Tuesday, 31 January 2023

राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

 राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर.


            मुंबई, दि. 30 : मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठित केल्या आहेत.


            विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठित करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे. 


            आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोदकुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैदराबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेशकुमार (यूजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.


            आयआयटी कानपुरचे संचालक डॉ. अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मीना चंदावरकर (यूजीसी प्रतिनिधी) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.


            मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिगंबर शिर्के यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.  


            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ १८ मे २०२२ रोजी संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. 


००००


Governor constitutes Search Committees for selection of Mumbai, Pune Vice Chancellors


       Mumbai, 30th Jan : Maharashtra Governor and Chancellor of Universities in the State Bhagat Singh Koshyari has constituted separate Search Committees for the selection of vice chancellors to the University of Mumbai and the Savitribai Phule Pune University.


       The Search Committee for the selection of Mumbai University vice chancellor will be headed by the former UGC Chairman Dr. D. P. Singh while the Search panel for the selection of the vice chancellor of the Savitribai Phule Pune University will be headed by former AICTE chairman Dr Anil Sahasrabuddhe. 


       Prof. Pramod Kumar Jain, Director, Indian Institute of Technology, (BHU) Varanasi, Anand Limaye, Additional Chief Secretary (Home) and Prof. Suresh Kumar, Vice Chancellor of the English and Foreign Languages University Hyderabad (UGC nominee) will be the members of the Search Committee for the selection of Mumbai University Vice Chancellor.


       Dr. Abhay Karandikar, Director, IIT, Kanpur, Deepak Kapoor, Additional Chief Secretary, Irrigation Department and Dr. Meena R. Chandawarkar, Chief Advisor-Quality Assurance, BVV Sangha, Bagalkot and former Vice Chancellor of Karnataka State Women's University Vijaypura (UGC Nominee) have been named as the Members of the Search Committee for the selection of vice chancellor of the Savitribai Phule Pune University.


       The term of MU vice chancellor Suhas Pednekar ended on 10 September. Shivaji University Vice Chancellor Dr. Digambar Shirke has been holding the additional charge of the post of Mumbai Vice Chancellor.


       The term of Vice Chancellor Dr. Nitin Karmalkar ended on 18 May 2022. Dr. Karbhari Kale, Vice Chancellor of the Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere has been holding the additional charge of the post of SPPU Vice Chancellor.


००००

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघद्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघद्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे.

            मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दोन पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघाच्या तीन अशा एकूण पाच मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.


            नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.

भवताल मासिकाचा जानेवारी २०२३ चा अंक


 नमस्कार.

भवताल मासिकाचा जानेवारी २०२३ चा अंक आणि त्याचे कव्हर सोबत शेअर करत आहोत.


अंकाची वैशिष्ट्ये :

• एकाच साच्यातील विकास

• आदिवासींचा वाघ्या

• अभी पार्टी शुरू हुई है।

• अनोख्या इको-टूरची धमाल

आणि बरेच काही...


सोबत दिलेली लिंक आपल्या संपर्कात शेअर करून इतरांनीही भवताल मासिकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करावे, ही विनंती.


नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/connectus/masik-nondani

- संपादक, भवताल मासिक.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


शासकीय कामकाज ‘मिशन मोडवर’ राबवावे

 शासकीय कामकाज ‘मिशन मोडवर’ राबवावे

                          - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबई, दि. 31 : “प्रशिक्षणामुळे नवीन ज्ञानप्राप्ती होवून विषयाची उजळणी होते. प्रशिक्षण घेऊन जनतेच्या हितासाठी शासकीय कामकाजाला अधिक गती देऊन ‘मिशन मोडकर’ काम करावे”, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


            डॉ.होमी भाभा राज्य समूह विद्यापीठ मुंबई, येथे नवनियुक्त विभागीय सहसंचालकांसाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, अजित बाविस्कर उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, प्रशिक्षण हे व्यक्तिमत्वाच्या विकासाचे माध्यम असून सक्षम बनविण्याचे साधन आहे. नवीन विषय आत्मसात करण्यासाठी आणि त्याचे अचूक आकलन होण्यासाठी आणि योग्य अवलंबासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. विभागीय सहसंचालक हे पद महाविद्यालय आणि शासन यांच्यामधील दुवा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून प्रशिक्षण घेऊन शासकीय कामकाजाला अधिक गती द्यावी.


            यावेळी नवनियुक्त विभागीय सहसंचालकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा

 राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा

निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती.

            मुंबई, दि. ३१ : राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, राज्य सेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ पर्यायांवर आधारित परीक्षा घेतली जाते. या पद्धतीमध्ये बदल करुन जुन्या पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हा निर्णय लगेच, २०२३ पासून लागू केल्यास या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षेचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलण्याची आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करुन त्याप्रमाणे वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा निर्णय पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली असून आयोग यावर तातडीने निर्णय घेऊन राज्यातील लाखो तरुण-तरुणींना दिलासा देईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोग अत्यंत कार्यक्षमतेने काम करीत असून गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये आयोगाने नोकऱ्यांमधील अनुशेष कमी करण्याचे काम वेगाने केले आहे. शासकीय नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली असून त्याचे नियोजनही झालेले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.


