Sunday, 8 January 2023

राज्यपालांच्या उपस्थितीत सैन्य दलातीलपदक विभूषित अधिकाऱ्यांची वार्षिक परेड संपन्न

 राज्यपालांच्या उपस्थितीत सैन्य दलातीलपदक विभूषित अधिकाऱ्यांची वार्षिक परेड संपन्न.

            मुंबई, दि. ८ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज एनसीपीए मुंबई येथून सुरु झालेल्या सैन्य दलातील शौर्य पदांनी विभूषित अधिकारी व जवानांच्या वार्षिक संचलनात “परेड ऑफ व्हेटरन्स” सहभाग घेतला. सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 


            राज्यपालांनी सुरुवातीला व्हीलचेअरमध्ये बसून आलेल्या वरिष्ठ सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना अभिवादन केले. त्यानंतर शेकडो युवक व नागरिकांच्या 'वंदे मातरम' च्या जयघोषात माजी सैनिक अधिकाऱ्यांच्या संचलनासोबत चालून माजी सैनिकांप्रती त्यांनी सद्भावना प्रकट केली.


            परेड ऑफ व्हेटरन्सचे आयोजन नेव्ही फाऊंडेशनच्या पश्चिम विभाग मुंबई शाखेच्या सहकार्याने केले होते.


            परेडमध्ये ५०० माजी वीर अधिकारी, व जवान त्यांचे कुटुंबीय व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एच. एस. कहलों, नेव्ही फाऊंडेशन, मुंबई विभागाचे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा आदी उपस्थित होते. 


0000

Maharashtra Governor flags off Veterans'

Parade; greets War Veterans.




            Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari flagged off the 2nd edition of the Parade of Veterans of the Armed Forces from the promonade opposite NCPA, Nariman Point Mumbai on Sunday 8 Jan


            The Governor greeted the War veterans, Veer Naris and Ex Servicemen from the armed forces and walked a few steps with them as an expression of solidarity with them. Hundreds of youths, members of the armed forces and citizens cheered the Veterans as they marched towards the Marine Drive amidst the chanting of 'Vande Mataram' and 'Bharat Mata Ki Jay'.


            The Parade of Veterans was organised by the Navy Foundation, Mumbai Chapter in association with the Headquarters of the Western Naval Command. The Parade was held after a gap of two years.


            More than 500 war veterans putting on their ceremonial dress with caps and Medals marched from NCPA to Marine Drive and back. War veterans, some in wheelchairs, gallantry awardees and other retired senior officers participated in the march.


            Flag Officer Commanding in Chief of the Western Naval Command Vice Admiral Ajendra Bahadur Singh, GOC in C, Maharashtra, Goa and Gujarat Area Lt. Gen HS Kahlon, President of the Navy Foundation Mumbai Chapter Commander Vijay Vadhera were present. Officers and jawans of the armed forces, War Veterans, ex servicemen and their family members and citizens were present in large numbers. .


            According to the Navy Foundation, the objective of celebrating Veterans Day is to bring about compassion, empathy and respect for the Veterans from the people. It is a unique initiative of Indian Defence Services to acknowledge and honor the selfless devotion and sacrifice by our Veterans who even after retiring, are always in search of opportunities to serve the Nation. 


            According to Cdr Vadhera, the Navy Foundation Mumbai Chapter had conducted India's first Veterans Day Parade on Sunday 12th Jan 2020 at the Marine Drive. It invoked a lot of interest amongst the students as well as the citizens of Mumbai when they saw on Sunday morning about 500 War Veterans including Veer Naaris, coming from the suburbs, proudly marching putting on their ceremonial dress with Medals . Due to Covid, the Parade could not be held in 2021 & 2022.


0000



पर्यटनवाढीसाठी आराखडा करुन प्रभावी अंमलबजावणी करा

 पर्यटनवाढीसाठी आराखडा करुन प्रभावी अंमलबजावणी करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरेपर्यटन विकास व पोलीस विभागाचा

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 

            सातारा, दि. ८ : कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी कराअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

             दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदेजिल्हाधिकारी रुचेश जयवंशीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारीपोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

               मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,उपजिविकेच्या पर्यायांमध्ये विविधता उपलब्ध करुन देण्यात यावी. यामध्ये कृषीवनपशुधनपर्यटनपाणी आणि  स्वच्छता याचा समावेश करावा. रस्ते जोडणी आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी. या भागातील ऑनलाईन सेवांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हीटी विकसीत करावी. तसेच स्थानिकांचा कौशल्य विकास आणि क्षमतावर्धन करावे.  कांदाटी खोऱ्यात कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांना योग्य संधी उपलब्ध करुन द्यावी.  शासकीय व्यवस्था  आणि खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून पर्यावरणपूरक शाश्वत आणि एकात्मिक विकासासाठी सक्षम लोकसमुदाय तयार करावा.

