. मणियार म्हणाले, मानखुर्द आणि डोंगरी येथील बालकांचा कल लक्षात घेवून तसेच त्यांना समुपदेशनच्या माध्यमातून कौशल्य विकास व्हावा यासाठी भव्यता फाऊंडेशन चिल्ड्रन एड सोसायटीला सहकार्य करेल त्यासाठी संस्थेमार्फत दोन प्रशिक्षक देखील नेमण्यात आले आहेत, असेही श्री. मणियार म्हणाले.
*****
संध्या गरवारे/विसंअ/
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
नागपूर, दि. 3 : वर्धा येथील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी 10.30 वाजता नागपूर विमानतळ येथे विमानाने आगमन झाले. त्यांच्या समवेत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे होते. नागपूर विमानतळ येथे त्यांचे स्वागत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रण्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री शिंदे हे मंत्री दीपक केसरकर यांचे समवेत 11.50 वाजता नागपूर येथून हेलिकॉप्टरने वर्ध्याकडे रवाना झाले.
सौ दोलांजली आशिष राजेशिर्के यांनी एस के स्टार इव्हेंटस कंपनी आयोजित मिससेस युनिव्हर्स इंडिया क्वीन ह्या स्पर्धेत नॉयडा दिल्ली येथे फिनाले मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत संपूर्ण भारतामधून अनेक महिलांनी सहभाग घेतला त्यातील २५ महिलांचे या स्पर्धेसाठी निवड झाली.त्यातून 15 महिला फाईनलिस्ट झाल्या. पेण रायगड मधून सौ. दोलांजली राजेशिर्के यांनी .
मिसेस युनिव्हर्स इंडिया क्वीन 2023 इलाईट किताब पटकावून पहिले बक्षिस मिळवण्याचा बहुमान मिळवला
प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल पेणच्या प्रथम नागरिक मा. नगराध्यक्षा सौ. प्रितमताई ललित पाटील यांनी सौ.दोलांजली यांच्या घरी जावून त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
🍁 *तरुणाई अशी हवी* 🍁
कर्नाटकातल्या अगुंबे घाटाच्या वाटेवर असलेलं सीतानदी नावाचं छोटंसं गांव. त्या वाटेवर असलेलं एक छोटंसं हॉटेल कम स्थानिक पदार्थ विकण्याचं दुकान श्रीसत्यनारायण नावाचं. मेनू अगदी मर्यादित, मोजकेच, अगदी घरगुती चवीचे पदार्थ, तेही तिथले खास स्थानिक, म्हणजे शहाळ्याची मलई आणि पाणी वापरून बनवलेला सायीसारखा मऊसूत, तलम नीरडोसा, फणसाच्या पानांच्या द्रोणात वाफवलेली खोट्टे इडली, गोडसर मंगळूर बन्स आणि गोल गोळे भज्जी, प्यायला चहा, कॉफी आणि खास लोकल मसाला घालून बनवलेला कषाय. दुकान चालवणारं शेणॉय आडनावाचं चौकोनी कुटुंब. गल्ल्याच्या मागच्या बाजूच्या स्वयंपाकघरात पदार्थ बनवणारे बाबा, गल्ल्यावर बसलेली आई, आलेल्या लोकांना पदार्थ सर्व करणारी अकरावी-बारावीतली मुलगी आणि दुकान सांभाळणारा आठवी-नववीतला चटपटीत, गोड, हसरा मुलगा. त्याची सेल्स पीच इतकी प्रभावी की मार्केटिंगच्या प्राध्यापकांनी त्याच्याकडून धडे घ्यावेत.
आम्ही त्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो तेव्हा सकाळचे साडे-आठ वाजले होते. हॉटेलमध्ये त्या वेळी सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती. आई-वडील आणि बहीण त्यांच्या त्यांच्या कामात गुंग होते आणि मुलगा उत्साहाने आलेल्या लोकांना दुकानातले वेगवेगळे पदार्थ दाखवायचं, त्यांच्या किंमती सांगायचं काम करत होता, तेही अंगावर पडलंय म्हणून अनिच्छेने नव्हे तर मनापासून.
