Tuesday, 31 January 2023

आपल्या आई वडिलांना कधीच खाली मान घालायला लाऊ नका .-

 आपल्या आई वडिलांना कधीच खाली मान घालायला लाऊ नका .-प्रवीण किणे  


रत्‍नागिरी - गोदूताई जांभेकर विद्यालय ,रत्‍नागिरी मध्ये क्रांतीसागर प्रविण किणे यांनी आई, बाबा यांच्‍या स्‍पप्‍नांची राख करून आपल्‍या प्रेमाची कथा रचणाऱ्या तरूणासोबत लहान मुलांनाही आई वडीलांच्‍या कष्टाची जाणीव करून दिली. उसने पासणे घेवून आपले आईवडील आपल्‍याला

मोबाईल घेवून देतात त्‍यावर वॉलपेपर मात्र प्रेयसीचा असतो..आई बापाचं काय असा प्रश्न या मुलांना विचारला व त्‍यानंतर सलग अर्धा तास मुले हुसमसुन रडत होती...विषय थेट काळजाला भिडला होता. मुलांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. आम्ही घरी जाऊन आई वडील यांना मिठी मारून नमस्कार करू असे वचन मुलांनी दिले.

           आज काल मोबाईल गॉसीप, प्रेमप्रकरणे व मोठी स्‍वप्‍ने पाहणे व साकार करणे अलिशय दुर्मिळ होत आहे..मुलांना आपण कोणत्‍या एसटीत बसलो आहेात हेच आपल्‍याला माहित नाही ..आपले ध्येय निश्चित करा...मुलांनी आपल्‍या शिक्षणासमोर आर्थिक अडचणी, शिक्षणाचे माध्यम, कौटुंबीक समस्‍या, आरोग्‍य अशा अनेक समस्‍या मांडल्‍या त्‍या साध्या सोप्या हसतमुख उदाहरणातून किणे सरांनी लिलया खोडून काढत 8 वर्षाच्‍या पदव्‍या बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 3 महिन्‍यात पूर्ण केल्‍या हे सांगत, अब्‍दुल कलाम यांची परिस्‍थिती, हात पाय नसतानाही केवळतोंडाने चित्रे काढणारी नसरीमा हुजरूक कोल्‍हापूर या संस्‍थेतील मुले...उंची कमी असून जागतीक किर्ती मिळवलेला सचिन, अपघातात अपंगत्‍व येवूनही लाकडी पायावर नृत्‍य करून प्रसिध्द झालेली सुधा चंद्रन अशा अनेक उदाहरणाने मुलांच्‍या काळजाला हात घातला...शिवाय फेअर न लव्‍हली ने सुंदर होता आले असते तर संपुर्ण आफ्रिका गोरा झाला असता हे सांगून हास्‍याचे कारंजे उडवतानाच व्‍यक्‍तिमत्‍वाचे सोंदर्य हे आपल्‍या दिसण्यात नसुन आपल्‍या कतृत्‍वात असते हे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्‍या समोर अनेक नेते झुकतात...त्‍यामुळे दिसण्यापेक्षा असण्याला महत्‍व दया हे सांगत असतानाच अखेर मुळ पालकांच्‍या मनात असणाऱ्या व टंगळमंगळ करणाऱ्या मुलांच्‍या काळजालाच हात घातला...

             आई वडील आपल्‍यासाठी आयुष्य खर्ची घालून स्‍वतः कर्जबाजारी होतात...जर आपल्‍याला पळून जायचे असेल तर आपल्‍या आई वडीलांना विष घालून पळून जा हे सांगताच मुलींसोबत मुलांनीही हुंदके दयायला सुरवात केली आपल्‍यावर प्रेम करणारा मुलगा जर आपल्‍याला जिंकत असेल तर त्‍याला आईबापाला ही जिंकायला सांगा तरच तो मुलगा तुमच्‍या लायक आहे हे समजुन सांगतानाच दिड तास पींडर ऑफ सायलेन्‍स मधुन हसू व अश्रु यांचा संगम मुलांनी अनुभवला....शाळेच प्राचार्य चव्‍हाण संर यांनी पालक, विदयार्थ्याना अशा व्‍याख्यानाची गरज असुन मुलांच्या मध्ये परीवर्तन दिसत असल्‍याचे सांगीतले. मुख्याद्यापक चव्हाण सर यांनी दीड तास मुले चुळबुळ न करता शांतपणे ऐकतात हे आज पाहायला मिळाले...असे सांगून प्रविण .किणे यांचे आभार मानले व पुन्‍हा या सभागृहात पालकांनाही मार्गदर्शन करायला या असे निमंत्रण दिले. आईवडीलांच्‍या आठवणींची व्‍याकुळता व हसता हसता रडवणारे किणे सर अशा वातावरणात दीड तास आयुष्याचे परीवर्तन घडणारे संस्‍मरणीय ठरले.

जिंदगी

 *


जिवन गाणे

 












ज्वारीच्या भाकरीचे महत्व*

 *ज्वारीच्या भाकरीचे महत्व* 


“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.” 


“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”


“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”


“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”


“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले...


गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. 


*जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?*


ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. 


ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते. 


बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.


तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.


ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.


तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.


भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.


*ज्वारीचे फायदे*


1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.


2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.


3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.


4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.


5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.


6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.


7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.


8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.


9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.


10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.


11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.


*ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाचा सणावाराला उपयोग करा.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2301397959870609&id=100000012811378

एक लसूण पाकळी, आरोग्यासाठी

 हा विडीओ जास्त प्रमाणात आपल्या नातेवाईका नां पाठवा


हळदीकुंकू समारंभ mahadpoladpur

 



Monday, 30 January 2023

तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा

 तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

            मुंबई, दि. ३० : “तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर प्रमुख देश म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर अधिक भर द्यावा”, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


             कापड उत्पादक असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित केलेल्या 76 व्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


            वस्त्रोद्योग मंत्री श्री.पाटील म्हणाले की, वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी कापूस खरेदी ते कापड निर्मिती असे सर्वसमावेशक नवीन वस्त्रोद्योग धोरण राज्य शासन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करणार आहे. तसेच सहकारी सूत गिरण्यांना प्रति युनिट 3 रुपये प्रमाणे सवलतीस पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईत वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.


            वस्त्रोद्योग मंत्री श्री.पाटील यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच उद्योजकांशी वस्त्रोद्योगातील अडचणी आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली. याठिकाणी वेगवेगळ्या ब्रँडचे 937 स्टॉल लावण्यात आले आहेत.


            यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, कापड उत्पादक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेश मसंद, उपाध्यक्ष राजेश शाह, चेअरमन रोहित मुंजल सचिव संतोष कटारिया, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्री. खरात संबंधित अधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi