Monday, 30 January 2023

लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव

 लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव


"केवळ 'पंजाब केसरी' नव्हे; लाला लजपतराय 'हिंद केसरी'": राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई, दि. 28 : थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे कार्यक्षेत्र अविभाजित पंजाब असले तरीही त्यांचे जीवन कार्य व योगदान संपूर्ण देशासाठी होते. शिक्षण, आरोग्य, संस्कार व समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ 'पंजाब केसरी' नव्हते तर खऱ्या अर्थाने 'हिंद केसरी' होते. विद्यार्थी व युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज व देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.


            लाला लजपतराय जयंती दिनाचे औचित्य साधून मुंबईतील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित लाला लजपतराय स्मृती सुवर्ण महोत्सवी व्याख्यान देताना राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.


            लाला लजपतराय पारतंत्र्याच्या ज्या काळात जगले, त्या काळात युवकांनी उच्च शिक्षण स्वतःसाठी नाही तर समाज व देशासाठी घेतले. बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपीनचंद्र पाल यांसह लाला लजपतराय या 'लाल बाल पाल' त्रयीनीं स्वातंत्र्य लढ्याला निश्चित अशी दिशा दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            स्वातंत्र्य लढ्यासोबतच लजपतराय यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून समाजातील जातीव्यवस्था, विषमता यांविरुद्ध लढा दिला तसेच अँग्लो वेदिक महाविद्यालये स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. लजपतराय यांनी लोकसेवक मंडळ ही संस्था स्थापन करून जनतेची सेवा केली असे सांगून युवकांनी नोकरी, उद्योग, नवसंशोधन आदी सर्व गोष्टी कराव्या, परंतु त्यासोबतच समाजासाठी योगदान द्यावे असे राज्यपालांनी सांगितले .


       लाला लजपतराय स्मृती न्यासाचे अध्यक्ष डॉ. कमल गुप्ता यांनी महाविद्यालयाच्या पन्नास वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला. महाविद्यालयाने 25 देशीविदेशी संस्थांशी सहकार्य करार केले असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी लाला लजपतराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले.

कार्यक्रमाला लाला लजपतराय स्मृती न्यासाचे विश्वस्त डॉ.सुनील गुप्ता, विनोद गुप्ता, नरेश गुप्ता, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलम अरोरा, उपप्राचार्य डॉ. अरुण पुजारी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


000000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेट

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेट.

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील .                                                                        -मुख्यमंत्री

पुणे, दि.29: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील. मंदिर उभारण्याशी निगडीत अडचणी दूर केल्या जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


            यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय शिरसाठ, भरत गोगावले, माजी मंत्री बाळा भेगडे, मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब काशिद पाटील आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करायला आणि वारकऱ्यांना भेटायला आल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भंडारा डोंगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते. अशा पावन भूमीत येण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. भंडारा डोंगर आगळ्यावेगळ्या ऊर्जेने भरला आहे. या परिसराचा विकास करताना या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. विकासकामे करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही. त्यामुळेच रिंगरोडच्या मार्गातही बदल करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे जगातील अतिशय भव्य मंदिर इथे उभे राहिल. श्रद्धा आणि तळमळ असल्यास अशी कामे उभी राहतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसराचा चांगला विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे श्री.शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाच्या रुपाने समाजाला दिशा देणारी मोठी शक्ती महाराष्ट्रात आहे. आपले सण, उत्सव, परंपरा पुढे नेण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. ही परंपरा आपणही पुढे न्यायला हवी. वारकरी संप्रदायाने समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य सातत्याने केले आहे. आध्यात्मिक विचाराने जीवन सफल होतं. आध्यात्मिक सोहळ्यातून अनेकांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होत असते. उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            खासदार बारणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पालखी मार्गाचे काम आणि पंढरपूर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी वारकरी दत्तात्रेय कराळे यांनी पाच लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

प्रास्ताविकात श्री. काशिद पाटील यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या कामाची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले युवा महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले युवा महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

            मुंबई, दि. 29 : विश्वचषकावर आपले नाव कोरणाऱ्या 19 वर्षांखालील युवा महिला क्रिकेटपटूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. आगामी काळात क्रीडाविश्वात भारत आपला वेगळा ठसा उमटवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, भारताच्या युवा महिला क्रिकेटपटूंनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत विश्वचषक पटकाविला. गेल्या काही वर्षात सर्वच क्रीडा प्रकारात आपले युवा खेळाडू उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करत असून आगामी काळात भारत क्रीडाविश्वात आणखी नाव कमावेल. युवा महिला क्रिकेटपटूंचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप.

जत्रोत्सवाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे- मुख्यमंत्री.

            पुणे दि.२९: इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि नारीशक्तीचा सन्मान प्रदर्शित करण्यात आला असून जत्रोत्सवामुळे आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

            इंद्रायणी थडी जत्रा भव्यदिव्य आणि हजारोंना एकाचवेळी आनंद देणारी जत्रा असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, भारताची संस्कृती, परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम आहे. विविध वयोगटातील आणि क्षेत्रातील व्यक्तींसाठी भव्यदिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानिमित्ताने एक हजार स्टॉल द्वारे 800 महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळाली आहे. महिला बचत गट आणि लहान व्यावसायिकांना अशा महोत्सवातून बाजारपेठ मिळते आणि त्यातून मोठे उद्योजक तयार होतात. म्हणून अशा महोत्सवाचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे श्री.शिंदे म्हणाले. 

            सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आणि राज्याची प्रगती करणारे सरकार आहे. म्हणूनच कोविडनंतर शासनाने निर्बंध हटविल्याने विविध उत्सव सुरू झाले आहेत. सर्वसामान्यांच्या आकांक्षांना न्याय देण्याचे कार्य सरकार करत आहे. सहा महिन्यात सर्व समाजघटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. उत्तम आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार लांडगे यांचे अभिनंदन केले. 

            आमदार लांडगे आणि विकास डोळस यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

00000



जिंदगी

 





थंड पाण्यात शिजणारा आसामचा बोका तांदूळ

 *थंड पाण्यात शिजणारा आसामचा बोका तांदूळ*


     भारत हा शेतीप्रधान देश आहे त्यातही तांदूळ हे मुख्य पीक आहे.महाराष्ट्राचा आंबेमोहोर,अजरा घनसाळ तांदूळ, कोकणातील लाल उकडा तांदूळ, उत्तर प्रदेशाचा कालानमक तांदूळ, बासमती तांदूळ,पश्चिम बंगालचा गोविंद भोग, तुलाईपंजी, मणिपूरचा चकहाओ,केरळचा हट्टा तांदूळ, पोक्कली तांदूळ,वायनाडचा गंधकसाला, जीराकसाला तसाच आसामचा करणी तांदूळ आणि बोका तांदूळ.हे सगळे भारतीय सरकार द्वारे GI (Geographical Identification) मानांकन प्राप्त तांदूळ आहेत.

      *हे जरी खरे असले तरी आसामच्या बोका तांदळाची गोष्ट काही औरच आहे आणि म्हणूनच त्यांचे वेगळेपण उठून दिसते.सर्वात प्रथम म्हणजे बोका तांदूळ शिजवण्यासाठी काहीही म़ेहनत लागत नाही.आग नाही,लाकडे नाही'उकळते पाणी नाही की गॅस सुध्दा लागत नाही.तर आसामचा हा सुवासिक असणारा जगप्रसिद्ध बोका तांदूळ चक्क साध्या थंड पाण्यात शिजतो.थंड पाण्यात साधारण एक तासभर ठेवला की खाण्यास भात तयार होतो.आहे की नाही जगावेगळी गंमत.तर असा हा जादुई बोका तांदूळ आहे.जगात मॅजिक राईस म्हणून ओळखला जातो*

     *आसामच्या बोका तांदळाची लागवड*

    आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजे जून महिन्यात बोका भाताची पेरणी केली जाते, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होते. बोका तांदूळ किंवा बोका चाळ आसामच्या डोंगराळ आदिवासी भागात घेतले जाते. या भातामध्ये 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन असते. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.बोका तांदूळ शेतात पिकायला साधारण साडेचार ते पाच महिने लागतात. तोपर्यंत त्यांची फार काळजी घ्यावी लागते.

     बोका तांदूळ प्रामुख्याने आसाममध्ये डोंगराळ भागात पिकवला जातो. या भाताला इथली माती आणि हवामान यातून एक वेगळी चव आणि वेगळा सुगंध असतो. बोका तांदळाची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप येथे केली जाते.

       *बोका तांदूळाचे एकरी उत्पादन*

    बोका तांदळाचे इतर तांदळाच्या तुलनेत एकरी उत्पादन तसे कमीच आहे.एक एकर जमिनीवर साधारण 8 ते 10 क्विंटल तांदूळ पिकतो.

    *बोका तांदळापासून बनणारे पदार्थ*

   बोका तांदूळ बोका चोले आणि ओरिझा सॅटिवा म्हणून देखील ओळखला जातो. आसाममधील बोका तांदळापासून जोलपान,पिठात राईस केक असे अनेक प्रकारचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात.शिवाय बोका तांदूळ दही, गूळ, दूध, साखर किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत दिला जातो.

     *बोका तांदूळाचा ऐतिहासिक संदर्भ*

      बोका तांदूळ हा अहोम सैनिक रेशन म्हणून वापरत असत. इतिहासाची पाने उलटली तर बोका तांदळाचा स्वतःचा एक सुवर्ण इतिहास आहे. या भाताने किती युद्धे जिंकायला मदत केली माहीत नाही. ही कथा 17 व्या शतकातील आहे.जेव्हा अहोम सैनिक मुघल सैन्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी बोका तांदूळ खात असत. हा तांदूळ रेशन म्हणून युद्धात नेण्यात आला, ज्याला शिजवण्याची गरज नव्हती कारण साध्या थंड पाण्यात तासभर टाकला की खायला भात तयार.हा बोका तांदूळ जगात फक्त भारतातील आसाम राज्यातील डोंगराळ भागातच तयार होतो.

     बोका तांदळाचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे.जो थेट आसामशी संबंधित आहे. हेच कारण आहे की भारत सरकारने आसाममध्ये पिकवल्या जाणार्‍या या भाताला GI टॅग देखील दिला आहे. बोका तांदूळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे.

      किसान टाकच्या ताज्या अहवालानुसार उत्तर प्रदेशातील शेतकरीही बोका तांदळाच्या लागवडीत खूप रस घेत आहेत. रायबरेली जिल्ह्यातील उंचाहार येथील शेतकरी रामगोपाल चंदेल यांनीही बोका भात पिकवून नवा विक्रम केला आहे.

    तर मित्रांनो फार शोध घेऊन आपल्या स्थानिक बाजारात जर कुठे आसामचा हा बोका तांदूळ मिळाला तर अवश्य आस्वाद घ्या.


*किशोर देसाई*

*ksdesai331139@yahoo.com*

Sunday, 29 January 2023

लोकशाहीचा खरा अर्थ फक्त यालाच कळला 👆जय

 लोकशाहीचा खरा अर्थ फक्त यालाच कळला 👆जय हिंद जय महाराष्ट्र .


Featured post

Lakshvedhi