Wednesday, 4 January 2023

जिंदगी यही है

: *मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही,*

*परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे.*

*🙏🏻🙏🏻शुभ प्रभात🙏🏻🙏🏻*


कभी जीने की आशा,

कभी मन की निराशा,

कभी खुशियों की धूप,

कभी हकीकत की छाव,

कुछ खोकर पाने की आशा,

शायद यही है जीवन की परिभाशा  प्रतिभा आपल्याला आपल्या कारकिर्दीत उच्च स्थानावर नेईल परंतु वागणूक आपल्याला इतरांच्या हृदयात उच्च स्थान टिकवून ठेवण्यास मदत करेल


सुप्रभात .. आपला दिवस आनंदात जावो...🌹🌹🌹

मराठी तितुका मेळवावा’विश्व मराठी संमेलनाचे बुधवारी उद्घाटन

 मराठी तितुका मेळवावा’विश्व मराठी संमेलनाचे बुधवारी उद्घागटन 

                                                                      

            मुंबई, दि. 3 : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया (NSCI) येथे बुधवारी (दि.4) सकाळी 11.00 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.


            उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य, उद्योग, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींची उपस्थिती राहणार आहे.


            दि. 4 जानेवारी 2023 या पहिल्या दिवशी सकाळी 9.30 ते 11 या वेळेत लेझीम पथक, ढोलताशा पथक, मर्दानी खेळ यांच्या प्रात्यक्षिकांद्वारे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत समारंभ होणार असून त्यानंतर 11.00 वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सिने-नाट्यसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम. ‘मराठी भाषा काल, आज, उद्या’ यावर परिसंवाद, दुपारी तीन ते चार वाजता मराठी वस्त्रालंकारांचा मराठमोळा फॅशन शो, सायंकाळी 5 ते 6 या वेळेत परदेशातील निमंत्रितांचे अनुभव कथन, सायंकाळी 6 ते 7 या वेळेत लोकसंगीताचा कार्यक्रम, रात्री 7 ते 10 या वेळेत चला हसूया अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.


            दि.5 जानेवारीला स. 10 ते 11.30 या वेळेत भावगीत, भक्तीगीत, नाट्यसंगीतांचा स्वर अमृताचा कार्यक्रम, स. 11.30 ते दु. 12.30 या वेळेत भारतातील आणि परदेशातील उद्योजकांचा परिसंवाद, दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, दु. 2.30 ते 3.00 उपस्थितांची प्रश्नोत्तरे, साहित्य व संस्कृती मनोगत, दु. 3.00 ते 3.30 वाद्यमहोत्सव- ‘महाताल’, दु. 3.30 ते 3.45 स्वप्नील जोशी यांच्यासमवेत गप्पा, दु. 3.45 ते 4.45 हास्यजत्रा, सायं. 5 ते 6 परदेशातील निमंत्रितांचे अनुभव कथन, सायं. 6 ते 7 वाद्य जुगलबंदी, रात्री 7 ते 9 महासंस्कृती लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


            शुक्रवार दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते 10.00 दरम्यान दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. स. 9.30 ते 10.30 वेळेत पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, स. 9.30 ते दु. 12.00 या वेळेत इन्व्हेस्टर मीट अंतर्गत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी हे मार्गदर्शन करणार आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योजकांचा सत्कार करण्यात येणार आहे. दु. 12.00 ते 1.30 या कालावधीत आनंदयात्री या कार्यक्रमांतर्गत कविता वाचन, अभिवाचन आणि गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. दु. 3.00 ते 4.00 मुलाखत-गप्पाष्टक, दु. 4.30 ते 5.00 लावणीचा कार्यक्रम, सायं. 5.00 ते 6.00 परदेशातील निमंत्रितांचे अनुभव कथन, सायं. 6.00 ते 7.00 या वेळेत मंत्री तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप समारंभ होईल तर, रात्री 8 ते 10 या वेळेत मराठी बाणा या कार्यक्रमाने विश्व मराठी संमेलनाचा समारोप होईल.

.श्री काळुबाई देवीची यात्रा, दावजी बुवा यात्रा कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

 .श्री काळुबाई देवीची यात्रा, दावजी बुवा यात्रा कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

            सातारा दि. 3  : मांढरदेव ता. वाई येथे श्री काळुबाई देवीची यात्रा व दावजी बुवा यात्रासुरुर दि. 5 ते 7 जानेवारी  2023 या कालावधीत संपन्न होणार आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी 4 जानेवारी 2023 रोजीच्या 00.00 वाजल्या पासून  ते 4 फेब्रुवारी 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत या कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 मधील अधिकारान्वये  प्रतिबंधात्मक/बंदी आदेश तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारीवाई रणजित भोसले यांनी आदेश जारी केले आहेत.