०००००


महाराष्ट्रातील संसद सदस्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

 महाराष्ट्रातील संसद सदस्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठकखासदार हे राज्याच्या विकासासाठीचे


देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज


सर्वांनी एकत्रीतपणे केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 30 : संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. आपले खासदार हे देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येईल. त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा. सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी यंत्रणा उभी करतानाच महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्तांनी केंद्रीय मंत्रालय व राज्यातील विविध विभाग यातील दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संसद सदस्यांची बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्यातील संसद सदस्य यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या हिताचे, सर्व सामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे प्रस्ताव केंद्र शासनाकडे असून त्यांना गती देण्यासाठी आपण एकदिलाने काम करू. त्यासाठी ही बैठक महत्वाची आहे. प्रलंबित प्रस्ताव, प्रश्नांबाबत पाठपुरावा करतानाच, राज्याच्या विकासासाठी आणखी नवे, अभिनव प्रकल्प, उपक्रम, योजना यांची मांडणी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.


            आजच्या बैठकीत खासदारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर झालेल्या कार्यवाहीबाबत पाठपुरावा करण्यासाठी दोन महिन्यांनी पुन्हा एक बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            केंद्र शासनाकडून राज्याला आवश्यक तो निधी वेळेवर मिळावा यासाठी आवश्यक ती उपयोगिता प्रमाणपत्र मुदतीत पाठविण्यात यावीत. त्यामुळे मंत्रालयीन विविध विभागांच्या सचिवांनी याबाबत लक्ष घालावे आणि भविष्यात वेळीच उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली जातील, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला भरीव निधी मिळत असून नुकतेच राज्याच्या नगरविकास विभागाच्या १५ हजार कोटींच्या प्रस्तावाला पंतप्रधानांनी मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत - उपमुख्यमंत्री


            संसदेमध्ये विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रस्ताव आणि प्रश्न मांडावेत, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी सांगितले. रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. फडणवीस यांनी जाहीर केले.


 


            सध्या केंद्राकडून १४०० कोटी रुपये मिळाले आहेत. सर्वांनी वेळेत उपयोगिता प्रमाणपत्र द्यावे. त्यामुळे केंद्र शासनाकडे असलेला निधी मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.


            यावेळी खासदार सर्वश्री गजानन किर्तीकर, संजय मंडलिक, इम्तियाज जलील, धनंजय महाडिक, रामदास तडस, धैर्यशील माने, राजेंद्र गावित, डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, पूनम महाजन, डॉ. प्रीतम मुंडे, नवनीत राणा, मनोज कोटक, संजय मंडलिक, प्रतापराव जाधव, डॉ. सुजय विखे पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सुधाकर श्रृंगारे, गोपाळ शेट्टी, हेमंत गोडसे, डॉ. अमोल कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.


 

कपूर से आश्चर्यजनक उपाय:*

 🍃🌾😊


*कपूर से आश्चर्यजनक उपाय:*


*शास्त्रों के अनुसार देवी-देवताओं के समक्ष कपूर जलानें से अक्षय पुण्य प्राप्त होता है।*


*अत: प्रतिदिन सुबह और शाम घर में संध्यावंदन के समय कपूर जरूर जलाएँ।*


*पितृदोष और कालसर्पदोष से मुक्ति हेतु:* 

*कपूर जलानें से देवदोष व पितृदोष का शमन होता है। अक्सर लोग शिकायत करते हैं कि, हमें शायद पितृदोष है या काल सर्पदोष है। दरअसल, यह राहु और केतु का प्रभाव मात्र है। इसको दूर करनें के लिय प्रतिदिन सुबह, शाम और रात्रि को तीन बार घी में भिगोया हुआ कपूर जलाएँ। घर के शौचालय और बाथरूप में कपूर की 2-2 टिकियां रख दें। बस इतना उपाय ही काफी है।*



*आकस्मिक घटनां या दुर्घटनां से बचावः* 

*आकस्मिक घटनां या दुर्घटनां का कारण राहु, केतु और शनि होते हैं। इसके अलावा हमारी तंद्रा और क्रोध भी दुर्घटनां का कारण बनते हैं। इसके लिए रात्रि में हनुमान चालीसा का पाठ करनें के बाद कपूर जलाएँ।*

*हालांकि, प्रतिदिन सुबह और शाम जिस घर में कपूर जलता रहता है उस घर में किसी भी प्रकार की आकस्मिक घटनां और दुर्घटनां नहीं होती। रात्रि में सोनें से पूर्व कपूर जलाकर सोनां तो और भी लाभदायक है।*