काही लोक ऑर्डर देऊन पदार्थ टेबलावर येईपर्यंत दुकानात विक्रीला ठेवलेले पदार्थ बघत होते आणि त्यातला प्रत्येक गिऱ्हाईकाचा, त्याला कुठली भाषा समजते ह्याचा अंदाज घेऊन तो मुलगा, अद्वैत त्याचं नाव, त्या त्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधत होता. इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि मधूनच आई-वडिलांशी कोकणी असा त्याचा चार भाषांमधून सफाईदारपणे संवाद सुरु होता आणि तोही इतक्या लाघवीपणे की एक वस्तू बघायला आलेली व्यक्ती केवळ त्याच्या बोलण्याच्या हातोटीमुळे चार जिन्नस जास्त विकत घेत होती.
माझ्या मैत्रिणीने तिथे विकायला ठेवलेली खोबरेल तेलाची बाटली बघितली आणि ती मला कोकणीत सहज म्हणाली, ‘घेऊ गो हे? कशे आसतले? बरे आसतले?’ म्हणजे ’मी हे घेऊ का ग, कसं असेल’? तर अद्वैतने लगेच तिला कोकणीत परस्पर उत्तर दिलं, ‘छान आहे हे तेल, अगदी प्यूअर, आम्ही पण हेच वापरतो, तुम्ही एकदा वापरून बघा’, आणि इतकंच म्हणुन तो थांबला नाही तर ’तुमका वास घेवका?’ असं म्हणून पटदिशी स्वयंपाकघरात जाऊन उघडी बाटली घेऊन आला तिला दाखवायला. माझ्या मैत्रिणीने तेल घेतलं.
मी फक्त फणसाचे पापड बघायला मागितले तर ह्या मुलाने मला फणसाचे पापड, पोह्याचे पापड, उडदाचे तिखट पापड, उडदाचे कमी तिखट पापड, लसणाचे सांडगे, ताकातल्या मिरच्या, फणसाचे तळलेले गरे वगैरे दहा जिन्नस आणून दाखवले. बरोबर तोंडाची टकळी चालू, तीही मला कोकणी येतं हे कळल्यामुळे कोंकणीत. नव्वद रुपयाचे पापड घ्यायला गेलेली मी तब्बल नऊशे रुपयांची खरेदी करून परत टेबलवर परतले!
बाजूलाच एक हिंदी भाषी कुटुंब लोणचं बघत होतं. त्यांना ह्याने लोणच्याचे आठ प्रकार दाखवले तेही हिंदीत बोलून, ’आप ये ट्राय करो, होम-मेड हैं’. त्यांनी चार वेगवेगळ्या प्रकारची लोणची घेतली. मला अद्वैतचं खूप कौतुक वाटलं. तसं मी त्याच्या आईला सांगितलं सुद्धा. ती हसली, म्हणाली, ‘लॉकडाऊन मध्ये शाळा आता बंद आहेत ना, तेव्हापासून सकाळ-संध्याकाळ दोन-दोन तास हाच करतो दुकान मॅनेज, तेसुद्धा स्वतःहून, हौसेने’.
माझ्या ओळखीची कितितरी त्या वयातली शहरी मुलं सर्व सुविधा हाताशी असताना ’आय एम सो बोरड’ म्हणुन सतत आई-वडिलांच्या मागे भुणभुण लावताना मी बघितली आहेत, त्या पार्श्वभूमीवर मला अद्वैतचं वागणं, त्याची जबाबदारीची जाणीव, त्याचा उत्साही, सकारात्मक ऊर्जेने भरलेला दुकानातला वावर हे सगळंच खूप अपूर्वाईचं वाटलं. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या पर्यटकांशी बोलता-बोलता, वेगवेगळ्या भाषा शिकता शिकता, मनुष्य स्वभाव जाणून घेऊन किती अनुभव संपन्न बनत होता तो. पुढे कसलेही शिक्षण घेताना हा अनुभव त्याला मोलाची साथ करेल.