            पर्यटनवाढीसाठी ठिकठिकाणी होम स्टेची व्यवस्था विकसित करावी.कोयना जलाशयाच्याकाठी तंबू व कॉटेज सारखी व्यवस्था निर्माण करावी. नौका पर्यटन आणि जंगल मुक्कामासह ट्रेकिंगची सोय उपलब्ध करुन द्यावी. पशुधनावर आधारित शेतकरी उत्पादक संघटना विकसित करुन त्यांचा बिझनेस प्लॅन तयार करावा. मध गोळा करणेत्यावरील प्रक्रिया आणि  विक्री यासाठी  व्यवसाय योजना तयार करावी, असेही त्यांनी सांगितले.

            तापोळामहाबळेश्वरखेड आणि रत्नागिरीला जोडणारे रस्ते  तसेच जलवाहतुकीमध्ये सुधारणा करण्यात यावी.  तसेच कांदाटी खोऱ्यातील १६ गावांसाठी सक्षम  आरोग्य सुविधा निर्माण करावी, पुस्तकाचं गाव भिलार ब वर्ग पर्यटन दर्जा मिळणेबाबतकास पुष्पपठार येथील रस्ते विकास व परिसर निसर्ग पर्यटन आराखडा तयार करावा. किल्ले प्रतापगड  संवर्धन व  विकास कामेकिल्ले प्रतापगड पायथा येथे शिवप्रतापसृष्टी उभारणेसातारा जिल्ह्यातील २६ पर्यटन स्थळांचा व शहिद तुकाराम ओंबाळे यांच्या जन्मगावी स्मारक उभारणे या विषयांचाही आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला.

 

 

   पोलीस विभाग आढावा

            राज्य शासनाने पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर दिला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाणेअत्याधुनिक यंत्रणानिवासस्थाने यासह इतर सुविधा देण्यात येणार असूनपोलीस विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाहीअशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

0000


बु ढा पे का सहारा?

 


.अण्णामलाई : मॅन ऑफ दि ईयर

 *'के.अण्णामलाई : मॅन ऑफ दि ईयर!'*


पंतप्रधान मोदी एखाद्या नेत्याला आलिंगन देताना तुम्ही पाहिले आहे काय ? क्वचित कधीतरीच असं दृश्य बघायला मिळतं.. मोदी अशी जवळीक कुणाशी साधत नाहीत वा कुणाला साधू देत नाहीत.. मात्र याला एका नावाचा अपवाद आहे.. 'के. अण्णामलाई!' हा माणूस जेव्हा जेव्हा मोदींच्या समोर येतो तेव्हा ते त्याचं स्वागत आलिंगन देऊन करतात.. काय कारण असेल याचं ? मुळात हा 'अण्णा' आहे तरी कोण ?


के. अण्णामलाई.. वय 38. भाजप तामिळनाडूचा अध्यक्ष! पण ही ओळख पुरेशी नाही .. किंबहुना इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास अधिक महत्वाचा आणि रोमहर्षक आहे...


'अण्णा'चा जन्म 'करूर' या अती छोट्या खेड्यातला.. आई-वडील गरीब शेतकरी.. आपल्या मुलानं 'कॉलेजचं शिक्षण' घ्यावं ही त्यांची मनीषा! अण्णा 'कॉलेज'मध्ये जाणारा करूरचा पहिलावहिला मुलगा! त्यानं कोईमतूरला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. पण 'मोठं पॅकेज' मिळवण्यासाठी आणखी शिकणं आवश्यक होतं. त्याला लखनौच्या IIM मध्ये MBA ला प्रवेश मिळाला... लखनौमधलं आणि एकूणच उत्तर प्रदेशमधलं दारिद्र्य पाहून त्याला धक्का बसला. एकदा त्याला एका टपरीवर फक्त 'पाच रुपयात आठ पुऱ्या' खायला मिळाल्या.. 'पाच रु मिळाले' म्हणून टपरीवाला खूष होता.. हा अण्णा साठी एक 'शॉक' होता. MBA करताना तो पूर्ण यू. पी.फिरला.. विशेषत: पूर्वांचल.. तिथं त्याला असंख्य बालमृत्यू आढळून आले.. तो अतिशय अस्वस्थ झाला.. आणि त्याच सुमारास मुंबईला 26/11 चा हल्ला झाला..आणि अण्णाचं जीवनच बदललं.. *'आपण समाजसेवा- देशसेवा करण्यासाठी सरकारी नोकरी करायची' असं त्यानं ठरवलं..* MBA करता करता त्यानं UPSC ची प्रिलीम दिली.. नंतर मुख्य परीक्षा 'crack' केली.. इंटरव्ह्यू दिला आणि तो IPS उत्तीर्ण झाला.. पोस्टिंग कर्नाटक मध्ये मिळालं..