            या प्रतिबंधात्मक/बंदी आदेशानुसार मांढरदेव परिसरामध्ये यात्रा कालावधीमध्ये पशुहत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. मांढरदेव परिसरात कोंबड्याबकऱ्याबोकड इ. प्राण्याचा बळी देण्यासहत्या करण्यास तसेच वाहनातून यात्रेच्या ठिकाणी घेवून जाण्यास मनाईप्रतिबंध करण्यात आले आहे. मांढरदेव परिसरात वाद्य आणण्यास व वाजविण्यास बंदी करण्यात आलेली आहे. मांढरदेव परिसरात तसेच देवालयाच्या परिसरात असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकण्यासलिंबू टाकणेकाळ्या बाहुल्याबिबेभानामती करणेकरणी करण्यास प्रतिबंध करण्यास आलेले आहे. मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणेतेल वाहण्यास पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे. तसेच परिसरात दारुमद्य जवळ बाळगणेवाहतूक करणेविक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

            या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

0000

            सातारा दि. 3 : मांढरदेव ता. वाई येथे श्री काळुबाई देवीची यात्रा व दावजी बुवा यात्रा, सुरुर दि. 5 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत संपन्न होणार आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी 4 जानेवारी 2023 रोजीच्या 00.00 वाजल्या पासून ते 4 फेब्रुवारी 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत या कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 मधील अधिकारान्वये प्रतिबंधात्मक/बंदी आदेश तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, वाई रणजित भोसले यांनी आदेश जारी केले आहेत.


            या प्रतिबंधात्मक/बंदी आदेशानुसार मांढरदेव परिसरामध्ये यात्रा कालावधीमध्ये पशुहत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. मांढरदेव परिसरात कोंबड्या, बकऱ्या, बोकड इ. प्राण्याचा बळी देण्यास, हत्या करण्यास तसेच वाहनातून यात्रेच्या ठिकाणी घेवून जाण्यास मनाई, प्रतिबंध करण्यात आले आहे. मांढरदेव परिसरात वाद्य आणण्यास व वाजविण्यास बंदी करण्यात आलेली आहे. मांढरदेव परिसरात तसेच देवालयाच्या परिसरात असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकण्यास, लिंबू टाकणे, काळ्या बाहुल्या, बिबे, भानामती करणे, करणी करण्यास प्रतिबंध करण्यास आलेले आहे. मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणे, तेल वाहण्यास पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे. तसेच परिसरात दारु, मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.


            या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.


0000

सिंधुदुर्ग व कोल्हापूरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे २४९ कोटींची मान्यता

 सिंधुदुर्ग व कोल्हापूरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे २४९ कोटींची मान्यताहजारो पर्यटक, प्रवाश्यांना होणार लाभ

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

            मुंबई, दि. ३ : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व दुपदरीकरणाच्या कामांस मान्यता मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांसाठी २४९ कोटी रुपये किंमतीस मान्यता दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिली. या मान्यतेमुळे दररोज या मार्गावरुन प्रवास करणारे हजारो पर्यटक तसेच साखर कारखानदार यांना याचा खऱ्या अर्थाने लाभ मिळणार आहे. 


            यासंदर्भात बोलताना मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले, या रस्त्याच्या कामाच्या मान्यतेसाठी आमच्या विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. तसेच वेळोवेळी आवश्यक पत्र व्यवहार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे करण्यात येत होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.


            मंत्री श्री. चव्हाण यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, तळेरे गगनबावडा कोल्हापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी कि.मी. ६/००० ते ११/००० आणि १९/३०० (करुळ घाट सुरु) ते ३५/३०० (गगनबावडा) च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६.५० कि.मी. व कोल्हापूर जिल्ह्यातील ४.५० कि.मी. अशा एकूण २१ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पद्धतीने दुपदरी करणे या कामाच्या रु. २४९.१३ कोटी रुपये किंमतीच्या कामास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, दिल्ली येथील स्टँडीग फायनान्स समितीने बैठकीत मान्यता दिली आहे.


            राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी हा सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग असुन मुख्यत्वे करुन साखर कारखानदारी व पर्यटनाच्या दृष्टीने या रस्त्याचे महत्व आहे. सदर रस्त्यावर करुळ घाट असून येथे पडणाऱ्या पावसामुळे करुळ घाटाची अस्तित्वातील १० कि.मी. डांबरी रस्त्याची लांबी पावसाळ्यात वारंवार खराब होऊन वाहतूकीस अडथळे येत होते. या १० कि.मी. घाट लांबीमध्ये काँक्रिटीकरण पद्धतीने दुपदरी ७ मीटर रुंदीचा काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार असून उर्वरीत - ११ कि.मी. लांबीमध्ये काँक्रिटीकरण पद्धतीने दुपदरी रस्ता + पेव्हड शोल्डर्स असा एकूण १० मीटर रुंदीचा काँक्रिट रस्ता तयार होणार आहे. यामुळे या मार्गावरुन दरदिवशी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाश्यांचा यांना लाभ मिळणार आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

दिव्यत्वाची जेथ प्रचीती





 

जिंदगी गुलजार हैं

 






Tuesday, 3 January 2023

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे राजकारण - समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला

 लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे

राजकारण - समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

          मुंबई, दि. 3 :- “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नांची जाण आणि माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझ्या पक्षाचेच नाही तर माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे. राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी - चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत”.


००००

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लढवय्या सहकारी गमावला

- मंत्री सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर, दि. 3 : “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक निष्ठावान लढवय्या सहकारी आणि लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे”, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.


ते पुढे म्हणाले, “मितभाषी, पण जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ‘चिंचवडचा ढाण्या वाघ’ असे त्यांचे वर्णन केले जायचे. गंभीर आजारातही विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकात मतदानाचे आपले लोकशाहीतले कर्तव्य पार पाडून त्यांनी एक उदाहरण घालून दिले. ईश्वर त्यांना सद्गती देवो. जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो”, असे श्री.मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.


0000



Featured post

Lakshvedhi