आजकाल जेव्हा मी पेपर मध्ये बातम्या वाचते की पबजी हा गेम खेळू दिला नाही म्हणून पंधरा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली किंवा शाळेत दिसण्यावरून कुणी काहीतरी बोललं म्हणून दहावीतली मुलगी डिप्रेशन मध्ये गेली वगैरे तेव्हा मला अद्वैत सारखी मुलं आठवतात.
असाच अजुन एक तरुण मुलगा मी बरेचदा जिथे भाजी घेते त्या दुकानावर बसलेला असतो, त्याच्या आईला मदत करायला. साधेच पण स्वच्छ, नीटनेटके कपडे, नीट विंचरलेले केस, भुवयांच्या मधोमध शेंदराचा छोटा ठिपका आणि निर्मळ मोकळं हास्य असलेला तो मुलगा दुकानात गर्दी असेल तेव्हा भराभर गिऱ्हाइकांना भाजी वजन करून देत असतो आणि दुकानात कुणी नसताना पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करत असलेला दिसतो. एक दिवस मी त्याला विचारलं, ‘कितवीत आहेस’? तर तो हसून म्हणाला ‘बारावी कॉमर्स, बाहेरून देतोय परीक्षा’. मी विचारलं, ‘पुढे काय करणार, कॉलेज?’ तर हसून म्हणाला. ’डिग्री करेन, पण बाहेरून’. मी विचारलं ’का रे’? तर पांढरेशुभ्र दांत दाखवत तो निर्मळ हसला आणि मला म्हणाला, ‘ताई, नुसतं बी कॉम करून मला काय मिळणार आहे? सांगा ना तुम्ही? कुठल्यातरी खासगी कंपनीत पाच -दहा हजारांची नोकरी? तशी तर आता सुद्धा ह्या दुकानातून मला महिना २५-३० हजारांची कमाई सहज होते. मी कॉमर्स शिकतोय कारण मला कम्प्युटर घेऊन दुकानाचा सगळा हिशेब ऑटोमेटेड करायचाय आणि पुढे-मागे लोन घेऊन मोठं भाजी आणि फळांचं दुकान उघडायचंय. पक्क्या इमारतीत. चांगल्या लोकेशनवर.’
त्याच्या आवाजातच नव्हे तर पूर्ण देहबोलीतच कमालीचा आत्मविश्वास होता. आपल्याला काय करायचंय आणि काय नाही ह्याची पूर्ण जाणीव होती. ’वय काय रे तुझं’? मी न राहवून विचारलं, ‘ह्या वर्षी १९ पूर्ण होतील’ तो म्हणाला. कितीतरी श्रीमंत घरातली ह्या वयातली मुलं पब, डिस्को, फोन गेम्स आणि महागडे मोबाईल ह्यातच गुंतून जाऊन अर्थहीन आयुष्य घालवत असताना ह्या मुलाचा आत्मविश्वास आणि त्याची जिद्द पाहून मी थक्कच झाले.
तरुणाई अशी हवी.
*©️ शेफाली वैद्य*
जय जय महाराष्ट्र माझा’ राज्याचे अधिकृत राज्यगीत,राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर
मुंबई, दि. 2 (मावज) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले असूनन याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे. या गीताचा कालावधी सुमारे 1.41 मिनिटे असणार आहे. सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्ण, स्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे असले तरी राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वेळ मर्यादेचे भान ठेऊन त्याचे संक्षिप्तीकरण होणे आवश्यक होते. सध्या प्रचलित असलेल्या या गीतातील दोन चरण मिळून त्यांचे नव्याने ध्वनीमुद्रण करून ते मर्यादित वेळेत म्हणजेच दीड ते पावणे दोन मिनिटात बसविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात येत आहे. हे गीत 1.41 मिनिटे वाजविता / गाता येईल.
राज्यगीताचे गायन/वादन करण्याबाबत शासनाने राष्ट्रगीताप्रमाणे नियमावली तयार केली आहे. राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन /वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. 1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायिले जाईल. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादीमध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.
राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
वाद्यसंगीतावर आधारित या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
सर्व शासकीय कार्यालये/ निम शासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम, स्वयंसेवी संस्था व खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे हे पुढीलप्रमाणे राज्यगीत असेल:-
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥1॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥ 2॥