उडपीमध्ये S.P. असताना त्यानं आपली कारकीर्द गाजवली. तिथल्या कॉलेजात ड्रग माफियांचं जाळं होतं.. ते अण्णानं मोडून काढलं.. स्वतः 'स्पॉट'वर जाऊन तो गुंडांविरोधात कारवाई करत असे.. लोकांनी त्याला *'सिंघम ऑफ उडपी'* ही पदवी दिली.. पण पुन्हा एक 'टर्निंग पॉईंट' आला..

'दहावीत शिकणाऱ्या एका मुलीवर' सामूहिक अत्याचार झाला आणि तिचा खून झाला.. अण्णामलाई त्या स्पॉटवर गेला तेव्हा तिथे दहा हजार लोक जमले होते व दगडफेक चालू होती.. या गुन्ह्यामागच्या कारणांचा त्यानं शोध घेतला.. त्या मुलीच्या शाळेत फक्त दोन कॉम्प्युटर होते.. ते आळीपाळीनं वापरायला मिळत.. त्या दिवशी कॉम्पुटर वापरून शाळेतून बाहेर पडायला त्या मुलीला खूप उशीर झाला.. अंधार पडला होता. तिच्या गावाकडे जायला संध्याकाळी सात नंतर बस नव्हती.. म्हणून ती एकटी चालत जात होती.. आणि हा दुर्दैवी प्रसंग घडला...

'आपण पोलीस नोकरीत राहून या असुविधा (कॉम्पुटर वा बसचा अभाव) दूर करू शकणार नाही' असं अण्णाला वाटू लागलं.. याच दरम्यान 'सरकारी लायझन ऑफिसर' म्हणून त्याला कैलास मानसरोवर यात्रेला जावं लागलं.. तब्बल 70 दिवस.. आणि इथं तो पूर्णपणे बदलून गेला.. 'जीवन बदलणारा निर्णय घेण्यासाठी' आवश्यक असलेली एक 'आध्यत्मिक ऊर्जा' त्याला मिळाली.. त्याचा निर्णय पक्का झाला.. परत येऊन त्यानं नोकरीचा राजीनामा दिला...

*(कदाचित या आध्यत्मिक 'कनेक्ट' मुळे तो मोदींचा लाडका असावा.)* मुख्यमंत्री येडुयेराप्पानी स्वतः विनंती करूनही त्यानं राजीनाम्याचा निर्णय बदलला नाही.. नंतर एक वर्षं त्यानं 'Be the Leaders' हे फौंडेशन चालवलं.. सामान्य तरुणांसाठी.. 

मग 'दिल्लीतून' कळ फिरली.. भाजपचे काही लोक त्याला भेटले.. त्याला 'convince' केलं.. आणि त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला.. जिथं भाजप हा अत्यंत नगण्य पक्ष आहे तिथं असा निर्णय घेणं हे फारच धाडसाचं काम! मोदी-शहानीही अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्याला तामिळनाडूचा प्रदेशाध्यक्ष केलं... जुलै 2021 मध्ये..

आणि नंतरच्या दीड वर्षात त्यानं तामिळनाडू मध्ये जे लोकप्रियतेचं वादळ निर्माण केलं ते अभूतपूर्व आहे.. महाराष्ट्रात बसून त्याची नेमकी कल्पना येत नाही..

पण सध्या तो एखाद्या सिनेस्टार सारखा लोकप्रिय आहे.. त्याच्या दीड वर्षातील कामगिरी वर स्वतंत्र लेख लिहावा लागेल.. करुणानिधिंच्या गावात जाऊन त्यानं सभा घेतली.. त्याला एक लाख लोक उपस्थित होते.. परवा मोदी चेन्नईला गेले तेव्हाचा रोड शो रेकॉर्ड मोडणारा होता.. *तामिळ तरुणाई सध्या अण्णाच्या प्रचंड प्रेमात आहे..* सध्या तो तिथल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे.. एप्रिल 2023 पासून तो एक वर्षाची पदयात्रा काढणार आहे.. सर्व 234 मतदारसंघातून..