*सकारात्मक उर्जा और शां‍ति के लिए:*

*घर में यदि सकारात्मक उर्जा और शांति का निर्माण करनां है तो प्रतिदिन सुबह और शाम कपूर को घी में भिगोकर जलाएँ और संपूर्ण घर में उसकी खुशबू फैलाएँ। ऐसा करनें से घर की नकारात्मक उर्जा नष्ट हो जाएगी।*दु:स्वप्न नहीं आएंगे और घर में अमन शांति बनीं रहेगी।*

*वैज्ञानिक शोधों से यह भी ज्ञात हुआ है कि, इसकी सुगंध से जीवाणु, विषाणु आदि बीमारी फैलानें वाले जीव नष्ट हो जाते हैं जिससे वातावरण शुद्ध हो जाता है तथा बीमारी होनें का भय भी नहीं रहता।*



*अचानक धन प्राप्ति का उपाय:* 

*गुलाब के फूल में कपूर का टुकड़ा रखें। शाम के समय फूल में एक कपूर जला दें और फूल को देवी दुर्गा को चढ़ा दें। इससे आपको अचानक धन मिल सकता है।*

*यह कार्य आप कभी भी शुरू करके कम से कम 43 दिन तक करेंगे तो लाभ मिलेगा। यह कार्य नवरात्रि के दौरान करेंगे तो और भी ज्यादा असरकारक होगा।*


*वास्तु दोष मिटानें के लिए :*

*यदि घर के किसी स्थान पर वास्तु दोष निर्मित हो रहा है तो वहां एक कपूर की 2 टिकियां रख दें। जब वह टिकियां गलकर समाप्त हो जाए तब दूसरी दो टिकिया रख दें। इस तरह बदलते रहेंगे तो वास्तुदोष निर्मित नहीं होगा।*


*भाग्य चमकानें के लिए:*

*पानी में कपूर के तेल की कुछ बूंदों को डालकर नहाएँ। यह आपको तरोताजा तो रखेगा ही आपके भाग्य को भी चमकाएगा। यदि इस में कुछ बूंदें चमेली के तेल की भी डाल लेंगे तो इससे राहु, केतु और शनि का दोष नहीं रहेगा, लेकिन ऐसे सिर्फ शनिवार को ही करें।*


*पति-पत्नी के बीच तनाव को दूर करनें हेतु :

*रात को सोते समय पत्नी अपनें पति के तकिये में सिंदूर की एक पुड़िया और पति अपनी पत्नी के तकिये में कपूर की 2 टिकियां रख दें। प्रातः होते ही सिंदूर की पुड़िया घर से बाहर कहीं उचित स्थान पर फेंक दें तथा कपूर को निकाल कर शयन कक्ष में जला दें।*

*यदि ऐसा नहीं करनां चाहते हैं तो प्रतिदिन शयनकक्ष में कपूर जलाएँ और कपूर की 2 टिकियां शयनकक्ष के किसी कोनें में रख दें। जब वह टिकियां गलकर समाप्त हो जाए तो दूसरी रख दें।*


*धन-धान्य के लिए:* 

*रात्रि काल के समय रसोई समेटनें के बाद चांदी की कटोरी में लौंग तथा कपूर जला दिया करें। यह कार्य नित्य प्रतिदिन करेंगे तो धन-धान्य से आपका घर भरा रहेगा। धन की कभी कमी नहीं होगी।*


*विवाह बाधा हेतु :* 

*विवाह में आ रही बाधा को दूर करनां चाहते हैं तो यह उपाय बहुत ही कारगर है। 36 लौंग और 6 कपूर के टुकड़े लें, इसमें हल्दी और चावल मिलाकर इससे मां दुर्गा को आहुति दें।*


*मनचाही भूमि या भवन पानें के लिए :* 

*यह उपाय नवरात्रि के दिन करनें का है। सबसे पहले उस स्थान की थोड़ी-सी मिट्टी लाकर एक कांच की शीशी में उसे डालें। उसमें गंगा जल और कपूर डालकर उसे पूजा में जौ के ढेर पर स्थापित कर दें। नवरात्र भर उस शीशी के आगे नवार्ण मन्त्र "ऐं हीं क्लीं चामुण्डाय विच्चे" का पांच माला जप करें और जौ में रोज गंगा जल डालें। नवमी के दिन थोड़े से अंकुरित जौ निकाल लें और ले जाकर मनचाही जगह पे डाल दें। कांच की शीशी को छोड़कर शेष सामग्री को नदी में डाल दें। देवी की कृपा हुई तो आपको मनचाहा घर मिल जाएगा।*

*|('}_,*

*|(/\\, संकलन:--- संजय हिरे नाशिक*

*9850088804*

*7030506008*


*आपका,आपके परिवार का भविष्य, बच्चोंका करिअर,शिक्षण, नोकरी, धंदा ,विवाह, संतती ,दारू नशा, वास्तु दोष, निवारण करणे हेतू संपर्क कर सकते हो*

*985008884*

*7030506008*


      *‼️ राधे राधे ‼️*

Featured post

Lakshvedhi