पण तिथलं राजकारण 'क्रूर' मार्गानं जाणारं आहे.. अण्णाला 'संपवण्याचे' प्रयत्न DMK नं हरप्रकारे चालवले आहेत.. जर अण्णामलाई 'सुरक्षित' राहिला तर 2024 चे तामिळनाडूतले निकाल धक्कादायक असतील हे लिहून ठेवा..आणि 2026 च्या विधानसभेचे तर त्याहूनही 'शॉकिंग!' 


*'के.अण्णामलाई' हा माझ्या दृष्टीनं 2022 चा 'मॅन ऑफ दि ईयर' आहे...*👍


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

©️®️धनंजय कुरणे

30/12/22

पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे

 पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण


प्रमुख 9 पवित्र जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा, सुविधा विकासासाठी कार्यक्रम


            मुंबई, दि. 7 : राज्यातील पवित्र जैन तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे आज राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी यांच्या हस्ते आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. याअंतर्गत राज्यातील प्रमुख 9 जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


            राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमास मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, हिरे व्यावसायिक सेवंतीभाई शाह यांच्यासह जैन समाजबांधव उपस्थित होते.


            राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले की, पर्यटन विभागामार्फत पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी हाती घेण्यात आलेला कार्यक्रम निश्चितच स्तुत्य आहे. अध्यात्माचे महत्व लक्षात घेता सध्याच्या काळात पर्यटनाबरोबरच तीर्थाटनही तितकेच महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पर्यटन विभागाला आता पर्यटन आणि तीर्थाटन विभाग असे म्हणावे, असे त्यांनी सांगितले.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, मोठमोठी संकटे आणि आक्रमणानंतरही आपली भारतीय संस्कृती आणि धर्म अबाधीत राहीले. जैन धर्म आणि या समाजाचे देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासात फार मोठे योगदान राहीले आहे. यापुढील काळातही प्राचीन भारताच्या मार्गावर तसेच भगवान जिनेंद्र यांच्या मार्गावर आपण पुढे गेले पाहीजे, असे त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, पर्यटन विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी निगडीत पर्यटन सर्किटच्या विकासाचा कार्यक्रम नुकताच हाती घेतला आहे. त्याचबरोबर नांदेड येथे नुकताच वीर बाल दिनानिमित्त शीख समाजासमवेत विशेष उपक्रम राबविण्यात आला. आता ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख 9 जैन तीर्थक्षेत्रांचा समावेश असून या क्षेत्रांची सुरक्षा, तिर्थयात्रा तसेच सुविधांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


            महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी म्हणाले की, जैन समाजाचे योगदान फार मोठे आहे. आपले मूलतत्व या समाजाने आजही जपून ठेवले आहे. आध्यात्मिक विकासासह देशाच्या सर्व क्षेत्रामध्ये जैन समाज यापुढील काळातही योगदान देत राहील, असे त्यांनी सांगितले.


            याप्रसंगी मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह यांनी त्यागाचे महत्व सांगणारे विचार मांडले. ते म्हणाले की, आपली सर्वसमावेशक संस्कृती ही त्यागावर आधारीत आहे. हा भारताचा बहुमोल असा वारसा आहे. या वारशामुळेच आपल्या देशाचे फार पाश्चिमात्यीकरण झाले नाही. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोक त्यागाची भावना घेऊन जातात. या आधारावरच ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’ कार्यक्रम राबवावा, असे त्यांनी सांगितले.





प्रमुख 9 जैन तीर्थक्षेत्रांचा समावेश


            सटाना (जि. नाशिक) येथील श्री मांगी तुंगीजी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र देवस्थान, शहापूर (जि. ठाणे) येथील मानसमंदिर (शाहपूर जैन तीर्थ), साक्री (जि. धुळे) येथील श्री बलसाना श्वेतांबर जैन तीर्थ, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील श्री जगवल्लभ पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील कुम्भोज बाहुबली जैन मंदिर, वणी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील श्री अमिझरा शंखेश्वर पार्श्वाभ्युदय तीर्थ, पाबळ (ता. शिरुर, जि. पुणे) येथील पद्म आणि जैन तीर्थ, पायधुनी (मुंबई) येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ तीर्थ, शिरपूर (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या तीर्थस्थळांचा या पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटमध्ये समावेश आहे.

Papa चे काही खैर नाही

 


जिंदगी गुलजार हैं

 



🌹

Featured post

Lakshvedhi